🌼🌼🌼
रामदासांची सुसंवाद सूत्रे
🌼🌼🌼
बरेच वेळा आपण पाहतो की, बोलणा-याचा ‘वाच्यार्थ’ एक असतो तर त्याच्या बोलण्याचा ‘मथितार्थ’ काही वेगळाच असतो. उदाहरणार्थ, गोष्टीतल्या एका शिका-याने आपल्या प्रतिस्पर्धी शिका-याला सावजापासून हूल देण्यासाठी सांगितले की, या जंगलात चांगली हरणे नसल्याने मी दुस-या जंगलात जात आहे.
‘हेच समजून उत्तर देणें। दुस-याचें जीविंचे समजणे। मुख्य चातुर्याची लक्षणें। तीही ऐंसी।।’
अर्थात, सर्वात पहिले, दुस-या व्यक्तीला आपल्याला काय सांगायचे आहे ते नीट समजून घ्या आणि मगच त्याच्या बोलण्याचा हेतू समजावून घ्या. त्या हेतूप्रमाणे तुमचे उत्तर ठरवा. हीच चातुर्याची लक्षणे आहेत.
बरेच वेळा आपण पाहतो की, बोलणा-याचा ‘वाच्यार्थ’ एक असतो तर त्याच्या बोलण्याचा ‘मथितार्थ’ काही वेगळाच असतो. उदाहरणार्थ, गोष्टीतल्या एका शिका-याने आपल्या प्रतिस्पर्धी शिका-याला सावजापासून हूल देण्यासाठी सांगितले की, या जंगलात चांगली हरणे नसल्याने मी दुस-या जंगलात जात आहे.
त्या पहिल्या शिका-याचा हेतू जाणून न घेता दुस-या शिका-याने पहिल्याच्या सांगण्यावरच भरंवसा ठेवून ते जंगल सोडले, तर पहिल्या शिका-याला ते संपूर्ण जंगल आयतेच किंवा बाहेर घालविणा-या एकटय़ालाच मिळेल. याच्या उलट दुस-याने हा आपल्याला हाकलवण्याचा पहिल्याचा कट आहे हा हेतू समजावून घेतला तर तो चतुर ठरेल.
सूत्र २ :
‘नेणतेंपण सोडूं नये। जाणपणों फुगों नये।
नाना जनांचे हृदये। मृदू शब्दें उकलावे।।’
नाना जनांचे हृदये। मृदू शब्दें उकलावे।।’
जो नेता विविध लोकांशी संबंध ठेवून असतो, अशा नेत्याला समर्थ रामदासांची ही ओवी फारच उपयुक्त ठरेल. या ओवीनुसार अशा लोकनेतृत्वाने स्वत:च्या ज्ञानाने अहंमन्य होऊन आपल्यापेक्षा कनिष्ठ वर्गाशीही बोलण्याचे टाळू नये.
किंवा एखादी गोष्ट माहीत नसल्यास ते ध्यानात ठेवून लोकांशी झालेल्या संवादातून अशी माहिती काढावी की, जेणेकरून मृदू शब्दांतून लोकांचे मनोगत जाणण्याची विद्या हस्तगत करावी. लोकांशी सातत्याने संबंध येणा-या प्रत्येक व्यवस्थापकासाठी हे सूत्र खूप महत्त्वाचे व आवश्यक आहे.
सूत्र ३ :
‘जगामध्ये जगमित्र। जिव्हेपासीं आहे सूत्र।’
ज्या कुणाला चांगले बोलण्याची कला हस्तगत झालेली आहे, असा माणूस जगमित्र होत असतो. लोकांना आपल्या वक्तृत्वाच्या प्रभावाने जिंकून घेणारे काही जण असतात. असे लोक प्रभावी नेते ठरतात. प्रभावी व्यवस्थापक ठरतात.
सूत्र ४ :
‘कठिन शब्दें वाईट वाटतें।
हें तो प्रत्ययास येतें।
तरी मग वाईट बोलावें तें।
काय निमित्य।।
पेरिलें तें उगवतें।
बोलण्यासारिखें उत्तर येतें।
तरी मग कर्कश बोलावें तें।
काये निमित्य।।’
हें तो प्रत्ययास येतें।
तरी मग वाईट बोलावें तें।
काय निमित्य।।
पेरिलें तें उगवतें।
बोलण्यासारिखें उत्तर येतें।
तरी मग कर्कश बोलावें तें।
काये निमित्य।।’
जे पेराल तेच उगवेल हा निसर्ग नियम आहे. त्यामुळे क्रियेला जशी प्रतिक्रिया तसेच अनुचित शब्दाला अनुचित प्रतिशब्दच आपल्याला ऐकू येणार. हे माहीत असूनही आपण अनुचित का बोलावे बरे?
आपल्याशी जर एखादी व्यक्ती रागावून बोलली तर आपल्याला ज्याप्रमाणे वाईट वाटते, त्याप्रमाणे इतरांशी बोलताना दुस-याच्या मनाचा विचार करावा व इतरांशी बोलताना त्यांना बोचेल किंवा वाईट वाटेल असे बोलू नये. कारण ज्याप्रमाणे आपण बोलत असतो त्याप्रमाणेच समोरच्या व्यक्तीकडून प्रतिक्रिया येण्याची शक्यता असते. याचे भान ठेवूनच लोकांशी बोलावे.
संदर्भ व सौजन्य : प्रहार
No comments:
Post a Comment