Tuesday, 21 March 2017

🌼🌼🌼

रामदासांची सुसंवाद सूत्रे 

🌼🌼🌼

बरेच वेळा आपण पाहतो की, बोलणा-याचा ‘वाच्यार्थ’ एक असतो तर त्याच्या बोलण्याचा ‘मथितार्थ’ काही वेगळाच असतो. उदाहरणार्थ, गोष्टीतल्या एका शिका-याने आपल्या प्रतिस्पर्धी शिका-याला सावजापासून हूल देण्यासाठी सांगितले की, या जंगलात चांगली हरणे नसल्याने मी दुस-या जंगलात जात आहे.
‘हेच समजून उत्तर देणें। दुस-याचें जीविंचे समजणे। मुख्य चातुर्याची लक्षणें। तीही ऐंसी।।’
अर्थात, सर्वात पहिले, दुस-या व्यक्तीला आपल्याला काय सांगायचे आहे ते नीट समजून घ्या आणि मगच त्याच्या बोलण्याचा हेतू समजावून घ्या. त्या हेतूप्रमाणे तुमचे उत्तर ठरवा. हीच चातुर्याची लक्षणे आहेत.
बरेच वेळा आपण पाहतो की, बोलणा-याचा ‘वाच्यार्थ’ एक असतो तर त्याच्या बोलण्याचा ‘मथितार्थ’ काही वेगळाच असतो. उदाहरणार्थ, गोष्टीतल्या एका शिका-याने आपल्या प्रतिस्पर्धी शिका-याला सावजापासून हूल देण्यासाठी सांगितले की, या जंगलात चांगली हरणे नसल्याने मी दुस-या जंगलात जात आहे.
त्या पहिल्या शिका-याचा हेतू जाणून न घेता दुस-या शिका-याने पहिल्याच्या सांगण्यावरच भरंवसा ठेवून ते जंगल सोडले, तर पहिल्या शिका-याला ते संपूर्ण जंगल आयतेच किंवा बाहेर घालविणा-या एकटय़ालाच मिळेल. याच्या उलट दुस-याने हा आपल्याला हाकलवण्याचा पहिल्याचा कट आहे हा हेतू समजावून घेतला तर तो चतुर ठरेल.
सूत्र २ :
‘नेणतेंपण सोडूं नये। जाणपणों फुगों नये।
नाना जनांचे हृदये। मृदू शब्दें उकलावे।।’
जो नेता विविध लोकांशी संबंध ठेवून असतो, अशा नेत्याला समर्थ रामदासांची ही ओवी फारच उपयुक्त ठरेल. या ओवीनुसार अशा लोकनेतृत्वाने स्वत:च्या ज्ञानाने अहंमन्य होऊन आपल्यापेक्षा कनिष्ठ वर्गाशीही बोलण्याचे टाळू नये.
किंवा एखादी गोष्ट माहीत नसल्यास ते ध्यानात ठेवून लोकांशी झालेल्या संवादातून अशी माहिती काढावी की, जेणेकरून मृदू शब्दांतून लोकांचे मनोगत जाणण्याची विद्या हस्तगत करावी. लोकांशी सातत्याने संबंध येणा-या प्रत्येक व्यवस्थापकासाठी हे सूत्र खूप महत्त्वाचे व आवश्यक आहे.
सूत्र ३ :
‘जगामध्ये जगमित्र। जिव्हेपासीं आहे सूत्र।’
ज्या कुणाला चांगले बोलण्याची कला हस्तगत झालेली आहे, असा माणूस जगमित्र होत असतो. लोकांना आपल्या वक्तृत्वाच्या प्रभावाने जिंकून घेणारे काही जण असतात. असे लोक प्रभावी नेते ठरतात. प्रभावी व्यवस्थापक ठरतात.
सूत्र ४ :
‘कठिन शब्दें वाईट वाटतें।
हें तो प्रत्ययास येतें।
तरी मग वाईट बोलावें तें।
काय निमित्य।।
पेरिलें तें उगवतें।
बोलण्यासारिखें उत्तर येतें।
तरी मग कर्कश बोलावें तें।
काये निमित्य।।’
जे पेराल तेच उगवेल हा निसर्ग नियम आहे. त्यामुळे क्रियेला जशी प्रतिक्रिया तसेच अनुचित शब्दाला अनुचित प्रतिशब्दच आपल्याला ऐकू येणार. हे माहीत असूनही आपण अनुचित का बोलावे बरे?
आपल्याशी जर एखादी व्यक्ती रागावून बोलली तर आपल्याला ज्याप्रमाणे वाईट वाटते, त्याप्रमाणे इतरांशी बोलताना दुस-याच्या मनाचा विचार करावा व इतरांशी बोलताना त्यांना बोचेल किंवा वाईट वाटेल असे बोलू नये. कारण ज्याप्रमाणे आपण बोलत असतो त्याप्रमाणेच समोरच्या व्यक्तीकडून प्रतिक्रिया येण्याची शक्यता असते. याचे भान ठेवूनच लोकांशी बोलावे.
संदर्भ व सौजन्य : प्रहार

Sunday, 19 March 2017

पालकांसाठी लेख (हेरंब कुलकर्णी )
टिव्ही आणि सोशल मिडिया यांचा लहान मुलांवर होणारा परिणाम व पालकांची जबाबदारी यावर सकाळ च्या सप्तरंग पुरवणीतील लेख..

॥ हजार तासांची घरातली शाळा..... ॥

शिक्षण कायदयाने प्राथमिक शाळा वर्षाला ८०० तास तर माध्यमिक शाळा १००० तास चालते. इतका कमी काळ चालणार्या शाळेचे आपण समाज शासन पालक म्हणून किती बारकाईने मूल्यमापन करतो. त्यांच्याकडून खूप सार्या अपेक्षा करतो.ते करायला ही हरकत नाही.पण दुसरी एक १००० तास घरातच शाळा भरते पण त्या शाळेकडे पालक लक्ष देत नाही की त्या शाळेशी दर्जा सुधारा म्हणून भांडत नाहीत. त्या शाळेकडून अपेक्षा करीत नाहीत. कोणती आहे ती शाळा ?ती शाळा आहे दूरदर्शन आणि सोशल मिडियाची....!!!!
१००० तास ? होय.आपली मुले वर्षाला टीव्ही आणि सोशल मीडिया एका वर्षात १००० तासापेक्षा जास्त वेळ बघतात म्हणजे शाळेच्या वेळेतच या शाळेत ते असतात आणि तरीही त्या शाळेत ती काय शिकतात याकडे पालक,समाज ,शासन औपचारिक शाळेकडे काळजीने बघत नाहीत.
याउलट टिव्हीविरोधी बोलणार्यााना फॅडिस्ट समजले जाते.माझ्या घरातला टिव्ही गेली ३ वर्षे मी बंद ठेवला आहे. त्याचा लाभ मुलाचे वाचन,चित्र काढणे वाढले.गंभीरपणे एखादा विषय समजून घेणे वाढले. माझे स्वत:चे लेखन टिव्ही नसल्याने वाढले.मुलगा ज्या विषयात आवड आहे ती माहिती नेटवर बसतो. बातम्या दुसर्या दिवशी वर्तमानपत्रातून समजल्याने काही फरक पडत नाही. हे सारे सकारात्मक परिमाण मी अनुभवतो आहे॰ पण जेव्हा आमच्याकडे कुणी येते आणि घरात टिव्ही नाही तेव्हा एखाद्या हातपाय नसलेल्या व्यक्तीकडे दयेने बघावे तसे ते बघतात व जगाच्या ज्ञांनापासून मुलांना दूर ठेवू नका असा उपदेश करतात.
तेव्हा या टिव्ही आणि सोशल मिडियच्या अनौपचारिक शाळा खरच जगाचे परिपूर्ण ज्ञान देते का ?मुलांना शाळा जशा विकासाच्या संधी देते तशा संधी देते का ?या गृहीतकाचीच उलटतपासणी करायला हवी.
 टिव्ही ने आणि सोशल मीडिया ने शारीरिक नुकसान मुलांचे होते त्यापेक्षा कितीतरी जे अधिक नुकसान हे मानसिक स्तरावरचे असते. वेगवान हालचाली हिंसकतेशी जोडल्या गेल्याने मुलांना मग हिंसकताही आवडू लागते. कार्टून सिरियल्स बघितल्यामुळे लहान मुलांमध्ये हिंसकता वाढते. टॉम व जेरीचे विनोद हे आवडतात. त्यांच्यातली हिंसक प्रवृत्ती व त्यांच्या हिंसक कारवायांभोवती गुंफलेले असतात. हॉरर चित्रपट किंवा मालिकासुद्धा आवडायला लागतात. भीती आणि हिंसा याबाबत त्यांची संवेदनशीलता कमी होत जाते आणि याचा त्यांच्या प्रत्यक्ष जीवनावरही परिणाम होतोच. माध्यमिक शाळेतली मुलांना एकटय़ाने किंवा समवयीन मुलांबरोबर टीव्ही बघायला आवडतं. स्वातंत्र्य, प्रणय हे विषय आवडतात . म्युझिक व्हिडीओज्, हॉरर मूव्हीज् आणि पोर्नोग्राफिक व्हिडीओज् बघायला आवडतात. मध्यंतरी मानसोपचार परिषदेत किशोर अवस्थेतील ५० टक्के मुले पोर्न बघतात असा निष्कर्ष अतिरेकी वाटला तरी मोबाइलच्या वापरामुळे वास्तवाच्या जवळ जाणारा आहे.
आपली मुले टिव्ही आणि सोशल मिडियाच्या शाळेत शिकतात. यातून त्यांच्या भावनांकाची तोडफोड होते.हिंसाचार बघून संवेदना बोथट होतात.अपघात बघून थंडपणे पुढे जाणारी पिढी घडते.ओरडणे,शिवीगाळ,प्रसंगी मारहाण हे स्वभाव विशेष होतात. मध्यंतरी संगमनेर तालुक्यात लहान वर्गमित्रांनी आपल्याच मित्राचा केलेला खून हे बोलके उदाहरण ठरावे. प्रेमप्रकरणे अगदी ५ वीच्या वर्गापासून सुरू होतात. गेल्या ३ वर्षात मुंबईत १५ वर्षाखालील मुलींच्या गर्भपात करण्याच्या प्रयत्नात १४४ टक्क्याने वाढ झाली आहे तर १५ ते १९ वयोगटात गर्भपातात ४७ टक्के वाढ झाली आहे. या तपशीलाचा सहसंबंध या माध्यमांशी जोडायचा की नाही ?
ग्रामीण आणि आदिवासी भाग हाही याला अपवाद नाही. किंबहुना गरीब कुटुंबात ही एकमेव करमणूक व एकच खोली त्यामुळे तिथे मुले जास्त टिव्ही बघतात. मोबाइल बघतात.या आभासी जगातली मूल्यव्यवस्था आणि जाहिरातीतील जग त्यातील घर,तिथली सुंदर नटलेली आई ,गाडी आपल्या वाट्याला का नाही ? यातून एक वेगळाच न्यूनगंड मुलांमध्ये
संशोधनात असे आढळून आले की, जास्त टीव्ही पाहणार्याल मुलांमध्ये खेळाची आवड कमी होत जाते. ते लांबउडीदेखील मारू शकत नाहीत. माँट्रियल विद्यापीठ व जस्टिन मदर अँड चाइल्ड हॉस्पिटल यांच्या संयुक्त संशोधनातून मुलांनी अनेक तास टीव्ही पाहिल्याने त्यांच्यात स्थूलपणाच्या तक्रारी वाढतात. त्याच्या शरीरातील मांसपेशी कमजोर पडतात व त्यामुळे भविष्यात त्याच्या प्रकृतीला गंभीर धोका पोहोचू शकतो.
तासन्तास दूरचित्रवाणी बघितल्यास प्राणघातक पल्मनरी एम्बॉलिझम हा रोग होण्याची शक्यता असते.पल्मनरी एम्बॉलिझम म्हणजे हृदयाकडून फुफ्फुसाकडे रक्त वाहून नेणार्याम रोहिणी या मुख्य रक्तवाहिनीमध्ये अडथळा निर्माण होते
यावर उपाय काय? आमच्यासारखे टिव्ही बंद करावा आणि ते शक्य नसेल तर मुलांशीच चर्चा करून रोज १ तास टिव्ही बघण्याचे वेळापत्रक ठरवावे. कार्यक्रम एकत्र बघावेत.बघितल्यावर मुलांशी त्यावर चर्चा करावी. जाहिरातींचा पडणारा प्रभाव,खोटी जीवनमूल्ये यावर चर्चा करून वास्तवाची जाणीव करून द्यावी. त्याचबरोबर आपण सोशल मिडिया कमीत कमी वापरुन मुलांच्या हातात मोबाइल देवू नये. उलट सुटीच्या दिवशी जास्त वेळ व रोज मुलांशी बोलणे,खेळणे .त्याला चित्र काढणे,गोष्टीची पुस्तके वाचणे हे करायला हवे.पालकांची मुले अनुकरण करतात. तुमच्या हातात पुस्तके आली,घरात लहान मुलांसाठी ची पुस्तके असली तरच मुले ती वाचतील. तेव्हा पालक टिव्हीसमोर आणि whatsapp वर असतील तर मुले तेच करणार..तेव्हा टिव्ही सोशल मिडियाला सशक्त पर्याय पालकांनी दिले तरच घरातली १००० तासांची शाळा मुलांची सुटेल.
राजीव दीक्षित म्हणायचे की राजा हरिश्चंद्र हे नाटक बघून जर मोहनदास नावाचा बालक सत्य जगण्याचा संकल्प करून महात्मा गांधी होत असेल आणि या माध्यमात इतके सामर्थ्य असेल तर इतकी हिंसा,सेक्स आणि उथळ कार्यक्रम बघून आपली मुले काय होतील ? याची कल्पनाच करवत नाही

