🌼🌼🌼नियती🌼🌼🌼
नियतीबद्दल माणसाच्या धारणा अवास्तव व विपर्यस्त आहेत. सर्व साधारण माणूस दैव, नशीब, प्रारब्ध किंवा एखादी लहरी अचिंत्य शक्ती अशाला " नियती " असे समजतो.
आपल्या हातात काहीच नसून केवळ नियतीच्या इच्छेप्रमाणे आपले जीवन घडत जाणार आहे, अशी भ्रामक समजूत कोट्यावधी लोकांची असते व या समजुतीच्या आहारी जाऊन कोट्यावधी माणसे आपले जीवन बरबाद करून घेतात, ही खेदाची गोष्ट आहे.
इष्ट-अनिष्ट परिणामकारक चैतन्य शक्तीच्या निसर्गनियमांना आपण आपल्या कर्मांच्या द्वारे जेव्हा गती देतो, तेव्हा त्या गतीतून जी निर्मिती होते त्याला ' नियती ' असे म्हणतात.
माणसाच्या अतं:करणात जे विचार-विकार, संकल्प-विकल्प, कल्पना-भावना, वासना-धारणा वगैरे अंत:प्रेरणा असतात, त्या अंत:प्रेरणा माणसाच्या जीवनात अत्यंत महत्त्वाच्या असून
त्याच्या सर्व कर्मांना कारणीभूत असतात व ह्या सर्व कर्मांच्या द्वारे निसर्गाच्या नियमांना गती मिळून म्हणजेच ते कार्यान्वित होऊन त्यातूनच माणसाची नियती निर्माण होते.
म्हणजेच आपण स्वत:च आपली नियती निर्माण करीत असतो व तीच नियती आपल्या जीवनावर प्रभाव टाकीत असते. म्हणूनच
*"Niyati is Man's own creations which in turn influences his life".*
- सद्गुरू श्री वामनराव पै
No comments:
Post a Comment