- *गणपतीचे तोंड दक्षिण दिशेला असू नये. उत्तर दिशा चालेल. कारण पूजा करणाऱ्याचे तोंड जरी दक्षिणेला झाले तरी समोर गणपती असल्याने दिशादोष नाही. शिवाय दक्षिण भारतात देवाच्या समोर साष्टांग नमस्कार न घालता बाजूने घालतात. तसेच एकदम देवाच्या समोर न घालता किंचित बाजूला बसणे योग्य असते.
- *गणपती दीड, पाच, सात, नऊ, अकरा, एकवीस दिवस ठेवण्याची पद्धत आहे. घरातील गणपती जास्तीत जास्त बहुतांश अकरा दिवस पर्यंत ठेवतात.
- एकावर्षी जास्त दिवस गणपती ठेवला म्हणून दरवर्षी किंवा पुढे 3-5 वर्षे तसा ठेवायलाच हवा असा नियम नाही.
- *विसर्जनाच्या दिवशी मंगळवार अथवा मूळ नक्षत्र असेल तरी गणेश विसर्जन करता येते.
- नागपंचमीचा सण काही कारणाने न करता आल्यास गणपती पूजनाला त्याची काही बाधा नाही. चतुर्थीच्या गणेशपूजनापूर्वी किंवा अगोदरच्या दिवशी नागपूजा करायला हवी असे सांगतात. हे चूक आहे. तसे करण्याची गरज नाही. हे दोन वेगवेगळे सण असून एकाचा दुसऱ्याशी काही संबंध नाही.
- नागावर वाहिलेले जानवे काढून ठेवून नंतर तेच गणपतीला वाहतात, हे चूक आहे.
- *काही कारणास्तव गणेशचतुर्थीला गणपती पूजतात आली नाही, तर पुढे आश्विन शुक्ल चतुर्थी (पुढील महिन्यातील विनायकी) दिवशी सकाळी गणपती पुजून करून संध्याकाळी विसर्जन करतात. ही प्रथा-परंपरा आहे; मात्र त्यावेळीही पूजा न घडल्यास पुढे करत नाही व त्यावर्षी त्या व्रताचा लोप समजावा.
- *प्रथम वर्षी गणपती पाच दिवस ठेवला म्हणून कायम पाच दिवस ठेवायला हवा असा निर्बंध नाही.
- स्त्रियांना पूजा करता येते. शक्यतो अशाप्रसंगी गणपतीला जानवे ब्राह्मणाकडून घालून घ्यावे.
- पत्नी (रजस्वला) असताही नवऱ्याला पूजा करता येते. मासिक पाळीच्या पाचव्या दिवसापासून स्त्रियांनाही पूजा करता येते.
- *गरोदरपणी पाच महिने पूर्ण होईपर्यंत सर्व धार्मिक कार्यांत तिचा सहभाग चालतो. परंपरेनुसार गरोदर स्त्रीची दुसऱ्याने ओटी भरावी, तिने दुसऱ्याची भरू नये असे मानतात. देवतेची ओटी मात्र गरोदर स्त्रियांनी भरता येते.
- *एखाद्याचे मृत्यूकार्य केले असता वर्षभर काही करता येत नाही ही चुकीची समजूत आहे. परंपरागत वार्षिक सर्व कार्ये करावी . लोकोपवादासाठी सरंजाम टाळावा.
- या उत्सवात अशौच म्हणजे सोयर-सुतक अचानक येऊ शकते. त्या अनुषंगाने निर्णय पंचांगात दिलेले असतात.
- *सोयेर(जन्मामुळे) आल्यास दुसऱ्याकडून हे व्रत पूजा करण्यास हरकत नाही; मात्र सुतक (मृत्यूमुळे) आल्यास हे व्रत करू नये. तसेच असे नाजूक निर्णय समाज व कुटुंबीय यांतील जाणकार व्यक्तीच्या सहमतीने घेणे योग्य.
- *गणपती पूजनानंतर प्रथम वर्षी सत्यनारायण- सत्यविनायक केल्यास दरवर्षी करावे लागेल म्हणून लोक घाबरतात. यात काही तथ्य नाही. ही दोन वेगवेगळी व्रते आहेत.
- घरातच मृत्यूसारखी घटना घडल्यास मागील दरवाजाने गणपती नेऊन विसर्जन करावे असे सांगतात, त्यात अर्थ नाही.
- *गणपतीच्या पूजनानंतर मृताशौच (सुतक ) आल्यास दुसऱ्या व्यक्तीकडून गणपतीची पूजा, महानैवेद्य दाखवून पूजा विसर्जन व मूर्ती विसर्जित करावी.
- *मूर्ती पूजण्यापूर्वी (स्थापना) मूर्तीच्या अवयवांना धक्का लागून मूर्ती भग्न झाली तर ती लगेच बदलावी. पूजनापासून उत्तरपूजेपर्यत काही विपरीत घडणार नाही याची काळजी घेणे. तसे घडल्यास मूर्ती विसर्जित करावी व नंतर घरात दोषपरिहारार्थ पुरोहितांकडून वैदिक कार्य करून घेणे. पैकी उत्तरपूजा झाल्यानंतर विसर्जनाच्या वेळी काही विपरीत घडल्यास दोष नाही.