टीव्ही बंद अभियान
जळगाव येथील कुतूहल फाउंडेशन चे महेश गोरडे केवळ टीव्ही व सोशल मीडिया या विषयावर जागरण करण्याचे काम गेली १० वर्षापासून करीत आहेत. या समस्येबद्दल आतापर्यंत महाराष्ट्रात ३ लाख माहिती पत्रकांचे वाटप केले.४०,००० हून अधिक मुलांचे सामुहिक समुपदेशन झाले आहे.शेकडो व्याख्याने, कार्यशाळा, चर्चासत्रे, विविध स्पर्धा , पालक सभा , शिक्षक सभा, अशा विविध माध्यमातून या विषयावर नियमित प्रबोधन करीत आहेत. टीव्ही बंद नव्हे तर टीव्ही शिस्त अभियान ते सांगतात. टीव्ही,मोबाईल,इंटरनेट, व्हाटसअप फेसबुक या माध्यमांचा योग्य प्रमाणात वापर करून उपयोग करून घ्यावा. त्यांचा अतिवापर व चुकीचा वापर टाळावा असे सांगणारे ‘या टीव्हीच काय करायचं?’ हे पुस्तक लिहिले.त्याला महाराष्ट्रभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. टीव्ही शिस्त पुरस्कार विद्यार्थी, पालक यांना वितरीत करतात टीव्ही,मोबाईल, इंटरनेट व सोशल मिडियाच्या आहारी गेलेल्यांसाठी टीव्ही ,मोबाईल,इंटरनेट व्यसनमुक्ती केंद्रही सुरू केले. केवळ टीव्ही ला विरोध न करता सकारात्मक पर्यायही दिला. मुलांचे छंदवर्ग सुरू करण्यात आले.त्यात विज्ञान प्रकल्प,बौद्धिक खेळणी,सीडी,पुस्तके,सहली,यासह उपक्रम केंद्र सुरू केले आहे. हजारो विद्यार्थी व पालक या वर्गात सहभागी झाले. यातून पालकांना पर्याय मिळाला. आठवड्यातून एक दिवस टीव्ही बंद. टीव्ही किती वेळ बघायचा याचे वेळापत्रक मुले टीव्ही शेजारी लावतात.

 रोज सरासरी ४ तास टीव्ही ,व्हाटस अप ,फेसबुक चा वापर याप्रमाणे एका वर्षाला १४६० तास ,तर ६० वर्षांच्या आपल्या आयुष्यात ८७६०० तास टीव्ही ,व्हाटस अप, फेसबुक साठी खर्च होतो . १२ तासांचा कामाचा दिवस धरला तर आपण आयुष्यतील २० सोनेरी वर्ष टीव्ही ,व्हाटस अप, फेसबुक वर अक्षरश: वाया घालवतो.
भारतातील मुले (चार ते १४ वर्षे) दिवसाला सुमारे १७० मिनिटे (सुमारे तीन तास) टीव्ही बघतात. शनिवार-रविवारी आणखी जास्त म्हणजे २०० मिनिटे (सुमारे साडेतीन तास).
वय वर्षे चार ते नऊ या वयोगटातील मुलांमध्ये हेच प्रमाण अनुक्रमे १३० आणि २०० मिनिटे आहे.
संपूर्ण देशभरातील तीन कोटींहून अधिक मुले (चार ते १४ वर्षे) रात्री दहानंतरही टीव्ही बघतात.
रात्री दहानंतर एफ टीव्हीच्या प्रेक्षकांपैकी १३ टक्के, चॅनल व्हीच्या प्रेक्षकांपैकी १३ टक्के, एम टीव्हीच्या प्रेक्षकांपैकी १३ टक्के, तर बिन्दास चॅनलच्या प्रेक्षकांपैकी तब्बल १७ टक्के प्रेक्षक हे १४ वर्षांखालील मुले आहेत.
‘आहट’ या हॉरर मालिकेचे ४८ टक्के प्रेक्षक हे चार ते १४ वयोगटातील मुलं आहेत.
स्टार वनवरील ‘हॉरर नाईट्स’ या मालिकेचे हिंदी भाषिक राज्यांतील ४८ टक्के प्रेक्षक १४ वर्षांखालील मुलं आहेत, तर २५ टक्के प्रेक्षक हे नऊ वर्षांखालील मुलं आहेत.
( ‘व्हॉट्स ऑन इंडिया’ने मे २०१० मध्ये केलेल्या सर्वेक्षण)
हेरंब कुलकर्णी 

आत्मविश्वास वाढवण्यासाठी उपयुक्त सूचना-Published in “Sunday Sakal”


आत्मविश्वास वाढवण्यासाठी उपयुक्त सूचना  
१. स्वत:त सुधारणा घडवून आणण्याची तीव्र इच्छाशक्ती हवी. आत्मविश्वास मिळवणं आणि वाढवणं हे प्रत्येकाला शक्य आहे हे लक्षात घेऊया.
२. स्वत:मध्ये रुजलेली भिती व असुरक्षितता ह्यांना ओळखा, जाणून घ्या. त्यावरचे उपाय शोधा. आवश्यक तर तज्ञांची मदत घ्या.
३. स्वत:ची शरम वाटून घेऊ नका किंवा किंव करू नका.
४. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की कुठलाही माणूस परिपूर्ण नाही. कुणाच्याही हातून चुका होऊ शकतात. तशीच आपल्याही हातून चूक होऊ शकते. त्यामुळे निराश होऊ नका. स्वत:ला क्षमा करा.चूकांमधून शिका आणि पुनरावृत्ती टाळा.
५. इतरां पेक्षा आपण कमी आहोत ही भावना मनातून काढून टाका.
६. आपला स्वत:शी संवाद (self talk)  सतत चालू असतो. तो सकारात्मक होतो आहे ह्याकडे लक्ष्य द्या.
७.. इतरांकडून दयेची, सहानभूतीची अपेक्षा करू नका. त्यानं तुमची आत्मप्रतिमा दुबळी होईल व आत्मविश्वास कमी होईल.
८. तुमच्या बलस्थानांचा सतत विचार करा, ती शोधून काढा, त्यावर लक्ष केंद्रित करा.
९. मिळालेल्या लहानशा यशाबद्दल सुद्धा स्वत:ला शाबासकी देण्याची सवय ठेवा, स्वत:ला प्रोत्साहन देत रहा.
१०. घडून गेलेल्या किंवा घडणाऱ्या प्रत्येक प्रसंगातली चांगली बाजू लक्षात घेण्याचा प्रयत्न करा.
११. अपयश हा आयुष्याचा भाग आहे. त्यानं हताश होऊ नका. सकारात्मक विचार करा. पुन्हा प्रयत्न करा.
१२. योग्य त्यावेळी मदत मागण्यात लाज बाळगू नका. आयुष्यात प्रत्येकाला मदत लागते हे लक्षात ठेवा.
13.स्वत:ला relaxed अवस्थेत ठेवण्याची कौशल्ये आत्मसात करा म्हणजे तणावाच्या परिस्थितीत सुद्धा तुम्ही स्थिर राहाल व आत्मविश्वास डळमळणार नाही.
१४. तणाव नियोजनासाठी आवश्यक तेंव्हा वेळ न दवडता तज्ञांची मदत घ्या. कारण तणावाखाली असाल तर आत्मविश्वास मिळवणं/वाढवणं अवघड आहे. 

