🌼🌼🌼हनुमंत आमुची कुळवल्ली |
राममंडपा वेला गेली |
श्रीरामभक्तिने फळली |
रामदास बोले तया नाव ॥🌼🌼🌼
राममंडपा वेला गेली |
श्रीरामभक्तिने फळली |
रामदास बोले तया नाव ॥🌼🌼🌼
रामदास म्हणजे समर्थ रामदास स्वामी!
त्यांनी संपूर्ण कार्य करताना हनुमंताची, मारुतीरायाची मंदिरं जागोजागी स्थापन केली. भारतात अनेक ठिकाणी समर्थ स्थापित हनुमंताची मंदिरं आजही दिसतात. सुमारे अकराशे मारुती मंदिरं समर्थांनी निर्माण केली.
त्यामधील तेलंगणमधील श्रीक्षेत्रबासरपासून ४० कि.मी. अंतरावर ’सारंगपूर’ गाव आहे. या ठिकाणी रामदास स्वामींनी हनुमंताची मूर्ती स्थापन केलेली आहे. सारंगपूरला मारुती मंदिराची स्थापना का केली असावी? यामागे घडलेली एक घटना आहे.
सारंगपूरजवळ एक तलाव आहे. यवन बादशाह इथे जुलूम करीत होता. त्याच्या राज्यात दुष्काळ पडला, पर्जन्यवृष्टी झाली नाही. पाऊस पडावा यासाठी या यवन राजाने ६० ब्राह्मणांना पकडून आणलं. त्यांच्या मुसक्या आवळल्या. त्यांना फर्मान सोडलं, ’’तुम्ही असे मंत्र म्हणा की पाऊस पडला पाहिजे. पाऊस पडला नाही तर तुमची डोकी उडविली जातील.’’ तलावाच्या काठावर त्या ६० ब्राह्मणांना उपाशी ठेवण्यात आलं. तहान-भुकेनं व्याकूळ झालेले ब्राह्मण वेदांमधील ’पर्जन्यसूक्त’ अखंड म्हणत होते. जीवाच्या भितीने व भुकेने त्रस्त झाले होते. पाऊस काही केल्या पडत नव्हता. यवन राजा सतत त्रास देत होता. अशा संकटसमयी ते भगवंताची करुणा भाकू लागले.
त्यावेळी रामदास स्वामी आपले लाडके शिष्य उद्धव स्वामींसह त्या भागातून जात होते. त्यांना ब्राह्मणांनी सगळी हकीकत कथन केली. रामदास स्वामींना ब्राह्मणांची दया आली.
समर्थ रामदास स्वामींनी एका शिलेवर कोळशाने हनुमंताचे चित्र रेखाटले. समर्थ रामदास स्वामी चांगले चित्रकार होते. त्या शिळेवर आपली छाटी घातली. त्यावर ब्राह्मणांना रुद्राभिषेक करायला सांगितला आणि काय आश्चर्य! आकाशामधून धो...धो पाऊस तप्त भूमीवर बरसू लागला. सर्व धरती पाण्याने भरुन गेली. दुष्काळ संपला. ब्राह्मणांनी रामदास स्वामींच्या पायावर लोटांगण घातली. तेवढ्यात यवन राजा आला. तो ब्राह्मणांवर खूश झाला. तेव्हा ब्राह्मणांनी विन्रमपूर्वक कथन केलं की, ’’ही शक्ती आमची नाही. हे सामर्थ्य समर्थाचे आहे. त्यांच्या शक्तीमधून पर्जन्यवृष्टीची करामत घडलेली आहे.’’
हा यवन राजा समर्थांच्या दर्शनाला आला. इतकंच नव्हे तर त्याने रामदास स्वामींचे यथासांग पूजन केले. शीलेवर समर्थांनी रेखाटलेल्या मारुतीच्या चित्राचे मूर्तीत आपोआप रुपांतर झाले. बादशाहने हनुमंताच्या मंदिरासाठी जागा देऊ केली.
समर्थ रामदास स्वामींनी एक तप नंदिनी-गोदावरी नदीच्या संगमात कमरेएवढ्या पाण्यात उभे राहून ’’श्रीराम जयराम जय जय राम’’ या त्रयोदशाक्षरी मंत्राचा जप केला. नदीकाठावर गायत्री मंत्र जपला. या काळामध्ये एक दिवस एक महाकाय वानर समर्थांच्या पुढे येऊन वाट अडवून उभे राहिले. समर्थांना काही कळेना! ते वानर वेगाने समर्थांच्या समीप आले व त्यांना आलिंगन दिले. हे वानर म्हणजे दुसरं कोणीही नसून प्रत्यक्ष मारुतीराया -हनुमंतराय होते. रामदास स्वामींना आलिंगन देऊन शक्तिसंपन्न केलं. त्यावेळी रामदास स्वामींच्या मुखातून सगळ्यांना सुपरिचित असणारं स्तोत्र स्फुरलं-

भीमरुपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती ।
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना ॥१॥
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना ॥१॥
महाबळी प्राणदाता सकळां उठवी बळें ।
सौख्यकारी शोकहर्ता धूर्त वैष्णव गायका ॥२॥

दीनानाथा हरीरुपा सुंदरा जगदंतरा ।
पातालदेवताहंता भव्यसिंदूरलेपना ॥३॥
पातालदेवताहंता भव्यसिंदूरलेपना ॥३॥
लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना ।
पुण्यवंता पुण्यशीळा पावना परितोषका ॥४॥
पुण्यवंता पुण्यशीळा पावना परितोषका ॥४॥
ध्वजांगे उचली बाहो आवश लोटता पुढे ।
काळाग्नि काळरुद्राग्नि देखतां कांपती भयें ॥५॥

ब्रह्मांडे माइलीं नेणों आंवाळे दंतपंगती ।
नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भृकुटी ताठिल्या बळें ॥६॥

पुच्छ तें मुर्डिलें माथा किरीटी कुंडलें बरीं ।
सुवर्ण कटि कांसोटी घंटा किंकिणि नागरा ॥७॥

ठकारे पर्वता ऐसा नेटका सडपातळू ।
चपळांग पाहतां मोठें महाविद्युल्लतेपरी ॥८॥

कोटिच्या कोटि उड्डाणें झेंपावे उत्तरेकडे ।
मंद्राद्रीसारखा द्रोणू क्रोधे उत्पाटीला बळें ॥९॥

आणिला मागुतीं नेला आला गेला मनोगती ।
मनासी टाकीले मागे गतीसी तुळणा नसे ॥१०॥
मनासी टाकीले मागे गतीसी तुळणा नसे ॥१०॥
अणूपासोनि ब्रह्मांडाएवढा होत जातसे ।
तयासी तुळणा कोठें मेरु मंदार धाकुटे ॥११॥

ब्रह्मांडाभोंवते वेढे वज्रपुच्छें करुं शके ।
तयासी तुळणा कैंची ब्रह्मांडीं पाहतां नसे ॥१२॥

आरक्त देखिले डोळां ग्रासिलें सूर्यमंडळा ।
वाढतां वाढतां वाढे भेदीलें शून्यमंडळा ॥१३॥

धनधान्य पशुवृध्दि पुत्रपौत्र समस्तही ।
पावती रुपविद्यादि स्तोत्रपाठेंकरूनियां ॥१४॥

भूतप्रेतसमंधादि रोगव्याधि समस्तही ।
नासती तुटती चिंता आनंद भीमदर्शनें ॥१५॥
नासती तुटती चिंता आनंद भीमदर्शनें ॥१५॥
हे धरा पंधराश्लोकी लाभली शोभली बरी ।
दृढदेहो निसंदेहो संख्या चंद्रकळा गुणें ॥१६॥

रामदासी अग्रगण्यू कपिकुळासि मंडणू ।
रामरुपी अंतरात्मा दर्शनें दोष नासती ॥१७॥

॥ इति श्रीरामदासकृतसंकटनिरसन मारुतीस्तोत्रं संपूर्णम् ॥
No comments:
Post a Comment