Monday, 30 January 2017



🌼🌼🌼 श्री गणपती जयंती माहिती व जन्म कथा माहिती 🌼🌼🌼

गपपती बाप्पा मोरया !
दिनांक ३१-०१-२०१७ रोज मंगळवार माघ शुद्ध चतुर्थीस श्री गणेश जंयती आहे आज आपण श्री बुध्दिच्या देवताचे श्री गणपतीचे चरित्र वाचून आपले जीवन सार्थक करूया.
परिवार माहिती :- श्रीगणपती देवता
वाहन: उंदीर
शस्त्र: पाश, अंकुश, परशु, दंत
वडील: देव शंकर
आई: देवी पार्वती
पत्नी: देवी ऋद्धी, देवी सिद्धी
पुत्र: शुभ, लाभ
भाऊ: श्री कार्तिकेय
वहिनी: देवसेना देवी
बहिनः अशोकसुंदरी
सासरे: विश्वकर्मा
सासु: भुवना देवी
अन्य नावे/ नामांतरे ब्रह्मणस्पती, मयुरेश्वर, लंबोदर, वक्रतुंड, विनायक, विघ्नेश्वर, विघ्नहर, शूर्पकर्ण
गणपतीची बारा नावे १.वक्रतुंड २. एकदंत ३.कृष्णपिंगाक्ष ४. गजवक्त्र ५.लंबोदर ६.विकट ७.विघ्नराजेंद्र ८.धूम्रवर्ण ९.भालचंद १०.विनायक ११.गणपती १२.गजानन
मंत्र ॐ गं गणपतये नमः
नामोल्लेख गणेश पुराण, मुद्गल पुराण
तीर्थक्षेत्रे अष्टविनायक
गणपती हा हिंदू धर्मातील बुद्धीचा अधिष्ठाता, विघ्नांचा नियंत्रक मानला जाणारा देव आहे.
नावे:-
पुराणांमध्ये गणपती हा शिवहर, पार्वतीपुत्र या नावांनी व शंकरपार्वतींचा मुलगा असल्याचे सांगितले जाते. गणपतीला इतर काही नावे आहेत - माघ शुक्ल चतुर्थी व भाद्रपद शुक्ल चतुर्थी असा दोनदा जन्म झाल्याने द्वैमातुर नावानेही ही देवता ओळखली जाते. या देवतेस अग्रपूजेचा मान असतो. हिंदू धर्मग्रंथात या देवतेची वर्णने स्थलपरत्वे बदलत असली तरी हत्तीचे मुख आणि मनुष्याचे शरीर असलेली देवता हे वर्णन समान आहे. या देवतेचे वाहन काही ठिकाणी उंदीर तर काही ठिकाणी सिंह सांगितले आहे.पुराण व साहित्यात गणपतीचे अनेक ठिकाणी उल्लेख आहेत. गणपती हा महाभारत या ग्रंथाचा लेखनिक होता. भारतात सर्वत्रच गणेशाची पूजा प्रचलित आहे. विशेषतः महाराष्ट्र राज्यात गणेशाची मोठ्या प्रमाणावर पूजा व उत्सव होतात. गणेशाचा उपासक संप्रदाय गाणपत्य नावाने ओळखला जातो. हा संप्रदाय गणेशाची मयूरेश्वर नावाने पूजा करतो. गणेश गायत्री मंत्र असा आहे –
“ महत्काया विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् ”
सवाहन गणेश, कर्नाटकातील तळकाडूच्या वैद्येश्वर मंदिरातील शिल्प
नावांची व्युत्पत्ती
गणेश शब्दाचा अर्थ गणांचा ईश वा प्रभू असा आहे. गण म्हणजे शिव व पार्वतीचे सेवक होय. गणांचा अधिपति म्हणून गणपती असेही नाव या देवतेस आहे. महाराष्ट्रात हे नाव विशेष लोकप्रिय आहे. विनायक हे नाव दक्षिणेत वापरतात. हे नाव ‘गणपती’ नावाशी संबंधित आहे. विनायक या शब्दाचा अर्थ वि म्हणजे विशिष्टरूपाने जो नायक (नेता) आहे तो. याच अर्थाने गणाधिपती नावही प्रचारित आहे. हेरंब हे नाव देशीय प्राकृत शब्द हेरिम्बो पासून आले आहे. हेरंब म्हणजे दीनजनांचा तारणकर्ता होय. वक्रतुण्ड, एकदंत, महोदय, गजानन, विकट आणि लंबोदर ही गणपतीची देहविशेष दर्शविणारी नावे आहेत.