Thursday, 16 March 2017


🌼🌼🌼

Manual for Happy Family

🌼🌼🌼


समृध्द, सुखी कुटुंब
डॉ. विद्याधर बापट, मानसोपचार तज्ञ
एखाद्या घरात गेल्यावर नेहमी खूप प्रसन्न वाटतं. तेथील माणसे खूप आनंदी असतात ,फ्रेश असतात. सगळीकडे सकारात्मक उर्जा भरून राहिली आहे असं वाटतं . भले मग ते घर सांपत्तिक दृष्ट्या श्रीमंत असो वा नसो. तेथे रहाणाऱ्या व्यक्तींमध्ये आपसात खूप प्रेम, स्नेह, आदर असतो. वेगवेगळ्या वयोगटातील, नात्यातील, पिढीतील व्यक्तींमध्ये एक छान आपलेपणा असतो. आपल्यालाही त्यांच्या वागण्या बोलण्यातून, वावरण्यातून एक प्रकारचा मोकळेपणा आणि सकारात्मक संवेदना जाणवतात. आपल्यालाही तेथे वारंवार जावसं वाटतं तसेच आपलंही घर, आपलंही कुटुंब तसं असावं, असं वाटतं. असं कुटुंब “समृध्द ” असतं .
ह्या समृद्धीचे सहा सोपान असतात. प्रत्येक व्यक्तीची सकारात्मक मानसिकता, प्रत्येकाचं उत्तम आरोग्य, एकमेकांमधील विश्वासावर, आदरावर, प्रेमावर आधारित नातेसंबंध, दुसऱ्याला आनंद देण्याची वृत्ती, सुख किंवा दुख: वाटून घेण्याची वृत्ती आणि अनुकूल किंवा प्रतिकूल परिस्थितीत समाधानी रहाण्याची, एकोप्याने राहण्याची वृत्ती.
आता हे सगळं जमवून आणायचं असेल तर कुटुंबातील प्रत्येकासाठी काही टिप्स आहेत. प्रत्येकाला काही नियम समजून घ्यायला लागतील आणि आपली जबाबदारी पार पाडावी लागेल. आपण तीन पिढयांचे कुटुंब गृहीत धरुया. उदा. घरातील जेष्ठ व्यक्ती म्हणजे आजी आजोबा , मधली पिढी म्हणजे नवरा बायको व तरुण पिढी म्हणजे मुले.
सर्वांसाठी टिप्स -१. कुटुंब संस्थेवर विश्वास ठेवा. म्हणजेच इतरांबरोबर आनंदाने, स्नेह्बंधनाने आपण रहातो तेंव्हा सर्वांचंच व्यक्तिमत्व फुलू शकतं ह्यावर विश्वास ठेवा. . विपरीत परिस्थितून वर आलेल्या व्यक्ती, संपूर्ण कुटुंब आपण पहातो. त्यामागे व्यक्तीच्या कर्तृत्वा बरोबरच कुटुंबातील प्रेम , एकमेकांसाठी केलेला त्याग, धैयाने परिस्थितीशी दिलेली झुंज हे सगळं असतं.
२ . कुठलीही व्यक्ती परिपूर्ण नसते. प्रत्येकाचं व्यक्तिमत्व, भावनिक वीण ही वेगळी असू शकते. भावना व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असू शकते. भावनिक सहनशीलतेची पातळी वेगळी असू शकते. हे समजून घेणं महत्वाचं आहे. त्यामुळे लहान सहान कारणांवरून खटके उडणार नाहीत. मतभेद झाले तरी लवकर मिटतील. स्वस्थ कुटुंबासाठी हे समजून घेणे महत्वाचे आहे.
३.स्वत: भावनिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या शांत, स्वस्थ आहोत का हे तपासा. कारण जेंव्हा व्यक्ती आतून स्वस्थ, शांत असते तेंव्हा आणि तेंव्हाच ती स्वत:ला आणि दुसऱ्याला आनंद देऊ शकते. तसं नसेल तर त्यासाठी उपाय करा. एकमेकांशी किंवा विश्वासातल्या व्यक्तीशी मोकळेपणाने बोला. आवश्यक तर तज्ञांची मदत घ्या. स्वस्थतेसाठीचे व्यायाम करा. उदा. ध्यान, योगासने इत्यादी.
४. अहंकार आड येऊ देऊ नका. समोरच्या व्यक्तीलाही स्वतंत्र मतं असू शकतात हे मान्य करा. कुठल्याही प्रश्नावर टोकाची भूमिका टाळा. तुटेपर्यंत ताणू नका. सर्व कुटुंबासंदर्भातले काही निर्णय एकत्र चर्चा करून घ्या. ह्या प्रक्रियेमध्ये सर्वांची मते विचारात घ्या. एकमेकांशी बोलताना, वागताना नेहमी सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. मला समोरच्याला आनंद द्यायचाय ही भावना महत्वाची.
५. जेष्ठ पिढीने तरुण पिढीला शक्यतो आवश्यक ते स्वातंत्र्य द्यावे. आमच्या वेळेला असं होतं असा धोशा लावू नये. काळ बदलत रहातो. आपल्यालाही बदलायलाच हवे हे लक्षात घ्यावे. त्याच बरोबर नवीन पिढीनेही जेष्ठांच्या सगळ्याच गोष्टी, विचार टाकावू आहेत असा विचार करू नये. त्यांना योग्य तो आदर द्यायला हवा. त्यांच्या सूचनांवर विचार करावा.
६. कुटुंबातील सदस्यांमध्ये मोकळा संवाद असावा. त्यासाठी दिवसातील किंवा शक्य नसेल तर आठवड्यातील काही काळ , काही तास सर्वांनी एकत्र येउन कौटुंबिक किंवा साहित्य, संगीत इत्यादी विषयांवर गप्पा माराव्यात. इतरांचं ऐकून घेण्याची क्षमता, मदत मागण्याचा मोकळेपणा, आपण कुटुंबातील महत्वपूर्ण सदस्य आहोत ह्या धारणा स्वास्थ्यपूर्ण आहेत.
७. काळ बदलतो आहे. Technology चा वापर दैनंदिन आयुष्यात अपरिहार्य आहे. घरातील तरुण पिढी तो करणारच. त्यांना त्या बाबतीत स्वातंत्र्य द्यायलाच हवं. पण त्याचा दुरुपयोग किंवा त्यातच वेळ काढत रहाणं ही भावनिक समस्या किंवा अस्वस्थतेला वाट मिळवून देणं असू शकतं. उदाहरणार्थ अती आणि अवेळी मोबाईल चा वापर, अति गेम्स इ. अशावेळी प्रेमाने समजावून सांगणं व त्यात यश येत नसेल तर तज्ञांची मदत घेणं अपरिहार्य आहे. सतत ओरडणं, दमदाटी करणं, आत्मसन्मान दुखावेल असे शब्द उच्चारणं ह्यातून फक्त वातावरण तणावपूर्ण राहिल. तरुण पिढीचीही जबाबदारी आहे की जेष्ठ जे सांगत आहेत त्यामागची भूमिका समजून घ्यायला हवी. जेष्ठांचा अनुभव व आपल्या बद्दल वाटणारा जिव्हाळा त्यामागे असू शकतो.
८. लग्न जमवणं हा एक महत्वाचा मतभेदाचा मुद्दा असतो. ह्या बाबतीत मुलगा किंवा मुलगी ह्यांना पूर्ण स्वातंत्र्य द्यावं. फक्त निवडीसाठीचे निकष काय असावेत ह्याबाबतीत मोकळेपणाने संवाद व्हावा उदा. निर्व्यसनीपणा, चारित्र्य, इत्यादी. परंतु कुठलंही दडपण आणू नये.
९ . सध्याच्या काळात मित्र मैत्रिणी असणं हे समाजव्यवस्थेचा भागच बनला आहे. त्याबाबतीत मुलां मुलींना टोकू नये. फक्त मर्यादांची व धोक्यांची जाणीव करून द्यावी. मुलामुलीनीही ही बाब समजून जबाबदारीने मैत्र जपावे. चांगला मित्र किंवा मैत्रीण हे बलस्थानही असू शकतं.
१०. सासू सून नातं हे नाजूक प्रकरण असू शकतं . पण ह्याही बाबतीत सासुबाईनी सुनेला जास्तीत जास्त स्वातंत्र्य द्यावं. आता काळ बदलला आहे. मुली सुशिक्षित असतात, त्यांची संसाराबाबत स्वतंत्र मतं असू शकतात हे लक्षात घ्यावं. त्याच बरोबर आपण निरुपयोगी झालो, आपला काळ संपला असं वाटून हताशही होऊ नये. सुनेनेही सासुला आवश्यक तो आदर द्यावा, सल्ला घ्यावा.
सासुसुनेच्या नात्यातील तणावांमुळे मुलावर विलक्षण ताण येऊ शकतो, हे दोघींनीही लक्षात घ्यावे. कारण तो एकाच वेळी मुलगाही असतो आणि पतीही.
११. घरात लहान मुलांसमोर कुणीच कुठलेही वादविवाद करू नयेत. अपशब्द उच्चारू नयेत. लहान मुलं मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या सुदृढ, कणखर होणं ही काळाची गरज आहे.
जुनी पिढी आणि नवीन पिढी ह्यांच्या दृष्टीकोनांमध्ये फरक असणारच पण सुवर्णमध्य काढता येणं ही कला आहे. एकमेकांसाठी त्याग करण्याची भावना , आदर, प्रेम निर्माण झालं, “मी पणा ” सोडता आला की ते सहज शक्य आहे.
आनंद आणि मन:शांती ह्या दोन शब्दांसाठीच आपला जगण्याचा प्रवास आहे. कुटुंबाचं प्रेम हे त्या प्रवासासाठी एक बलस्थान आहे.
डॉ. विद्याधर बापट

