🌼 आवडणे आणि प्रेम यात फरक आहे एखाद्या व्यक्तीच्यागुणांमूळे ती व्यक्ती प्रिय होणे म्हणजे नुसते आवडणे दोष ठाऊक असूनही व्यक्ती आवडणे म्हणजे प्रेम..
🌼 कोमलतेत प्रचंड सामर्थ्य असतं कोमलता म्हणजे दुर्बलता नव्हे ..!
म्हणूनच खडक झिजतात प्रवाह रुंदावत जातो..!!
🌼 आपल्याला नेहमी हरवलेली वस्तू आणि दुरावलेली व्यक्ती हवी असते
🌼 आम्ही 'सहन करतो, सहन करतो', हे इतका वेळ तुम्ही सांगीतलेत...
ह्याचा अर्थ तुम्ही काहीच सहन करत नाही. तुम्ही दु:ख वाटत सुटलात.जो सहन करतो, तो बोलत नाही......
🌼अश्रू कितीही प्रामाणिक असले तरी, भूतकाळ परत आणण्याची ताकद त्यांच्यात नसते.
🌼 प्त्ता सापडणं कठीण बाब नाही.बरीच माणसं चाललेली आहेत त्या दिशेने आपणही गतिमान व्हायचे.माणूस गर्दीचा झाला म्हणजे हरवत नाही.एकटा राहिला की हरवतो....
🌼 कोणतेही समर्थन मूळ दु:खाची हकालपट्टी करू शकत नाही. वर पट्टी बांधायची, ती जखम झाकण्यासाठी. आत जखम आहे, ती ज्याची त्याला ठसठसत असतेच....
🌼 प्रॉब्लेम्स नसतात कुणाला..?
ते शेवटपर्य असतात..!पण प्रत्येक प्राॅब्लेमला उत्तर हे असतंच. ....
ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर कधी माणस..!
या तिन्ही गोष्टी पलीकडचा प्राॅब्लेम अस्तित्वातच नसतो..!!
🌼 सतत प्रत्येकाचा वापर करणाऱ्यांच्या आयुष्यातला सर्वात अपमानास्पद क्षण कोणता? आपलाही वापर केला जातो, हे सांगणारा क्षण.
🌼 वादळं जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजुन रहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघून जातात. वादळ महत्वाचे नसते प्रश्न असतो आपण त्याच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा..
🌼 'कोंब आणि माणूस सारखाच. बी जमिनीत सुरक्षित असतं. अंकुर उघड्यावर पडतो. कुणीतरी ओरबाडेल, कुणाचा तरी पाय पडेल, अशा दहशतीत त्याचा प्रवास सुरु होतो. माणसाचंही तसंच. आईच्या गर्भात मुल सुरक्षित असतं. श्वासही घेण्याचे कष्ट नाहीत. पोटापाण्याचा प्रश्न नाही. जन्म झाला की सगळं सुरु,'
🌼 माणसाला खूप हवं असतं.पण नेमकं काय ते मात्र माहित नसतं.
"जगायचंय जगायचंय" असं म्हणता म्हणता 'जगायचंय म्हणजे नक्की काय करायचंय' तेच माहित नसतं.'क्षण' असा उच्चार करेपर्यंत तो क्षण जुना झालेला असतो.
भूतकाळ बनलेला असतो.
तो क्षण गेला ह्याचं दु:ख करण्यात पुढचाही क्षण निघून जातो.
आयुष्य संपत जातं.
इच्छेला वेळ नसते...पण....
वेळ हि थांबणारी गोष्ट नव्हे..आत्महत्या करणारी माणसं जगण्यावरचं प्रेमच प्रकट करतात.
हवं ते आयुष्य मिळत नाही म्हणून मरायचं.
एक वेगळं मनासारखं आयुष्य मागणं हे जगण्यावरचंच प्रेम आहे...
🌼 ओळखी केल्याने सौख्याइतकाच त्रास पण होतो. एखाद्याची ओळख होते व नाविन्याला चटावलेले माणसाचे मन त्या ओळखीचाच विचार करत बसते , शेवटी ही ओळख इतकी वाढत जाते की त्या ओळखीचेच बंधन होते आणि कोणत्याही कारणाने त्या व्यक्तीच्या वागण्यात काही फ़रक झाला की आपण त्याचीच काळजी करत बसतो की " आता हा असा का वागला ?"
