Thursday, 28 July 2016

🌼🌼🌼गुरूचरित्र पारायण🌼🌼🌼


एक वयोवृध्द माणुस २० वर्षापासून गुरूचरित्र पारायण करीत असत, त्यांचा ८ ते १० वर्षाचा नातू विचारतो की आपण कसले पारायण करतात, आजोबा नातूला सांगतात का गुरूचरित्र पारायण. नातू सांगतो की मला पण पारायण करायचे, पारायण केल्या नंतर नातू विचारतो की आजोबा मला काही कळाले नाही, आजोबा नातवाला समजावून सांगतात की त्या कोप-यात एक गोणपाटात कढई आहे ता नदीवर घेवून जा व कढईत पाणी भरून आण, नातू आजोबांच्या आज्ञे प्रमाणेनातू ती गोणी घेवून नदीवर जातो, कढई गोणपाटातून बाहेर काढतो तर त्यात थोडे कोळसे असतात, मग ते कोळसे गोणपाटावर टाकून कढईत पाणी भरतो व घरी येण्यासाठी निघतो पण कढईला बारीक छिद्र असल्यामुळे घरी येई पर्यंत सर्व पाणी गळून जाते, आजोबा त्या नातूला सांगतात की ही कढईत परत पाणी भरून आण पुन्हा सर्व पाणी गळून जाते, असे ३-४ वेळा होते, तेव्हा आजोबा सांगतात की इतक्या वर्षापासून पारायण करीत होतो माझी अवस्था कढई सारखी झाली, पण कढईला बघ कढईत कोळसे असल्यामुळे कढई काळी झाली होती, पण तु ३-४ वेळा पाणी भरल्यामुळे कढईतील काळपटपणा धुतला गेला. तसेच ईतके वर्ष गुरूचरित्र वाचल्यामुळे माझ्या अंतरंगातील , मनातील, शरीरातील काळपटपणा पारायणमुळे धुतला गेला. यासाठी गुरूचरित्र पारायण करायचे असते.
|| श्री गुरुदेव दत्त ||

No comments:

Post a Comment