Monday, 18 July 2016

🌼🌼🌼साडेसाती🌼🌼🌼
साडेसाती हि साधारणपणे दर तीस वर्षाने येतेच, काहींना जन्मत:च साडेसाती असते. त्यामूळे त्यांच्या आयुष्यात जीवन त्रास, कटकटी, अडचणी येत असतात.
मात्र जीवनात साडेसाती येणार म्हणजे केवळ त्रासच होईल हा गैरसमज आहे. काहींना साडेसातीत फायदासुध्दा होतो. माझ्या एका ओळखीच्या गुरुजींची साडेसातीत तीन घर विकत घेऊन झाली, आधी भाड्याच्या घरात रहात होते.
चंद्र सप्तमात असेल तर वैवाहिक जॊडीदाराच्या बाबतीत त्रास होतो असा एक समज आहे मात्र तो कितपत खरा किंवा कितपत खोटा हे खात्रीशीर सांगणे शक्य नाही.
ज्योतिष शास्त्रात कुठलीही गोष्ट ठामपणे सांगण्यासाठी ती घटना किमान दोन-चार प्रकारे पत्रिकेत Indicate होण गरजेचे असते. त्यामूळे तूमच्या साडेसातीत तूमच्या जोडीदाराला त्रास होईल कि नाही हे समजण्यासाठी पुढील बाबी लक्षात घ्याव्यात
(१) तूमच्या पत्रिकेत चंद्र सहाव्या,, सातव्या किंवा आठव्या स्थानात असेल तर साडेसातीतील कुठली तरी अडीच वर्षे शनिचे तूमच्या पत्रिकेतील सप्तम स्थानावरुन भ्रमण होते त्याकाळात तूमच्या वैवाहीक जोडीदारास त्रास होण्याची एक शक्यता आहे.
(२) तूमच्य़ा पत्रिकेत सप्तम स्थान, सप्तमेश बिघडलेले असतील आणि सप्तमातून शनिचे भ्रमण असेल तर साडेसातीत जोडीदारास त्रास होण्याची शक्यता अधिक वाढते.
(३) तूमच्या जोडीदारास देखील शनिची पिडा असेल तसेच इतर काही ग्रहदोष असतील तर तूमच्या साडेसातीत जोडीदारास त्रास होण्याची शक्यता निर्माण होते.
साडेसाती समस्या आणि उपाय
अनेकांना अस वाटत कि साडेसाती म्हणजे केवळ त्रास अस वाटत पण शनि महाराजांकडे दंड आणि न्याय यांचे कारकत्व आहे त्यामूळे आपल्याला साडेसातीत आपल्याच पूर्वकर्माची फलिते अधिक तीव्रतेने मिळतात मग ज्याची जसी कर्म तशी फलिते मिळणार.
गर्विष्ठपणाने वागणार्‍यांना साडेसाती नक्किच जड जाते पण नम्रपणाने वागणार्‍यांच्या बाबतीत थोडी सौम्य फलिते मिळतात. आपल्याकडे कोर्टात कसे तूमची वागणूक चांगली असेल तर थोडी सहानूभूती मिळाते तसच शनि महाराज साडेसातीत करतात.
साडेसातीचा त्रास निवारण करण्यासाठी काही सोपे उपाय इथे सांगतो आहे.
(१) ॐ शं शनैश्वराय नम:! याचा रोज सकाळी आंघोळी नंतर १०८ वेळा जप करावा.
(२) रोज सकाळी आंघोळी नंतर दशरथ प्रोक्त शनिस्तूती वाचावी.
(३) मधल्या बोटात लोखंडाची अंगठी घालावी. नीलम हे रत्न वापरायचे असेल तर ते केवळ ज्योतिष तज्ञाच्या मार्गदर्शनाने घालावे.
(४) दर शनिवारी मारुतीच्या डोक्यावर तेल अर्पण करावे.

No comments:

Post a Comment