Sunday, 31 July 2016

🌼🌼🌼शिवपूजेतील काही विधीनिषेध🌼🌼🌼


पांढर्‍या अखंड अक्षता (धुतलेले अखंड तांदूळ) आणि फुले वहा !
अक्षतांकडे निर्गुण ईश्वरी तत्त्वाशी संबंधित उच्च देवतांच्या लहरी आकर्षिल्या जातात; म्हणून अधिकाधिक निर्गुणाशी संबंधित असलेल्या शिवाला त्याच्या पांढर्‍या रंगाशी साधर्म्य असलेल्या पांढर्‍या रंगाच्या अक्षता वहा. त्याचप्रमाणे शाळुंकेला निशिगंध, जाई, जुई, मोगरा यांसारखी पांढरी फुले १० किंवा १० च्या पटीत त्यांचे देठ पिंडीकडे करून वहावीत.
उदबत्ती आणि अत्तर वापरा !
उदबत्ती आणि अत्तर यांतून प्रक्षेपित होणार्‍या गंधलहरींकडे देवतांच्या लहरी लवकर आकृष्ट होतात; म्हणून शिवपूजेत केवडा, चमेली किंवा हीना या शिवाला प्रिय असणार्‍या गंधांच्या उदबत्त्या आणि केवड्याचे अत्तर वापरावे.
हळद-कुंकू वाहू नये !
हळद-कुंकू उत्पत्तीचे प्रतीक आहे; म्हणून लयाची देवता असलेल्या शिवाला हळद-कुंकू वाहू नये.

No comments:

Post a Comment