Friday, 21 October 2016

🌼🌼🌼भगवान शंकराची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीलामृत पोथीचे पारायण करावे.🌼🌼🌼

सप्ताह-पारायण पध्दति...

कोणत्याही सोमवारी सायंकाळी शंकराच्या मंदिरात जाऊन ११ बेलाची पाने पिंडीवर वहावीत व शंकराचे यथाशास्त्र दर्शन घेऊन " मी शंकराना प्रसन्न करून शांति, समाधान, आनंद ( जी इष्ट कामना असेल ती बोलून ) प्राप्त करण्यासाठी श्रीशिवलीलामृत पोथीचे ७ दिवसात पारायण करणार आहे तरी हे कार्य भगवान् श्रीशंकरानी कृपा करून पूर्ण करून घ्यावे." अशी प्रार्थना करावी व तेथे किंवा स्वत:च्या घरी येऊन रात्रीच्या भोजनापूर्वी शिवलीलामृत पोथी वाचावी. शूचिर्भूत असावे.
सोमवार - अध्याय १ व अध्याय २
मंगळवार - अध्याय ३ व अध्याय ४
बुधवार - अध्याय ५ व अध्याय ६
गुरुवार - अध्याय ७ व अध्याय ८
शुक्रवार - अध्याय ९ व अध्याय १०
शनिवार - अध्याय ११ व अध्याय १२
रविवार - अध्याय १३ व अध्याय १४
रविवारी रात्री १५ वा अध्याय वाचला तरी चालेल न वाचला तरी चालेल. रविवारी रात्रीच्या आपल्या जेवणाच्या पात्राचा नैवेद्य शंकराला दाखवावा व तेच उद्यापन समजावे.
पारायण करताना दीवा तेवत ठेवावा. रविवारी शंकराच्या मंदिरात जाऊन शंकरापुढे यथाशक्ति तांदूळ व पैसे ठेवावेत. शैव संप्रदायी साधूला कमीत कमी २१ रु. दक्षिणा व पांढरेशुभ्र वस्त्र दान द्यावे.
पोथी मोठयाने वाचली तरी चालेल. इतरांनीही ऐकावी. रविवारी वाचन पूर्ण झाल्यावर १०८ वेळा ॐ नम: शिवाय मंत्राचा जप करावा ( जमल्यास रोज जप करावा ).




|| श्री राम जय राम जय जय राम ||
|| जय हनुमान|| 

Friday, 7 October 2016

How Resources, Skills and Abilities Make a Difference.

🌼🌼🌼Japanese Fishing Co. Solution Story.. 🌼🌼🌼


How Resources, Skills and Abilities Make a Difference.
Japanese loved fresh fish but for decades close by water has not held many fishes. So to feed Japanese population, Fishing boats got bigger and went further and further than before.
Further the fisherman went for fishing, more time it took them to bring back the fish. Because it took a lot of time to get back after catching fishes, fishes were not fresh and didn’t taste good.Now, to solve this problem, Fisherman started to install freezers on their boats. So that after catching fishes they could freeze them at sea and this allowed fishermen to go further and stay longer to catch more fishes.
However, Japanese could taste the difference and they didn’t like frozen fish.This made Fishing company think for further solution and installed fish tanks in their boats. Now, they would catch the fishes and stuff them in tanks. After little trashing around these fishes were tired, dull and lost their freshness.This lead fishing companies to face an impending crisis.
Today, same fishing companies get fresh tasting fish to Japan..!! Wonder how they managed to keep the freshness of fishes??To keep fishes fresh. Japanese fishing companies still put the fishes in the fish tank But with a small shark..!! Because of shark fishes are challenged and constantly on move. This challenge keeps them alive and fresh.


Moral:In our life New challenges Keeps us Active. If you steadily win challenges, you are happy. These challenges keeps you energized.

🌼🌼🌼श्रीरामभक्त हनुमान🌼🌼🌼


कदा सीता कपाळावर शेंदूर लावत होती. 
हनुमानाने ते बघितले आणि तिला प्रश्न विचारला, 
`सीतामाई, तू प्रतिदिन हा शेंदूर का लावतेस ?' 
तेव्हा सीतेने सांगितले, `मी हा शेंदूर लावते; 
कारण त्यामुळे तुमच्या स्वामींचे म्हणजे श्रीरामाचे आयुष्य वाढते.' 
हे ऐकल्यावर हनुमानाला वाटले की, 
नुसत्या कपाळावर शेंदूर लावल्यावर श्रीरामाचे आयुष्य वाढते, 
तर आपण सगळया अंगाला शेंदूर लावूया.
मग मारुतीने शेंदूर घेतला आणि आपल्या सर्व अंगाला फासला. 
तेव्हापासून मारुतीचा रंग शेंदरी झाला.     


तात्पर्य : या गोष्टीवरून आपल्याला काय शिकायला मिळाले ? 

मारुति हा श्रीरामाचा भक्त होता. त्याचे रामावर फार प्रेम होते. 

रामासाठी काय वाटेल ते करायला तो सिद्ध होता. 
म्हणूनच श्रीरामाचा सगळयात जवळचा भक्त मारुति होता. 


Image result for ram bhakt hanuman

|| श्री राम जय राम जय जय राम ||

|| जय हनुमान||

Thursday, 6 October 2016

🌼🌼🌼जपमाळ आणि जपसंख्या 🌼🌼🌼

मनुष्य सात्विक असो, राजसिक असो वा तमोगुणी असो नामस्मरण इष्टच आहे. हल्ली आपल्या दैनंदिन जीवनात रोज नवनवीन उलथापालथ हि होतच असते. अश्या ह्या धकाधकीच्या जीवनात मानसिक स्थैर्य, आत्मिक आनंद दिवसेन दिवस कुठेतरी लुप्त होतायेत. आपल्या सर्वांनाच सुख हवं आहे, पण खरं सुखं कुठे आहे, कशात आहे ह्याचा बोध आपल्याला होत नाही. नामस्मरण हा मनुष्याचा श्वास आहे. हा आध्यात्मिक श्वास आपल्याला त्या भगवंतरूपी सुखाशी समरस करू शकतो. कलियुगात तर नामस्मरणाला अनन्य साधारण महत्व आहे. ह्या युगात केवळ परमात्मा परमेश्वराचे नाम युगां-युगांच्या पुण्याचे फळ देणारे आहे. त्यामुळे नामस्मरण हा कलियुगाचा अतिशय साधा- सरळ आणि सोप्पा मार्ग आपल्याला आध्यात्मिक उन्नतीकडे नेणारा आहे.
 नामस्मरणात लागणाऱ्या जपमाळेची माहिती करून घेऊ. नामस्मरण करताना आपण जपमाळेचा वापर करतो. हि जपमाळ 108 मण्यांची असते आणि एक मेरूमणी असतो त्यालाच गुरुमणी म्हणतात.
108 मणी आणि त्यांचे महत्व :
108 हि संख्या प्रामुख्यानी 9 ह्या आकड्यापासून बनलेली आहे. आध्यात्मिकदृष्ट्या 9 ह्या आकड्याचे अनन्य साधारण महत्व आहे.
12 आवर्तने 9 वेळा केल्यास 108 वेळा साधक मंत्र किंवा नाम जपतो.
108 ह्या संख्येमधील 8 आणि 1 ह्या आकड्यांची बेरीज देखील 9 च येते.
श्री दत्तगुरूंचा प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभ ह्यांच्या चरितामृतात 9 संख्येचे अतिशय सुंदर विवरण केले आहे.
श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत(अध्याय 13- नवम संख्या विवरण)
"9 हि संख्या विचित्र आहे. 9 ला 1 ने भागल्यास 9 च येतात. 9 ला 2 ने गुणल्यास 18 येतात. 1 आणि 8 ची बेरीज 9 च येते. 9 ला 3 ने गुणल्यास 27 ही संख्या येते. 2 आणि 7 ची बेरीज 9 च येते. या प्रकारे कितीही संख्येने गुणले आणि येणाऱ्या संख्येचे आकडे एकत्र केल्यास 9 हीच संख्या येते त्यामुळे 9 ही संख्या ब्रह्मतत्व सूचविते. "
त्यामुळेच मंत्रांचे पठण करताना किंवा जाप करताना निर्धारित जप संख्या 108 असावी. ह्याशिवाय 180 संख्येचे महत्व अनेक ठिकाणी अनुभवायला मिळते.
सनातन धर्मात 108 उपनिषधे आहेत.
तसेच ज्ञान देणाऱ्या, विद्या देवी-देवतांची संख्या 108 आहे.
एका संवत्सरात 10800 इतके शुभ सांकेतिक क्षण येतात. कलियुगात मनुष्याला प्राप्त होणारे आयुर्मान हे 100 वर्षांचे आहे जर संवत्सरातील 10800 क्षणांना 100 वर्षांनी भागले तर 108 हि संख्या उरते. म्हणजे मनुष्याला एका वर्षाला 108 शुभ क्षणांची प्राप्ती होते.
जपमाळेचे प्रकार:
हातात धरून ज्या माळेचा जप केला जातो तिला करमाळा म्हणतात. ह्या जपमाळेतील मणी हे त्या विशिष्ट दैवताला आकर्षित करून घेण्याची ताकद ठेवतात. ह्या जपमाळेतील मणी म्हणजेच प्रत्येक एका विशिष्ट वैश्विक शक्तीला जागृत करण्याचा मार्ग आहे. त्यामुळे आपले नामस्मरणचे अंतिम उद्दिष्ट जाणून आणि गुरूंच्या आज्ञेने विशिष्ठ जपमाळेच्या सहाय्याने जप करावा आणि त्या वैश्विक शक्तीचा आशिष प्राप्त करून घ्यावा.
1. कमलाक्ष माळ :
कमळ पुष्पं जे मुलतः पवित्रता आणि उत्पत्तीचे प्रतिक आहे, हे माता लक्ष्मीचे अति प्रिय पुष्पं आहे, त्यामुळे तिला कमला असाही संभोधतात. ह्याच मुळे लक्ष्मी देवीची साधना करताना कमळाच्या सुकलेल्या बियांपासून बनवलेल्या, कमलाक्ष जपमाळेचे अधिक महत्व आहे. ह्या माळेच्या आणि मंत्राच्या नियमित जपामुळे धन, भाग्य, सुख संतुष्टी ह्यांची प्राप्ती होऊ शकते.
2. तुळशी माळ :
भगवान विष्णूंना तुळशी अतिशय प्रिय आहे, त्यामुळे तुळशीची माळ हि भगवान विष्णू, राम आणि कृष्ण ह्या देवतांच्या नामजपासाठी वापरतात. तुळशीला आयुर्वेदातातही अधिक महत्व आहे. तसेच तुळशी माळेच आध्यात्मिक उन्नतीसाठीही उपयोग होतो.
3. रुद्राक्ष माळ :
रुद्राक्षापासून बनवलेली माळ ही भगवान शिव ह्यांच्या उपासनेस उत्तम असते. शिवपंथी हि मला तपस्येसाठी वापरतात. रुद्राक्ष वेगवेगळ्या प्रकारात उपलब्ध होतो उदा.एक ते चौदा मुखी रुद्राक्ष उपलब्ध आहेत पण पंचमुखी रुद्राक्ष अधिकतम वापरला जातो.
4. चंदन माळ:
चंदनाच्या लाकडापासून बनवलेली हि माळा दोन रंगात येतात. पांढर्या रंगात आणि रक्तचन्दनापासून बनवलेली माळ लाल रंगात येते. पांढर्या चंदनाची माळ हि भगवान विष्णू, राम आणि कृष्ण उपासनेसाठी उत्तम आहे. ह्या माळेच्या नियमित वापराने शांती प्राप्त होऊन समृद्धीचे द्वार खुले होतात. आणि रक्तचंदनापासून बनवलेली माळ हि श्री गजाननाच्या उपासनेसाठी उत्तम मानली जाते.
5. स्फटिक माळ :
स्फटिक मूलतः थंड असते त्यामुळे स्फटिक माळेचा जप मनशांती देणारा असतो. देवीचा जप करताना ह्या माळेचा विशेष उपयोग होतो. ह्या माळेच्या नित्य जपाने शीलसंवर्धानास सहाय्य होते.
6. पुत्र जीवी माळ :
पुत्राजीव वृक्षापासून बनवलेल्या ह्या माळेमुळे पुत्ररत्न प्राप्ती होते. ह्यालाच पुत्रवंती माळा असेही म्हणतात.

