Thursday, 6 October 2016

🌼🌼🌼जपमाळ आणि जपसंख्या 🌼🌼🌼

मनुष्य सात्विक असो, राजसिक असो वा तमोगुणी असो नामस्मरण इष्टच आहे. हल्ली आपल्या दैनंदिन जीवनात रोज नवनवीन उलथापालथ हि होतच असते. अश्या ह्या धकाधकीच्या जीवनात मानसिक स्थैर्य, आत्मिक आनंद दिवसेन दिवस कुठेतरी लुप्त होतायेत. आपल्या सर्वांनाच सुख हवं आहे, पण खरं सुखं कुठे आहे, कशात आहे ह्याचा बोध आपल्याला होत नाही. नामस्मरण हा मनुष्याचा श्वास आहे. हा आध्यात्मिक श्वास आपल्याला त्या भगवंतरूपी सुखाशी समरस करू शकतो. कलियुगात तर नामस्मरणाला अनन्य साधारण महत्व आहे. ह्या युगात केवळ परमात्मा परमेश्वराचे नाम युगां-युगांच्या पुण्याचे फळ देणारे आहे. त्यामुळे नामस्मरण हा कलियुगाचा अतिशय साधा- सरळ आणि सोप्पा मार्ग आपल्याला आध्यात्मिक उन्नतीकडे नेणारा आहे.
 नामस्मरणात लागणाऱ्या जपमाळेची माहिती करून घेऊ. नामस्मरण करताना आपण जपमाळेचा वापर करतो. हि जपमाळ 108 मण्यांची असते आणि एक मेरूमणी असतो त्यालाच गुरुमणी म्हणतात.
108 मणी आणि त्यांचे महत्व :
108 हि संख्या प्रामुख्यानी 9 ह्या आकड्यापासून बनलेली आहे. आध्यात्मिकदृष्ट्या 9 ह्या आकड्याचे अनन्य साधारण महत्व आहे.
12 आवर्तने 9 वेळा केल्यास 108 वेळा साधक मंत्र किंवा नाम जपतो.
108 ह्या संख्येमधील 8 आणि 1 ह्या आकड्यांची बेरीज देखील 9 च येते.
श्री दत्तगुरूंचा प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभ ह्यांच्या चरितामृतात 9 संख्येचे अतिशय सुंदर विवरण केले आहे.
श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत(अध्याय 13- नवम संख्या विवरण)
"9 हि संख्या विचित्र आहे. 9 ला 1 ने भागल्यास 9 च येतात. 9 ला 2 ने गुणल्यास 18 येतात. 1 आणि 8 ची बेरीज 9 च येते. 9 ला 3 ने गुणल्यास 27 ही संख्या येते. 2 आणि 7 ची बेरीज 9 च येते. या प्रकारे कितीही संख्येने गुणले आणि येणाऱ्या संख्येचे आकडे एकत्र केल्यास 9 हीच संख्या येते त्यामुळे 9 ही संख्या ब्रह्मतत्व सूचविते. "
त्यामुळेच मंत्रांचे पठण करताना किंवा जाप करताना निर्धारित जप संख्या 108 असावी. ह्याशिवाय 180 संख्येचे महत्व अनेक ठिकाणी अनुभवायला मिळते.
सनातन धर्मात 108 उपनिषधे आहेत.
तसेच ज्ञान देणाऱ्या, विद्या देवी-देवतांची संख्या 108 आहे.
एका संवत्सरात 10800 इतके शुभ सांकेतिक क्षण येतात. कलियुगात मनुष्याला प्राप्त होणारे आयुर्मान हे 100 वर्षांचे आहे जर संवत्सरातील 10800 क्षणांना 100 वर्षांनी भागले तर 108 हि संख्या उरते. म्हणजे मनुष्याला एका वर्षाला 108 शुभ क्षणांची प्राप्ती होते.