व. पु. काळे (गुलमोहर)🌼 संघर्ष न वाढवता नांदावं कसं हे सहज जमतं. त्यासाठी खुप अक्कल लागते, असं नाही. लागतो तो पेशन्स आणि संघर्षाशिवाय जगावं ही तळमळ.
🌼 अग्निदिव्य करुनही प्रभु रामचंद्राचे डोळे उघडले नाही किंवा खात्री पटुनही सीतेच्या नशिबातला वनवास टळला नाही आणि हे सगळं कुणासाठी? तर लोकांचे कपड्याने डाग स्वत:च्या उदरनिर्वाहासाठी काढणाऱ्या एका धोब्यासाठी. कुणाच्या समाधानासाठी कुणाचा अंत पाहायचा हे माणसाने
ठरवले पाहिजे.🌼 समस्या नावाची वस्तूच अस्तित्वात नसते. एक विशिष्ट परिस्थिती निर्माण होते आणि त्यात तारतम्याने वागायचे असते.
त्याचप्रमाणे एक माणूस दूसर्या माणसाच्या संदर्भात एका ठराविक मर्यादे पर्यंतच विचार करू शकतो किंवा मदत करू शकतो. म्हणून एवढ्यासाठीच कुणालाही बदलण्याच्या खटाटोपात माणसाने पडू नये. असह्य झालं तर अलिप्त व्हावं, उपदेशक होउ नये. दुसर्याचे प्रश्न सोडवताना तुम्ही त्याची बुध्दी वापरून त्या समस्येकडे बघूच शकत नाही. तुम्ही तुमचाच तराजू वापरता.🌼 श्वास म्हणजे विश्वाशी सोयरीक. म्हणूनच अत्यंत जिवाभावाची व्यक्ती गेली तर 'मी एक क्षण जगणार नाही' असं अनेक म्हणतात आणि मागे खुप वर्षे राहतात. त्यांचं प्रेम खोटं नसतं, पण विश्वाशी सोयरीक तुटलेली नाही हे त्यांना माहीत नसतं.
🌼 लहानपणी प्रत्येकजण ठिकरीचा खेळ खेळतो. " आयुष्य जवळपास तसं असतं. जवळच्या जवळच्या घरात तो ठिकरीचा चतकोर तुकडा अचूक पडतो. घरं लांब गेली की हातातला तुकडा नेमक्या घरात पडेल ह्याची शाश्वती नाही. त्याप्रमाणे आयुष्यात छोटे छोटे आनंद मिळतात. आपण खेळ खेळणारे असलो तर सरावाने सगळी घरं जिंकूही . पण ते झालं की नंतरचा टप्पा म्हणजे त्या आखलेल्या चौकोनांकडे पाठ करून ठिकरी टाकायची. ह्या टप्प्यात जवळच्या जवळच्या घरांचीही शाश्वती नाही आणि कोणतं घरं आपली ठिकरी अचूक झेलून धरील ह्याचाही भरवसा नाही."
🌼 " सुशिक्षित माणूस सुसंस्कारित असेलच असं नाही. पदवीचा उपयोग दरवाज्यावरच्या नावाच्या पाटीवर, बारीक अक्षरात लिहिण्यापुरताच. तो दरवाजा बंद केला की ती पदवी बाहेरच राहते. चार भिंतीत ज्यांना सुसंवाद साधता येतो, आनंदाचे मळे पिकवता येतात ती माणसं ह्या जगात येतानाच त्या पदव्या घेवून येतात. त्या विद्यापीठांना नावं नसतात. पदव्या मिळवण्यासाठी त्या विद्यापीठात कसलेही प्रबंध सादर करावे लागत नाहीत. तिथे बुद्धीची झटापट करावी लागत नाही. मज्जातंतू शिणवण्याची गरज नसते. त्या विद्यापीठांतून फक्त ''देढ हात कलेजा'' आणायचा असतो...!!!