जपमाळेसाठी विविध प्रकारचे मणी व त्यांचे परिणाम -
प्रवाळ मणी-१००० पट
स्फटीक माळ-१०००० पट
मोती माला-१० लाख पट
रुद्राक्ष - अनंत पट
Image result for japmal
|| श्री राम जय राम जय जय राम ||

|| जय हनुमान||

🌼🌼🌼सुभाषितमाला 🌼🌼🌼


परोपदेशवेलायां शिष्टाः सर्वे भवन्ति वै ।
विस्मरन्तीह शिश्टत्वं स्वकार्ये समुपस्थिते ॥
English Meaning:
Any body can give advice to somebody in distress. But forget all those advices when they themselves are in trouble.
भावार्थ...
दुःखी असलेल्या व्यक्तीला कोणीही उपदेश देऊन जातो. पण तोच उपदेशक जेंव्हा स्वतः संकटात असतो त्यावेळी तो सर्व उपदेश विसरून जातो.

|| श्री राम जय राम जय जय राम ||
|| जय हनुमान|| 

Wednesday, 5 October 2016


🌼🌼🌼 सुखी संसारासाठी काही सोपे तोडगे🍁 🌼🌼🌼🔹

🔷१) मुले नीट वागण्यासाठी नवनाथ भक्तीसारातील ५ वा अध्याय घरात दररोज संध्याकाळी ७ नंतर वाचावा.
🔷२) ज्यांचा विवाह होण्यास अनेक अडचणी येतात, ठरलेले विवाह मोडतात अशांनी नवनाथ भक्तिसार २८ वा अध्याय दररोज संध्याकाळी सातनंतर वाचावा.
🔷३) मंदिरात दिव्याची वात सुखप्राप्तीसाठी पूर्वेस करून ठेवणे.
🔷४) अडकलेले पैसे परत मिळण्यासाठी : सोमवारी चौकोनी कागदात मध्यभागी ज्या व्यक्तीकडून रक्कम येणे बाकी आहे त्याचे नाव लाल शाईने लिहावे व २ पांढरी फुले व चिमुटभर काळे टिळ घेऊन त्याची पुडी करून ती उजव्या मुठीत धरून १०८ वेळा मंत्र जपावा (मंत्र : ॐ नम: शिवाय), ही पुडी पिंडीवर वहावी. हे सतत ११ सोमवार करावे.
🔷५) महत्त्वाचे काम होण्यासाठी : मंगळवारी संध्याकाळी ४:३० ते ६:३० या वेळेत एक तांब्याचा कलश त्यात पाणी भरा, त्यात अर्धा पेला दुध टाका, चमचाभर पांढरे टिळ टाका, हा कलश घेऊन पिंपळाच्या वृक्षासमोर उभे रहा, एकच कामाची इच्छा मनात ठेवणे व हे काम व्हावे असे पिंपळवृक्षाला सांगून ते पाणी पिंपळाच्या बुंध्यात वहायचे (एकदाच करावे).
🔷६) नोकरीमध्ये वरिष्ठ सहकारी यांचा त्रास असल्यास : दररोज आंघोळीनंतर चिमुटभर साखर घराबाहेर टाकायची, ऑफिसला जाण्यापूर्वी तांब्याच्या / चांदीच्या ग्लासमध्ये पाणी घेऊन डाव्या हातात ठेवा, उजवा हात त्यावर ठेवून मंत्र ७ वेळा म्हणावा. “माझे घरापासून कार्यालयापर्यंतचे सर्व शत्रू’ ॐ चिमी चिमी स्वाहा” व ग्लासातील पाणी प्यायचे.
🔷७) आजार लवकर बरा होण्यासाठी : एक ओंजळभर एका जातीची एका रंगाची फुले घेणे, रोग्याच्या हातात द्यायची. आजारी माणसाला त्या ओंजळीत आपला चेहरा लपवायला सांगा, नंतर ती फुले वाहत्या पाण्यात विसर्जन करा (एकदाच करणे).
🔷८) पती-पत्नीचे पटत नसेल तर : गुरुवारी कडकडीत उपवास करणे, काहीही खायचे नाही, चहा, नारळपाणी, पाणी चालेल. सूर्यास्ताच्या वेळी दत्ताच्या मूर्ती समोर कोणतेही १ फळ नैवेद्य म्हणून दाखवायचे, सौभाग्याची प्रार्थना करावी आणि सूर्यास्तानंतर उपवास सोडावा. कडकडीत ११ गुरूवार करावेत.

९) इन्कम वाढ होण्यासाठी :दर गुरुवारी (जमल्यास रोज) २ ते ५ रु. चे चणे (भाजलेले) कबुतरांना द्यावे.
🍁संध्याकाळी गाईच्या तुपाचा दिवा लावावा (उंबरठ्याजवळ व मंदिरात)
🍁यत्र योगेश्वरो कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर: | तत्र श्री विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम || रोज संध्याकाळी १८ वेळा मोठ्याने म्हणावा.
🍁ॐ कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने | प्रणतक्लेश नाशाय गोविंदाय नमो नम: || कामाला / ऑफिसला जाण्यापूर्वी ८ वेळा म्हणावा.
🍁सर्व मंगल मांगल्ये …………. नारायणी नमोस्तुते || सर्व प्रकारच्या कल्याणासाठी रोज २८ वेळा म्हणावा.
🍁ॐ –हीं पद्मे स्वाहा | रोज १ तासभर रात्री झोपताना जपावा.
१०) आपली प्रकृती व संसार सुखासाठी : रोज आंघोळीनंतर १ चीमुठ साखर सूर्याकडे पूर्वेला वहावी. स्त्रियांनी कुंकू लावून १ लाल फुल आणि थोडे तांदूळ सूर्याकडे पूर्वेला वहावे असे केल्यास पती-पत्नीमधील भांडणे कमी होतात. आपणाकडून रोज साखर मुंग्यांनी खाल्यामुळे अन्नदानाचे पुण्य व सुर्याला अर्ध्य याने सूर्यपूजा होते आणि आपल्या अडचणी सुटतात.
🔷११) मंदिरातील (घरातील) देव-देवतांची पूजा नित्यनेमाने, पूर्ण भावाने पुरुषानेच करणे. कुलदेव व कुलदेवीची यथाशक्ती पूजा / सेवा करणे. वर्षातून एकदा सहपरिवार कुलदेव व कुलदेवीचे दर्शन न चुकता करून येणे. यामुळे तुमचे कुलदेव व कुलदेवी प्रसन्न राहील ज्यामुळे तुमच्या कुटुंबावर कोणतेही संकट येणार नाही, आल्यास त्यातून अगदी सहीसलामत बाहेर पडाल. स्त्रियांनी उंबरा पुजून, हळद कुंकू वाहून तुळशीसही हळद कुंकू वाहून पाणी घालणे, नंतर मंदिराजवळ येवून कुलदेव व कुलदेवीची प्रार्थना करून आशीर्वाद मांगणे.

