Monday, 18 July 2016

🌼🌼🌼🌼श्रीराम समर्थ🌼🌼🌼🌼
🌹वर्म चुकतय आपलं!🌹
शेषनारायण एकदा काहीतरी आजाराने खूपच व्यथीत झाले
शरीराने अशक्त होऊन
त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खूपच खालावत चालली होती.
हे पाहुन एक दिवस शेषाला भगवंताने विचारले,"तुझी प्रकृती दिवसेंदिवस खुपच खालावत चालली आहे".
भगवंताने देवतांचा वैद्य अश्विनीकुमारांना बोलावून शेषाची प्रकृती दाखवीली.
त्यानी अमुक अमुक वनस्पती इतके दिवस मधातुन औषध बनवून घ्यायला लावले.
त्याप्रमाणे शेषाने औषध घ्यायला सुरुवात केली.
सांगितल्याप्रमाणे औषधही घेतलेहीे गेले.
परंतु गुण काही येईना,भगवंताने पुन्हा अश्विनीकुमारांना बोलावून घेतले.
त्यांनी पुन्हा पुन्हा शेषाची तपासणी केली.
परंतु काही केल्या निदान होईना,
शेवटी अश्विनीकुमारांनी श्रीहरि विष्णूचाच अवतार असलेल्या धन्वंतरी भगवंतालाच शेषाच्या प्रकृती बाबत विचारले.व दिलेल्या औषधीबद्धल सांगितले आणि त्या औषधीचा काहीही गुण आला नाही
हे ही सांगितले.
धन्वंतरी भगवान अश्विनीकुमाराना म्हणाले आपण केलेल निदान व दिलेली औषधीही अगदी बरोबर आहे
मग अश्विनीकुमार भगवंताला म्हणाले
गुण का नाही आला मग ?
धन्वतंरी भगवान म्हणाले,"शेषाची नजर विषारी आहे.औषध देताना शेषाची नजर त्या औषधीवर पडते
वाऔषध विषारी होते.त्यामुळे औषधाचा गुण येत नाही.आता पुन्हा हेच औषध द्या.
फक्त औषध देताना शेषाच्या डोळ्याना पट्टी बांधून घ्या
आता अश्विनी कुमारांना नेमके वर्म समजले होते.
वरील रितीने औषधी देताच अगदी थोड्याच दिवसात शेषाची प्रकृती ठणठणीत झाली.
कथेचा बोध——
🌼🌼🌼
आपणही बहुतेक सर्वजण रोज भगवंताचे नामस्मरण करतो.
पण आपल्याला कुठं भगवंताच्या नामरूपी औषधाचा गुण आलाय आतापर्यंत!
डोळे उघडे ठेवून आपणही सकाळी उठल्यापासुन न्युज पेपर, टिव्ही, फेसबुक,व्हाॅट्स अप, सोशल मीडिया व समाजातील चांगले वा वाईट बघुन आपलीही दृष्टी विषारी झाली आहे.
नाही तर अमृताहुनी गोड,नाम तुझे देवा।
असे असताना का गुण येईना विषयाचा रोग बरा का होईना?
तर दिवसभर उघड्या डोळ्याने विषयांच्या दर्शनामुळे कामाने (इच्छेने) व्यापलेलं मन सायंकाळी उघड्या डोळे ठेऊन नाम घेतले तर ते कडुच वाटणार.
म्हणुन भगवंताच नामाबरोबर ध्यानही थोडं करणं गरजेचं आहे.
तरच नाम गोड वाटेल व विषयांचा रोग बरा होईल.यासाठी सतत भगवंताच्या गुणाचे, रुपाचे,लिलेचे,नामाचे, चिंतन करत राहावे.
हे वर्म आहे आत्मकल्याणाचे म्हणजेच भक्तीचे जिथे नेमकी आपली चुक घडतेय.
यासाठी आपणही आपल्या ॐश्रीसद्गुरूंच्या मुखातून आलेलं नाम रूपी औषध आजपासून रोज संध्याकाळी नियमित डोळे बदं करून घेऊन बघुया.निश्चितच नामरूपी औषधाचा गुण आपल्याही विषयांच्या रोगाला आल्याशिवाय राहणार नाही.
।। श्रीराम जयराम जय जय राम ।।

No comments:

Post a Comment