🌼🌼🌼नकळतपणेही करू नका हे एक काम🌼🌼🌼
*आचार्य चाणक्य यांच्या मतानुसार कोणत्याही व्यक्तीसाठी सर्वात मोठी दु:खाची गोष्ट म्हणजे मूर्ख असणे. एखादा माणूस मूर्ख असेल तर त्याला जीवनात कधीही सुख मिळणे शक्य नाही. त्याला जीवनात पावलो पावली दु:ख आणि अपमान सहन करत जगावे लागते. बुद्धीअभावी माणूस कधीही उन्नती करू शकत नाही.
* दुसरी अडचण आहे जवानी किंवा तारुण्य. तारुण्यही दु:खदायी होऊ शकते. कारण या वयात माणसात अत्याधिक जोश असतो आणि क्रोधही असतो. तारुण्यात हा जोश योग्य मार्गी लागला तर जीवनात उत्तुंग शिखर गाठता येते. मात्र दिशा चुकली तर जीवन दु:खमय बनते.
*मूर्खपणा आणि तारुण्य या दोन्हीही अवस्थांहून अधिक घातक अवस्था कोणती असेल तर ती दुस-यांच्या घरी राहाणे ही होय असे आचार्य सांगतात. एखादा माणूस परक्या घरात राहात असेल तर त्याच्यासमोर अडचणीच अडचणी असतात.
* दुस-यांच्या घरी राहिल्याने आपले स्वातंत्र्य नष्ट होते. अशा वेळी मनुष्य आपल्या मर्जीने काहीही करू शकत नाही. स्वातंत्र्य हरवून बसणे ही गोष्ट अधिक घातक असल्याचे आचार्यांना वाटते.
.......................................
1)जुन्या काळी ज्या मनुष्याचा देवावर विश्वास नसे, त्यास नास्तिक म्हणत. आता मात्र ज्याचा स्वत:वर विश्वास नाही, त्यास नास्तिक म्हणावे लागेल.
2) माणसाने प्रत्येक काम एवढे सतर्कता, निष्ठा व मन लावून करावे की, जणू त्या कामाच्या सफलतेवरच संपूर्ण सृष्टीचे कल्याण अवलंबून आहे.
3) जीवनात आदर्श उतरवण्यासाठी जे लोक सतत प्रयत्न करत असतात, ते एकसमान गतीने कार्य करत राहतात आणि एक दिवस जीवनात आदर्श ठरतात.
4)मृत्यूसंदर्भात सदैव प्रसन्न असावे. सुस्वभावी व्यक्तीमध्ये जिवंतपणी तसेच मृत्यूनंतरही कोणताही दुगरुण येऊ शकत नाही, हे सत्य समजून घ्या.
5)लोळत पडणे कलियुग, अंथरुण त्यागने द्वापार युग, उठून उभे राहणे त्रेतायुग, तर चालत राहणे हे सत्ययुग आहे. म्हणून कर्म करत राहा.
6) औषधाची अल्प पण नियमित मात्रा जुनाट रोगांचाही नायनाट करते, तसेच ईश्वराची नियमित केलेली थोडी थोडी भक्तीही दु:ख आणि कष्ट दूर करते.
"श्री राम जय राम जय जय राम....."
No comments:
Post a Comment