Monday, 11 July 2016

🌼🌼🌼रुद्राभिषेकाचे द्रव्य आणि त्याचे फ़ळ 🌼🌼🌼

श्रावण महिन्यातील सोमवार, प्रदोष यादिवशी शंकरावरती दूध, पाणी याने अभिषेक करतात. परंतु काहिवेळा मनात वेगळा संकल्प असल्यास खालील माहितीचा उपयोग करावा.
1) शुद्ध पाण्याचा अभिषेक :- पाउस पडण्यासाठी.
2) कुशोदक(दर्भ घातलेले पाणी) :- व्याधी नाशासाठी.
3) दही :- गोधनादि प्राप्तीसाठी.
4) उसाचा रस :- लक्ष्मीप्राप्तीसाठी. आयुष्याच्या वृद्धिसाठी.
5) मध किंवा तूप :- धन प्राप्तीसाठी.
6) पुण्यतीर्थोदक :- मोक्षप्राप्तीसाठी.
7) गाईचे दूध किंवा साखरमिश्रित पाणी :- पुत्रप्राप्तीसाठी.
8) कर्पूर्मिश्रित पाणी :- ज्वरनाशासाठी.
9) तुपाचा अभिषेक :- वंशविस्तारासाठी.
१०) साखरमिश्रित दूध :- बुद्धिमान होण्यासाठी.
११) मधाचा अभिषेक :- क्षयनाश, पाप, व्याधिनाश.
१२) चंदन, अष्टगंधमिश्रित पाणी :- शिवाला / देवाला शांत करण्यासाठी.
विशेष रानरेड्याच्या (गवा) शिंगाने शिवावर अभिषेक करावा.
लघुरुद्र, महारुद्र, अतिरुद्र करण्याची काही कारणे- आपत्तींच्या नाशासाठी, कायिक, वाचिक, मानसिक मतभेद दूर होण्यासाठी. भारतीय संस्कृतिविषयी प्रेम / निष्ठा उत्पन्न होण्यासाठी. शांतता नांदण्यासाठी, या जन्मातील सर्व प्रकारे उत्कर्ष साधण्यासाठी, करणी, जारण, मारण, बंधन, यातून मुक्त होण्यासाठी, रुद्रदेवतेचा कृपा-आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी, सर्वअरिष्ट निरसनासाठी, मनातल्या शुभइच्छा पूर्ण होण्यासाठी . कारणांसाठी लघुरुद्र इत्यादिक कार्ये करावी.


*|| श्रीराम जय राम जय जय राम ||*



No comments:

Post a Comment