🌼 'सिंहगड पाहायचा असेल, तर तो पायी चढत चढतच बघायला हवा. मोटारीचा रस्ता वरपर्यंत केला किंवा हेलिकॉप्टरमधून उतरलात की विज्ञानाचा चमत्कार समझतो......, -इतिहास समजत नाही...!!
🌼 एका माणसाच्या समस्येवर दुसऱ्या माणसाजवळ उत्तर नसत.कारण सल्ला देणारा त्या समस्येपरंत पोचू शकत नाही.तो स्वःतच्या वैचारिक पातळीप्रमाणे त्या समस्येकडे पाहतो.समस्येतुन जाणाऱ्या माणसाच्या भूमिकेत तो जाऊ शकत नाही.समस्या सांगणारा माणूस अनुकूल उत्तरासाठीच अनेकांना भेटत राहतो आणि त्याला आवडणारा विचार मिळाला कि त्या माणसाला ग्रेट मानून खुष होतो.हे सगळं पाहिला कि वाटतं, कोण कुणाला खऱ्या अर्थाने जाणून घेत असेल?
🌼 "पायातल्या चपला काढताक्षणी त्याने प्रथम त्या चपलांना नमस्कार केला.माझी नजर पाहून तो म्हणाला,
"तुमच्या घरपरन्त येण्यासाठी ह्या चपलांनी मला मदत केली.माझे श्रम ह्या चपलांनी सुसह्य केले,म्हणून त्यांना हे थँक्स."
माझ्या चेहऱ्यात काही फरक पडला नसावा.
माझ्या कडे बारकाईने पाहत म्हणाला,
"तुम्हाला नवल वाटलेलं दिसत आहे"
"चपलांना हे समजत का?"मी विचारलं.
तो हसत म्हणाला,
"राग आला म्हणजे माणस दारं आपटतात ना?"
"मीसुद्धा कधीतरी आपटतो".
"घरातल्या माणसांवर ओरडता येत नाही म्हणूनच ना?"
"आरडाओरडा न करता आपला राग पोहोचावा हा हेतू".
"तुम्ही रागावलेले आहात हे जर दरवाजाना कळत असेल तर,आपला नमस्कार त्यांच्यापरंत का पोहोचणार नाही?"
तो पुढे म्हणाला,"आणि दारांनाही कळत नाही अस समजू नका.लहान मुलांप्रमाणे ती पावसाळ्यात फुगतात व आपला निषेध पाऊस संपेपरंत व्यक्त करतात.पण त्यांचं दुर्देव अस कि पावसाळ्यात त्यांना आपल्या लाथा खाव्या लागतात".

🌼 जगाच्या पाठीवर काेणत्याही देशातल्या माणसांना, मानवी रक्त हाच एक धर्म आहे ह्याचं आकलन हाेईल, त्यांनाच 'निधर्मी' शब्दाचा खरा अर्थ समजला आहे. ज्यांना ताे अर्थ समजला नाही, ते सगळे सत्ता टिकवण्यासाठी, मानवी रक्त इंधन म्हणून वापरतात.
🌼 वयाच्या साेळाव्या वर्षी सगळ्या विश्वात शांती नांदावी म्हणून 'पसायदान' मागणार्या ज्ञानेश्वरांनाच फक्त 'निधर्मी' शब्द समजला हाेता.
🌼 मनात ते असतं....जे आवडलेलं असतं....आपल्याला आपल्यासाठी....
अन् हातात ते असतं....जे निवडलेलं असतं....दैवाने आपल्यासाठी....
आवडलेलं आणि निवडलेलं यांची ताटातूट म्हणजे "तडजोड".......!
🌼 गरजेवर जेंव्हा मैत्री अवलंबून असते तेंव्हा त्या मैत्रीला काहीही आधार नसतो काहीही अर्थ नसतो …. गरज संपू शकते …. मैत्री संपू शकते !
🌼 कोणी चांगलं म्हंटल्यामुळे मी चांगला ठरत नाही किंवा कोणी वाईट म्हंटल्यामुळे मी वाईट ठरत नाही. आपण कसे आहोत हे ज्याचं त्याला पक्कं माहित असलं म्हणजे माणूस निर्भय होतो.
