** “ करुणात्रिपदी ” ची जन्मकथा ***
परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती ( टेंब्ये ) स्वामी महाराजांचे समग्र वाङमय हा अद्भुत चमत्कारच आहे. अत्यंत काटेकोर, व्याकरण-काव्य नियमांचा धागा न सोडता, प्रतिपादनाच्या विषयातच विविध मंत्रांची चपखल योजना करीत त्यांनी रचलेली असंख्य संस्कृत व मराठी स्तोत्रे हा भारतीय वाङ्मयातला अजरामर आणि अलौकिक असा विशेष विभाग आहे.
त्यांनी रचलेल्या भगवान श्रीदत्तप्रभूंच्या अष्टोत्तरशतनाम स्तोत्रामध्ये असे १४ मंत्र खुबीने गुंफलेले आहेत. त्यासाठी त्यांनी अनेक नवीन शब्दही निर्माण केलेले आहेत. अशाप्रकारच्या रचना करण्यासाठी विलक्षण प्रतिभा आणि भाषेवर अद्वितीय प्रभुत्व लागते.

प. प. श्री. टेंब्ये स्वामी महाराजांची एक रचना संपूर्ण जगात अतिशय प्रसिद्धी पावलेली आहे. प्रत्येक दत्तभक्त दररोज ही रचना म्हणतोच म्हणतो. त्यांची ही सुप्रसिद्ध रचना म्हणजेच ' करुणात्रिपदी ' होय !
ह्या अजरामर अशा करुणात्रिपदीची खरी जन्मकथा आपणां सर्वांसाठी सादर करीत आहोत !
एका मंदिराचा पुजारी देवाचा नैवेद्य खातो म्हणून स्वामी त्याला रागावतात व ते पाहून दत्तप्रभू चिडून स्वामींना ओरडतात की, आमचे पुजारी किंवा विश्वस्त काय करतात ते आम्हांला माहीत असते व त्यावर आमचे लक्ष असते, तेव्हा इतरांनी त्या फंदात पडू नये.....इत्यादी. मग स्वामी त्यांची क्षमा मागून ही करुणात्रिपदी रचून त्यांची करुणा भाकतात ; अशा स्वरूपाची ती पूर्णपणे खोटी गोष्ट सर्वत्र प्रसारीत होत होती.
ही गोष्ट तर आपल्या चुकांवर रितसर पाघरूण घालण्यासाठीच कोणीतरी मुद्दाम रचलेली आहे, हे स्पष्ट दिसून येते. असा कोणताही प्रसंग प. प. टेंब्येस्वामींच्या चरित्रात कधीही घडलेला नाही.
करुणात्रिपदीची रचना होण्यामागे एक महत्त्वाची गोष्ट घडलेली होती, तीच या लेखातून आम्ही आवर्जून सांगत आहोत.
श्रीक्षेत्र नरसोबाचीवाडी ही श्रीदत्तप्रभूंची राजधानी मानली जाते. या स्थानावर भगवान श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे बारा वर्षे वास्तव्य झालेले आहे. त्यांच्या ' मनोहर पादुका ' कृष्णा काठावरील औदुंबर वृक्षाखाली स्थापित असून सर्व दत्तभक्तांचे हे अतीव प्रेमादराचे स्थान आहे. या वाडीच्या नित्यपूजेची व उत्सवांची सर्व पद्धत आणि आचारसंहिता-नियमावली स्वत: प. प. श्री. टेंब्ये स्वामींनीच घालून दिली आहे. त्यानुसार चातुर्मास्यातील आषाढ पौर्णिमा ते दसरा हा अडीच महिन्यांचा काळ सोडता उर्वरित वर्षभर दररोज संध्याकाळी येथे श्रींची पालखी प्रदक्षिणा असते.
इ.स.१९०५ मध्ये एकेदिवशी वाडीला पालखी प्रदक्षिणा सुरू असताना, पुजारी गुंडोपंत खोंबारे यांच्या हातून श्रींची उत्सवमूर्ती पालखीतून खाली आली. हा भलताच अपशकुन पाहून सगळे घाबरले. नक्कीच भविष्यात काहीतरी संकट येणार असून त्याचीच ही पूर्वसूचना आहे, असे जाणून ते सगळे पुजारी प्रचंड घाबरले. त्यावेळी प. प. श्री. टेंब्ये स्वामी हिंगोली जिल्ह्यातील नरसी (नामदेव) येथे चातुर्मास्यानिमित्त मुक्कामाला होते. पुजारी मंडळी त्यांना भेटायला गेली. त्यांच्या तोंडून सर्व हकीकत ऐकल्यावर प. प. श्री. टेंब्ये स्वामी ध्यानाला बसले.