श्रीमंत बाजीराव पेशवे – अपराजित योद्धा

छत्रपती शिवाजी महाराजांनंतर मराठी मुलखात जणू तेवढाच आत्मविश्र्वास व
स्वराज्यनिष्ठा निर्माण करणारा ‘संस्थापक पेशवा’!
दिल्लीच्या तख्तापर्यंत धडक मारणारा एकमेव मराठी लढवय्या म्हणजे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे (ऑगस्ट १८इ.स. १७०० – एप्रिल २८इ.स. १७४०) हे मराठा साम्राज्याचे चौथे छत्रपती शाहू महाराज यांचे इ.स. १७ एप्रिल,१७२० पासून वयाच्या अवघ्या २० व्या वर्षीपासुन तहहयात पेशवे (मुख्य प्रधान) होते. त्यांना थोरले बाजीराव किंवा पहिले बाजीराव या नावांनेही ओळखले जाते. रणधुरंधर असलेल्या पहिल्या बाजीरावाने आपल्या कुशल युद्धनेतृत्वाने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेल्या मराठा दौलतीच्या सीमा उत्तर भारतात विस्तारल्या. वेगवान हालचाल हा यांच्या युद्ध कौशल्याचा महत्त्वाचा भाग होता. यांनी केलेल्या सर्व मोठ्या लढाया जिंकल्या.
बाळाजींच्या मृत्यूनंतर “पेशवेपदासाठी” दरबारी लोकांत अहमिका लागली, त्यांत बाजीरावास परंपरागत पेशवेपद देऊ नये असे इतर दरबारी म्हणू लागले त्याला २ कारणे होती –
१) यादवकालीन राजकारणापासून ते ताराराणीपर्यंत राजकारणावर देशस्थांचा पगडा होता ते वर्चस्व पुन: प्रस्थापित व्हावे असे देशस्थांना वाटणे स्वाभाविक होते.
२) थोरला बाजीराव हा फटकळ होता, एक घाव दोन तुकडे हाच त्याचा स्वभाव होता. मुत्सद्देगिरीपेक्षा त्याला समशेर जवळची होती. हे तरुण रक्त आपल्याला भारी पडणार हे लक्षात येताच शाहू महाराजांनी त्यांचा निर्णय बदलावा असे त्यांना सांगितले.
मात्र पडत्याकाळात इतर कोणाहीपेक्षा बाळाजीने त्यांची जास्त काळजी घेतली होती त्यामुळे शाहू महाराजांचा बाजीरावावर जीव होता. त्यांनी पेशवाईची वस्त्रे व शिक्के कट्यार थोरला म्हणजेच पहिला बाजीराव यास दिली.
बाजीराव शिपाई होता. उण्यापुर्‍या ४० वर्षांच्या आयुष्यात त्याने अतुल पराक्रम गाजवला. १७२० मध्ये पेशवाई त्याच्या कोवळ्या खांद्यावर आली. त्याच्या मृत्युपर्यंत म्हणजे २५ एप्रिल १७४० पर्यंत त्याने २० वर्षात अनेक लढाया केल्या. त्यात माळवा(डिसेंबर,१७२३), धर(१७२४), औरंगाबाद(१७२४), पालखेड(फेब्रुवारी,१७२८), अहमदाबाद(१७३१) उदयपूर(१७३६), फिरोजाबाद(१७३७), दिल्ली(१७३७), भोपाळ(१७३८), वसईची लढाई(मे,१७,१७३९) या आणि अशाच ३६ मोठ्या लढायांचा समावेश आहे. आणि सगळ्याच लढाया तो जिंकला आहे. थोडक्यात त्याचा “सक्सेस रेट” “१००%” आहे. वेगवान हालचाल हेच त्याचे प्रभावी हत्यार. शत्रू सावध होण्याआधीच त्याच्यावर अशी काही झडप घालायची की त्याला सावरून प्रतिकार करायला वेळच मिळायला नको हीच त्याची रणनीती आपण “मैदानी लढाई” लढून जिंकू शकतो हे मराठी सैन्याला जाणवून द्यायला कारणीभूत झाली. बर्नाड मॉन्टगोमेरी(Bernard Law Montgomery) या ब्रिटिश ’फील्डमार्शल’ने बाजीरावाची स्तुती पुढील प्रमाणे केली आहे – “The Palkhed Campaign of 1727-28 in which Baji Rao I, out-generalled Nizam-ul-Mulk , is a masterpiece of strategic mobility”. उभ्या भारतात बाजीरावाच्या समशेरीचा डंका वाजत होता. पहिल्या बाजीरावानेच पुण्याला शनिवारवाडा बांधला आणि सातार्‍याच्या राजगादी इतकेच महत्त्व पुण्याला मिळवून दिले. शनिवारवाड्याबद्दल एक दंतकथा सांगितली जाते – बाजीरावाने त्या ठिकाणी एका सशाला मोठ्या शिकारी कुत्र्याचा पाठलाग करताना बघितले, त्याला त्याचे आश्चर्य वाटले, त्या जागी मग त्याने भुईकोट किल्लाच बांधवून घेतला हाच तो शनिवारवाडा. तसे बघता ती जागा पेशव्यांना लाभली असे म्हणायला हरकत नाही कारण नंतर स्वराज्यावर चालून येणारे ’शिकारी कुत्रे’ खरेच स्वराज्याला घाबरू लागले. पुण्यातून हललेले मराठी सत्तेचे केंद्र त्यानेच कोल्हापुरातून आणून पुण्यात वसविले.
दिल्लीचा वजीर “मोहम्मद खान बंगेश” छत्रसाल बुंदेल्यावर चालून आला. तेव्हा त्याच्या समोर छत्रसालला शरणागती पत्करावी लागली. बंगेश हा औरंगजेबाच्या हाताखाली शिकलेला असल्याने शिस्त व चिकाटी हे गुण त्यात पुरेपूर उतरले होते. त्याने ८० वर्षांच्या छत्रसालला छावणीत बंदिस्त केले. मात्र छत्रसाल बुंदेला बंगेशचे बारसे जेवला होता, आपण शरण आलोय असे भासवून त्याने हेरांमार्फत बाजीरावाला एक पत्र पाठवले. कारण दिल्लीला ताळ्यावर आणेल असा तोच एकच परमप्रतापी पुरुष भारतात होता. “जग द्वै उपजे ब्राह्मण, भृगु औ बाजीराव। उन ढाई रजपुतियां, इन ढाई तुरकाव॥” – याचा अर्थ जगात २ ब्राह्मण नावाजले गेले. एक परशुराम ज्याने – उन्मत्त क्षत्रिय सत्ताधीशांना बुडविले, तर दुसरा बाजीराव पेशवा ज्याने तुर्कांची तीच स्थिती केली. याच पत्रात त्याने “जो गति ग्राह गजेंद्र की सो गति भई जानहु आज॥ बाजी जात बुंदेल की राखो बाजी लाज॥ असा “गजांतमोक्षाचा” हवाला देऊन बाजीरावाकडे मदतीची याचना केली. पत्र मिळाल्यावर टाकोटाक ३५-४० हजारांची फ़ौज घेउन खुद्द बाजीराव, मोहम्मद खान बंगेशवर चालून गेला. ही हालचाल इतकी त्वरेने केली की बाजीराव धडकेपर्यंत मोहम्मद खान बंगेशला काहीच समजले नाहि. बेसावध बंगेश एका गढीत अडकला. बाजीरावाच्या झंजावातापुढे मोगल हैराण झाले. या मदतीने खुश होउन छत्रसालने वार्षिक बत्तीस लाखाचे उत्पन्न असलेला मुलूख बाजीरावास नजर केला. इतकेच नव्हे तर आपल्या अनेक उपपत्नींपैकी एकीची मुलगी “मस्तानी” बाजीरावास दिली. बुंदेल्यांचे व मराठ्यांचे रक्तसंबध जुळावेत असा यामागचा हेतू असावा.. या शिवाय बाजीरावास “काशीबाई” ही प्रथम पत्नी होतीच. काशीबाईपासून बाजीरावास रामचंद्र ऊर्फ रघुनाथराव पेशवा, जनार्दन व बाळाजी ऊर्फ नाना पेशवा असे ३, तर मस्तानीकडून समशेरबहाद्दर ऊर्फ कृष्णराव असे एकूण ४ पुत्र झाले. कर्मठ ब्राह्मणांनी मस्तानी मुसलमान असल्याने बाजीरावावर बहिष्कार घातला होता, पण बाजीरावाचा दराराच जबर होता, त्याने कोणालाच जुमानले नाही. मस्तानीकरीता शनिवारवाड्यातच महाल बांधून घेतला होता.
