🌼🌼🌼*श्री गोंदवलेकर महाराजांनी आपल्या साधकांसाठी चार अनमोल रत्ने दिली आहेत.*🌼🌼🌼
*१) पहिले रत्न आहे...माफी*
*तुमच्यासाठी कोणीही काहीही बोलू द्या, ते कितीही क्लेशदायक असले तरीही आपल्या मनावर घेऊ नका आणि त्यासाठी प्रतिकार ही करु नका व ती भावनाही मनात ठेवू नका. उलट त्यांना माफ करा.*
*२) दुसरे रत्न..विसरून जाणे*
*आपण केलेले उपकार नेहमी विसरून जा. कधीही त्या केलेल्या उपकाराचा पुनर्उच्चार, प्रतिलाभ, लोभ ठेवू नका.*
*३) तिसरे रत्न...विश्वास*
*नेहमी आपल्या मेहनतीवर आणि श्री रामरायांवर अतुट विश्वास ठेवा. हेच खरे सफलतेचे सूत्र आहे.*
*४) चौथे रत्न...वैराग्य*
*हे नेहमी लक्षात ठेवा की जसा आपला जन्म झाला आहे, तसाच एक दिवस आपला मृत्यू ही आहेच म्हणून लीन होऊन आनंद घ्या व वर्तमानात जगा.*
No comments:
Post a Comment