Wednesday, 1 February 2017

🌼🌼🌼 राम भक्त 🌼🌼🌼

रामाचे दोन भक्त एक जटायू आणि दुसरा हनुमंत.
रावणासी दोघांचाही सामना झाला.
सीतामातेला घेऊन जाताना जटायुचे युद्ध रावणाबरोबर झाले जटायु पराजित होईना म्हणून रावणाने रामभक्त असणार्या जटायुला विचारले सांग तुझे मरण कशात आहे सत्यवचनी जटायुने सरळ उत्तर दिले माझ्या पंखात आणि जटायुने रावणाचे मरण विचारले तर धुर्त रावणाने खोटे सांगितले माझ्या अंगठ्यात जसा जटायु अंगठ्याकडे वाकला तसाच पंखावर वार केला व आपला प्राण गमवण्यास जटायु स्वतःच कारण झाला.
याउलट हनुमंतराया लंकेत शिष्टाचारासाठी बोलणे करायला गेले तर धुर्त रावणाला वाटले की रामभक्त बावळट असतात सर्व खरे सांगतात म्हणून हनुमंतरायाला विचारले तुझे मरण कशात आहे, ज्ञानी सावध युद्धनिती पारंगत हनुमंतरायाला रावणाचे धुर्त मन कळाले व सत्यासाठी खोटे बोलले व मरण शेपटीत सांगितले व लंका जाळून रावणाला धडा शिकविला....
Tit For Tat धर्म रक्षणासाठी अनेक ठिकाणी ही युक्ती रामायण महाभारतात वापरली गेली आहे.
धर्माचे रक्षण! करणे पाखांड खंडण!
हेचि आम्हा करणे काम! बीज वाढवावे नाम!!
मऊ मेणाहुनी मऊ आम्ही विष्णुदास!
कठीण वज्रासी भेदू जाणे!!
देऊ तर कासेची लंगोटी! नाहीतर नाठाळाच्या माथी हाणू काठी!
शिवरायांनी तुकाराम महाराजांचे आशिर्वाद घेवून अन्यायी अहंकारी मनचले धुर्त माणुसकी धर्माला काळीमा फासणार्यांचा समाचार घेतला....
जय हरि!
|| श्री राम जय राम जय जय राम ||
||जय हनुमान ||

Image result for ram bhakt hanuman and jatayu
Image result for ram bhakt hanuman and jatayu

No comments:

Post a Comment