ध्यानात त्यांनी दत्तप्रभूंना कारण विचारले, त्यावर देव क्रोधाविष्ट होऊन म्हणाले, " तू घालून दिलेल्या नियमांनुसार हे लोक वागत नाहीत, पादुकांवर अशुद्ध पदार्थ घालतात, तुझी निंदा करतात. आम्हांलाच तेथे राहायचा कंटाळा आलाय. पंच नेमून परभारे व्यवस्था करावी ! " ध्यानातून उठल्यावर प. प. श्री. टेंब्ये स्वामींनी पुजाऱ्यांना रोषाने सांगितले की, " जर दुर्वर्तन सुधारून श्रींची योग्य प्रकारे सेवा करणार नसाल तर काय भयंकर परिणाम होतील ते आम्ही सांगू शकत नाही. तुम्ही आपले वर्तन सुधाराल तर ठीक, नाहीतर तुम्ही जाणे आणि तुमचे देव जाणे !
पुजाऱ्यांनी हात जोडून पुन्हा पुन्हा क्षमा मागितल्यावर व नीट वागण्याची, जशी घालून दिली आहे त्याबरहुकूम सेवा करण्याची हमी दिल्यावर प. प. श्री. टेंब्ये स्वामींनी कळवळा येऊन भगवान श्रीदत्तप्रभूंची प्रार्थना केली. त्याचवेळी त्यांनी ही तीन पदांची करुणात्रिपदी रचून ती दररोज प्रार्थनापूर्वक म्हणण्याची पद्धत घालून दिली. आजही पालखीच्या तिसऱ्या प्रदक्षिणेला तीन थांब्यांवर ही त्रिपदी म्हटली जाते.
' करुणात्रिपदी ' ही नावाप्रमाणेच करुणा भाकणारी, झालेल्या अपराधांची क्षमा करावी अशी प्रार्थना करणारी अतीव भावपूर्ण, मंत्रमय व रसाळ रचना आहे. यातून श्रीस्वामी महाराज, भगवान श्रीदत्तप्रभूंना विनवणी करीत आहेत. देवांना त्यांच्या लीलांची आठवण करून देऊन त्या लीलांमध्ये जशी तुम्ही भक्तांवर, शरणागतांवर क्षमापूर्वक कृपा केलीत तशीच आमच्यावरही करा, आमच्याकडून सेवा निरंतर करवून घ्या. आईच्या मायेने आमचे दोष पदरात घेऊन आम्हां सर्वांवर मायेचे कृपाछत्र घाला, अशी अत्यंत दयार्द्र होऊन भगवंतांची ते प्रार्थना करीत आहेत.
आज श्रीदत्तप्रभूंच्या सर्वच क्षेत्रांमध्ये, दत्त संप्रदायातील संतांच्या स्थानांवर ही करुणात्रिपदी दररोज आरतीनंतर विनवणी म्हणून म्हणायची पद्धतच पडलेली आहे. साक्षात् दत्तावतार प. प. श्री. टेंब्ये स्वामींचेच हे प्रासादिक, मंत्रमय शब्द असल्याने, आजवर अनेक भक्तांचा असा अनुभव आहे की, करुणात्रिपदीच्या भावपूर्ण गायनाने श्रीदत्तप्रभूंची कृपा नक्की होतेच. अपराधक्षमापनासाठीच्या उपलब्ध काव्यांमधील, एकमेवाद्वितीय, अद्भुत व अलौकिक काव्य म्हणून करुणात्रिपदीला सर्वदूर मान्यता आहे !
संपूर्ण जीवजगत ज्या नियमचक्राला बांधलेलं असतं, ती ही कर्मगती मोठी विलक्षण असते. कर्माची ही गती खरोखरच कोणाला समजत नाही. पूर्वजन्मांत कधीतरी निर्माण केलेली गती आज विस्मृतीत गेली, तरी तिचे परिणाम शिल्लक राहतात आणि त्या गतीच्या प्रतिक्रिया भोगताना पुन्हा ज्या काही क्रिया घडतात, त्यांची सुद्धा गती निर्माण होते आणि तेही परिणाम भोगायला लागतात, म्हणूनच ‘कर्मणो गहना गति:’ हे भगवान श्रीकृष्णाचे शब्द अगदी नि:संदिग्ध आणि सार्थ आहेत.
