🌼🌼🌼श्रीराम समर्थ..🌼🌼🌼
शेताची मशागत जशी पावसासाठी करतात,तशी नामासाठीच इतर साधने करावीत.नामाचे प्रेम एकदम येणार नाही,पण केव्हातरी पाऊस पडला कि शेताच्या मशागतीचे सार्थक होते,तसे नामस्मरण सतत केल्याने आज ना उद्या भगवंताचे प्रेम येईल.एका भक्ताने श्री महाराजांना विचारले की,परमार्थात आपली प्रगती होत आहे का,तें कसे समजावे..??तेव्हा श्री चटकन म्हणाले,"सध्या नाम घेताना संसाराचे विचार मनात येतात,त्याउलट संसाराची कामे करताना जर नामाचे विचार येऊ लागले,की परमार्थात आपली प्रगती होत आहे असे समजावे...Those who choose God are those who are already choosen by him'
जे परमेश्वराची निवड करतात (त्याच्याकडे ओढले जातात) त्याची निवड परमेश्वरानेच केलेली असते...
-----श्री.गोँदवलेकर महाराज.
|| श्री राम जय राम जय जय राम ||
|| जय हनुमान||

No comments:
Post a Comment