बाजीरावांनी १७२५ ते १७२७ ह्या काळात दक्षिणेत मराठ्यांचे नेतृत्व निर्माण केले. ह्याच वेळी निजामाने पुण्यावर हल्ला केल्याने त्यांना गुजरात दौरा अर्धवट सोडून यावे लागले. पण बाजीराव निजामाच्या मुलखात घुसल्याने स्वत:च्या मुलखाच्या रक्षणासाठी निजामाला पुण्यातून पळ काढावा लागला. १७२८ साली पालखेड येथे पराभव पत्करून निजामाने मुंगी-शेगांवचा तह केला, त्याचे पूर्ण खच्चीकरण झाले. अत्यंत मुत्सद्देगिरीने लढलेल्या या लढाईपासूनच बाजीरावांची ख्याती गनिमीकाव्याचा प्रभू  म्हणून झाली. १७३८ साली दिल्लीच्या रक्षणासाठी पातशाहने जेव्हा निजामाची मदत घेतली. त्या वेळीदेखील बाजीरावांनी भोपाळ येथे निजामाचा दारूण पराभव केला. नाईलाजाने निजामाला पुन्हा तह करावा लागला. या तहान्वये नर्मदा आणि चंबळमधील प्रदेश मराठ्यांच्या ताब्यात आला. भोपाळचा विजय म्हणजे बाजीरावांच्या कर्तृत्वाचा परमोच्च बिंदू होता. या विजयाने ते ‘हिंद-केसरी’ बनले, अर्थात यापूर्वीच पालखेड-डभईच्या विजयाने ते ‘महाराष्ट्र-केसरी’ बनलेलेच होते.
थोरल्या बाजीरावांनी मराठी सत्तेचा झेंडा उत्तरेत फडकविल्याने जसे त्यांना बृहत्तर महाराष्ट्राचा संस्थापक म्हटले गेले, तसेच ते पुण्याचेही संस्थापक पेशवा आहेतच. उत्तरेकडील मोहिमांसाठी पुणे शहर सोईचे वाटल्याने त्यांनीच छत्रपती शाहू महाराजांची मर्जी संपादून पुणे हे आपले निवासस्थान बनविले. त्यांनी बांधलेला भव्य शनिवारवाडा हा त्या काळी देशाच्या राजकारणाचा मध्यबिंदू  बनला.
बाजीराव आणि चिमाजीने खरेच मराठी सत्तेचा दबदबा दख्खन पासून रुमशेपावतो पसरवला. मरहट्यांची विजयी घोडी नर्मदा ओलांडून गेली. मुंगीपैठण येथे झालेल्या तहात नासिरजंगने हंडिया व खरगोण हे बाजीरावांना दिले. त्याचीच व्यवस्था लावण्यासाठी ३० मार्च रोजी बाजीराव खरगोणला गेले. या स्वारीत अचानक प्रकृती बिघडून, नर्मदातीरावर रावेरखेडी (मध्य प्रदेश) या गावी विषमज्वराने २८ एप्रिल १७४०(वैशाख शुध्द शके १६६२) रोजी पहाटे थोरले बाजीराव वारले. अवघे ४० वर्षांचे आयुष्य आणि केवळ २० वर्षांची कारकीर्द लाभलेल्या अशा या मराठी लढवय्याने शेवटचा श्र्वास घेतला. बाजीराव हे ६ फूट उंच होते, असा उल्लेख आहे. उंची बरोबरच त्यांचे हातही बरेच लांब होते, भक्कम पिळदार शरीरयष्टी, तांबूस गौरवर्ण, निकोप प्रकृती, कोणीहि मोहित व्हाव असा चेहरा, तेजस्वी कांती, न्यायनिष्ठुर स्वभाव, असे उमदे व्यक्तिमत्व असल्याने कोणावरही त्यांची सहज छाप पडे. भपकेबाज पोशाखाचा त्यांना तिटकारा होता, स्वत: बाजीराव पांढरे किंवा फिकट रंगाचे कपडे वापरीत. स्वत:ची कामे शक्यतो स्वत: करण्यावर त्यांचा भर होता, नोकराशिवाय त्यांचे अडत नसे. त्यांचे खाजगी ४ घोडे होते – निळा, गंगा, सारंगा आणि अबलख. ते त्यांचे दाणावैरण पाणी स्वत: बघत. खोटेपणा, अन्याय, ऐषाराम त्यांना अजिबात खपत नसे. उभ सैन्य त्यांच्या करड्या शिस्तीत तयार झा्ले होते. थोरले बाजीराव हे अपराजित सेनापती होते.
अशा ह्या धोरणी, कर्तृत्ववान थोरल्या बाजीरावाचे वर्णन करतांना यदुनाथ सरकार म्हणतात, ‘बाजीरावाने हिंदुस्थानच्या इतिहासात मराठ्यांना मानाचे स्थान मिळवून दिले. मराठेशाहीत छत्रपती शिवाजी राजांनंतरच्या कर्तृत्ववान पुरुषांत बाजीराव पेशव्यांची गणना केली पाहिजे. छत्रपतींनी महाराष्ट्र राज्याची निर्मिती केली व या राज्याला बृहत्तर महाराष्ट्राचे रूप देण्याचा प्रारंभ बाजीरावांनी केला.’
तल्लख बुद्धीने डावपेचांची आखणी करून आणि अद्वितीय शौर्याने त्याची अंमलबजावणी करून अवघ्या २० वर्षांत बाजीरावांनी मराठ्यांच्या नेतृत्वाला मराठी मुलखाच्या बाहेर प्रवेश मिळवून दिला. दक्षिणेत मराठ्यांचे नेतृत्व संपादणे व उत्तरेत मराठी सत्तेचा विस्तार करून सार्‍या बुंदेलखंडात मराठ्यांचा दबदबा निर्माण करणे ही बाजीरावांची महत्त्वाकांक्षा होती आणि ती त्यांनी बहुतांशी पूर्ण केली.
मराठी इतिहासात पेशवाईचा उल्लेख करताना बाजीरावाचे नाव येते. पण का कुणास ठाऊक त्याच्या पराक्रमाचे योग्य दान त्याच्या पदरात टाकले गेले नाही. अतुलनीय पराक्रम गाजवूनही तो उपेक्षित राहिल्यासारखाच वाटतो. मस्तानी हे कदाचित त्याचे कारण असावे. हिंदू जोधाबाईला पत्नी करून घेणारा सम्राट अकबर सर्वत्र चर्चिला जातो, पण एका मुस्लिम (?- मस्तानी ही प्रणामी पंथाची होती, ज्यात हिंदू व मुस्लिम यांची मिश्र उपासना पद्धत आहे.) बाईला कायद्याने पत्नी म्हणून घरी आणणारा आणणारा बाजीराव मात्र उपेक्षित ठरविला जातो हे दुर्देव आहे.
अश्या ह्या थोर बाजीरावाची आपण उपेक्षा केली तरी जगाच्या इतिहासात मात्र तो तितका उपेक्षित राहिला नाही. म्हणूनच अ कन्साईज हिस्ट्री ऑफ वॉरफेअर या युद्धशास्त्रावर आधारीत ग्रंथात फिल्ड मार्शल मॉंटगोमरी यांनी जगातील सात लढायांचा उल्लेख केला आहे. त्यात पालखेड (वैजापूर-औरंगाबादजवळ) येथील लढाईचा उल्लेख आहे.
जीवाची बाजी लावणे‘ हा वाक्प्रचार आपल्या कर्तृत्वाने जन्माला घालणार्‍या या महान योध्याला सलाम