अशा वेळी प्रत्येक मनुष्याच्या हाती एकच स्वातंत्र्य असतं, भविष्य सुधारण्यासाठी सत्कर्म करत राहणं आणि वर्तमानातील भोगगती सुसह्य व्हावी म्हणून व्यक्तिगत अहंकार सोडून देऊन सदगुरुतत्वाला प्रार्थना करत राहणं. कृतकर्माच्या पश्चात्तापासह जेव्हा आपल्या मनात स्वतःबद्दलची करुणा उद्भवते, तेव्हा तीच करुणा कृपेचं रूप घेऊन सदगुरुतत्वातही प्रकटते.
कीव आणि करुणा ह्यांच्यात एक मूलभूत फरक आहे. जेव्हा एखाद्याबद्दल कीव येते, तेव्हा त्यात त्या व्यक्तीच्या अंधार्या भविष्याची सावली असते, त्या व्यक्तिचं अध:पतन समोर दिसत असतं. तसा प्रकार करूणेत अनुस्यूत नाही. करुणा ही या व्यक्तीच्या भल्यासाठी वाटते, त्यात त्या व्यक्तीच्या त्याचं भविष्य सुधारण्याच्या क्षमतेवर एक प्रकारचा विश्वास व्यक्त झालेला असतो. एखाद्या व्यक्तिचा चांगल्याकडे वळण्याचा निश्चय जेव्हा होतो, तेव्हा त्याच व्यक्तीबाबत वाटणारी कीव करुणेत रुपांतरीत होते.
हयाच न्यायाने सदगुरुतत्वाला आपली कीव न वाटता करुणा वाटावी, हा मूळ उद्देश कोणत्याही अध्यात्मसाधनेचा असतो. त्यासाठी मग स्तोत्र, मंत्र, नामजप, यज्ञ असे कित्येक तपप्रकार असू शकतात. असाच मूर्तिमंत कारुण्याचा आविष्कार असणारी स्तोत्ररचना म्हणजे सर्वसामान्यांना जमेल, रुचेल आणि भावेल अशी ही प.पू. श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराजकृत "करुणात्रिपदी" आहे. यात स्वामी महाराजांसारख्या कनवाळू सत्पुरुषाचं कारुण्य तर प्रतिबिंबित झालं आहेच, पण मोह हीच ज्यांच्या कर्मामागील चालकशक्ती असते, अशा सर्वसामान्यांच्या भूमिकेवर उतरून आईच्या मायेने त्यांनी साधना मार्गाची ही त्रिपदी, म्हणजे तीन पावलं जणू भक्ताचं बोट धरून चालायला शिकवली आहेत. सत्कर्माच्या परिणामांतही निसर्गनियमाप्रमाणे जे कालांतर जातं, त्या कृपा-प्रतीक्षेच्या काळातही मनोबल वाढवण्याची क्षमता, तेवढं सामर्थ्य करुणात्रिपदीत आहे. प्रत्येकाने या स्तोत्रातालं स्वयंसिद्ध सामर्थ्य जरूर अनुभवावं.
ह्या स्तोत्रात जरी दत्तावाताराचं वर्णन असलं, तरी त्यात अवगुंठित झालेली कर्मकहाणी सर्वसामान्यांची असल्याने भगवान दत्तात्रेयांच्या ठिकाणी ईश्वरशक्तीचं आपलं आवडतं प्रतीक कल्पून ह्या त्रिपदीचं पठण सर्वांनी अवश्य करावं. ईश्वरीकृपेचा सहज सोपा मार्ग दाखवणाऱ्या ह्या करुणात्रिपदीचं अंतरंग सर्व भक्तांना समजावं, उमजावं आणि जाणवावं हीच सद्गुरुतत्त्वाचरणी प्रार्थना.

प्रार्थनेचा आदर्श वस्तुपाठ असणाऱ्या या करुणात्रिपदीची ही रंजक जन्मकथा देखील विशेषच म्हणायला हवी.
प. प. श्री. टेंब्येस्वामी त्रिपदीचा समारोप करताना श्रीदत्तमहाराजांकडे फार सुंदर मागणे मागतात,
प्रार्थी वासुदेव पदीं ठेवी भाव ।
पदीं देवो ठाव , देव अत्रिनंदन ॥
पदीं देवो ठाव , देव अत्रिनंदन ॥
देवा सद्गुरुराया अत्रिनंदना, मी आपल्या श्रीचरणीं प्रेमभाव ठेवून प्रार्थना करतो की, आपण मला कायमच आपल्या पदी ठाव द्यावा, आपल्याच श्रीचरणीं निरंतर सेवारत ठेवावे. करुणात्रिपदीच्या सतत अनुसंधानाने, श्री. टेंब्येस्वामींच्या या मागणी प्रमाणे, करुणावरुणालय भगवान श्रीदत्तप्रभू तुम्हां-आम्हां सर्वांवर कृपावर्षाव करोत
No comments:
Post a Comment