Wednesday, 27 July 2016

🌼🌼🌼अब्दुल कलाम यांचे पुण्यस्मरण...🌼🌼🌼


रामेश्वरमधील कनिष्ठ मध्यमवर्गात जैनुलद्दीम कलाम या अशिक्षित पण बहुश्रुत पित्याच्या व सहनशील मातेच्या पोटी अब्दुल कलाम यांचा जन्म १९३१ साली झाला. रामेश्वरम ते धनुष्कोडी असा प्रवास करणाऱ्यांचे नाविकाचे काम करणे हा वडिलांचा व्यवसाय. सीताराम कल्याण या वार्षिक महोत्सवात रामाची मृर्ती आणण्याचा मान त्यांच्या नावेला मिळत होता. ते धार्मिक वृत्तीचे होते. शिवमंदिराचे मुख्य पुजारी पाक्षी लक्ष्मणशास्त्री हे त्यांचे घनिष्ट मित्र. त्या दोघांची आध्यात्मिक चर्चा ऐकण्यात कलामांचे बालपण गेले.
सर्वधर्मसमभावाची शिकवण लहानपनापासुन त्यांचा मनावर ठसलेली होती. प्राथमिक शिक्षण आटोपून पुढील शिक्षणानंतर त्यांना हवाई दलात जायचे होते. त्याआधी भौतिकशास्त्रातील पदवी घेऊन त्यांनी मद्रास (चेन्नई) इन्स्टीटयूट ऑफ टेकनोलॉजीत प्रवेश घेतला. तिथे त्यांनी एरोडायनॉमिक्सचा परिचय करून घेतला व उड्डानाच्या क्षेत्रातच जीवन व्यतीत करण्याचा निर्धार केला. पण हवाईदलात त्यांना प्रवेश मिळाला नाही. तेव्हा ते मानसिक शांति करीता स्वामी शिवनंदांच्या आश्रमात जाऊन पोहोचले. त्यांच व्यक्तिमत्व पाहून कलाम खुप प्रभावित झाले. जेव्हा त्यांनी स्वामीजींना आपला परिचय दिला तेव्हा स्वामीजी त्यांना मोठ्या आपुलकिने भेटले. कलाम या भेटिबद्दल लिहतात की माझ्या मुस्लिम नावाची स्वामींनी जरादेखिल प्रतिक्रिया नाही दिली. मी त्यांना जेव्हा माझ्या असफलते बद्दल सांगितले तेव्हा स्वामी म्हणाले. इच्छा जी तुझ्या मन व अंतरात्म्यातुन उत्पन्न होते जी शुध्द मनातून केलि गेलेली असते. ती एक आश्चर्य करणारी विद्युत-चुम्बकीय ऊर्जा असते. हि ऊर्जा रात्रि आकाशात जाते व सकाळी ब्रम्हांडातील चेतना घेऊन परत आपल्या शरीरात प्रवेश करते. आपल्या या दिव्य उर्जेवर तु विश्वास ठेव व आपल्या नियतीला स्वीकार कर. या अपयशाला विसरून जा. नियतिला तुझे पायलेट बनणे मंजूर नाही तुझ्या नशिबी याहीपेक्षा काहीतरी उदात्त आहे.” असे ते म्हणाले. पुढे ते संरक्षण आणी उत्पादन विभागाचे प्रमुख बनले. व १९५८ साली ज्येष्ठ वैज्ञानिक अभियंता बनले.
विज्ञानाचापरमभोक्ता असणारे डॉ. कलाम तेवढेच अध्यात्मिक स्वतः अब्दुल कलाम कुरान,वेद, उपनिषदे,बाइबल आणि भगवद्गीता यांचे वाचन केल्याचे सांगतात मनाने खुप संवेदनशील, अतिशय नम्र, प्रेमळ, साधे व सरळ होते. त्यांना वीणा वाजण्याचा, कविता करण्याचा, मुलांशी गप्पा मारण्याचा छंद होता. निर्भयपणे जगाला सामोरे जाणारे कलाम कुरान आणि गीता दोन्हीला समान मानणारे होते. म्हणूनच आज सर्व धर्म,जाती संप्रदयातील लोकांना आपलेसे वाटतात. धर्म केवळ साधन आहे, अंतिम सत्याकडे जाण्याचा तो एक पूल आहे, अंतिम साध्य नव्हे. सत्य हे तर त्याहून खूप उंच आहे. अब्दुल कलाम यांचे संपूर्ण आयुष्य या तत्त्वावर आधारलेले आहे. ‘सर्वधर्मसमभावी’ या शब्दाचे खऱ्या अर्थाने अब्दुल कलाम हकदार आहेत.
डॉ ए पी जे अब्दुल कलाम म्हणत अध्यात्म आणि विज्ञान यांचा योग्य समन्वय झाला, तरच देश आर्थिकदृष्ट्या संपन्न आणि स्थिर बनवण्याचे आपले ध्येय सफल होईल.
२००२-२००७ या काळात त्यांनी भारताचे राष्ट्रपतीपद भूषविले. मिसाईल मॅन म्हणून जगभरात त्यांची ख्याती होती. पंतप्रधानांचे सल्लागार म्हणूनही त्यांची कारकीर्द फारच प्रभावी ठरली. सुरक्षाविषयक धोरणांची प्रभावी अंमलबजावणी त्यांनी केली. १९९९ मध्ये भारताने घेतलेल्या अणुचाचण्यांमध्ये अब्दुल कलाम यांचा सिंहाचा वाटा होता. इंडिया २०२० या पुस्तकातून भारत सुपरपॉवर बनेल हे भाकित त्यांनी वर्तविले होते.
भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्यविभूषण' व १९९८ मध्ये 'भारतरत्न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला. डॉ. कलाम हे अविवाहित व पूर्ण शाकाहारी होते. पुढील वीस वर्षांत होणाऱ्या विकसित भारताचे स्वप्न ते पाहत. बालपण अथक परिश्रमांत व्यतीत करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगलेले, आणि जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतिपदी निवड झालेले डॉ. कलाम, हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व आहे.
Like

No comments:

Post a Comment