🌼🌼🌼देवीला कुंकुमार्चन करणे म्हणजे काय ?🌼🌼🌼
त्या संबधी कोणती काळजी घ्यावी?
कुंकुमार्चनाचे शास्त्र अथवा फायदे काय ?
♦ देवीचा नामजप करत एक-एक चिमूटभर कुंकू देवीच्या चरणांपासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत वहावे अथवा देवीचा नामजप करत तिला कुंकवाने स्नान घालने म्हणजेच कुंकुमार्चन होय.
कुंकुमार्चन करताना देवीची प्रतिमा अथवा श्री यंत्र अथवा प्रतिकात्मक वस्तु (सुपारी,यंत्र,ताम्रपट,सुवर्णपट )पात्रात घेऊन सुचिर्भुत करुन घ्यावे. त्यानंतर करंगळी व चाफेकळी बोटाचा स्पर्श न करता केवल अंगठा तर्जनी व मधील बोट यानीच कुंकुम घेऊन देवीच्या चरणापासुन मस्तकापर्यंत वाहावे. अथवा कुंकवाने स्नान घालावे.
कुंकवात शक्तीतत्त्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते; म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते.जागृतमूर्तीतील शक्तीतत्त्वकुंकवात येते. नंतर ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते.
कुंकुमार्चन करण्यासाठी विषेश दिवसाची जसे पोर्णिमा , अमावस्या , गुरुपुष्यामृत योग ,लक्ष्मीपुजन , मंगळवार , शुक्रवार निवड करावी.कुंकुमार्चन करताना देवीची प्रतिमा अथवा श्री यंत्र अथवा प्रतिकात्मक वस्तु (सुपारी,यंत्र,ताम्रपट,सुवर्णपट )पात्रात घेऊन सुचिर्भुत करुन घ्यावे. त्यानंतर करंगळी व चाफेकळी बोटाचा स्पर्श न करता केवल अंगठा तर्जनी व मधील बोट यानीच कुंकुम घेऊन देवीच्या चरणापासुन मस्तकापर्यंत वाहावे. अथवा कुंकवाने स्नान घालावे.
कुंकवात शक्तीतत्त्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते; म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते.जागृतमूर्तीतील शक्तीतत्त्वकुंकवात येते. नंतर ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते.
‘मूळ कार्यरत शक्तीतत्त्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झाली अाहे. शक्तीतत्त्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकवाने करतात. कुंकवातून प्रक्षेपित होणार्या गंधलहरींच्या सुवासाकडे ब्रह्मांडातील शक्तीतत्त्वाच्या लहरी अल्प कालावधीत आकृष्ट होत असल्याने मूर्तीतील सगुण तत्त्वाला जागृत करण्यासाठी लाल रंगाचे दर्शक, तसेच देवीतत्त्वाला प्रसन्न करणार्या गंधलहरींचे प्रतीक म्हणून कुंकवाच्या उपचाराला देवीपूजेत अग्रगण्य स्थान दिले आहे. मूळ शक्तीतत्त्वाच्या बिजाचा गंध हाही कुंकवातून दरवळणार्या सुवासाशी साधर्म्य दर्शवणारा असल्याने देवीला जागृत करण्यासाठी कुंकवाचे प्रभावी माध्यम वापरले जाते.’
अशा प्रकारे कुंकुमार्चन करुन अर्पन केलेले साठलेले कुंकुम एका डबीत ठेवावे अक्षय लक्ष्मी प्राप्ती तथा कार्यसिध्दीसाठी याची सहायता होते.
*श्रीराम जय राम जय जय राम*
No comments:
Post a Comment