🌼🌼🌼रामायण🌼🌼🌼


रामायण हा वाल्मिकी ऋषींकडून लिहिल्या गेलेला एक पौराणिक ग्रंथ आहे. यामध्ये 24,000 श्लोक आणि सात अध्याय आहेत, ज्यांना काण्ड असे म्हटले जाते. बाल काण्ड ,अयोध्या काण्ड, अरण्य काण्ड, किष्किंधा काण्ड, सुंदर काण्ड, लंका काण्ड (युध्द काण्ड) आणि उत्तर काण्ड.
वरील सर्व रामायण हे वेगवेगळ्या रामायणाने ओळखल्या जाते. जसे गायत्री रामायण, अद्भुत रामायण, आनंद रामायण आणि अध्यात्मिक रामायण.
तसेच एका श्लोकी रामायण देखील आहे. यामध्ये रामाच्या वनवासापासून रावणवधाच्या घटनेपर्यंतचा प्रवास वर्णिलेला आहे. (पराक्रम ).
आदौ राम तपोवनादि गमनं ,हत्वा मृगं कांचनम्
वैदेही हरणं जटायु मरणं,सुग्रीव संभाषणम्
बाली निर्दलनं समुद्रतरणं,लंका पुरी दाहनंम्
पश्चाद्रावणं कुंभकर्ण हननं एतद्विरामायण्
जसे वाल्मकिंनी संपूर्ण रामायण लिहिले तसे बुधकौशिक ऋषिंनी श्रीरामरक्षा लिहिली आहे. असे म्हणतात श्रीबुधकौशिक ऋषींना सकाळी सकाळी शिवाने स्वप्नात येवून रामरक्षा सांगितली आणि ऋषिंनी ती जशीच्या तशी लिहून काढली रामरक्षेतील प्रत्येक श्लोक हा मंत्र आहे.म्हणून त्यात " स्तोत्र मंत्रस्य जपे विनीयोगः " असे म्हटले आहे.
रामरक्षा ही चैत्र महिन्यातील प्रतिपदेपासून नवमी पर्यंत रोज 21वेळेस म्हटल्यावर सिद्ध होते. त्यासाठी रोज संध्याकाळी तुपाचा दिवा लावावा .चंदनाची अगरबत्ती लावावी आणि जेव्हढी विभूती जमेल ती सर्व एका डबीमध्ये भरून ठेवावी. आजारी व्यक्तिस, मनात हूरहूर वाटत असल्यास, विनाकारण मनावर दडपण वाटत असल्यास ही विभूती दोन भुवयांमध्ये लावावी किंवा विभूती लावून पटकन श्री रामाचे नाव घेऊन झोपी जावे.वाईट स्वप्न, झोपेतून दचकून उठणे एकदम कमी होते.
श्रीरामाची महती कोट्यवधी शब्दांमधून वर्णिल्या गेली आहे. श्रीराम नामाने सर्वच प्राणी मात्रांचा उद्धार झाला आहे. श्रीरामाच्या पदस्पर्शाने एका शिलेचाही उद्धार झाला आणि अहिल्या शाप मुक्त झाली . श्री रामरक्षेमध्ये सीतेची शक्ती आणि हनुमानाची भक्ती वर्णिली आहे.आणि श्रीरामचंद्र ही प्रमुख देवता आहे ." सीताशक्तिः श्रीमद्हुमानकीलकम् श्री रामचंद्र प्रीत्यर्थ जपे विनियोगः.
याशिवाय रामरक्षा ही एक योगनिद्रा आहे.माझ्या एकेक अंगाचे श्री राम रक्षण करो आणि मला निरोगी दीर्घायुष्य लाभो असा संकल्प सोडून रामरक्षा म्हणावी.
पाताल,भूतल आणि आकाश अशा सर्व ठिकाणी संचार करणार् या जीवाचा उद्धार श्रीराम करतो म्हणून रामाची महती अनन्यसाधारण आहे.
" शिरोमे राघवः पातु भालं दशरथात्मजा
कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रियः श्रुतीः||
घ्राणं नातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः
जिव्हा विद्यानिधीः नातु कठं भरतवंदिताः ||
स्कंधौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः
करौ सीतापतिः पातु ह्रदयं जामदग्न्यजित् ||
मध्यं नातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः
सुग्रीवेशः कपी नातु सक्थिनी हनुमत्प्रभुः ||
उरू रघूत्तमः पातु रक्षः कुलविनाशकृत्
जानुनी सेतकृत् पातु जंग्घे दशमुखान्तकः
पादौ बिभीषणश्रीदः पातु रामौ अखिलं वपुः ||
एतां रामबलोपेतां रक्षां यः सुकृती पठेत्
स चिरायुः सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् ||
शिर,भाल,दृशौ,श्रुती ,घ्राणं,मुखं, जिव्हा ,कंठ, स्कंध, भुज, करौ, ह्रदयं , मध्यं (शरीराचा मध्य भाग) नाभिं, कटी, उरू (ओटीपोट) .जंग्घे, आणि पादौ .असे म्हणून त्या त्या अवयवाला स्पर्श करून रामरक्षा म्हटल्यास शरीराला स्वस्थता तर लाभतेच शिवाय मंत्रामुळे मन देखील नियंत्रीत होते.
गर्भवती स्त्रियांनी रोज सकाळी आणि संध्याकाळी देवासमोर विशिष्ट वेळेस बसून ही साधना केल्यास येणार्या गर्भावर नक्की चांगले परिणाम होवून बाळाचे प्रत्येक अंग निरोगी राहाण्यास मदत होईलच शिवाय बाळ सुंदर, तेजस्वी आणि बुध्दिमान असेल यात शंका नाही.
|| श्री राम जय राम जय जय राम ||