Tuesday, 14 March 2017

🌼🌼🌼मुलांना मारू नका 

🌼🌼🌼


पालक – बालक, चतुरंग
लोकसत्ता 28 मार्च 201
लेखिका – शोभा भागवत
parent-threatening-son-for-a-learning-on-the-white-background
पालक सभेत असा एक प्रश्न विचारून बघावा, ‘कोणाची मुलं हट्टी आहेत, त्यांनी हात वर करा.’ सगळे हात वर होतात. असं विचारलं की ‘कोणाची मुलं नीट जेवत नाहीत?’ तरी सगळे हात वर! मी आणखी एक प्रश्न विचारते, ‘इथे असे कोणी पालक आहेत का ज्यांनी आपल्या मुलांना कधी मारलं नाही?’ बहुतेक वेळेला एकही हात वर होत नाही. मग विचारावं की ‘ठीक आहे. आता दुसरा प्रश्न विचारते. असे कोणी पालक आहेत का की ज्यांना आपल्या मुलांना मारून बरं वाटतं? आनंद होतो? त्यांनी हात वर करा.’ पुन्हा एकही हात वर होत नाही. पालक सांगू लागतात, ‘मुलांना मारलं की मग आपल्यालाच वाईट वाटतं. रडू येतं मग रडून झोपलेल्या मुलाच्या डोक्यावर आम्ही हात फिरवत बसतो. तो उठला की त्याच्या आवडीचं काही खायला करतो.’
एकदा असं झालं की पहिल्या प्रश्नाला एका पालकाने हात वर केला. ते म्हणाले, ‘मी माझ्या मुलांना कधीच मारलेलं नाही.’ मला फार नवल वाटलं. मी म्हटलं, ‘तुम्ही पुढे येता का? आम्हाला सांगा तरी तुम्ही असं कसं वागता ते?’ ते पुढे आले. हातात माईक घेतला आणि म्हणाले,‘ ते डिपार्टमेंट त्याच्या आईकडे दिलंय.’ आणि हशा-टाळ्यांच्या गजरात जागेवर जाऊन बसले. आणखी एका बाबांना स्फूर्ती आली. ते आले आणि म्हणाले, ‘मी कामामुळे बाहेरगावी असतो. त्यामुळे मारायला मला मुलं भेटतच नाहीत.’ पुन्हा मोठा हशा झाला. क्वचित काही पालक भेटतात न मारणारे आणि कुणी सांगतं, ‘आम्हाला आमच्या आईवडिलांनी कधीच मारलं नाही त्यामुळे आम्हाला पण मारावंसं वाटत नाही.’ कुणी म्हणतात, ‘लहानपणी भरपूर मार खाल्ला त्यामुळे ठरवलं की मुलांना आपण मारायचं नाही.’ काही असं सांगतात की ‘मारायची गरज नाही. समजावून सांगितलं की मुलं ऐकतात.’
मला असं विचारावंसं वाटतं, ‘तुम्हाला मुलांना मारल्यावर जर वाईट वाटतं, रडू येतं, तरी का मारता मुलांना?’ पालक सांगतात, ‘राग येतो त्यांचा. राग आवरता येत नाही. कधी इतर कुठलातरी राग मुलांवर निघतो. वडय़ाचं तेल वांग्यावर म्हणतात- तसं!’
beating-jamaica-observer-news
असं आपण जेव्हा म्हणतो की आम्हाला राग आवरत नाही तेव्हा आपण लबाड वागत असतो. काय लबाडी करतो आपण? एकच चूक मुलांनी केली की त्याला मिळतो मार आणि वडिलांनी, आजी आजोबांनी, काकांनी केली तर? तर लगेच आपण राग आवरतो.
मग एखाद्या छोटय़ा मुलीला मी माइकपाशी बोलावते. तिला विचारते, ‘‘अगदी सोप्पा प्रश्न आहे बरं का. घाबरू नको. छान उत्तर दे.’’ ती हो म्हणते, पण तिच्या चेहऱ्यावर ताण दिसतो. मग मी तिला म्हणते, ‘‘समज ही एक भाजीची वाटी आहे. ती अशी खोलीच्या मधेच ठेवलीय. तिकडून तू धावत धावत आलीस आणि तुझा पाय वाटीला लागला. वाटी उडाली आणि सगळी भाजी सांडून गेली तर तुझी आई काय करेल?’’ अर्ध मिनीट ती विचार करते आणि म्हणते, ‘‘आई आधी एक धपाटा घालेल आणि म्हणेल, दिसत नाही तुला? आता भरून ठेव ती भाजी.’’ सगळे पालक हसतात. तिला मी म्हणते, ‘‘छान उत्तर दिलंस. आता दुसरा सोप्पा प्रश्न. समज ती भाजीची वाटी तशीच आहे आणि तू धावत धावत नाही आलीस. तुझे बाबा चालत आले. त्यांचा पाय वाटीला लागला. भाजी सांडली. आता आई काय करेल?’’ मुलीला आता गंमत वाटते आणि उत्तर द्यायला उत्साह वाटतो. ती म्हणते, ‘‘बाबांना आई काहीच म्हणणार नाही. धपाटापण घालणार नाही. उलट म्हणेल, मी भरते ती भाजी. तुम्ही जा कामाला. माझंच चुकलं. वाटी उचलून नाही ठेवली.’’ पालक पुन्हा जोरदार हसतात. मुलीला मी शाबासकी देते. छोटं बक्षीस देते.
आपलं असं ठरलेलंच असतं की चूक लहान मुलाच्या हातून झाली तर त्याला लगेच मारायचं आणि मोठय़ा माणसांना मात्र माफ! जो आपल्याला उलट मारू शकतो त्याला आपण मारायला जात नाही! लहान मूल काय बिचारं करणार?
मुलं बालभवनात सांगतात ते पालकांनी ऐकावं, ‘‘आज ना बाबांनी मला खूप मारलं. मला आज आत्महत्या करावीशी वाटते आहे.’’
‘‘आज आईनी मला उगाचच मारलं. मला घरातून पळून जावंसं वाटतंय.’’
‘‘आज दोघं मला खूप रागावले. मला असं वाटतंय की जगात माझं कुणीच नाही.’’
इतकं जर मुलांना वाईट वाटतं तर का मारायचं मुलांना? ‘छडी लागे छमछम’ वर अनेक पालकांचा विश्वास असतो. मारलं नाही तर मुलं बिघडतात अशी त्यांच्या मनात भीती असते. काही पालक तर हमखास असं सांगतात, ‘‘मी लहानपणी फार वात्रट होतो. आमच्या एका सरांनी मला मला खूप बदडलं म्हणूनच मी सुधारलो!’’
मुलं मात्र कितीदा सांगतात, ‘‘मारू नका ना! समजावून सांगा. आम्हाला कळतं.’’
पण आपल्या मन:स्थितीचं काय करायचं? कधी समजा सुट्टीचे दिवस आहेत. आवडते पाहुणे घरात आलेत. सर्वाच्या तब्येती उत्तम आहेत. पशाचा काही प्रश्न नाही. घरात काही भांडण नाही अशा आनंदाच्या वातावरणात मुलांनी काही दंगा केला, नासधूस केली, आगळीक केली तर आपण उदारपणे म्हणतो, ‘‘जाऊ दे, जाऊ दे. भरून टाका ते. आपल्याला आता बागेत जायचंय.’’ आणि याऐवजी समजा मुलांना परीक्षेत कमी मार्क मिळालेत, आपल्याला बरं नाही, पशांची चणचण आहे, घरात भांडणं झालीयत, आपला मूड खराब आहे अशा वेळी मुलाच्या हातून चमचा खाली पडला तरी आपल्याला संताप आवरत नाही. त्याला मार तर बसतोच वर दहा बोलणी ऐकून घ्यावी लागतात. हा आपला मूड म्हणजे एखाद्या ग्लासातल्या पाण्याच्या पातळीसारखा असतो. अप्रिय गोष्टी घडल्या की पातळी खाली जाते. आणि आपली सहनशक्ती कमी कमी होते. आवडीच्या गोष्टी घडल्या तर पातळी वर जाते. आपली सहनशक्ती चांगली असते.
तेव्हा एक लक्षात ठेवायचं, मुलं जोवर १४-१५ वर्षांची होत नाहीत तोपर्यंत ही पाण्याची पातळी निर्धारपूर्वक वर ठेवायची आणि मुलांना मारायला हात उठेल तेव्हा दुसऱ्या हातानं हात धरायचा आणि स्वत:ला विचारायचं, ‘‘याची जरूर आहे का?’’ ९९ टक्के वेळा तुम्हाला उत्तर मिळेल- ‘‘जरूर नाही. मारू नको. समजावून सांग.’’
तेव्हा प्रश्न संयमाचा आहे. मारणं हा आपला शॉर्टकट असतो. खरं तर कोण समजावून सांगत बसणार? घाईच्या वेळी मुलं हट्ट करतात. वेळ नसतो. मग घाला दोन धपाटे. आणि मुलं इतकी चिवट असतात की ती आपला अंत पाहतात. खरंच आहे! तुम्ही रस्सीखेच सुरू केलीत तर मुलं कधीच हरणार नाहीत. तुम्हालाच आपल्या हातातला दोर सोडून देण्याचा शहाणपणा करावा लागतो.
मुलांशी संवाद वाढवण्यासाठी एक गोष्ट करता येईल. रात्री मूल झोपत असेल तेव्हा वेळ काढून त्याच्याजवळ बसा. त्याला गोष्ट सांगा. गप्पा मारा. आणि त्याला हे सांगा की आज दुपारी तू जो दुकानात हट्ट केलास, मला अमुक पाहिजे म्हणून आणि रडायला लागलास ते मला आवडलं नाही. किती खेळणी आहेत तुझ्याकडे! तरी हट्ट करायचा का? मूलपण सांगेल त्याला तेच खेळणं का हवं होतं ते. तुम्हीही सांगा तुम्ही ते का नको म्हणालात ते आणि सारखं आपल्याला हवं ते त्या क्षणी मिळत नाही, धीर धरावा, वाट पहावी. कधी नाही मिळालं तर नाही! हट्ट करू नये. तमाशे तर नाहीच करायचे हे त्याला, तिला पटवून द्या. हे संवादाचं कौशल्य, प्रामाणिकपणे बोलणं मुलापर्यंत पोचतं. त्याला कळतं आई उगाचच ‘नाही’ म्हणत नाही. त्यामागे कारणं असतात आणि मूलही मनात विचार करू लागेल.
निसर्ग आपल्या हाती लहान मूल देतो. ते अननुभवी असतं, आकारानं छोटं असतं पण त्याचं आणि आपलं नातं कायम तसंच राहणार नसतं. एक वेळ अशी येणार असते की ते शरीरानं आपल्याहून ताकदवान असेल, मानसिकदृष्टय़ा आपण त्याच्यावर अवलंबून असू, कदाचित आíथक बाजूनंही आपल्याला त्याची मदत असेल अशा वेळी आपण त्याच्या लहानपणी जर आपली पालकत्वाची सत्ता अविचारानं वापरली असेल तर त्यानं कसं वागावं आपल्याशी?
पालकत्वाची सत्ता ही न वापरण्यासाठी असते. ती चांगल्यासाठी जरूर वापरावी पण मारण्यासाठी, अपमान करण्यासाठी, अडवणूक करण्यासाठी कधीही वापरू नये. पटतंय ना?
शोभा भागवत
चतुरंग 28.3.15

🌼🌼🌼नियंत्रण रागावर…🌼🌼🌼

एक छोटा मुलगा होता अतिशय रागीट आणि संतापी. थोडे काही मनाविरूद्ध झाले की संतापायचा.

एके दिवशी वडिलांनी त्याच्या हातात एक पिशवी दिली आणि म्हणाले, यात हातोडी आणि खिळे आहेत. तुला राग आला की, तू सरळ जायचे आणि घराला कुंपण म्हणून जी भिंत घातली आहे, त्या भिंतीवर एक खिळा ठोकायचा.
पहिल्याच दिवशी त्याने ३७ खिळे ठोकले.
पुढच्या काही दिवसात तो रागावर नियंत्रण ठेवण्यास शिकला. त्याचबरोबर भिंतीवर ठोकल्या जाणाऱ्या खिळ्यांची संख्याही कमी झाली. पण त्याला जाणीव झाली की, रोज खिळे ठोकण्यापेक्षा रागावर नियंत्रण ठेवणे सोपे आहे.
एक दिवस असा उजाडला की त्या मुलाला एकदाही राग आला नाही  आणि खिळा ठोकण्याची वेळ त्याच्यावर आली नाही. त्याने ही गोष्ट वडिलांना सांगितली. वडिलांनी त्याचे कौतुक केले आणि सांगितले की आता तू राग आवरलास की प्रत्येकवेळी तिथला एक खिळा काढायचा.
मुलगा त्याप्रमाणे करू लागला. एके दिवशी तेथे एकही खिळा उरला नाही. मग त्याने ही बाब वडिलांना सांगितली. रागावर नियंत्रण ठेवण्याच्या गुणाचे वडिलांनी कौतुक केले.
मुलगा आनंदी झाला. त्या दिवशी वडील त्याला घेऊन त्या भिंतीपाशी गेले. त्याला म्हणाले,
“हे बघ, तू रागावर नियंत्रण मिळवलेस, ही गोष्ट चांगलीच आहे. पण, बघ भिंतीवरील ही भोके तशीच राहणार आहेत. आपण रागात काहीतरी बोलून जातो आणि दुसऱ्याच्या मनावर असेच ओरखडे उठतात. नंतर शांत झाल्यावर आपल्याला चूक कळते.  पण दुसऱ्याच्या मनावरील ओरखडे तसेच राहतात. तू भिंतीवरील खिळे काढलेस पण दुसऱ्याच्या मनावर झालेले ओरखडे कसे मिटवणार?”
“लक्षात ठेव, रागाच्या भरात कधीही दुसऱ्याला बोलू नकोस, जेणेकरून राग विरल्यावर तुला खेद व्यक्त करावा लागेल.”