त्यासाठी स्वतः चीच ओळख स्वत:ला व्हावी लागते
🌼 जग कसं अजब आहे..
देवावर प्रेम सर्वांनाच आहे.
पण ' त्याच्या घरी ' जायची घाई मात्र कुणालाच नाही.
आपल्या घरात सर्वांनाच देव हवा.
पण त्याच्या घरी आपण जायच्या विचाराने मात्र मनात धडकी भरते.
देव आपल्या घरी आला,म्हणजे सण,उत्सव आणि आनंद.
आपण त्याच्या घरी गेलो म्हणजे दुःख,शोक..
देव आपल्या घरी यावा,म्हणून आटापिटा.
आपण त्याच्या घरी जाऊ नये म्हणून आटापिटा..
देवाघरून येणं,म्हणजे जन्म..देवाघरी जाणं म्हणजे मृत्यू.
दोन्ही अटळ आहे.पण ह्या मधली जी गम्मत आहे,
त्यालाच 'आयुष्य ' म्हणतात.

🌼 कुणी कुणासाठी किती त्याग केला ह्याचा हिशेब आला कि आंब्याच्या झाडाने आपला मोहर येण्याचा काळ संपला हे जाणावं
🌼 एका क्षणात दृष्टीकोन बदलणं हे साधंसुधं स्थित्यांतर नाही.
जगातली सगळ्यात अवघड गोष्ट म्हणजे विचार बदलणं.
इतर गोष्टी केंव्हाही बदलता येतात. आज आवडलेली गोष्ट उद्या फेकून देता येते.
पण नवा विचार स्वीकारणं ही खूप मोठी घटना आहे. आणि तो क्षण साजरा केलाच पाहिजे
इतर गोष्टी केंव्हाही बदलता येतात. आज आवडलेली गोष्ट उद्या फेकून देता येते.
पण नवा विचार स्वीकारणं ही खूप मोठी घटना आहे. आणि तो क्षण साजरा केलाच पाहिजे
🌼 निष्काम कर्मयोगाचं उदाहरण म्हणजे घर बांधणारा गवंडी…
इतरांसाठी वास्तू उभी करायची आणि जेव्हा सच्च्या अर्थानं रहाण्यासारखी होते…तेव्हा मागे वळुनही न पाहता ती सोडुन जायचं…
🌼 आजच्या दिवसापेक्षा उद्याचा दिवस नक्की चांगला असणार, याची आशा सुटत नाही म्हणून आपण जगतो.उद्याबद्दलची काही ना काही स्वप्नं उराशी असतात म्हणून आज आपण मृत्यूला कवटाळावे असे वाटत नाही..
🌼 माणूस निराळा वागतोय बिघडला कामातून गेला असं आपण पटकन एखाद्याबद्दल बोलतो .पण तसं नसतं ,त्या सगळ्याचा अर्थ तो आपल्याला हवं तसं वागत नाही एवढाच असतो.
🌼 माणूस एकदा बाजूला पडला की पार उतरला. मग स्पष्टवक्तेपणाला ’फटकळपणा’ म्हटला जातो. मोकळ्या वृत्तीला ’वाह्यात’ विशेषणाचा आहेर मिळतो. व्यवहाराला चोख असलेल्या माणसावर ’बिलंदरपणाचा’ शिक्का मारला जातो. थोडक्यात, उपजत असलेल्या गुणांची शंका घेतली जाते, सावळेपणाला काळेपणा म्हटलं जातं.
🌼 आपल्याला जिवापाड आवडणाऱ्या माणसाचं मूल वाढवणं,
आपल्या जोडीदाराला अंशरूपाने स्वत:च्या शरीरातच जागा
देण्याच्या आनंदाची बरोबरी कशाशीच होऊ शकत नाही.
अपत्याला वाढवताना प्रत्येक स्त्री काही प्रमाणात
आपल्या नवऱ्याचीही आई होत असावी
पहिलं मूल होण्यापूर्वी ती केवळ प्रेयसीच असते.
