🌼🌼🌼'' श्रीराम जयराम जय जय राम " हा नामजप कसा कराल ? 🌼🌼🌼
प्रथम पहिल्या दिवशी स्नान करून देवासमोर बसा, पुरूषांनी कपाळाला चंदन कींवा कुंकुम तिलक लावावे महिलांनी कपाळाला हळद कुंकू लावावे, (कपाळावर टिकली असलीतरी ) देवा समोर दिवा लावा, अगरबत्ती लावा व हात जोडुन गणपती, आपली कुलदेवता, ग्रामदेवता, वास्तुदेवता, श्रीरामप्रभु आपले सद्गुरु व आपले आई वडिल या सर्वांना मनोभावे नमस्कार करा.�

अशी प्रार्थना करून जपाला सुरूवात करा.
१) आसनावर मांडीघालुन बसा. ज्यांना खाली बसता येत नाही त्यांनी खुर्चीवर बसावे.
२) माळ कपाळाला लावुन माळेला नमस्कार करा व त्वं माले सर्व देवानां प्रीतीदा शुभदा भव असे म्हणा.
३) माळेला अंगठ्या जवळील बोटाने स्पर्श करू नका.
४) जप वैखरी वाणीने करावा म्हणजे स्वतःला ऐकायला येईल एवढ्या आवाजात.
५) मेरूमणी ओलांडु नये मेरूमण्या पर्यंत आलात की तिथुन माळफिरवुन पुन्हा सुरू करा.
६) अशा पद्धतीने किमान एक माळेपासुन ते कंटाळा येई पर्यंत जप करा.
७) किमान एकतास जप करावा.
८) एकतासात किमान पंचवीस माळा जप होतो.
९) शक्यतो माळ तुळशीची असावी अन्यथा कुठलीही चालेल माळेत अडकु नये , माळ हे साधन आहे नाम हे साध्य आहे.
१०) दिवसभर जमेल तेंव्हा जमेल तेवढा जप करा व दिवसभरात झालेल्या माळांची रात्री एका वहीत नोंद करा.
श्रीराम जयराम जय जय राम
No comments:
Post a Comment