जपमाळेचे प्रकार:
हातात धरून ज्या माळेचा जप केला जातो तिला करमाळा म्हणतात. ह्या जपमाळेतील मणी हे त्या विशिष्ट दैवताला आकर्षित करून घेण्याची ताकद ठेवतात. ह्या जपमाळेतील मणी म्हणजेच प्रत्येक एका विशिष्ट वैश्विक शक्तीला जागृत करण्याचा मार्ग आहे. त्यामुळे आपले नामस्मरणचे अंतिम उद्दिष्ट जाणून आणि गुरूंच्या आज्ञेने विशिष्ठ जपमाळेच्या सहाय्याने जप करावा आणि त्या वैश्विक शक्तीचा आशिष प्राप्त करून घ्यावा.
1. कमलाक्ष माळ :
कमळ पुष्पं जे मुलतः पवित्रता आणि उत्पत्तीचे प्रतिक आहे, हे माता लक्ष्मीचे अति प्रिय पुष्पं आहे, त्यामुळे तिला कमला असाही संभोधतात. ह्याच मुळे लक्ष्मी देवीची साधना करताना कमळाच्या सुकलेल्या बियांपासून बनवलेल्या, कमलाक्ष जपमाळेचे अधिक महत्व आहे. ह्या माळेच्या आणि मंत्राच्या नियमित जपामुळे धन, भाग्य, सुख संतुष्टी ह्यांची प्राप्ती होऊ शकते.
2. तुळशी माळ :
भगवान विष्णूंना तुळशी अतिशय प्रिय आहे, त्यामुळे तुळशीची माळ हि भगवान विष्णू, राम आणि कृष्ण ह्या देवतांच्या नामजपासाठी वापरतात. तुळशीला आयुर्वेदातातही अधिक महत्व आहे. तसेच तुळशी माळेच आध्यात्मिक उन्नतीसाठीही उपयोग होतो.
3. रुद्राक्ष माळ :
रुद्राक्षापासून बनवलेली माळ ही भगवान शिव ह्यांच्या उपासनेस उत्तम असते. शिवपंथी हि मला तपस्येसाठी वापरतात. रुद्राक्ष वेगवेगळ्या प्रकारात उपलब्ध होतो उदा.एक ते चौदा मुखी रुद्राक्ष उपलब्ध आहेत पण पंचमुखी रुद्राक्ष अधिकतम वापरला जातो.
4. चंदन माळ:
चंदनाच्या लाकडापासून बनवलेली हि माळा दोन रंगात येतात. पांढर्या रंगात आणि रक्तचन्दनापासून बनवलेली माळ लाल रंगात येते. पांढर्या चंदनाची माळ हि भगवान विष्णू, राम आणि कृष्ण उपासनेसाठी उत्तम आहे. ह्या माळेच्या नियमित वापराने शांती प्राप्त होऊन समृद्धीचे द्वार खुले होतात. आणि रक्तचंदनापासून बनवलेली माळ हि श्री गजाननाच्या उपासनेसाठी उत्तम मानली जाते.
5. स्फटिक माळ :
स्फटिक मूलतः थंड असते त्यामुळे स्फटिक माळेचा जप मनशांती देणारा असतो. देवीचा जप करताना ह्या माळेचा विशेष उपयोग होतो. ह्या माळेच्या नित्य जपाने शीलसंवर्धानास सहाय्य होते.
6. पुत्र जीवी माळ :
पुत्राजीव वृक्षापासून बनवलेल्या ह्या माळेमुळे पुत्ररत्न प्राप्ती होते. ह्यालाच पुत्रवंती माळा असेही म्हणतात.

जपमाळेसाठी विविध प्रकारचे मणी व त्यांचे परिणाम -
प्रवाळ मणी-१००० पट
स्फटीक माळ-१०००० पट
मोती माला-१० लाख पट
रुद्राक्ष - अनंत पट
Image result for japmal
|| श्री राम जय राम जय जय राम ||

|| जय हनुमान||

No comments:

Post a Comment