Sunday, 10 July 2016

🌼🌼🌼"मुंगी हा एक छोटासा जीव आहे. घर-अंगण अशा फेरीतच बिचारीचा पूर्ण दिवस निघून जातो. अशा मुंगीला जर दिल्लीला जायचे असेल तर किती दिवस लागतील ???

याची आपण कल्पना तरी करू शकतो का ??? परंतु त्याच छोट्या मुंगीने कोणा व्यक्तीचा पदर धरला किंवा कोणा व्यक्तीच्या वस्त्रावर ती चढली आणि ती व्यक्ती दिल्लीला जाणाऱ्या गाडीत जाऊन बसली तर विना परिश्रम मुंगी दुसऱ्या दिवशी दिल्ली गाठू शकते. खरे ना.
*त्याचप्रमाणे परमार्थामध्ये आपल्या सदगुरूंचा पदर पकडून त्यांनी दिलेल्या नामाच्या बळावर आपण सुद्धा भवसागराची ही अशक्यप्राय दुर्गम यात्रा विना परिश्रम पूर्ण करु शकतो...*

 *श्रीराम जय राम जय जय राम

No comments:

Post a Comment