Friday, 7 October 2016

🌼🌼🌼श्रीरामभक्त हनुमान🌼🌼🌼


कदा सीता कपाळावर शेंदूर लावत होती. 
हनुमानाने ते बघितले आणि तिला प्रश्न विचारला, 
`सीतामाई, तू प्रतिदिन हा शेंदूर का लावतेस ?' 
तेव्हा सीतेने सांगितले, `मी हा शेंदूर लावते; 
कारण त्यामुळे तुमच्या स्वामींचे म्हणजे श्रीरामाचे आयुष्य वाढते.' 
हे ऐकल्यावर हनुमानाला वाटले की, 
नुसत्या कपाळावर शेंदूर लावल्यावर श्रीरामाचे आयुष्य वाढते, 
तर आपण सगळया अंगाला शेंदूर लावूया.
मग मारुतीने शेंदूर घेतला आणि आपल्या सर्व अंगाला फासला. 
तेव्हापासून मारुतीचा रंग शेंदरी झाला.     


तात्पर्य : या गोष्टीवरून आपल्याला काय शिकायला मिळाले ? 

मारुति हा श्रीरामाचा भक्त होता. त्याचे रामावर फार प्रेम होते. 

रामासाठी काय वाटेल ते करायला तो सिद्ध होता. 
म्हणूनच श्रीरामाचा सगळयात जवळचा भक्त मारुति होता. 


Image result for ram bhakt hanuman

|| श्री राम जय राम जय जय राम ||

|| जय हनुमान||

No comments:

Post a Comment