|| जय हनुमान||

🌼🌼🌼श्रीदत्तात्रेयकवच🌼🌼🌼


(पातःस्मरणीय परमपूज्य श्रीदत्तावतार प.प. श्रीमद्वासुदेवानंदसरस्वती श्रीचरणांच्या स्तोत्रादी संग्रहातील हे १४२ वे स्तोत्र आहे.)
॥ सार्थ श्रीदत्तकवच प्रारंभ ॥
श्रीपादः पातु मे पादावूरू सिद्धासनिस्थितः । पायाद्दिगंबरो गुह्य नृहरिः पातु मे कटिम् ॥१॥
श्री म्हणजे लक्ष्मी ज्यांच्या पदकमलांचा आश्रय करून राहते ते श्रीपाद श्रीदत्तात्रेय माझ्या पायांचे रक्षण करोत. सिद्धासन घालून बसलेले श्रीदत्तात्रेय माझ्या मांड्यांचे रक्षण करोत. दिगंबर म्हणजे दिशा हेच ज्यांचे वस्त्र आहे असे म्हणजे नग्न अवधूत वेष धारण करणारे श्रीदत्तात्रेय माझे गुह्य म्हणजे विसर्जन करणारे गुद व जननेंद्रिय यांचे रक्षण करोत. माझ्या कंबरेचे रक्षण नृहरि श्रीदत्तात्रेय करोत ॥१॥
नाभिं पातु जगत्स्रष्टोदरं पातु दलोदरः । कृपालुः पातु ह्रदयं षड्भुजः पातु मे भुजौ ॥२॥
सर्व जगाला निर्माण करणारा म्हणजे ब्रह्मदेव हे रूप धारण करणारे श्रीदत्तात्रेय माझ्या नाभीचे म्हणजे बेंबीचे रक्षण करोत. पिंपळाच्या पानाप्रमाणे पातळ उदर म्हणजे पोट असणारे (दलोदर) श्रीदत्तात्रेय माझ्या उदराचे रक्षण करोत. कृपाळू म्हणजे कृपाशील श्रीदत्तात्रेय माझ्या ह्रदयाचे रक्षण करोत. सहा हात असणारे षड्भुज श्रीदत्तात्रेय माझ्या भुजांचे रक्षण करोत. ॥२॥
स्त्रक्कुंडी-शूल-डमरू शंख-चक्र-धरः करान् । पातु कंठं कंबुकंठंः सुमुखः पातु मे मुखम् ॥३॥
माला, कमंडलू, त्रिशूल, डमरू, शंख व चक्र यांना सहा हातांनी धारण करणारे श्रीदत्तात्रेय माझ्या हातांचे रक्षण करोत. कंबू म्हणजे शंख. शंखाप्रमाणे ज्यांचा कंठ आहे ते श्रीदत्तात्रेय माझ्या कंठाचे म्हणजे माझ्या गळ्याचे रक्षण करोत. सुंदर मुख असणारे श्रीदत्तात्रेय माझ्या मुखाचे रक्षण करोत. (या श्लोकात करान् पातु म्हणजे अनेक हातांचे रक्षण करोत असे बहुवचन घातलेले आहे. माणसाला दोनच हात असताना बहुवचन का घातले अशी शंका येते. बहुवचन घेण्यास कारण असे की आपल्या येथे पुरुषाला लग्न झाल्यावर चतुर्भुज झाला असे म्हणतात. पती व पत्नी एकरूपच असतात. तेव्हा पुरुषाला पत्नीचे दोन हात घेऊन चार हात होतात व पत्नीलाही पतीचे दोन हात घेऊन चार हात होतात. याप्रमाणे बहुवचनाची संगती लागते. 'करौ' असा पाठ मूळ प्रतीत असल्यास प्रश्नच नाही.) ॥३॥
जिह्वां मे वेदवाक्‌पातु नेत्रे मे पातु दिव्यदृक् । नासिकां पातु गंधात्मा पातु पुण्यश्रवाः श्रुती ॥४॥
सर्व वेद ज्या विराटस्वरूप श्रीदत्तात्रेयांचे वागिंद्रिय आहे तो माझ्या जिभेचे रक्षण करो. ज्याची दृष्टी दिव्य म्हणजे भूत, वर्तमान व भविष्य या सर्व काळातील सर्व पदार्थांना प्रत्यक्ष पाहणारी आहे असे सर्वदर्शी श्रीदत्तात्रेय माझ्या दोन्ही डोळ्यांचे रक्षण करोत. ज्यांचे शरीर सर्वदा व स्वभावतःच सुगंधी आहे आणि जे गंधरूप आहेत असे श्रीदत्तात्रेय माझ्या नाकाचे रक्षण करोत. ज्यांच्या स्वरूपाचे व गुणांचे श्रवण पुण्यकारक आहे असे श्रीदत्तात्रेय माझ्या दोन्ही कानांचे रक्षण करोत. ॥४॥
ललाटं पातु हंसात्मा शिरः पातु जटाधरः । कर्मेन्द्रियाणि पात्वीशः पातु ज्ञानेन्द्रियाण्यजः ॥५॥
(विषयात चित्त गुंतलेले असते व चित्तात विषय भरलेले असतात. मग विषयातून चित्त व चित्तातून विषय कसे काढावे असा प्रश्न ब्रह्मदेवाला पुढे करून सनत्कुमारादी चौघा सिद्धांनी विचारला असता; माझ्या निरंतर चिंतनाने जीव मत्स्वरूप झाल्यावर चित्तातून विषय व विषयातून चित्त बाजूला होईल असे ब्रह्मदेवालासुद्धा न सुचणारे उत्तर हंसावतारात श्रीदत्तात्रेयांनी देऊन सनत्कुमारादी सिद्धांना समाधान दिले ते) हंसरूप श्रीदत्तात्रेय माझ्या ललाटाचे रक्षण करोत. जटा धारण करणारे श्रीदत्तात्रेय माझ्या मस्तकावर जटा नसल्या तरी आपल्या जटाधारित्वाच्या योगाने माझ्या मस्तकाचे रक्षण करोत. सर्वांचे ईश म्हणजे स्वामी असणारे श्रीदत्तात्रेय वाणी, जननेन्द्रिय, गुद, हात व पाय अशा पाच कर्मेंन्द्रियांचे रक्षण करोत. अज म्हणजे जन्मरहित असणारे अर्थात जन्मानंतरचेही विकार नसणारे श्रीदत्तात्रेय, डोळे, नाक, कान, जीभ व त्वगिंद्रिय (स्पर्श जाणणारे इंद्रिय) अशा पाच ज्ञानेंद्रियांचे रक्षण करोत. ॥५॥
सर्वान्तरोन्तःकरणं प्राणान्मे पातु योगिराट् । उपरिष्टादधस्ताच्च पृष्ठतः पार्श्वतोऽग्रतः ॥६।
सर्वांच्या आत राहणारे म्हणजेच सर्वान्तर, ज्यांच्याव्यतिरिक्त आत दुसरा कोणी नाही असे सर्वान्तर श्रीदत्तात्रेय माझ्या अंतःकरणाचे रक्षण करोत. सर्व योग्यांचा राजा श्रीदत्तात्रेय माझ्या प्राणापानादी दशवायूंचे रक्षण करोत. वरती, खाली, पाठीमागे, डाव्या-उजव्या दोन्ही बाजूला तसेच पुढच्या बाजूला श्रीदत्तात्रेय माझे रक्षण करोत. ॥६॥
अन्तर्बहिश्च मां नित्यं नानारूपधरोऽवतु । वर्जितं कवचेनाव्यात्स्थानं मे दिव्यदर्शनः ॥७॥
नानारूप धारण करणारे श्रीदत्तात्रेय आत बाहेर म्हणजे घराच्या किंवा शरीराच्या आत व बाहेर माझे रक्षण करोत. ज्या स्थानाला कवच लागले नाहे त्या स्थानांचेही दिव्यदृष्टि असणारे श्रीदत्तात्रेय रक्षण करोत. ॥७॥
राजतः शत्रुतो हिंस्त्राद् दुष्प्रयोगादितोघतः । अधि-व्याधि-भयार्तिभ्यो दत्तात्रेयः सदावतु ॥८॥
राजापासून, शत्रूपासून, हिंसा करणे ज्यांचा स्वभाव आहे अशा सिंहव्याघ्रादिकांपासून, जारणमारणादी दृष्ट प्रयोगापासून, अघ म्हणजे पाप त्यापासून, आधि म्हणजे मानसीव्यथा तिच्यापासून, व्याधी म्हणजे शरीरव्यथा तिच्यापासून, भय म्हणजे इतर जी भये त्यापासून व आर्ति म्हणजे पीडा तिच्यापासून श्रीदत्तात्रेय गुरु सर्वदा माझे रक्षण करोत. ॥८॥
धन-धान्य-गृह-क्षेत्र-स्त्री-पुत्र-पशु-किङकरान् । ज्ञातींश्च पातु नित्यं मेऽनसूयानंदवर्धनः ॥९॥
माझ्या वित्ताचे, धान्याचे, घराचे, शेतीचे, स्त्रीचे, मुलांचे, पशूंचे, सेवकांचे व इतर सर्व कुटुंबाचे अनसूयेच्या आनंदाला वाढविणारे श्रीदत्तात्रेय रक्षण करोत. ॥९॥
बोलोन्मत्तपिशाचाभो द्युनिट्संधिषु पातु मां । भूतभौतिकमृत्युभ्यो हरिः पातु दिगंबरः ॥१०॥
केव्हा केव्हा लहान मुलासारखे वागणारे, केव्हा केव्हा उन्मत्त म्हणजे वेड्यासारखे वागणारे, केव्हा केव्हा पिशाच्चा सारखे दिसणारे दिगंबर व हरिरूप असे श्रीदत्तात्रेय दिवसा, रात्री व दिवसरात्रीच्या संधीत म्हणजे दिवसरात्रीच्या मधल्या वेळेत पंचमहाभूत व पंचमहाभूतांपासून झालेल्या पदार्थांपासून आणि मृत्युपासून माझे रक्षण करोत. ॥१०॥ (आत्मा अमर आहे पण त्याने देहादिकांशी संगती केली म्हणून त्यांचे मरण मला आहे असे मनुष्य समजतो. अर्थात देहादिक मी नाही किंबहुना त्याहून मी अत्यंत वेगळा आहे असे साक्षात्काराने जाणले म्हणजे मनुष्य मृत्यु पासुन सुटतो. श्रीदत्तमहाराज माझे मृत्यु पासुन रक्षण करोत म्हणजे मला आत्मज्ञान देऊन माझ्यावर आरोपित केलेल्या देहादिकांच्या मरणापासून माझे रक्षण करोत, असा अर्थ येथे घ्यायचा आहे. पहिल्या श्लोकापासून रक्षण करोत, रक्षण करोत अशीच प्रार्थना ह्या कवचात केलेली आहे. कवच अंगात घातले म्हणजे ज्याप्रमाणे लढाईत शत्रूच्या बाणादिकांची काही पीडा न होता आपले शरीर सुरक्षित राहते; त्याचप्रमाणे हात, पाय इ. आपले अवयव वाईट, चुकीच्या कार्याकडे न वळता भजन, तीर्थयात्रादी उत्तम कार्याकडे वळणे ह्यालाच त्यांचे रक्षण करणे असे म्हटले जाते. अर्थात माझ्या इंद्रियांकडून अधःपात होणाऱ्या कोणत्याही क्रिया न होता उत्तम गतीला पोहोचविणाऱ्याच क्रिया होवोत असे मागणे ह्या कवचात देवापाशी मागितले आहे. या कवचाचा पाठ करताना हे तत्त्व लक्षात घेऊन पाठ केल्यास ऐहिक व पारमार्थिक असे दोन्ही प्रकारचे कल्याण कवच जापकाचे म्हणजे जप करणाऱ्याचे श्रीदत्तमहाराज करणार आहेत ह्यात शंका नाही. श्रीदत्तात्रेय हे सर्व देवांचे देव, ब्रह्मस्वरूप असल्याने त्यांना अशक्य काहीच नाही. मनात श्रीदत्तमहाराजांची मूर्ती आठवून हे मागणे करावे म्हणजे पुढील दोन श्लोकात सांगितलेले फळ कवच पाठकाला निश्चयाने मिळेल.)
य एतद्दत्तकवचं संनह्याद्‍भक्तिभावितः । सर्वानर्थविनिर्मुक्तो ग्रहपीडाविवर्जितः ॥११॥
भूतप्रेतपिशाचाद्यैर्देवैरप्यपराजितः । भुक्त्वात्र दिव्यभोगान् स देहांते तत्पदं व्रजेत् ॥१२॥


