Monday, 11 July 2016

🌼🌼🌼गंगा नदीत विसर्जन केलेल्या अस्तीका, आखेर जातात कोठे?🌼🌼🌼

पतित पावन "गंगा" नदीला देवी मानतात, कारण शास्त्रानुसार "गंगा" स्वर्गातुन धरतीवर आली आहे. मानतात कि गंगा श्री हरि विष्णुच्या चरणातुन प्रकट होऊन भगवान शिव शंकाराच्या जटांमध्ये स्थिरावली आहे. श्री हरि आणि भगवान शिव शंकर ह्यांच्याशी घनिष्ठ संबध असल्या कारणांमुळे तिला पतित पावन म्हणले जाते.गंगा नदीत स्नान केल्याने सर्व पाप धुवुन जाते असेही मानतात.
एके दिवशी गंगा नदी श्री हरिला भेटण्यासाठी स्वयं वैकुंठास गेली, आणि तेथे जावुन त्यांना बोलली, "प्रभु ! माझ्या जल मध्ये स्नान केल्याने सकलांचे पाप नष्ट होतात, पण मी एवढ्या पापाचे ओझं कसे सांभाळु? माझ्यात जे पाप सामावलेले आहे, त्या पापाचा कसा नाश करु?
ह्यावर श्री हरी उत्तरले, "गंगा ! जेव्हा साधु, संत, वैष्णव येवुन स्नान करीन, तेव्हा आपोआप सर्व पाप विरघळुन जाईन."
गंगा नदी इतकी पवित्र आहे, की प्रत्येक हिन्दुची शेवटची ईच्छा आसते की आपल्या अस्तीका गंगेत विसर्जित व्हावे. पण ह्या अस्तीका आखेर जातात कोठे?
ह्याचे उत्तर साक्षात वैज्ञानिक सुध्दा देवु शकले नाही , कारण असंख्य प्रमाणात अस्तीकांचे विसर्जन केल्या नंतरही गंगा नदी पवित्र आणि पावन आहे. गंगासागर पर्यंत शोध घेवुन सुध्दा हा प्रश्न सुटला नाही.
सनातन धर्माच्या मान्यतेनुसार मृत्यु पावलेल्याच्या आत्म्यास शांति लाभ होण्यासाठी मृत व्यक्तिची अस्तीका गंगेत विसर्जन करणे उत्तम मानले आहे. ह्या अस्तीका सरळ श्री हरीच्या चरणी वैकुंठास जातात. ज्या व्यक्तिचा शेवट समय गंगेच्या सानिध्यात होतो, त्यास मरणोपरांत मुक्ति भेटते. ह्या भावनेने गंगे बद्दल हिन्दुची श्रध्दा स्वभाविक आहे.
वैज्ञानिक दृष्टिने पाहीले तर गंगा जल मध्ये पारा अर्थात (मर्करी) विद्यमान आहे, ज्यामुळे हाडातील कॅल्शियम आणि फोस्फोरस पाण्यात विरघळण्यास मदत होते, जो जलजंतुसाठी एक पोशक आहार होतो. वैज्ञानिक दृष्टीने हाडात गंधक(सल्फर) विद्यमान आहे, जो पारा समवेत मिळुन पारद तयार होतो. ह्याच बरोबर हे दोन्ही मिळुन मर्करी सल्फाईड साल्ट तयार करते. हाडातील शिल्लक राहीलेले कॅल्शियम पाण्याला स्वच्छ ठेवण्यास मदत करते. धार्मिक दृष्टीने पाहीले तर पारद भगवान शिवाचे प्रतिक आहे, आणि गंधक शक्तिचे प्रतिक आहे. सर्व जीव आखेर शिव आणि शक्तित विलीन होतात.
।। हर हर गंगे ।। ।। नम: शिवाय ।।
*श्रीराम जय राम जय जय राम

No comments:

Post a Comment