Tuesday, 7 March 2017

🌼🌼🌼तुम्ही पालक म्हणून तुमच्या मुलांसाठी GPS आहात की CCTV ? ॥🌼🌼🌼

:- डॉ अमित करकरे
गंमतशीर वाटला ना प्रश्न ? हे काय आता नवीन ?
पण विचार करून बघा… आई-बाबा ना GPS सारखे असायला हवेत.
आपण प्रवासाला जाताना GPS वापरतो ना रस्ता कळण्यासाठी तसेच! आपण विचारले की हे GPS आपल्याला ईप्सित स्थळी पोहोचण्यासाठी किती वेगवेगळे मार्ग उपलब्ध आहेत हे सांगते, त्यातला सर्वात सुलभ कोणता हे सुद्धा सांगते... पण हे सांगताना GPS मी सांगेन त्याच मार्गाने तुम्ही जायला हवे असा आपल्याकडून हट्ट नाही धरत.
म्हणजे समजा आपण जरा वेगळाच रस्ता पकडला किंवा एक चौक पुढून जायचा प्रयत्न केला तर ते न कुरकुरता, न चिडता नव्याने मार्ग दाखवणे सुरु करते.
जमेल तितके आपल्याला तिथलीही दिशा दाखवत राहते...
आणि जर तो रस्ता आजवरपेक्षा जास्त चांगला निघाला तर पुढे इतरांना तोही रस्ता आहे अशी जाणीव करून देते.
अगदी निर्मनुष्य ठिकाणी रात्रीच्या वेळी प्रवास करताना या GPS ची साथ आपल्याला आपण बरोबर रस्त्यावर आहोत याची जाणीव करून देते... अश्या या निर्धास्त अवस्थेत आपण न बिचकता, न थांबता, जलदपणे आपले ध्येय गाठू शकतो. हो की नाही? विवेकी पालकत्व हे असं असायला हवं.
दिशा दाखवणारे...
पण माझेच ऐकले पाहीजे हा हट्ट न धरणारे.
पण आपला बऱ्याचदा होतो तो CCTV!
तो कसा दुसऱ्याच्या प्रत्येक लहानसहान हालचालीवर बारीक लक्ष ठेऊन असतो, अगदी तसे! CCTV च्या लक्ष ठेवण्यामागे काहीसा अविश्वास ही असतो आणि ‘बघतोय हं मी!’ असा धाक ही.
CCTV ची नेहमी धास्ती वाटते आणि त्याउलट GPSचा आधार.
आता पालक म्हणून आपणच मागे वळून बघूया आपण आपल्या मुलांसाठी आजवर नक्की काय होतो ते!
जागतिक महिला दिन !
आम्ही विद्येची देवता सरस्वती देवीला वंदन करतो, दुर्गे दुर्गट भारी म्हणत हात पसरून 'आई तुज वाचोन कोण पुरवील आशा' अशी आर्त हाक घालून त्या जगजननी समोर मनाची घालमेल व्यक्त करतो, अडचणीत येऊ नये म्हणून 'संकट निवारी' अशी विनवणी तिला आपण करत असतो... धातुच्या नाण्याला, कागदाच्या पैशाला लक्ष्मी देवो भव: म्हणत हळद कुंकू फुल आपण अर्पण करत असतो.. नवरात्रातील तिच्या नऊ रुपांचा जागर घराघरात चाललेला असतो..
🙏🏻🙏🏻🌷
या पृथ्वीला आम्ही धरणी माता ( Mother Earth )तर आमच्या देशाला सुद्धा आम्ही 'भारत माता' म्हणून संबोधतो. या देशा मध्ये अगदी पुराणकाळापासून ते आज पर्यंत असंख्य महिलांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर समाजाला योग्य दिशा देण्याचे अद्भुत कार्य त्या त्या काळात केलेलं आहे, प्रसंगी दुष्टं प्रवृत्तींशी दोन हात करत समाजाचे रक्षण करण्याचे धीरोदात्त कर्तव्य सुद्धा आमच्या माता भगिनींनी बजावलेलं आहे.

जगामध्ये अशा असंख्य, अज्ञात महिला आज हि आहेत कि ज्या स्वत: वातीच्या भुमिकेत राहून 'सर्वेsपि सुखिन: सन्तू' म्हणत लोकोद्धारासाठी, सर्वांच्या कल्याणासाठी त्या सदैव जळत आहेत.
🌷🌷
जिजाऊ आऊसाहेब, राणी चेन्नम्मा, पद्मिनी, येसुराणी साहेब, महाराणी ताराबाई, आहिल्याबाई होळकर, झाशीची रणरागिणी राणी लक्ष्मी बाई, आनंदीबाई जोशी (पहिल्या महिला डाॅक्टर), सरोजिनी नायडू, मादाम कामा, भगिनी निवेदिता, सावित्रीबाई फुले ,मदर टेरेसा,अशा अनेक कर्तृत्ववान स्त्री व्यक्तीरेखा ज्यांनी ख-या अर्थानी इतिहास घडविला, समाजाला जगण्यासाठी प्रेरणा दिली.. देशाचे नाव उज्वल केलं!
🌷🌷

पुढच्या पिढीतील लतादिदी, आशा भोसले, इंदिरा गांधी, कल्पना चावला, आताच्या सुनिता विल्यम्स अशी अनेक नावं आज आहेत की जगभरात या व्यक्तीरेखांचा उल्लेख अतिशय आदरानी केला जातो याबद्दल प्रत्येक भारतीयाला यांचा निश्चितच अभिमान वाटतो आहे.
🌷🌷

अशा थोर स्त्री व्यक्तीरेखांचे स्मरण केवळ आजच नाही तर सतत, सदैव आपण केलं पाहिजे, यांचा इतिहास जपला पाहिजे व पुढील पिढीला मार्गदर्शक असा हा अमुल्य ठेवा आपल्याला हस्तांतरीत करता आला पाहिजे.
🌷🌷
फुला पानांमध्ये, लता वेलींमध्ये, नद्यांना सुद्धा सिंधु, कावेरी, गंगा, नर्मदा, कृष्णा, यमुना अशी नावं आम्ही दिली त्या सर्व नद्यांमध्ये, देव्हा-याध्ये, मनाच्या एका हळव्याशा कोप-या मध्ये, इतकंच काय तर या चराचर सृष्टीच्या प्रत्येक घटकामध्ये तुझं साैंदर्य, तुझं अस्तित्व अबाधित आहे आणि ते असंच चिरंतन राहो हिच खरी स्रीशक्तीला शुभकामना ..🌷

Sunday, 5 March 2017

🌼🌼🌼greatest inspiration is the deadline…🌼🌼🌼


 There was a girl who was quite lazy by nature. Her indolent attitude made her postpone every task, be it personal or professional. She was always the last one to submit assignments in the class, she was always the one who gets late for the planned visits. This in turn, was proving to be troublesome for others, but she was least bothered.
She was a great swimmer though. She had won various swimming competitions at the inter-school level. Fortunately, she got selected for the state level championship. She was very excited & confident. On the day of the competition, when she reached the venue, she realised that she had forgot her I-card in the home, & the non-submission of the I-card would prohibit her from participating in the event. She tried to reach out her family members, but unfortunately nobody responded at that moment. She called one of her friends & asked her to urgently pick up the I-card from her home & reach the venue. Her friend asked her to relax & wait for her to get the I-card. It took her a while to reach the venue. By the time, she reached the destination with the I-card, she saw her friend crying outside all alone. The competition had already started. She couldn’t participate now. She was feeling bad & disgusted.
That was the day when she actually realised how badly the delayed activities can affect the biggest things of your life. One must learn to work with time, & not against it!

