Wednesday, 5 October 2016


🌼🌼🌼 सुखी संसारासाठी काही सोपे तोडगे🍁 🌼🌼🌼🔹

🔷१) मुले नीट वागण्यासाठी नवनाथ भक्तीसारातील ५ वा अध्याय घरात दररोज संध्याकाळी ७ नंतर वाचावा.
🔷२) ज्यांचा विवाह होण्यास अनेक अडचणी येतात, ठरलेले विवाह मोडतात अशांनी नवनाथ भक्तिसार २८ वा अध्याय दररोज संध्याकाळी सातनंतर वाचावा.
🔷३) मंदिरात दिव्याची वात सुखप्राप्तीसाठी पूर्वेस करून ठेवणे.
🔷४) अडकलेले पैसे परत मिळण्यासाठी : सोमवारी चौकोनी कागदात मध्यभागी ज्या व्यक्तीकडून रक्कम येणे बाकी आहे त्याचे नाव लाल शाईने लिहावे व २ पांढरी फुले व चिमुटभर काळे टिळ घेऊन त्याची पुडी करून ती उजव्या मुठीत धरून १०८ वेळा मंत्र जपावा (मंत्र : ॐ नम: शिवाय), ही पुडी पिंडीवर वहावी. हे सतत ११ सोमवार करावे.
🔷५) महत्त्वाचे काम होण्यासाठी : मंगळवारी संध्याकाळी ४:३० ते ६:३० या वेळेत एक तांब्याचा कलश त्यात पाणी भरा, त्यात अर्धा पेला दुध टाका, चमचाभर पांढरे टिळ टाका, हा कलश घेऊन पिंपळाच्या वृक्षासमोर उभे रहा, एकच कामाची इच्छा मनात ठेवणे व हे काम व्हावे असे पिंपळवृक्षाला सांगून ते पाणी पिंपळाच्या बुंध्यात वहायचे (एकदाच करावे).
🔷६) नोकरीमध्ये वरिष्ठ सहकारी यांचा त्रास असल्यास : दररोज आंघोळीनंतर चिमुटभर साखर घराबाहेर टाकायची, ऑफिसला जाण्यापूर्वी तांब्याच्या / चांदीच्या ग्लासमध्ये पाणी घेऊन डाव्या हातात ठेवा, उजवा हात त्यावर ठेवून मंत्र ७ वेळा म्हणावा. “माझे घरापासून कार्यालयापर्यंतचे सर्व शत्रू’ ॐ चिमी चिमी स्वाहा” व ग्लासातील पाणी प्यायचे.
🔷७) आजार लवकर बरा होण्यासाठी : एक ओंजळभर एका जातीची एका रंगाची फुले घेणे, रोग्याच्या हातात द्यायची. आजारी माणसाला त्या ओंजळीत आपला चेहरा लपवायला सांगा, नंतर ती फुले वाहत्या पाण्यात विसर्जन करा (एकदाच करणे).
🔷८) पती-पत्नीचे पटत नसेल तर : गुरुवारी कडकडीत उपवास करणे, काहीही खायचे नाही, चहा, नारळपाणी, पाणी चालेल. सूर्यास्ताच्या वेळी दत्ताच्या मूर्ती समोर कोणतेही १ फळ नैवेद्य म्हणून दाखवायचे, सौभाग्याची प्रार्थना करावी आणि सूर्यास्तानंतर उपवास सोडावा. कडकडीत ११ गुरूवार करावेत.

९) इन्कम वाढ होण्यासाठी :दर गुरुवारी (जमल्यास रोज) २ ते ५ रु. चे चणे (भाजलेले) कबुतरांना द्यावे.
🍁संध्याकाळी गाईच्या तुपाचा दिवा लावावा (उंबरठ्याजवळ व मंदिरात)
🍁यत्र योगेश्वरो कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर: | तत्र श्री विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम || रोज संध्याकाळी १८ वेळा मोठ्याने म्हणावा.
🍁ॐ कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने | प्रणतक्लेश नाशाय गोविंदाय नमो नम: || कामाला / ऑफिसला जाण्यापूर्वी ८ वेळा म्हणावा.
🍁सर्व मंगल मांगल्ये …………. नारायणी नमोस्तुते || सर्व प्रकारच्या कल्याणासाठी रोज २८ वेळा म्हणावा.
🍁ॐ –हीं पद्मे स्वाहा | रोज १ तासभर रात्री झोपताना जपावा.
१०) आपली प्रकृती व संसार सुखासाठी : रोज आंघोळीनंतर १ चीमुठ साखर सूर्याकडे पूर्वेला वहावी. स्त्रियांनी कुंकू लावून १ लाल फुल आणि थोडे तांदूळ सूर्याकडे पूर्वेला वहावे असे केल्यास पती-पत्नीमधील भांडणे कमी होतात. आपणाकडून रोज साखर मुंग्यांनी खाल्यामुळे अन्नदानाचे पुण्य व सुर्याला अर्ध्य याने सूर्यपूजा होते आणि आपल्या अडचणी सुटतात.
🔷११) मंदिरातील (घरातील) देव-देवतांची पूजा नित्यनेमाने, पूर्ण भावाने पुरुषानेच करणे. कुलदेव व कुलदेवीची यथाशक्ती पूजा / सेवा करणे. वर्षातून एकदा सहपरिवार कुलदेव व कुलदेवीचे दर्शन न चुकता करून येणे. यामुळे तुमचे कुलदेव व कुलदेवी प्रसन्न राहील ज्यामुळे तुमच्या कुटुंबावर कोणतेही संकट येणार नाही, आल्यास त्यातून अगदी सहीसलामत बाहेर पडाल. स्त्रियांनी उंबरा पुजून, हळद कुंकू वाहून तुळशीसही हळद कुंकू वाहून पाणी घालणे, नंतर मंदिराजवळ येवून कुलदेव व कुलदेवीची प्रार्थना करून आशीर्वाद मांगणे.

No comments:

Post a Comment