Thursday, 4 August 2016

🌼🌼🌼श्रावण महिन्यातील कार्ये -🌼🌼🌼

या महिन्याचे वैशिष्ठ्य -
- श्रावण पौर्णिमेच्या मागे-पुढे श्रवण नक्षत्र असते म्हणून हा श्रावण महिना.
- या महिन्यापासून वर्षा ऋतू सुरु होतो.
- जवळजवळ प्रत्येक दिवशी काहीतरी धार्मिक कृत्य असतेच.
- या महिन्यात उनपावसाचा खेळ चालू असतो, हवा फिरती असते, फुले फुललेली असतात. शेतीचे काम कमी झालेले असते. रोपे तरारलेली असतात. फुलपाखरे-चतुर-भुंगे फिरत असतात. आल्हाददायक वातावरण असते.
धार्मिक कार्ये -
१) प्रत्येक सोमवारी - शिवपूजन
२) प्रत्येक मंगळवारी - मंगलागौरीचे पूजन
३) प्रत्येक बुधवारी - बुधाचे पूजन
४) प्रत्येक गुरुवारी - बृहस्पतीचे पूजन
५) प्रत्येक शुक्रवारी - देवीचे पूजन
६) प्रत्येक शनिवारी - शनि-मारुति-अश्वत्था(पिंपळा)चे पूजन
७) प्रत्येक रविवारी - आदित्याचे पूजन
शिवाय -
शुक्ल व कृष्ण एकादशी - वैष्णवांचा उपवास
द्वादशीला पारणे
कृष्ण चतुर्थीला - संकष्ट चतुर्थीला गणपती उपवास
विशेष दिवस -
- श्रावण शुक्ल पंचमी (नागपंचमी) - नागपूजन
- श्रावणी पौर्णिमा (नारळी पौर्णिमा, राखी पौर्णिमा, पोवती पौर्णिमा)
- श्रावणी (वैदिकांसाठी)
- श्रावण कृष्ण सप्तमी-अष्टमी (श्रीकृष्ण-जन्माष्टमी)
- श्रावणी अमावस्या (पिठोरी अमावस्या)
॥श्रीराम समर्थ॥🕉

|| श्री राम जय राम जय जय राम ||
|| जय हनुमान|| 

No comments:

Post a Comment