॥...संस्कार करताय मुलांवर ?..॥

🌼🌼🌼॥...संस्कार करताय मुलांवर ?..॥🌼🌼🌼

-डॉ. आनंद नाडकर्णी, डॉ. सुखदा चिमोटे
आपल्या मुलांना आपणच 'ओळखतो' प्रत्येक मूल वेगळं, त्याची अभ्यासाची शैली वेगळी आणि त्याला त्याच्या पालकांशिवाय कोणीही तितकंसं चांगलं ओळखत नसतं. म्हणूनच त्यावर उत्तरही पालकच जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं शोधू शकतात. आपण कोणीही आदर्श पालक नसतो. हळूहळू चुकांमधून शिकतच पुढे गेले पाहिजे. 'मारा डुबकी आपल्या लहानपणात. पालकत्व हे काही आव्हान नाही, तर एक निखळ, निर्मळ आनंद देणारी प्रक्रिया आहे. तेव्हा त्यातील कोणत्याही प्रश्नाला महाभयंकर रूप देणं टाळावं, तसेच फार क्षुल्लकदेखील समजू नये.
मुलांचं असं वागणं कदाचित एखाद्या विशिष्ट काळापर्यंत मर्यादित राहून पुढे बदलूदेखील शकतं. त्यामुळेच पालकांनी सर्वप्रथम संयम ठेवायला शिकलं पाहिजे. स्वत:च्या लहानपणात एक डुबकी मारून आलो तर बरेचसे प्रश्न हे प्रश्नच राहणार नाहीत. आपलं बालपण आठवलं की मुलांच्या भावना ओळखणं सोपं जातं. भावनिक साक्षरता आली की, संवाद साधणं सोपं होतं. पालक-पाल्य यांच्यामध्येच सुसंवाद असला की समस्या सहज सोडवता येतात. पण अर्थात सुसंवाद म्हणजे आपण बोलणं व मुलांनी ऐकणं नाही तर पाल्यांचंही ऐकून घेणं, समजून घेणं व त्याप्रमाणे वागणंदेखील! 'आज काहीतरी बिनसलंय. मूल शाळेतून आलं की त्याच्या दप्तर फेकण्याच्या पद्धतीवरूनच आज त्याचं काहीतरी बिनसलं आहे हे लक्षात यायला हवं आणि मग अशा वेळी पालकांनी याआधी दप्तर जागेवर ठेव, फेकलंस कशाला? हा हट्टीपणा सोडून आधी त्याला काय म्हणायचंय हे समजून घेतलं पाहिजे. त्याची त्या-त्या वेळेची गरज ओळखली की मग त्याच्याशी संवाद छान साधता येऊ शकेल.
'देण्यातला आनंद म्हणजे संस्कार 'मर्यादित मी' कडून 'विशाल मी' बनण्याचा प्रयत्न म्हणजे संस्कार. इतरांचा विचार करायला शिकणं, स्वार्थी दृष्टिकोन बाजूला ठेवणं म्हणजे 'विशाल मी' बनवणं होय. नम्रता, कृतज्ञता, क्षमा, करुणा, आनंद, तन्मयता या भावनांचा अनुभव पालकांनी स्वत: घेणं व तो घेत असताना मुलांना त्यात सहभागी करून घेणं म्हणजे संस्कार. इतरांना देण्यातला, आनंदी करण्याचा अनुभव मुलांना दिला की, त्याला खरा संस्कार म्हणता येईल. तुम्हीच मुलांचे रोल मॉडेल.
संस्काराच्या व्याख्या काळानुसार बदलत आहेत. फक्ता 'शुभं करोति म्हणणं' म्हणजे संस्कार नव्हे. संस्कार करण्याचा बागुलबुवा करू नये. पालकच मुलांचे पहिले रोल मॉडेल असल्यानं पालकांच्या योग्य वर्तनातून संस्कार आपोआपच घडत जातात. त्यामुळे आपलं वागणं योग्य असेल तर चांगले संस्कार आपोआपच घडत जातील.
''आमच्यावेळी असं नव्हतं!.' मुलं हट्टीपणा करतात, आपल्या म्हणण्यानुसारच सर्व गोष्टी व्हाव्यात, असा आग्रह धरतात.अशावेळी पालकांनी 'आमच्या लहानपणी असं नव्हतं' हा विचार अगोदर बाजूला ठेवावा. कारण आता आजूबाजूची परिस्थिती आमूलाग्र बदललेली आहे. मुलांवर माध्यमाद्वारे होणार्‍या संवेदनांच्या भडिमारामुळे त्यांचा 'अहं' फारच लवकर जागृत होतो. माध्यमाद्वारे त्यांना हव्या - नको त्या सर्व माहितीचा भडिमार त्यांच्यावर सतत होत असतो. अशा वेळी पालकांकडून मुलांना माहितीपेक्षा शहाणपण, संवेदना, सद्सद्विवेक बुद्धी मिळावी जी त्यांना माध्यमं देऊ शकत नाहीत. संगणक, मोबाइल, फेसबुक यापासून मुलांना लांब ठेवण्यापेक्षा आपणही त्यांचा वापर संवादाचं माध्यम म्हणून करून घेतला तर नक्कीच उपयुक्त ठरेल.
'ठेवा खाली ते अपेक्षांचं बोचकं! मुलांमध्ये सभाधीटपणा, वक्तृत्वगुण कसे विकसित करावेत यावर पालक फारच हातघाईला येतात. खरं म्हणजे प्रत्येक मूल चांगला वक्ता झालाच पाहिजे ही अपेक्षाच मुळी चुकीची आहे. प्रत्येक क्षेत्रात अंतर्मुख (इंट्रोव्हर्ट) व बहिर्मुख (एक्स्ट्रोव्हर्ट) असे दोन्ही प्रकारचे लोक आवश्यक असतात व ते दोघेही तितकेच महत्त्वाचे असतात. त्यामुळे मुलांना जे आवडतं ते करू द्यावं, सतत त्यांच्यावर आपल्या अपेक्षा लादू नयेत.
'मोठय़ांचा अनादर आणि 'डे ड्रिमिंग.' किशोरवयीन मुलं अभ्यासात एकाग्र होऊ शकत नाहीत. मोठय़ांशी अनादरानं वागतात. किशोरवयीन मुला-मुलींमध्ये 'दिवास्वप्ना'चं (डे ड्रिमिंग) प्रमाण वाढल्यासारखं दिसतं. ही अनेक पालकांची अडचण असते, पण यात नैसर्गिक भागही आहे. मुलींपेक्षा मुलांमध्ये स्वत:ला सिद्ध करण्याची ऊर्मी थोडी उशिरा येते. त्यामुळे बर्‍याचदा या वयात मुली अभ्यास जास्त गांभीर्यानं घेताना दिसतात. स्वत:ला सिद्ध करण्याची प्रवृत्ती त्यांच्यात निर्माण व्हावी म्हणून त्यांच्यासमोर कमी वयाची रोल मॉडेल्स ठेवली, तर त्याचा निश्‍चितपणे उपयोग होऊ शकतो. त्याच्याशी संवाद साधत त्यांची आवड लक्षात घेतली, त्या क्षेत्रातील यशस्वी झालेल्या व्यक्तीशी परिचय करून दिल्यास ध्येयाकडे जाण्याची त्यांना योग्य दिशा मिळू शकेल.
'कबूल करा. चुकलो!'
पालकांंविषयी मुलांना आदर नाही, असं अनेकदा ऐकायला मिळतं. पण बदलत्या काळानुसार आदराची व्याख्याही तपासून पाहायला शिकलं पाहिजे. 'भीतीयुक्त आदर' वा 'आदरयुक्त भीती' या कल्पना मागे पडल्या आहेत. धाकापेक्षा मैत्रीची भावना असावी, अशी आता मुलांची व काही पालकांची अपेक्षा असते. आदर फक्त आदरार्थी बोलण्यातून दिसून येतो, असं नाही. तर वेळप्रसंगी तो त्यांच्या वागण्यातूनच लक्षात येतो. पालकांनी स्वत:च्या चुका लपवून न ठेवता प्रांजळपणे कबूल केल्यास मुलांना आदर वाटतो.
''शिक्के' मारणं बंद करा, प्रश्न आपोआप सुटतील.'
मुलांचं वर्तन सुधारण्यासाठी आपल्याला मुलांचं जे वागणं आवडत नसेल ते नेमकेपणानं सांगितलं पाहिजे. त्यांच्यावर मूर्ख, बावळट, बेशिस्त असे शिक्के न मारता 'मला तुझं अमुक वर्तन आवडलं नाही,' असं सांगणं जास्त परिणामकारक ठरते. खरं म्हणजे बर्‍याच प्रश्नांचं मूळ पालक व पाल्य विसंवादातच आहे. एकदा पालकांमध्ये भावनिक साक्षरता आली तर मुलांशी त्यांच्या वाढीच्या टप्प्यावर संवाद साधता येऊ शकेल व बरेचसे प्रश्न आपोआपच सुटतील.

Saturday, 4 March 2017

🌼🌼🌼॥ एटीकेट म्हणजे सर्व चमचे ताटाबाहेर ठेवावेत! ॥ - : पु. ल. देशपांडे 🌼🌼🌼
सगळ्यांत उत्तम 'एटीकेट म्हणजे' सर्व चमचे ताटाबाहेर ठेवावेत. सूप, बासुंदी, रस याच्या वाट्या तोंडाला लावाव्यात आणि घोटाघोटाने संपवाव्यात.
ताक आणि कढी यात थोडे चिमटीने मीठ घालून त्यात तर्जनी फिरवून वाटी तोंडाला लावावी व आतील वस्तू संपेपर्यंत तोंडापासून वाटी अलग करू नये.
आमटीला शक्यतो वाटी घेऊच नये भाताचा पोण तयार करून मध्ये वाढायला सांगावी. वरण मात्र भातावरच, वरणावरील तुपाचा ओघळ बाहेर जाणार नाही याची दक्षता घेऊन बोटाला चटके बसत असताना गरमगरम कालवावा.
ताक भात आणि आमटी भात यांची कृती तीच तशीच वरणभात आणि दहीभात यांचीही एकच कृती.
जेवताना म्हणजे भाताचा घास घेताना तळहात कोरडा राहायला हवा हे ज्यांना जमत नाही त्यांची मद्रास, केरळ इथे बदली होऊ शकते.
रसगुल्ले किवा तत्सम प्याराबोला चमच्याने तुकडे करून खाणाऱ्या मंडळींचा स्वतःवर विश्वास नसतो, पाक अंगावर सांडेल ही भीती त्यांना वाटत असते, हे पदार्थ अंगठा व तर्जनी यात धरून थोडे तोंड वर करून जिभेवर सरकवायचे असतात.
जिलबी मात्र मठ्ठ्यात बुचकळून ज्यांना आवडते त्यांनी पाकात बुचकळून तुकड्या तुकड्याने तोंडात सरकवायची असते.
श्रीखंड चमच्याने खाणे हा शुद्ध बावळटपणा आहे, हे तर्जनीवर घेऊन गंधासारखे जिभेला लावायचे असते.
पुरीचा तुकडा मोडून त्याचा गोकर्णीच्या फुलासारखा आकार करायचा व त्यात श्रीखंड, बासुंदी, आमरस ही मंडळी भरून जिभेवर सोडायची असतात.
मिठाच्या डावीकडील पदार्थ काही लोक पोळीला लावून किंवा भातात मिसळून खातात हा त्या पदार्थांचा अपमान आहे.
कधी कधी एखाद्या गवयाचा सूर लागत नाही, ऐकणार्‍याचा आणि सुरांचा जीव घेत त्याचा प्रवास सुरू असतो आणि मध्येच एकदम अनपेक्षित एखादा गंधार किवा पंचमाचा सूर सणकन लागतो आणि मैफील चमकून जागी होते, चटण्या, कोशिंबिरी हे देखील असे अचानक लागणारे खणखणीत सूर आहेत, यांची बोट जेवताना रुची पालट म्हणून जिभेवर ओढायची असतात. पंचामृतातील मोहोरीने सर्वांगाचा ठाव घ्यायला हवा.
पापड, कुरड्या हे पदार्थ फक्त जागा अडवणारे आहेत, चविष्ट आहेत पण जेवणाच्या ताटात थोडे बेसुरच.
हल्ली छोट्या आकाराचे बटाटेवडे वगैरे करतात. बटाटावड्याच एवढं बालिश आणि ओंगळ रूप दुसरे नाही. बटाटावडा हा काय जेवताना खायचा पदार्थ आहे का ? भजी मात्र चालतात.
स्वच्छतेच्या आचरट कल्पनांनी या चमचा संस्कृतीला जन्म दिलेला आहे.
साधा किवा मसाला डोसा जे लोक काट्या चमच्याने खातात त्यांच्याबद्दल मला भीतीयुक्त आदर आहे हे असे कोणाला खाताना पाहिले की हे लोक पोळी देखील काटा चमच्याने तोडून खात असतील ही शंका मनात पिंगा घालायला लागते.
चिवड्याला चमचा नको पण या यज्ञकर्मात मिसळीची आहुती द्यायची असेल तर चमचा क्षम्य आहे.
ही पाच बोटे ही पंचमहाभूतांचे प्रतिनिधी आहेत. उदा. करंगळी म्हणजे जलतत्त्व. जेवताना ही पंचमहाभूतं जेवणात उतरायला हवीत.
राजकारणात आणि जेवणात हे चमचे मंडळी आली आणि भारताची तब्येत बिघडली.
पु. ल. देशपांडे