कायम जीव टाकावा अशा पात्रतेचा नवरा लाभला तर
दिवसाचे किती क्षण ती
नवऱ्याचाही अपत्यासारखा सांभाळ करते
हे कोणत्याही पुरुषाला कळायचं नाही.
🌼 माणसाचं मन ही एक फार मोठी शक्ती आहे. ती कोणत्या स्वरुपात कुठं, कशी प्रकट होईल, हे सांगता येत नाही. प्रकट झाल्यावर ती विधायक होईल की विध्वंसक होईल, हेही सांगणं कठीण आहे. मला तर मन म्हणजे बाटलीत कोंडलेला राक्षसच वाटतो. 'अफाट शक्ती आणि बुद्धीवर ताबा नाही.'
🌼 मिठामुळे पदार्थाला चव येत असली तरी मीठ चवदार नसत. काही माणसे एकटी असतात अन एकटी असतात तेंव्हा बरणीतल्या मिठासारखी खारट असतात. पण ती जेंव्हा दुसर्यांच्या जीवनात मिसळतात तेंव्हा त्यांच्या जीवनाची गोडी वाढवतात व आपल्या जीवनाला सार्थकता प्राप्त करून घेतात.
🌼 बायकोत काय नसतं ते अशा मैत्रीणीत असतं?
ह्यासारख्या प्रश्नांची उत्तरं कशी द्यायची?
माझ्या मते अशी मैत्रीण जी हवीशी वाटते, ती बायकोच्याऐवजी हावी असते हा समज चुकीचा आहे. तिला बायकोने सुध्दा स्वीकारावं ही गरज असते. तसं झालं नाही की होणा-या यातना फक्त मैत्रीणीला समजतात. बायकोला समजत नाहीत. नि:स्वार्थी मैत्रीण मित्राचा संसार उधळला जावा, पण आपली मैत्री टिकावी अशी कधीच अपेक्षा करीत नाही. पण ही धडपडही बायकोपर्यंत पोहोचत नाही. मैत्रीण मित्राच्या पत्नीची मर्जी आणि प्रतिष्ठा संभाळते, पण तो समंजसपणा पत्नी दाखवत नाही. बायकोचे मन धाब्यावर बसवून मैत्री जपणारे महाभाग किती टक्के असतात आणि किती टक्के स्त्री पुरुष, त्याच्या व तिच्या मैत्रीला तिलांजली देतात, ह्या टक्केवारीत जाण्यात अर्थ नाही. समजूतदारपणाच्या बाबतीत संसारातल्या साथीदारापेक्षा मैत्रीतला जोडीदार वरचढ ठरला ह्याचा आनंदही चिरकाल उरत नाही, कारण समजूतदार घटकालाच अन्याय सहन करावा लागला हे शल्य पुसता येत नाही. .....

🌼 "जवळच्या माणसाचा स्वभाव कितीही पुरेपुर माहीत असला; तरी जगावेगळी समस्या उभी राहिली की, तो कसा वागेल हे सांगता येत नाही."
🌼 खळाळून टाळी देणाऱ्या हातात एक प्रचंड सौंदर्य असतं.
परमेश्वर माणसाला रिक्त हस्ते पाठवतो असं म्हणण्यात
काही अर्थ नाही. असं असतं, तर नुकत्याच जन्माला आलेल्या
इवल्या इवल्या बाळमुठी वळलेल्या नसत्या.
त्या मिटलेल्या बाळमुठीत एक टाळी लपवलेली असते.
ही टाळी आयुष्यभर अनेक महाभागांना सापडत नाही.
काही अर्थ नाही. असं असतं, तर नुकत्याच जन्माला आलेल्या
इवल्या इवल्या बाळमुठी वळलेल्या नसत्या.
त्या मिटलेल्या बाळमुठीत एक टाळी लपवलेली असते.
ही टाळी आयुष्यभर अनेक महाभागांना सापडत नाही.
