Friday, 19 August 2016

🌼🌼🌼बुद्धी हि एका ज्योती सारखीच अज्ञानाचा नाश करून, ज्ञानाची ज्योत तेवत ठेवणारी...! 🌼🌼🌼


बुद्धी म्हणजे वस्तू, व्यक्ती, प्रसंग व माहिती समजून घेण्याची, लक्षात ठेवण्याची क्षमता, तसेच काय चांगले व काय वाईट हे ठरविण्याची क्षमता होय.
शुद्धी दे, बुद्धी दे, हे दयाघना
शक्ती दे, मुक्ती दे आमुच्या मना

तरतम ते उमजेना, उमजेना सत्य
फसविते आम्हांला विश्व हे अनित्य
दिग्दर्शन मज व्हावे हीच कामना

स्वत्वाला विसरून जर भ्रमले हे चित्त
ऋजुतेवर मात करी द्रोह हा प्रमत्त
निर्भयता जागावी हीच प्रार्थना

बुद्धी आणि शक्ती मिळविण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी आदर्श जीवनशैलीची आवश्यकता असते. संतुलित आहाराचीही गरज असते.
देवाची भक्ती किंवा वडील मंडळींना नमस्कार करण्यामुळे नकळतपणे मनात एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होतो ज्याने कोणत्याही संकट किंवा अडचणीच्या वेळी निर्माण होणारी भीती व त्याचा परिणाम म्हणून कॉर्टिझॉलचा आघात कमी होतो. अर्थात, मेंदूवर होणारा विपरीत परिणाम ह्या प्रकारे सहज टाळता येतो.
हिंदू धर्मशास्त्रात बुध या ग्रहाला बुद्धीचा कारक ग्रह मानण्यात आले आहे. त्यामुळेचे बुद्धीदाता गणेश भक्तीसाठी चतुर्थी आणि बुधवारला विशेष महत्त्व आहे.
।। ओम बुधाय नम: ।।

No comments:

Post a Comment