Tuesday, 9 August 2016

🌼🌼🌼नामा म्हणे तुम्ही स्मरावे गोविंदा🌼🌼🌼


पांडवांकरीता अग्नी कौरवांणी तयार केला कुभांड केले पण ह्रदयात माधवाचे नामस्मरण नित्य होते.
गोकुळात गोपाळांना अग्नी पासून अलिप्त राहिले त्यांच्या ह्रदयात देवकीच्या बाळाचे सतत स्मरण होते.
लंकेमध्ये हनुमंतराय यांना रावनाने अग्नीने जाळण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या ह्रदयात स्मरण फक्त सीताकांत रामराय यांचे होते.
भक्त प्रल्हाद यासाठी त्यांच्याच पित्याने अग्नीत टाकन्याचा प्रयत्न केला पण भक्ताच्या ह्रदयात स्मरणात गोविंद रहात होता.
सीतामाईला देखील अग्निपरिक्षेला सामोरे जावे लागले पण ह्रदयात स्मरण रघुनाथांचे होते.
सर्व लंका जळून ख़ाक झाली होती लंकेसी फ़क्त बिभीषणाचे घर राहिले होते कारण बिभीषणाच्या ह्रदयात स्मरण सीतावराचे होते.
आणि म्हणूनच संसाराची भवबाधा चुकेल पण
*नामा म्हणे तुम्ही स्मरावे गोविंदा । चुके भवबाधा संसाराची ।।*
अहो प्रत्यक्ष नामात इतकी क्षमता आहे की भगवान शिवजी देखील नामाने शीतल झाले
शिव हलाहले तापला । तोहि नामे शीतल झाला ।।
|| श्री राम जय राम जय जय राम ||
|| जय हनुमान|| 

No comments:

Post a Comment