🌼 अधूनमधून मला हा आधार लागतो. ह्याची अरुणाला जाणीव आहे. पण आठच दिवसांपूर्वी सहज बोलता बोलता ती शेजारच्या बाईंना म्हणाली, “कुठं निवांतपणी जावं, राहावं असं एकही घर नाही.” माझ्या कानावर हे वाक्य पडलं आणि वाटून गेलं, आपण सगळी सुबत्ता असूनही ‘पोरके’ आहोत. आणि ह्याच वेळेला दुसरी जाणीव झाली की, आपल्या एवढीच अरुणा पोरकी आहे. माझ्या व्यथेमध्ये सहभागी होणारा कुणी नाही, म्हणून मी जेवढा कष्टी आहे तेवढीच अरुणाही कष्टी आहे, आणि पोरकेपणा म्हणजे तरी नक्की काय हो ? आपली व्यथा इतरांना न समजणे हाच पोरकेपणा.
🌼 सल्लामसलत करुन किंवा वेगवेगळे दाखले देऊन, समोरचा माणूस कधीही बदलत नाही. निसर्गाने प्रत्येक माणूस वेगळा घडवला आहे, तो कशासाठी?
म्हणुनच सांगणारा माणूस जेव्हा समस्या म्हणुन काही सांगतो, तेव्हा ऐकणाऱ्याला ती समस्या आहे असे वाटतच नाही.
"समस्या" या शब्दाची तु व्याख्या करु शकशील का?
समस्या नावाची वस्तूच अस्तित्वात नसते. एक विशिष्ट परिस्थिती निर्माण होते आणि माणसाने तारतम्याने वागायचं असतं. त्याचप्रमाणे एक माणूस दुसऱ्या माणसाच्या संदर्भात एका ठराविक मर्यादेपर्यंतच विचार करु शकतो किंवा मदत करु शकतो. म्हणुन एवढ्यासाठीच कुणालाही बदलण्याच्या खटाटोपात माणसाने पडु नये. असह्य झालं तर अलिप्त व्हावं. उपदेशक होऊ नये. दुसऱ्याचे प्रश्न सोडवताना तुम्ही त्याची बुद्धी वापरून, त्या समस्येकडे कधीच बघू शकत नाही. तुम्ही तुमचाच तराजू वापरता. माणूस असाच आयुष्यभर एकटाच असतो. दोन मुलांपैकी एका मुलाला आमटी तिखट लागते आणि दुसऱ्याला सौम्य वाटते, हे चूक की बरोबर कुणी ठरवायचं? ......
"समस्या" या शब्दाची तु व्याख्या करु शकशील का?
समस्या नावाची वस्तूच अस्तित्वात नसते. एक विशिष्ट परिस्थिती निर्माण होते आणि माणसाने तारतम्याने वागायचं असतं. त्याचप्रमाणे एक माणूस दुसऱ्या माणसाच्या संदर्भात एका ठराविक मर्यादेपर्यंतच विचार करु शकतो किंवा मदत करु शकतो. म्हणुन एवढ्यासाठीच कुणालाही बदलण्याच्या खटाटोपात माणसाने पडु नये. असह्य झालं तर अलिप्त व्हावं. उपदेशक होऊ नये. दुसऱ्याचे प्रश्न सोडवताना तुम्ही त्याची बुद्धी वापरून, त्या समस्येकडे कधीच बघू शकत नाही. तुम्ही तुमचाच तराजू वापरता. माणूस असाच आयुष्यभर एकटाच असतो. दोन मुलांपैकी एका मुलाला आमटी तिखट लागते आणि दुसऱ्याला सौम्य वाटते, हे चूक की बरोबर कुणी ठरवायचं? ......
🌼 "जवळच्या माणसाचा स्वभाव कितीही पुरेपुर माहीत असला; तरी जगावेगळी समस्या उभी राहिली की, तो कसा वागेल हे सांगता येत नाही."