हे श्रीदत्तकवच जो कोणी भक्तीने युक्त होऊन आपल्या अंगावर चढवील (येथे जो कोणी असे 'यः' या पदाने म्हटले आहे. येथे जाती पातीचा प्रश्न येत नाही. ज्याला कल्याणाची इच्छा असेल तो कोणीही या कवचजपाचा अधिकारी आहे असे स्वामीमहाराज म्हणतात.) म्हणजे जो कोणी ह्या कवचाचा जप करील वा पाठ करील तो सर्व अनर्थातून मुक्त होईल. शनीमंगळादिकांपासून होणाऱ्या ग्रहांच्या पीडेपासून मुक्त होईल. भूत, प्रेत व पिशाच्च यांचे कवचधारकापुढे काही चालणार नाही. देव सुद्धा त्याला पराजित करू शकणार नाहीत अर्थात देवांचेही त्याच्यापुढे काही चालणार नाही. इतकेच नव्हे तर या लोकात, स्वर्गात असणाऱ्या सुखांप्रमाणे त्याला सर्व सुखे प्राप्त होतील. दुःख तर मुळीच होणार नाही व या लोकातील आयुमर्यादा संपल्यावर म्हणजेच देहान्ती, कवच जापक श्रीदत्तस्वरूपाला प्राप्त होईल. याहून जास्त काय मागावे व याहून जास्त मागणे तरी काय असणार?
श्रीदत्तकवच सार्थ संपूर्ण

Tuesday, 4 October 2016


🌼🌼🌼बोध कथादुःख तुम्हांला माणूस बनवते...अपयश तुम्हांला विनम्रता शिकवते.🌼🌼🌼

आर्थर अँश हा इटली मधील अतिशय नावाजलेला टेनिसपटू होता.१९८३ मध्ये त्याच्या हदयावर शस्ञक्रिया करावी लागली.त्यावेळी त्याच्या शरीरात दूषित रक्त चढवल्यामुळे त्याला कैन्सरची लागण झाली. त्यानंतर त्याच्या चाहत्यांकडून त्याला अनेक पञे येत राहिली. त्यातील एका पञात म्हटले होते... इतक्या वाईट आजारासाठी देवाने तुलाच का निवडले ? या पञाला उत्तर देताना आर्थर म्हणतो...५ कोटी मुले टेनिस खेळू लागली, ५० लाख मुले टेनिस खेळायला शिकली, त्यातील ५ लाख मुले व्यावसायिक टेनिस खेळाडू बनली, त्यातील ५० हजार मुले टेनिस सर्किटमध्ये दाखल झाली, त्यातून ५ हजार मुले ग्रॅडस्लँम स्पर्धेसाठी निवडली गेली.
त्यातील फक्त ५० टेनिसपटू विम्बलडनसाठी निवडले गेले, त्यातील चौघे उपांत्य फेरीत आणि दोघे अंतिम फेरीत पोचले.
त्या दोन जणांपैकी मी जेव्हा विम्ब्लडनसाठी विजेतेपदाचा करंडक उंचावला तेव्हा मी देवाला कधीही विचारले नाही की, माझीच निवड का केलीस ? मग आत्ताच वेदना होत असताना माझीच निवड का केली, असे मी देवाला कसे विचारु ?
सराव तुम्हाला बळकट बनवतो.. दुःख तुम्हांला माणूस बनवते...अपयश तुम्हांला विनम्रता शिकवते, यश तुमच्या व्यक्तीमत्वाला चमक देते, परंतु फक्त विश्वासच तुम्हांला पुढे चालण्याची प्रेरणा देत असते.
-----यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलतात..

|| श्री राम जय राम जय जय राम ||

|| जय हनुमान||

Sunday, 2 October 2016

🌼🌼🌼अतिशय सुरेख आणि सूज्ञ पालकांसाठी डोळे उघडणारा झणझणीत लेख:

'मार्क'म्हणजेच गुणवत्ता नाही!

🌼🌼🌼

डॉ. अरुण नाईक,
(मानसोपचारतज्ञ) -

नुकतीच एक बातमी वाचली....
नेहमी चांगले मार्क मिळवणाऱ्या मुलीला दहावीचा पहिला पेपर चांगला नाही गेला. संध्याकाळी तिने आत्महत्या केली. अजून परीक्षाही संपली नाही. पण मुलगी संपली.
मागे एका मेडिकलच्या विद्यार्थ्यांने शेवटच्या वर्षांला गोल्ड मेडल ऐवजी सिल्वर मेडल मिळाले, म्हणून आत्महत्या केली होती. माणूस मरायला घाबरत नाही, पण किंमतशून्य जगायला घाबरतो.
एका नामांकित शाळेच्या स्कॉलर वर्गातील मुलांशी बोलताना मी त्यांना विचारले की, "सर्वजण त्यांना काय म्हणतात?"
मुले म्हणाली, की 'स्कॉलर'.
मी विचारले 'का?',
मुले म्हणाली, "कारण आम्हाला चांगले मार्क मिळतात."
मी समीकरण मांडले.
'अ = ब'

'ब = क'
त्याअर्थी 'अ = क'.
म्हणजेच,
'मी = स्कॉलर'

'स्कॉलर = मार्क'.
याचा
अर्थ 'मी = मार्क'.
जेव्हा आपण आपली किंमत मार्कावरून करायला लागतो, तेव्हा जरा मार्क कमी मिळाले की, आपली किंमत कमी झाली असे वाटते.
सर्व परीक्षा बोर्डानी मार्क वाटायला सुरुवात केल्यापासून तर हे समीकरण पालक व मुले यांच्या डोक्यात गच्च बसायला लागले आहे.
हे धोकादायक आहे....
माझी भाची शाळेतही जात नसताना तिने काढलेल्या एका चित्राला मी 'वा' म्हटले. ती लगेच म्हणाली-मार्क दे.
मी चित्राच्या बाजूला लिहिले 'छान'.
ती म्हणाली मार्क दे. शंभरपैकी.
अडूनच बसली.
शाळेत जायच्या आधीपासूनच हे डोक्यात शिरत आहे. हे आजूबाजूच्या वातावरणात आहे. या विषारी वातावरणाने वरील बळी घेतले आहेत.
जेव्हा कधी पालकांना विचारले की, तुमच्या मुलांबाबत काय व्हावे असे तुम्हाला वाटते? तेव्हा
हमखास उत्तर येते की, तो चांगला नागरिक बनावा, चांगला माणूस बनावा.
जरा विरोधाभास पाहूया...
मेडिकलच्या विद्यार्थ्यांशी बोलताना त्यांनी सांगितले की त्यांना चांगला डॉक्टर बनायचे आहे.
मी विचारले चांगला डॉक्टर कोणाला म्हणता?
तर मुले म्हणाली की, जो जास्तीत जास्त लोकांना चांगल्यात चांगला उपचार देऊन बरा करतो तो.
सिल्वर मेडल मिळालेल्या त्या मेडिकलच्या विद्यार्थ्यांलाही चांगला डॉक्टर बनायचे असेल ना?
पण बनला का?
त्याच्या आधीच गेला.
चांगला नागरिक,
चांगला माणूस,
चांगला डॉक्टर,
चांगला व्यावसायिक...
आपण जेव्हा काहीतरी चांगले "करतो" तेव्हा बनतो. नुसत्या मार्कानी नाही बनत.
एका नववीतील मुलीला चाचणी परीक्षेत गणितात वीसापैकी १४ मार्क मिळाले म्हणून तिने आत्महत्येचा प्रयत्न केला.
माझ्याशी बोलताना तिचे पहिले वाक्य होते की, 'आय एम युझलेस'.
या मुलीला दहावीनंतर क्रीडा पत्रकार बनायचे आहे. त्यासाठी ती कलाशाखेला जाणार आहे.
मी विचारले की आर्ट्सला गणित असते का?
ती म्हणाली 'नाही'.
मी म्हटले की याचा अर्थ तू दहावी नंतर गणिताला टाटा करणार,मग तू गणितासाठी जीव का देत होतीस?
हे ऐकल्यावर तिलाही हसू आले.
काय आहे की 'गुणी मुलगी',
'भावंडात हुशार मुलगी',
'सर्वाची आवडती',
'९०% मिळायला हवेत हं'. या इतरांच्या
मनातील प्रतिमेला जपण्याचे तिला दडपण आले होते.
ही प्रतिमा आपण जपू शकलो नाही तर आपण युझलेस....!
मुलांमध्ये खूप क्षमता असते, परंतु मार्कावर लक्ष केंद्रित केल्यामुळे त्या क्षमतांना 'किंमत' दिली जात नाही.
आज जग जवळ आले आहे. अनेक शक्यता निर्माण झाल्या आहेत.
पालकांनी लक्षात घ्या की, हे "आपल्या" लक्षात न आल्यामुळे जेव्हा मुलांना कमी मार्क मिळतात तेव्हा "आपण" नकळत हिंसक होतो. मुलांच्या आत्मविश्वासावर घाला घालतो.
मार्कावरून मुलांची किंमत किंवा लायकी ठरवू नका. आपण जन्माला आलो ही एकच गोष्ट आपण जगायला लायक आहोत यासाठी पुरेशी आहे. आता जगताना काय करायचे याचा विचार करूया.
'थ्री इडियट' सिनेमातील मुलाखतीच्या प्रसंगात आजवर मार्कावरून आपली किंमत ठरवणारा,घाबरणारा मुलगा म्हणतो...
'जिंदगी में कुछ तो ठीकठाक कर ही लूंगा'..
हा आत्मविश्वास मुलांना द्या !




