🌼🌼🌼प्रदोष म्हणजे नक्की काय आहे ?🌼🌼🌼
प्रदोष व्रत हे कलियुगा मध्ये अतिशय मंगलमय आणि भगवान शिवाची कृपा प्रदान प्रदान करणारे आहे.
स्त्री अथवा पुरूष कोणीही स्वकल्याणासाठी हे व्रत करू शकतात.
प्रदोष व्रत केल्याने आपले सारे दोष नाहीसे होतात.
आठवड्यातील सात दिवसांतील प्रदोष व्रताचे विशेष असे महत्व आहे.
[१] रविवारी प्रदोष व्रत केल्यास आपले शरीर निरोगी राहते.
[२] सोमवारी प्रदोष व्रत केल्याने आपल्या मनातील इच्छा पूर्ण होते.
[३] मंगळवारी प्रदोष व्रत केल्याने आपणांस रोगांपासून मुक्ती मिळते आपण स्वस्थ आणि समृद्ध राहतो.
[४] बुधवारी प्रदोष व्रत केल्याने आपली कार्य सिद्धी होते.
[५] गुरुवारी प्रदोष व्रत केल्याने शत्रुनाश होतो.
[६] शुक्रवारी प्रदोष व्रत केल्याने सौभाग्याची वृद्धी होते.
[७] शनिवारी प्रदोष व्रत केल्याने पुत्रप्राप्ती होते.
या व्रताचे महात्म्य पूजनीय गंगा मातेच्या किनाऱ्यावर शुभ मुहूर्तावर वेदऋषी आणि भगवंताचे
भक्त श्री सुत महाराजांनी श्री सनकादि ऋषींना सांगितले.
श्री सुत महाराज म्हणाले कि या कलियुगात मनुष्य धर्मचरणापासून भटकून अधर्माच्या मार्गावरून जात असेल,प्रत्येक
ठिकाणी अन्याय आणि अनाचार माजला असेल,मनुष्य आपल्या कर्तव्याला विसरून
नीच कर्म करीत असेल,तर अशा वेळी प्रदोष व्रत असे व्रत असेल कि ते व्रत त्या
मनुष्याला भगवान शिवाच्या कृपेला पात्र बनवून पुण्य कर्माचा संचय होवून मनुष्यास उत्तम लोकाची प्राप्ती होईल आणि
स्वर्गीय सुख मिळेल.श्री सुत ऋषींनी सनकादि ऋषींना असे हि सांगितले कि प्रदोष व्रताने मनुष्याचे
सर्व प्रकारचे कष्ट दूर होवून पापांपासून मुक्ती मिळेल.हे व्रत अति कल्याणकारी आहे.या व्रताच्या प्रभावाने शुभ आणि इष्ट
गोष्टीची प्राप्ती होते.
प्रदोष व्रत विधी
~~~~s~~~~
●प्रत्येक पक्षातील त्रयोदशीला प्रदोष व्रत करता येते.सूर्यास्त झाल्या नंतर रात्र होण्याच्या पूर्वीचा कालावधी म्हणजे प्रदोष
काळ होय.
●या व्रतात भगवान श्री शंकराची पूजा केली जाते.या व्रतात व्रतस्थ व्यक्तीने निर्जल राहून व्रत करावयाचे असते.
●प्रातःकाळी स्नान करून भगवान श्री शंकराला बेल पत्र,गंगाजल अक्षता धूप दीप ओवाळून पूजा करावी.संध्याकाळी प्रदोष
समयी सुद्धा अशीच अभिषेक युक्त पूजा करावी.अशा रीतीने प्रदोष व्रत करण्याने
●व्रतस्थ व्यक्तीला महत पुण्य प्राप्ती होते मनोवांछीत कामे पूर्णत्वास येतात.
ॐ नमः शिवाय
जय श्री राम जय हनुमान
No comments:
Post a Comment