ही वस्तुस्थिती आहे. कधीकाळी जवळचे म्हणवणारे मित्र जेंव्हा दुरावतात; तेंव्हा त्यांच्यामधील अंतरही वाढत जाते. ते दोन ध्रुवाप्रमाणे दोन टोकावर पोहचलेले असतात. अशावेळी त्यांचे विचार पूर्वीसारखेच असतील, याचा अंदाज देता येत नाही. मुळातच विचारांमध्ये अंतर निर्माण झालेले असते; म्हणून तर ते दुरावलेले असतात. अशावेळी ते कसे वागतील हे कसे सांगता येईल? दुर्दैवाने केवळ आकसापोटी... द्वेषापोटी ते परस्पर भूमिका घेतात; तेंव्हा अर्जुनाच्या ईर्षेतून कौरवांच्या पक्षात जाणारा महारथी कर्ण डोळ्यांसमोर उभा राहतो. शत्रुपक्षाला मिळणाऱ्या बिभीषणांमध्ये आणि कर्णामध्ये खूप फरक आहे.
शेवटी जीवन हेही कुरुक्षेत्रच आहे, येथे परकीयांपेक्षा स्वकीयांशीच लढावे लागते. मग तो कर्ण असला म्हणून काय झाले??? आपण कथा कादंबऱ्या वाचून कर्णाच्या बाबतीत फार हळवे झालेले आहोत. विशेषतः शिवाजी सावंतांची मृत्युंजय असेल अथवा रणजीत देसाईंची राधेय. त्यातूनच आपण कर्णाला निर्दोष ठरवण्याची फार घाई करतो. कोणत्याही पारड्यात बसून सत्य कळत नाही. वस्तुस्थिती पाहण्यासाठी तटस्थपणे काट्यासारखे मधोमध उभे राहूनच पहावे लागते.
जन्मतःच आई असूनही वैरीण होऊन लोकलज्जेस्तव कुंतीने पाण्यात सोडून दिले. केवळ जातीच्या दुराभिमानामुळे द्रोणाचार्यांनी विद्या द्यायचे नाकारून अन्यायच केला. स्पर्धेतूनही पितामह भीष्मांनी जाणीवपूर्वक दूर केले. सुतपुत्र म्हणून द्रौपदीने अपमानच केला. ज्याची सेवा करून अस्त्रविद्या मिळवली; त्या भार्गवरामानेही विस्मरणाचा शाप दिला. एवढेच कशाला? इंद्राने छल कपट करून अंगावरील कवचकुंडले पळवली. रथाचे चाक रुतल्याचा गैरफायदा घेऊन निःशस्त्र असताना मृत्यू यावा, यापेक्षा अवहेलना ती कोणती? एकना अनेक युक्तिवादाने एक पारडे जड होत असतानाच दुसरी बाजू शांत कशी राहील?
द्रौपदीचे वस्त्रहरण झाले; तेंव्हा कर्णाने मदत नाही केली तिची. उलट पाच नवरे असणारी स्त्री वेश्याच असते, तिला कसला सन्मान? असे म्हणून अपमानचा पुरेपुर बदला घेतला होता. एकाकी पडलेल्या अभिमन्यूला मारताना कोणते युद्धाचे नियम पाळले होते??? आपल्याच पक्षातील भीष्म-द्रोणांचा मृत्यूही शांतपणे पाहिला होता. ही सूडबुद्धी नव्हती का? कर्ण संपूर्ण लढाई मैत्रीसाठी म्हणून दुर्योधनाच्या बाजूने लढला. सर्व काही जाणूनही आपले दातृत्व न सोडता अंगावरील कवचकुंडलाशिवाय तो कौरवपक्षात राहिला. हे खरे असले; तरी त्याचे दातृत्व हे आयुष्यभरातील न्यूनत्वानंतरही श्रेष्ठत्व मिळवण्याची एक हताश केविलवाणी धडपड नव्हती का? दुर्योधनाच्या मैत्रीमुळे व केलेल्या उपकारामुळे तो कौरवांशी एकनिष्ठ राहिला, असेच आपण समजतो आणि त्याच्या अपराधांवर पांघरुण घालायचा दुबळा प्रयत्न करतो. पण त्याला अंगराज बनवण्याच्याही अगोदरपासूनच कर्ण पांडवांचा विशेषतः अर्जुनाचा द्वेष करत होता. म्हणूनच पहिल्या स्पर्धेत असो वा द्रौपदी स्वयंवरावेळी असो, चाणाक्ष दुर्योधनाने त्याचा फायदा उठवला. हे सोईस्कररित्या आपण विसरून जातो. कुंतीने त्याला सोडून दिले, द्रोणाचार्यांनी अन्याय केला, यात नेमका अर्जुनाचा काय दोष होता? त्याचा द्वेष कशासाठी??? दुर्दैव इतकेच की, कुंतीच्या इच्छेनुसार शेवटच्या लढाईत तो पांडवाच्या विरोधात नाही, केवळ मात्र द्वेषापोटी अर्जुनाशी लढला. हो! तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. सर्वांनी कर्णावर अन्याय केला. पण अर्जुनाचाच एवढा द्वेष का? त्याची काय चूक होती, ते तर सांगा.