🌼🌼🌼 तुमचं आनंदी राहणंच तुमच्या शत्रुकरिता सर्वात मोठी शिक्षा आहे.एक साधा विचारसुध्दा तुमचं आयुष्य उजळवू शकतो म्हणून नेहमी नवे विचार मिळवत रहा. 🌼🌼🌼


Saturday, 1 October 2016

🌼🌼🌼*नवरात्र म्हणजे काय ?* *त्याला शारदिय नवरात्रका म्हणतात ?*🌼🌼🌼

अश्विन शुध्द प्रतिपदेपासून शरद हृतुचे आगमन होते.प्रतिपदेपासून नवमीपर्यंत साज-या होणा-या देवीच्या या उत्सवासशारदीय नवरात्र म्हणतात. ९ दिवस उत्सवचालतो म्हणून नवरात्र.१०व्या दिवशी उत्सवाची समाप्ती होते.नवरात्र हा वार्षिक महोत्सव असूनघरोघरी साजरा होणे आवश्यक आहे. आपण दररोज पूजा करीत असलेल्या कुलदेवतेतील देवत्वअधिकाधिक प्रभावी व्हावे, तिचे आपल्या घरावर वकुटुंबियांवर कृपाछत्र असावे आणि अदृष्यशक्तीपासून तिचे आपल्या कुटुंबाला संरक्षणमिळावे या हेतूने शास्त्रात नवरात्र व्रत सांगितलेलेआहे. नवरात्र व्रत जितके आवडीने, भक्तीने, हौसेने व मनःपूर्वक केले जाते, तितक्या अधिक प्रमाणातत्या घरात एकोपा, शांती, सुख व समाधान नांदते.
*नवरात्र हा कुळधर्म कोणी सांभाळावा ?*
*त्यासाठी काय काय करावे ?*
नवरात्र महोत्सव हा देवीचा म्हणजेशक्तीउपासनेचा असल्याने अत्यंत महत्त्वाचा कुळधर्म आहे. तो सगळ्यांकडेपाळला जाणे गरजेचे आहे. आपण कुटूंबातून विभक्तझालोत, आपले देव वेगळे केलेत, आपण आपले अन्न स्वतंत्रशिजवितो अशा सर्वांनी हा कुळधर्म पाळावा.आमच्या मोठ्या भावाकडे कुळधर्म आहे असे सोपवूनरिकामे राहू नये. स्वयंपाक, मिळकत सगळे वेगळे असताना कुळधर्म कशाला दुसरीकडे सोपवायचा ?
ज्या घरात स्वयंपाक व उपजिविकेचे साधन स्वतंत्र,त्या घरात कुळधर्म ही स्वतंत्र असायला हवेत.आपली आपली कुलदेवते आपण सांभाळली पाहिजेत.शिवाय कुळधर्माच्या संस्काराने घरातीलमुलांच्या मनात चांगली स्मृती तयार होते. हा संस्कार सांभाळलाच पाहिजे.कुलदेवतेची प्राणप्रतिष्ठा ती देवता स्थापनकरण्याच्या वेळी केलेली असते. ती पुढे दरबारा वर्षांनी करावी. म्हणून तिला प्रत्येकनवरात्रात स्वतंत्र प्राणप्रतिष्ठेची गरज नसते.तिच्यातील चैतन्य कायम टिकविण्यासाठी आपल्या परंपरेने कुलाचाराचेमार्ग सांगितलेले आहेत.
*नवरात्रात देवीचे घट,चंपाषष्ठीचे नवरात्र यामार्गे सेवा करीतराहिल्यास ते कर्म कुलदैवतेपर्यंत पोहोचते.*
कुलदेवतेची स्थापना केल्यानंतर काही काळसेवा खंडीत झाल्यास संरक्षण कवच लगेचच संपत नाही. पण क्षीण होत जाते. त्यामुळे शक्यतो खंडकरूच नये. चांगल्या शक्तीचा अनुभव यावा असे वाटतअसेल तर परंपरेने चालत आलेले उत्सव साजरे करणे गरजेचेआहे.
~~~~~~s~~~~~~~
*卐वेदिका :*
वेदिका म्हणजे शेत. शेतीतील काळी माती आणूनएका पत्रावळीवर बोटाचे उभे पेर उंचीचा व वीतभरलांबरूंदीचा सपाट ढीग करून एक मूठभर धान्य त्यातपेरावे. हे धान्य हळदिच्या पाण्यात रंगवून घ्यावे. यामध्ये सप्त धान्य येतात. ( तांदूळ, गहू, मसूर, हरभरा,तीळ, उडीद, मूग)पत्रावळीवर आपण जे शेत तयार केलेत्यामः”"वेदिकायैनमः” म्हणून गंधफूल वाहूनपूजा करावी. ” सप्तधान्येभ्योनमः” असे म्हणूनत्या शेतात तांदूळ, गहू, मसूर, हरभरा, तीळ, उडीद, मूग ही धान्ये पेरावीमः”" पर्जन्यायनमः” म्हणूनत्यावर पाणी शिंपडावे. नंतर त्यावर वरूणदेवतेची स्थापना करावी. काही जण वरूण ( कलश )मातीचा किंवा तांब्याचा ठेवतात. त्यावरकाहीजण नारळ ठेवतात. तर काही जण ताम्हण ठेवूनउपास्य देवतेची स्थापना करतात. नंतर दिपाची प्राणप्रतिष्ठा करावी लागते. कारणशक्तीचे स्वरूप हे तेजोमय आहे.त्यासाठी जडधातूची समई किंवा नंदादीपवापरावा.भोदीप देवी रुपस्त्वं कर्मसाक्ष ह्यविघ्नकृत |यावन्नवरात्रसामप्ति: स्थात्तावत्वं सुस्थिरोभव || अशी प्रार्थना करून दीप लावावा. यासाठी दोनसमयांची योजना करावी. त्यामुळेएखादी जरी शांत झाली तरी दुसरी चालू रहाते.विड्याच्या पानावर कुंकूवाने अष्टदल ( * )किंवा स्वस्तिक काढून त्यावर देवीचा टाकठेवावा. पानाचे देठ देवाकडे ठेवावे. नवरात्रात इतर देवतांची षोडशोपचार पूजा करावी. टाक जागेवरूनन हलविता फुलाने पाणी शिंपडावे व उपचार करावेत.सकाळ संध्यकाळ आरती करावी. देवीची स्तोत्रे,आरती, जोगवा म्हणावेत. ललिता सहस्त्रनाम,सौंदर्य लहरी, देवी अथर्वशिर्ष इत्यादी जे शक्यहोईल त्याचे पठण करावे. उत्सवाच्या वातावरणामुळे मनात चांगल्या भावना येतात. आनंदी वातावरणनिर्माण होते व देवीचे सतत स्तवन केल्यानेस्फूर्ती निर्माण होते.ललिता सहस्त्रनाम :हे वेदातील सत्याला उजागर करते. ह्या परादेवतेचेसगुण वर्णन करते आणि पुजेचे मार्ग दाखविते व तिच्या कृपा प्रसादाची पद्धती स्पष्ट करते.ललिता सहस्त्रनामाच्या पठणाने तिच्या सर्वभक्तांच्या इच्छा पुरविल्या जातात. तिचे नाम हेकल्पवृक्षाप्रमाणे आहे. पुरुषांनी पठणकरताना त्यातील ॐकाराचा उच्चार करावा.स्त्रीयांनी ॐकाराचा उच्चार न करता पठण करावे.
*卐दुर्गा-सप्तशती*
:दुर्गासप्तशती मध्ये अनेक स्तुतीपर श्लोक आहेत की,ज्याद्वारे भगवतीला आठविले जाते. विश्वाचेकल्याण करणारी कल्याणरूपिणी, भौतिकसुखाचा वर्षाव करणारी नारायणी, मोक्षप्राप्ती करून देणारी निर्वाण सुखदायिनी,ज्ञानामृत पाजणारी त्रिनेत्री अशा अनेकनावांनी देवीची स्तुती त्यात आहे. देवीची सततस्तुती केल्याने प्रज्ञाजागृत होते.सौंदर्य-लहरी :हे शक्तीस्वरूप ज्ञानावर रचलेले आहे. सौंदर्य-लहरीचे श्लोक पापापासून मुक्त आहेत. भक्तीयुक्तअंतःकरणाने लोक ते म्हणू शकतात.देवीच्या उपासनेसाठी या श्लोकांचे पठण करणेहा अतिशय आनंददायक अवर्णनीय अनुभव आहे. म्हणूनअसे श्लोक रोज घरी मोठ्याने म्हणले पाहिजेत,किंवा सर्वांनी एकत्र बसून म्हणले पाहिजेत. सर्वांच्या कल्याणाची इच्छा केली पाहिजे.पूर्वी प्रत्येक घरात, देवालयात पहाटे असे श्लोकम्हणले जायचे. तसेचदुपारी आणि संध्याकाळी ही म्हणले जात.
~~~~~~~s~~~~~~
*卐३} नवरात्राच्या उपवासाचे महत्त्व काय ?*