- *काही आततायी माणसे घरासमोर मुद्दामहून गणपती ठेवून समस्या निर्माण करतात. घराबाहेर अशी मूर्ती ठेवल्यास अपमान न करता घरात आणून ठेवावी व पूजा न करता योग्यवेळी विसर्जन करावी किंवा मंदिरात नेऊन ठेवावी.
- *तुम्हाला गणपती पूजायची इच्छा असेल तर तो कुणी ठेवायलाच हवा असे नाही. तुम्ही स्वतः आणून पूजायला हरकत नाही.
- *गणेश मूर्तीच्या पूजनानंतर प्राणप्रतिष्ठा ते उत्तरपूजेपर्यंत मूर्ती आसनावरून अजिबात हलता नये हे लक्षात ठेवावे.
- *अगडबंब गणपती करणे टाळावे. गणपतीवर जी माटोळी बांधतात तिची काही फळे काही दिवसांनी तुटण्याची शक्यता असते. मूर्तीला धक्का पोचू नये अशी माटोळीची रचना असावी.
- *आरास करताना विजेचे शॉट सर्किट होणार नाही, याची काळजी घ्यावी. मुलांना समईवर फुलज्योती पेटविण्याची सवय असते. अशा गोष्टी टाळाव्यात.
- *काहीजण अगोदरच्या दिवशी रात्री गणपती दरवाजावर ठेवून पळ काढतात. पण अशा वेळी मूर्तीला पाऊस, कुत्रा वगैरे पासून तसेच मालकाने दरवाजा उघडल्यावर मूर्तीला धक्का बसणार नाही, ही काळजी घ्यावी.
- *प्रखर उष्णतेचे दिवे मूर्तीवर लावल्यास रंग उडण्याची भिंती असते. शिवाय समई खाली कागद ठेवणे, अगरबत्ती व कापूर देवाच्या एकदम जवळ ठेवणे टाळावे.
- *अभिषेक वगैरे करताना फुलं किंवा दूर्वा घेऊन पाणी घालावे. पंचामृतही असेच वहावे अन्यथा मूर्तीचा रंग उडू शकतो.
- *गल्लीबोळातून सार्वजनिक गणेशोत्सवाचे 'फॅड' माजले आहे. हा एक धार्मिक सण आहे. त्यामुळे शक्य त्या प्रमाणात सोवळे -ओवळे. आचार संहिता पाळणे आवश्यक आहे.
- *अगडबंब गणपती करणे टाळावे. त्याचे संरक्षण व विसर्जन त्रासिक असते. खाद्यपदार्थ/नाशवंत वस्तूंचे (देवतांचे आकार) गणपती करणे कटाक्षाने टाळावे.
- *बहुतांशी हरितालिका (तय )अगोदरच्या दिवशी येते. काही लोक तय झाल्याशिवाय माटोळी बांधता येत नाही असा कायदा सांगतात. वास्तविक माटोळी ही आरास असून तिचा हरितालिकेशी संबंध नाही.
- *हरतालिका (तय) आणि गणेशचतुर्थी कधी एकाच दिवशी असतात. ही दोन वेगवेगळी व्रते आहेत. तथापि माटोळी-आरास अगोदर करावी. शक्यतो अशा प्रसंगी हरतालिका (तर) पूजा अगोदर करणे शास्त्रसंमत मानतात.
- *एखाद्या तिथीचा क्षय होऊन अनंत चतुर्दशी दहाव्याच दिवशी येते. अकरा दिवसांचा गणपती म्हणतात पण तरीही दहाव्या दिवशी अनंत चतुर्दशीला विसर्जन करता येते. रुढीनुसार अकराच दिवस ठेवायचा तर अशा वर्षी आपल्या प्रथेनुसार विसर्जन करावे.
- *पूजा करणाऱ्या व्यक्तीनेच उत्तररपूजा करावी असा नियम नाही.
- *एक दिवसाच्या गौरी (ज्येष्ठागौर-देवी) असतात त्या गौरी पूजनाच्या दिवशी सकाळी आणून दुपारी पूजन करून संध्याकाळी विसर्जित कराव्या.
- *बहुतेक सर्व ठिकाणी सार्वजनिक पूजेमध्ये (जेवणाचा) महानैवेद्य दाखवण्याची पद्धत नाही.
- *सत्यनारायण, सत्यविनायक गणेश विसर्जनाच्याच दिवशी काही कारणाने करणे भाग पडल्यास पूजाविधी संपन्न झाल्यानंतर संध्याकाळी/रात्री गणेशविसर्जनाच्या वेळी दोन्ही उत्तरपूजा करणे.
- *घरामध्ये एकादशी दिवशी सत्यनारायण व त्याच रात्री गणेशविसर्जन नक्की झाले, तर सत्यनारायण मांडावळ किंचित बाजूला करावी, ज्यामुळे गणेश विसर्जनाच्या वेळी मूर्ती काढताना त्रास होणार नाही व दुसऱ्या दिवशी महानैवेद्याने सत्यनारायण व्रताची सांगता, उत्तरपूजा करावी.
No comments:
Post a Comment