▬▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬▬▬
★॥एक फोटो ज्याने मंत्र्यासहीत हजारो लोकांना विचार करण्यास भाग पाडले..॥★
▬▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬▬▬
★॥एक फोटो ज्याने मंत्र्यासहीत हजारो लोकांना विचार करण्यास भाग पाडले..॥★
▬▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬▬▬
सोशल मीडिया मध्ये वायरल होत असलेल्या या फोटोने उच्च पदस्थ मंत्री,अधिकाऱ्यांसहीत हजारो लोकांना अचंबित केले आहे.आपली मुलं स्मार्ट आणि हुशार व इतरांपेक्षा एक पाऊल पुढे करण्याच्या नादात आपण त्यांच्यावर अत्याचार तर करत नाही आहोत ना ?
हैदराबादच्या सुरेन नावाच्या व्यक्तीने ट्विटरच्या माध्यमातून एक फोटो पोस्ट केला आहे ज्यात एक चिमुकला अर्धवट झोपेत आणि खिशात पराठा खोसलेल्या अवस्थेत शाळेच्या प्रार्थनेसाठी हात जोडून उभा आहे.जेब. सुरेनने या पोस्टमध्ये मानव संसाधन मंत्रालय व तेलंगणाचे मंत्री के.टी.रामराव यांना टॅग करून विचारले कि, ”खिशात सकाळचा नाष्टा,अधुरी झोप....शाळेची वेळ १० ते सं.५:३० का नाही ? कृपया विचार करा.”
ट्वीट फार वायरल झाला आणि बऱ्याच लोकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या.मंत्री के.टी.रामराव यांनी म्हटले, ”मी आपल्या मताशी सहमत आहे.मुलांसाठी बालपण गरजेचे आहे....असे तणावपूर्ण वातावरण नाही."
कोणत्याही संवेदनशील व्यक्तीस हा फोटो हादरवून टाकतो.मुलांचं भविष्य(ज्याबाबत आपल्याला माहिती नाही) सुरक्षीत करण्याच्या नादात आपण त्यांचं बालपण तर हिरावून घेत नाही आहोत ना ?
यावर नेते,मंत्र्यासहीत आपण पालकांनी पण विचार करणे गरजेचे आहे.अधुरी झोप आणि अधुरं पोषण यामुळे शरीर अशक्त करून कोणत्या शिक्षणाने आपण त्यांना सशक्त करू इच्छीतो ? जरा विचार करा.....
यावर नेते,मंत्र्यासहीत आपण पालकांनी पण विचार करणे गरजेचे आहे.अधुरी झोप आणि अधुरं पोषण यामुळे शरीर अशक्त करून कोणत्या शिक्षणाने आपण त्यांना सशक्त करू इच्छीतो ? जरा विचार करा.....
*फोटो पहा.......*

No comments:
Post a Comment