उपवास ह्याचा अर्थः ‘ उप ‘ म्हणजे जवळ, ‘ वास ‘म्हणजे रहाणे. भगवंताच्या जवळ रहाणे, त्याची सततआठवण करणे. त्यासाठी सात्त्विक शुद्ध अन्न घेणेगरजेचे आहे. नवरात्रात नऊ दिवस उपवास करण्याची प्रथा आहे. घरातील मुख्य व्यक्ती तेउपवास करते. त्या व्यक्तीच्या हयातीनंतरघराची सूत्रे ज्याव्यक्तीकडे येतात, तिने ते उपवासकरावेत म्हणजेच त्या कुटूंबातीलकुळांनी ती प्रथा पुढे चालू ठेवली पाहीजे.शक्ती देवतेची उपासना करताना मन व शरीर शुद्ध रहावे, परमेश्वराचे सानिध्य लाभावे, त्याची सततआठवण रहावी हा उद्देश आहे. ह्यामागेएकट्या दुकट्याचा विचार नसून संपूर्ण कुलपरंपरेचा विचार केलेला आहे. उपवास आहे म्हणून,खिचडी, बटाटा वगैरे जड पदार्थ खाल्ले जातात.त्यामुळे शरीराला जडत्व येते. शरीर लवकर थकते. पोटात गेल्याबरोबर निद्रा येते. मग उपवास,आराधना होत नाही. म्हणून हलके, भाजके अन्न, दुध वफलाहार घ्यायचा. शिवाय जड पदार्थ खाल्यानेपोटात आम वाढतो, त्याचा निचरा होत नाही,तोपर्यंत जांभया, आळस येत राहतो. बर्याचबायका नवरात्रात तांबूल सेवन करतात. पण तांबूल रजोगुणी आहे. सत्त्वगुणी नाही. देवीला तो प्रियआहे म्हणून तो नैवेद्यात समाविष्ट असावा, पणत्याचे सेवन करू नये.शरद ऋतुत पावसाळा संपल्याने नद्यांना गढूळपाणी आलेले असते. निसर्गात अनेक जिव निर्माणहोतात. काही मानवाला अहितकारक असतात. असे पाणी पोटात जाते व जड अन्नाचे सेवन यामुळेअनेक रोग शरीरात ठाण मांडून बसतात. आपलेव्रताच्या दृष्टीने होणारे सात्त्विक आहाराचे सेवनरोगांचे उच्चाटन करते. म्हणूनदेवाला प्रार्थना केली जाते. ‘ जीवेत शरदः शतम | ‘म्हणजे आपण शंभर शरद ऋतू पहावे ही प्रार्थना केलेली असते.
*卐४} व्रताचे नियम काय आहेत ?*
जे नवरात्र व्रत आचरतात त्यांनी नऊ दिवस केशकर्तनकरू नये. गादीवर झोपू नये. दुसर्याच्या घरी अंथरूणावरझोपू नये अथवा बसूही नये. पायात चप्पल घालू नये.पण आजकाल हे शक्य होत नाही. मनशांत ठेवावे. परान्न घेवू नये. उगाच चिडचिड करू नये. व्रतकरतानाच ते समजावून घेवून करावे. आपणआपल्या कुलाच्या कल्याणासाठी हे करतो आहे हेलक्षात घ्यावे. स्वत:ला काय झेपणार आहे हे पहावेम्हणजे थोडक्यात स्वतःच्य शक्तीचे परीक्षण करावेआणि मगच व्रत करावे. जर व्रत करणे गरजेचे आहे आणि स्वतःची शक्ती कमी पडतेय असे आहे तरपरमेश्वराला साक्षी ठेवून जेवढे आचरणे शक्य आहे तेवढेप्रामाणिकपणे करावे, त्याला सततप्रार्थना करावी, ‘ हे देवा, हे माझ्याकडून करवून घे ‘व्रताचा अर्थ समजावून घेवून व्रत आचरल्यासआपल्याकडून ते पूर्ण होते, यात शंका नाही. ” हे देवी, माझ्या बुद्धीच्या ठिकाणी तुझा वासराहू दे. ” अशी देवीला प्रार्थना करावी.व्रताची आठवण ठेवली की देवीची आठवणआपोआपच होते.नवरात्रात जर सूतक आले किंवा सोहेर आले तरज्या दिवशी ते संपेल त्याच्या दुसर्या दिवसापासून नवमीपर्यंत जेवढे दिवस मिळतील तेवढे दिवसनवरात्रोत्सव करावा. नवरात्र बसल्यानंतर अशौचआले तर त्याला कोरडा म्हणजे साखर, पेढे असा नेवेद्यदुस-या कडून दाखवून घेवून त्याचे लगेचच उत्थापनकरावे. अन्नप्रसादाचा नेवेद्य दाखवु नये.कुमारीपूजा : नवरात्रात कुमारीपूजा हा महत्त्वाचा विधी आहे.जमल्यास दररोज एक प्रमाणे नऊ दिवसकुमारीकांची पूजा असते. न जमल्यास एक दिवसतरी कुमारीका पूजन करावे. दोन तेदहा वर्षापर्यंतच्या मुलीला ‘ कुमारीका ‘म्हणतात. दहावर्षानंतर रजोगुण प्रवेश करण्यास सुरूवात करतो, म्हणून दहाव्या वर्षानंतरकुमारीका नाही.
दोन वर्षाची ‘ कुमारी ‘, तीनवर्षाची ‘ त्रिमूर्ती ‘,
चार वर्षाची ‘ कल्याणी ‘,
पाच वर्षाची ‘ रोहिणी ‘,
सहा वर्षांची ‘कालिका ‘,
सात वर्षांची ‘ चंडिका ‘, आठवर्षांची ‘ शांभवी ‘,
नऊ वर्षांची ‘ दुर्गा ‘,
व दहा वर्षांची ‘ सुभद्रा ‘
अशी वयानुसारतिला विविध नावे आहेत. मस्तकावर अक्षता टाकूनत्या वयाचे नाव घेवून तिला आवाहन करावे वतिची पूजा करावी.
~~~~~~~s~~~~~
*卐दुर्गा-सप्तशती:*
नवरात्रात दररोज विशिष्ठ संख्येने सप्तशतीचे पाठकरावेत. हे पाठ पूजकानेस्वतः किंवा उपाध्यायांकडून करवून घ्यावेत.यामध्ये सुद्धा देवीची भरपूर स्तुती केली आहे. ‘ हे भगवती, तू इतकी दयाळू आहेसकी तुझ्या नुसत्या स्मरणाने भक्ताचे भय नाहिसेहोते. भक्ताने नुसते स्मरण केले तरी तू विद्येचे दानदेतेस, तू दारिद्र्य आणि दु:ख दूर करतेस ‘इत्यादी स्तुतीपर प्रार्थना आहे. हे पाठ कुळाचेकल्याणच करतात. मालाबंधन :नवरात्रात देवीचे रोज मालाबंधन करावे.पहिल्या दिवशी विड्याच्या पानाची माळबांधावी व नंतर प्रत्येक दिवशी तिच्या रूपाप्रमाणेमालाबंधन करावे. महकाली, महालक्ष्मी,महासरस्वती व शेवटी ‘विजया’ ही तिची रूपे आहेत. दुस-या व तिस-या दिवशी रक्तवर्ण पुष्पे नंतर तीनदिवस झेंडू, सोनचाफा, शेवंती,तुळशीच्या मंजिर्या व नंतर पांढरी सुवासिक फुलेह्यांची माळ करावी.
*दीपप्रज्वलन :*
म्हणजे तेजाची पूजा. भगवंताच्या तेजाच्या पूजेने आपल्या हृद्यातील तो तेजोमय भाव जागृतव्हावा आणि तेजानेतेजाची पूजा करावी अशी कल्पना आहे.यासाठी दोन जड समया ठेवाव्यात व नऊ दिवसअखंड दीप चालू ठेवावा. तेल संपल्यामुळेकिंवा काजळी झटकताना जर दिवा शांत झाला तर विचार करण्याचे कारण नाही.दिवा पुन्हा लावावा, पण सगळे व्यवस्थितअसताना दिवा शांत झाला तर कुलदेवतेचा जपकरावा, तिची प्रार्थना करावी,क्षमा याचना करावी.
*फुलोरा :*
नवरात्रात देवीला फुलोरा करण्याची पद्धत आहे.यात करंज्या आणि कडक पुर्या, साटोर्या करतात.हा फुलोरा कुटूंबातील प्रथेप्रमाणे तॄतीया, पंचमी,सप्तमी, अष्टमी या दिवशी करावा. देवघरातमंडपी ठेवून हा फुलोरा बांधला जातो.पूजा करताना आपण ‘ यथादेहे तथा देवे ‘ हा भाव ठेवून पूजा करतो. त्यामुळे आपण तरी आपल्या घराला असेखरकटे बांधून ठेवू का? ते खरकटे पदार्थ बांधूनठेवण्याची पद्धत चूकीची आहे. त्यापेक्षा डब्यातठेवून त्याचा नेवेद्य दाखवावा.
*नेवेद्यदाखवितो म्हणजे काय करतो ?*
समर्पण भावनेनेअर्पण करतो. देव नेवेद्य द्विकरतो म्हणजे काय तर अर्पण करणार्याचा भाव पाहून वास घेतो.
~~~~~s~~~~~~~~~
*卐होम :*
नवरात्रात अष्टमीला होम करण्याची प्रथा आहे.ब-याच ठिकाणी अजबली देतात. ‘अज’ म्हणजेबोकड. खाणे आणि हिंडणे या खेरीजबोकडाचा काय उपयोग? रस्त्यावरून चालला तरी लांबूनच त्याची दुर्गंधी येते.याची जातच कडू असते. याचे मांस भक्षण केल्यानेबुद्धिला मांद्य येते. शिवाय तो रस्त्यावरील कुठेकचरा खातो, त्यापासूनचत्याचा रक्ताची निर्मिती होते. असे मांसखाल्याने अनेक रोगांना अनेक रोगांना निमंत्रण मिळते. म्हणूनच पूर्वीच्या ऋषिमुनींनी द्रष्टेपणानेहोमात अजबली देण्याची प्रथा सुरू केली.याच्या रक्ताने कनिष्ठ देवता प्रसन्न होतात.नवरात्रात दुष्ट शक्तीचा नाश करण्यासाठीचआपण या देवी ( शक्ती ) स्वरूपाची पूजा करतो.
