Saturday, 23 July 2016

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर श्रीमहाराज म्हणतात... 
🌼🌼🌼🌼🌼🌼
आपल्या नामस्मरणाला एक गोष्टीची अत्यंत जरूरी आहे. आपल्या जीवनात परमेश्वरावाचून नडते असे जोपर्यंत आपल्याला वाटत नाही, तो पर्यंत आपले नामस्मरण खरे नव्हे. परमेश्वरच आपल्या जीवनाचा आधार, त्याशिवाय आपण जगूच शकत नाही, अशी वृत्ती बाणल्यावर होणारे नामस्मरण तेच खरे नामस्मरण. आपली स्थिती तर याच्या अगदी उलट ! परमेश्वरावाचून आपले कुठेच अडत नाही अशा वृत्तीने आपण नामस्मरण करतो. मग परमेश्वर तरी कसा येईल ? परमेश्वराचे नाम हेच आपल्या जीवनाचे सर्वस्व समजून नाम घेतले, तर जीवनाचे सार्थक झाल्यावाचून राहणार नाही. 
नामाने भगवंताची प्राप्ती होणारच ही खात्री असावी. अशा नामालाच 'निष्ठेचे नाम' असे म्हणतात.
🌼🌼🌼जानकी जीवन स्मरण जयजय राम🌼🌼🌼

|| श्री राम जय राम जय जय राम ||

No comments:

Post a Comment