आता ही निकोप स्पर्धा राहिलेली नव्हती. कोणा तरी एकाला मरावेच लागणार होते. हेच तर कर्णाने कुंतीला वचन दिले होते. माझ्या मृत्यूनंतरच माझ्या जन्माचे रहस्य पांडवाना सांग, असे श्रीकृष्णाला सांगणारा कर्ण निर्वाणीच्याच भावनेने युद्धभूमीवर आला होता, हे आपण कसे काय विसरतो? अन्यायाने कर्णाला मारले म्हणून गळा काढण्यापूर्वी आपणांस या गोष्टीची खात्री देता येईल का? की अभिमन्यूच्या बाबतीत नियम धाब्यावर बसवणारा कर्ण अर्जुनाला मारताना सर्व नियम पाळणार होता. शेवटी हे युद्ध आहे. आणि लक्षात ठेवा! प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असते. एक तर तुम्ही त्याला मारा; नाहीतर तो तुम्हाला मारणार. निर्णय तुम्हालाच घ्यावा लागतो. मरायचे की मारायचे?
एवढ्या सगळ्या ऊहापोहानंतर एक प्रश्न उरतोच. कर्ण इतर पांडवांपेक्षाही अर्जुनाचाच एवढा द्वेष का करत होता???
उत्तर साधे आहे मित्रांनो! अर्जुनाने कर्णाचा तर कोणताच अपराध केला नव्हता. फक्त अडचण एकच होती, कर्णाने आयुष्यात जे जे मिळवण्यासाठी प्रयत्न केले, ते ते त्याला मिळवता आले नाही. ते सर्व काही अर्जुनाला मात्र सहज मिळाले. चांगला निष्णात गुरू असो... धनुर्विद्येतील प्रावीण्य असो... अथवा द्रौपदीही असो... इतकेच कशाला? पोरका असणाऱ्या कर्णाला त्याची आई शेवटच्या क्षणाला सापडलीही. पण ती कुंतीही अर्जुनाचीच आई बनून कर्णाकडे गेली. यापेक्षा मोठी शोकांतिका ती काय असणार? आपण जे जे मिळवू शकलो नाही; ते सर्व इतरांना मिळाले की, माणूस त्याचा द्वेष करू लागतो. It's simple psychology...!!!
आणि म्हणूनच केवळ माझ्या द्वेषापोटी कोणी कर्ण बनून कौरवसेनेला मिळणार असेल; तर तो कितीही महान का असेना! त्याला संपावेच लागेल. कारण हे माझे कुरुक्षेत्र आहे...!!!

Which book is this quote from?
ReplyDelete"आपल्याला जिवापाड आवडणाऱ्या माणसाचं मूल वाढवणं, आपल्या जोडीदाराला अंशरूपाने स्वतःच्या शरीरातच जागा देण्याच्या आनंदाची बरोबर कशाशीच होऊ शकत नाही. आपल्याला वाढवताना प्रत्येक स्त्री काही प्रमाणात आपल्या नवऱ्याचीही आई होत असावी. पहिलं मूल होण्यापूर्वी ती केवळ प्रेयसी असते. कायम जीव टाकावा अशा पात्रतेचा नवरा लाभला तर दिवसाचे किती क्षण ती नवऱ्याचाही अपत्यासारखा सांभाळ करते हे कोणत्याही पुरुषाला कळायचं नाही. स्त्री जेव्हा जेव्हा संघर्षासाठी उभी असते."