महाराष्ट्रात देवीची साडेतीन पिठे आहेत. त्यापैकी कोल्हापूरची ” महालक्ष्मी”,तुळजापूरची “भवानी”, व वणीची “सप्तश्रुंगी”ही पूर्ण पिठे व माहुरची “रेणुका” हे अर्धपीठ आहे.कारण माहुरला फक्त तांदळा आहे. फक्त मुखपूजन आहे.तांदळा हे पार्वतीचे रूप आहे. तिथे शिवाचा लोपआहे. इतर पिठामध्ये प्रत्येक मूर्तीच्या डोक्यावर शिवलिंग आहे. म्हणजे शिवशक्ती दोन्हीही आहे.देवीच्या-सेवा :श्रीसुक्तांची आवर्तने उपाध्यायांकडून करवूनघ्यावीत.
*कुंकूमार्चन :*
देवीला कुंकू हे अतिशय प्रिय आहे. कुंकू हे हळदीपासून बनविले जाते. हळद ही सुवर्णाची गुणधर्म धारण करते.ती रजोगुणी आहे. तीला ते प्रिय आहे. स्त्रीचे रूपचअग्निस्वरूप आहे. त्यामुळे लाल रंग तिला प्रिय आहे.म्हणून कुंकूमार्चन सेवेने ती प्रसन्न होते.कुठल्याही देवतेच्या मुर्तीला कुंकूमार्चन करावे,त्यामुळे शक्तीदायिनी देवता प्रसन्न होतात व आपणास सामर्थ्य प्राप्त होते, सौभाग्य देते, ऍश्वर्यदेते. कुंकूमार्चन श्रीयंत्रावर करतात.
*卐तांबूल प्रदान :*
देवीला विडा हा आत्यंतिक प्रिय आहे.विडा हा ही रजोगुणी आहे.त्रयोदशगुणी विडा तिला आत्यंतिक प्रिय आहे.जगाच्या कल्याणासाठी तिला सत्त्वगुणापेक्षाही रजोगुणाची आवश्यकता असते. म्हणूनतिला रजोगुणी पदार्थ सेवन करण्याची आवड आहे.विडा, खीर, पुरी, तळलेले पदार्थ तिला प्रिय आहेत.नवरात्रामध्ये दुष्ट शक्तीच्या संहारासाठी ब्रह्मा,विष्णु आणि महेशया तिघांच्या ठिकाणी असलेली मुळ शक्ती एकत्र येवून, ही आदिशक्ती, आदिमाया, जगदंबा निर्माणझाली. ही आदिशक्ती अत्यंत प्रभावी आहे.
नवरात्राच्या पहिल्या दिवशी दौहित्री पाडवाअसतो. त्या दिवशी मातामह श्राद्ध असते. ज्यांचेवडील जिवंत आहेत पण आजोबा जिवंत नाहीत( आईचे वडील ) आणि आजोबांना जावून एक वर्ष झाले असेल अशा तीनवर्षापेक्षा मोठ्या असलेल्या नातवास( आईच्या मृत वडीलांस ) आजोबास तर्पण करता येते.व्यवस्थित श्राद्धाचा स्वयंपाक करून ब्राह्मणभोजन करवून श्राद्ध विधीही करता येतो. मात्रवडील गेल्यावर दौहित्र करता येत नाही. नवरात्रात एखाद्या व्यक्तिचे निधन झाल्यासपुढिल वर्षी नवरात्र करायचेनाही असा चुकीचा समज आहे. प्रथमवर्षाची निषिद्धे जरूर पाळावीत. उत्सवमहोत्सवपूर्वक साजते करण्याऍवजी धार्मिकविधी पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे.
*अष्टमीच्या दिवशी घागरी फुंकणे*
हा चितपावनकोकणस्थ लोकांचा विधी असतो.हा कुळधर्मापैकी एक विधी आहे.त्यावेळीही शक्ती देवतेला आवाहन करूनअग्नी प्रज्वलित होतोच. ती देवता तेथे उपस्थितअसते. नवमीला शस्त्रपूजन असते. याचे ऍतिहासिक महत्त्व आहे.विजया दशमीच्या दिवशी देवीचा महोत्सव असतो.यावेळी देवीस पंचामृत महाभिषेक करावा.
*सरस्वती-पूजन :*
सरस्वती ही सर्वोच्च स्थानावर विराजमानझालेल्या देवतांपैकी एक आहे. सर्व प्रकारच्या विद्या देणारी, विद्यादात्री,ब्रह्मज्ञान देणारी देवता असा तिचा लौकिकआहे. शारदा किंवा सरस्वती या देवात ‘रिध्दी सिद्धी ‘ म्हणून मानलेल्या आहेत.गणपती त्यांच्याकडून कार्य करवून घेतो.षष्ठी सप्तमिला आपण त्यांचे आवाहन करून पूजन करतो. ती हंसारूढ असल्याने ‘ हंसासारखी सर्वत्रविहार करते पण हंसाला नीरक्षीर विवेक असल्यानेती त्याचा वाहन म्हणून स्विकार करते.नवनव्या प्रांतात जावून नविन नविनप्रज्ञा ती आत्मसात करते.
*卐महालक्ष्मी-पूजन :*
अष्टमीला आपण महालक्ष्मी पूजन करतो. तेपरमेश्वराचेच रूप आहे. लक्ष्मी याचा अर्थएका व्यक्तीकडे लक्ष्य देणारी म्हणजे तीचेभगवंताकडे लक्ष आहे. कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर हे श्रीयंत्रावर उभे आहे. श्रीयंत्राच्या बरोबरमध्यावर देवीचा वास आहे.त्याठिकाणी कुंकूमार्चन करूनश्रीसुक्ताची आवर्तने करतात.जगदंबा ही दुष्टांचा नाश करून ऍश्वर्य व ज्ञानया स्वरूपात सौभाग्य प्रदान करते.
*दुर्गा-महाकाली* :
हे शक्तीचे रूप आहे. तिचे रूप अतिशय उग्र आहे.दुष्टांचा संहार करण्यासाठीच हे उग्र रूप तिने धारणकेलय. आठ हात, गळ्यात रुद्र माळा,तोडलेल्या हातांचा मेखला असेदाखवण्याचा उद्देश हाच आहे की, कोणत्याही दिशेने संकटे आली तरी ती थोपवू शकते.जास्त भुजा आणि जास्त मुखे तिचे महाकाय स्वरूपदाखवितात. तिच्या उपासनेने अनेक सिद्धी प्राप्तहोतात. तिच्या पूजा स्थानावर जावूनतिची पूजा केल्यास ती दिव्य शक्ती देते.उत्थापन : आपआपल्या कुळाचारानुसार काही कुळातनवमीला तर काही कुळातदशमीला नवरात्रोत्थापन करतात.या दिवशी देवी विजया स्वरूपात असते. म्हणजेमहिशासुरावर विजय प्राप्त केल्याने आपणआनंदोत्सव साजरा करतो. गोडधोड करतो. एकमेकांच्या घरी जावून अभिष्टचिंतन करतो.
*सोनेप्रदान :*
पराक्रम करायला गेलेल्या देवींचे भक्तगणया दिवशी विजय मिळवून येतात पण अशी गोष्टसांगतात, विद्यारण्यस्वामिंनी गायत्री देवीची उपासना केली ती बारा वर्षांच्या नंतर त्यांना दसर्याच्या दिवशी प्रसन्नझाली. तिने सोन्या मोत्याचा वर्षावकेला त्यामध्ये आपट्याची पाने होती.हल्लीच्या कालामानानुसार सुवर्णदान देणे शक्यनाही, पण आपट्याची पाने मात्र देतात. हे सुवर्ण,पराक्रम करून आणल्याने, लहानांनी मोठ्यांना द्यायचे असते.जप :नवरात्रामध्ये ” जय जगदंब, श्री जगदंब ”असा देवीचा जप करावा आणि प्रार्थना करावी, ‘हे देवी, तू बुद्धी रूपाने सर्वांच्या ठिकाणी वास कर.
卐आपण जी व्रते आचरतो,ती आपल्या कर्तव्याचा भाग म्हणून आचरतो.त्यामध्ये मी करतो असा अहंभाव नसावा. ही व्रतेआचरल्यानंतर सर्व कर्मे श्रीकृष्णार्पण करावीतम्हणजे त्यातील दोषांचे परिमार्जन होते. यावेळेस भगवंत आपली परीक्षा पहात असतो. त्यामुळेव्रतारंभ करताना परमेश्वराची शरणागत भावनेनेप्रार्थना करावी व शक्तीची प्रार्थना करावी. मनस्थिर ठेवून शांत रहावे.शेवटी अपराधांची क्षमा मागून व्रतसांगता करावी.


*|| श्री गुरुदेव दत्त ||*
*शारदिय नवरात्र*