🌼🌼🌼 *जेथे बुध्दिचे क्षेत्र संपते तेथे श्रध्देचे क्षेत्र सुरू होते.*🌼🌼🌼
- लोकमान्य टिळक
जोपर्यंत माणूस बुद्धीचा वापर करून त्याच्या समस्या सोडवतो आहे तोपर्यंत त्याला भगवंताचा हात दिसणे अवघड आहे .भगवंतावर श्रद्धा बसायला आधी बुद्धीने हात टेकले पाहिजेत .आता हे काही मी बुद्धीने सोडवू शकत नाही असे वाटले की भागवंतावाचून उपाय राहत नाही आणि मग त्याच्यावर श्रद्धा बसते .खरेतर बुद्धीही भागवंतानेच दिलेली असते .समस्या सोडवताना याचे भान राहिले तर या आधीच भगवंताबद्दल श्रद्धा वाटली असती .पण बुद्धीने बहुतेक वेळा कर्ता भावच निर्माण होतो . आता श्रद्धा निर्माण झाली पण तरीही पूर्ण कर्ता भाव गेलेला नसतो .काही बाबतीत मनुष्य हतबल असतो , बुद्धी चालत नाही तिथे श्रद्धा असते , आणि अजून काही गोष्टी बुद्धीच्या आवाक्यात असतात तिथे कर्ता भाव असतो .इथे जर मनुष्य अनुभवाने शहाणा होऊन भगवंताला कर्तेपण देऊन जाणीवपूर्वक , श्रद्धापुर्वक कर्मे करील तर त्याची सगळी काळजी भगवंत घेईल .प्रत्येक कर्मा मध्ये वाटले पाहिजे हे मी माझ्या बुद्धीने नाही करत , त्यामागे भगवंत आहे . आपणच तपासून बघावे आपल्याला भगवंताचा काय अनुभव आला असा विचार केला तर आयुष्यातील काही ठराविक प्रसंग आठवतात .ते श्रद्धेचे प्रसंग , बाकी वाटते आपल्या बुद्धीने झाला.खरेतर रोज सकाळी आपण झोपेतून जागे होतो , आपली शक्ती, स्मृती तशीच्या तशी असते यामध्ये सुद्धा ईश्वरी कृपा आहे .असा प्रत्येक क्षण हा भगवंत कृपेचच आहे अशी जाणीव निर्माण झाली तर साधन करावे लागणार नाही ते आपोआप होईल .जगण्याकरता श्वास घेणे जसे मनुष्यास जरूरीचे आहे तसेच भगवंताच्या भेटीसाठी प्रत्येक श्वासाबरोबर नाम घेणे अगत्याचे आहे.
*|| श्रीराम जय राम जय जय राम ||*
*|| श्रीराम जय राम जय जय राम ||*
No comments:
Post a Comment