Wednesday, 5 October 2016

🌼🌼🌼रामायण🌼🌼🌼


रामायण हा वाल्मिकी ऋषींकडून लिहिल्या गेलेला एक पौराणिक ग्रंथ आहे. यामध्ये 24,000 श्लोक आणि सात अध्याय आहेत, ज्यांना काण्ड असे म्हटले जाते. बाल काण्ड ,अयोध्या काण्ड, अरण्य काण्ड, किष्किंधा काण्ड, सुंदर काण्ड, लंका काण्ड (युध्द काण्ड) आणि उत्तर काण्ड.
वरील सर्व रामायण हे वेगवेगळ्या रामायणाने ओळखल्या जाते. जसे गायत्री रामायण, अद्भुत रामायण, आनंद रामायण आणि अध्यात्मिक रामायण.
तसेच एका श्लोकी रामायण देखील आहे. यामध्ये रामाच्या वनवासापासून रावणवधाच्या घटनेपर्यंतचा प्रवास वर्णिलेला आहे. (पराक्रम ).
आदौ राम तपोवनादि गमनं ,हत्वा मृगं कांचनम्
वैदेही हरणं जटायु मरणं,सुग्रीव संभाषणम्
बाली निर्दलनं समुद्रतरणं,लंका पुरी दाहनंम्
पश्चाद्रावणं कुंभकर्ण हननं एतद्विरामायण्
जसे वाल्मकिंनी संपूर्ण रामायण लिहिले तसे बुधकौशिक ऋषिंनी श्रीरामरक्षा लिहिली आहे. असे म्हणतात श्रीबुधकौशिक ऋषींना सकाळी सकाळी शिवाने स्वप्नात येवून रामरक्षा सांगितली आणि ऋषिंनी ती जशीच्या तशी लिहून काढली रामरक्षेतील प्रत्येक श्लोक हा मंत्र आहे.म्हणून त्यात " स्तोत्र मंत्रस्य जपे विनीयोगः " असे म्हटले आहे.
रामरक्षा ही चैत्र महिन्यातील प्रतिपदेपासून नवमी पर्यंत रोज 21वेळेस म्हटल्यावर सिद्ध होते. त्यासाठी रोज संध्याकाळी तुपाचा दिवा लावावा .चंदनाची अगरबत्ती लावावी आणि जेव्हढी विभूती जमेल ती सर्व एका डबीमध्ये भरून ठेवावी. आजारी व्यक्तिस, मनात हूरहूर वाटत असल्यास, विनाकारण मनावर दडपण वाटत असल्यास ही विभूती दोन भुवयांमध्ये लावावी किंवा विभूती लावून पटकन श्री रामाचे नाव घेऊन झोपी जावे.वाईट स्वप्न, झोपेतून दचकून उठणे एकदम कमी होते.
श्रीरामाची महती कोट्यवधी शब्दांमधून वर्णिल्या गेली आहे. श्रीराम नामाने सर्वच प्राणी मात्रांचा उद्धार झाला आहे. श्रीरामाच्या पदस्पर्शाने एका शिलेचाही उद्धार झाला आणि अहिल्या शाप मुक्त झाली . श्री रामरक्षेमध्ये सीतेची शक्ती आणि हनुमानाची भक्ती वर्णिली आहे.आणि श्रीरामचंद्र ही प्रमुख देवता आहे ." सीताशक्तिः श्रीमद्हुमानकीलकम् श्री रामचंद्र प्रीत्यर्थ जपे विनियोगः.
याशिवाय रामरक्षा ही एक योगनिद्रा आहे.माझ्या एकेक अंगाचे श्री राम रक्षण करो आणि मला निरोगी दीर्घायुष्य लाभो असा संकल्प सोडून रामरक्षा म्हणावी.
पाताल,भूतल आणि आकाश अशा सर्व ठिकाणी संचार करणार् या जीवाचा उद्धार श्रीराम करतो म्हणून रामाची महती अनन्यसाधारण आहे.
" शिरोमे राघवः पातु भालं दशरथात्मजा
कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रियः श्रुतीः||
घ्राणं नातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः
जिव्हा विद्यानिधीः नातु कठं भरतवंदिताः ||
स्कंधौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः
करौ सीतापतिः पातु ह्रदयं जामदग्न्यजित् ||
मध्यं नातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः
सुग्रीवेशः कपी नातु सक्थिनी हनुमत्प्रभुः ||
उरू रघूत्तमः पातु रक्षः कुलविनाशकृत्
जानुनी सेतकृत् पातु जंग्घे दशमुखान्तकः
पादौ बिभीषणश्रीदः पातु रामौ अखिलं वपुः ||
एतां रामबलोपेतां रक्षां यः सुकृती पठेत्
स चिरायुः सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् ||
शिर,भाल,दृशौ,श्रुती ,घ्राणं,मुखं, जिव्हा ,कंठ, स्कंध, भुज, करौ, ह्रदयं , मध्यं (शरीराचा मध्य भाग) नाभिं, कटी, उरू (ओटीपोट) .जंग्घे, आणि पादौ .असे म्हणून त्या त्या अवयवाला स्पर्श करून रामरक्षा म्हटल्यास शरीराला स्वस्थता तर लाभतेच शिवाय मंत्रामुळे मन देखील नियंत्रीत होते.
गर्भवती स्त्रियांनी रोज सकाळी आणि संध्याकाळी देवासमोर विशिष्ट वेळेस बसून ही साधना केल्यास येणार्या गर्भावर नक्की चांगले परिणाम होवून बाळाचे प्रत्येक अंग निरोगी राहाण्यास मदत होईलच शिवाय बाळ सुंदर, तेजस्वी आणि बुध्दिमान असेल यात शंका नाही.
|| श्री राम जय राम जय जय राम ||

|| जय हनुमान||

No comments:

Post a Comment