वक्रतुण्ड म्हणजे ज्याचे तुण्ड (तोंड) वक्र वा वाकडे आहे तो. गणपतीच्या सोंडेमुळे चेहरा थोडासा वक्र दिसतो त्यामुळे हे नाव. एकदंत म्हणजे ज्याला एक दात आहे तो. गणपतीस एक दात असण्याच्या अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात. प्रथम कथेनुसार, परशुरामाने युद्धात गणपतीचा एक दात उपटला. दुसर्‍या कथेनुसार कैलास पर्वतावर गणपतीने रावणास अडवले म्हणून रावणाने गणपतीचा एक सुळा मोडला. आणखी एका कथेनुसार खेळाखेळातील लढाईत कार्तिकेयाने गणपतीचा एक दात भग्न केला. महोदर आणि लंबोदर शब्दांचा अर्थ अनुक्रमे महा म्हणजे मोठे उदर (पोट) असणारा व लंब वा लांबडे उदर (पोट) असणारा असा आहे. ही दोन्ही नावे गणपतीचे स्थूलत्व दाखवतात. विघ्नराज वा विघ्नेश्वर शब्दाचा अर्थ सकल विघ्न वा बाधांचा अधिपति असा आहे. पुराणात सर्वत्र गणपतीचा विघ्नाधिपती म्हणून उल्लेख आढळतो. सकल बाधांचा अधिपति व नियंत्रक असल्यामुळे गणपतीस हे नाम प्राप्त झाले.
गणपतीचा प्रथम उल्लेख प्राचीनतम हिंदू धर्मग्रंथ असलेल्या ऋग्वेदात मिळतो. वैदिक गणपतीचा स्पष्टपणे निर्देश करतात. जरी हा वैदिक गणपती व सध्या पूजिला जाणारा पौराणिक गणपती एक नसला तरी वेदोत्तर काळात ऋग्वेदातील गणपती-ब्रह्मणस्पती-वाचस्पती पासूनच पौराणिक गजवदन-गणेश-विघ्नेश्वर हे रूप उद्भवल्याचे अनेक संशोधक मान्य करतात.
वैदिक गणपतीची दुसरी नावे होती -बृहस्पती, वाचस्पती. ही देवता ज्योतिर्मय मानली जाई. तिचा वर्ण लालसर सोनेरी होता. अंकुश, कुर्‍हाड ही या देवतेची अस्रे होती. या देवतेच्या आशिर्वादाविना कोणतीही इष्टकाम संभव होणार नाही असे मानले जाई. ही देवता कायम ‘गण’ नामक एका नृत्यकारी दलासोबत विराजमान असे व देवतांची रक्षकही मानली जाई.
दुसर्‍या मतानुसार भारतातील अनार्यांच्या हस्तिदेवता व लम्बोदर यक्षाच्या एकत्रिकरणातून गणेश संकल्पना निर्मिली गेली. गणेश या मूळच्या अनार्य देवतेचे आर्यीकरण झाले असावे हा दुसरा कयास लावण्यात येतो. गणेशाचे वाहन उंदिर याच आदिम संस्कृतीचे प्रतीक म्हणून राहिले असावे. इसवीसनपूर्व आठव्या शतकापासून सहाव्या शतकाच्या मध्यापर्यंत लिहिल्या गेलेल्या बौधायण धर्मसूत्रात गणेशाचा उल्लेख नाही. इसवीसनाच्या चौथ्या शतकातील कालिदास, इसवीसनाच्या सहाव्या शतकातील भारवी, इसवीसनाच्या पाचव्या शतकातील पंचतंत्र वा भरताच्या नाट्यशास्त्रातही गणेश देवता दिसत नाही. गुप्त काळाच्या अस्तकाळापासून या देवतेची स्वतंत्र पूजा प्रचलित झाली असावी.
मानवगृह्यसूत्र व याज्ञवल्क्य स्मृतीमध्ये शाल, कटंकट, उष्मित, कुष्माण्ड राजपुत्र व देवयजन इत्यादीचा विनायक म्हणून उल्लेख आहे. महाभारतातील विनायक हाच आहे. याचे काम विघ्न उत्पादन करणे असे. पुढे हाच विघ्नकर्ता गणपती विघ्नहर्ता मानला जाऊ लागला. याज्ञवल्क्य स्मृतीनुसार विनायक हा अम्बिकेचा पुत्र होय. गणेशाचा पार्वतीपुत्र उल्लेख येथेच प्रथम होतो. अनेक पुराणे स्वयम्भू मानतात.कार्तिकेयाचे अनेक गण वा पार्षदही पशुपक्ष्यांचे मुखधारित असतात. इसवीसनाच्या सहाव्या शतकातील 'भूमारा'त याप्रकारच्या अनेक गणांचा उल्लेख सापडतो. गणेश म्हणजेच गण-ईशाचे ह्त्तीमुख असण्याचे हेही कारण असू शकते. काही ठिकाणी गणेश व यक्ष/नागदेवता यांची वर्णने मिसळल्याचे दिसते. गणपतीच्या ह्त्तीमुखाचे हेही कारण असावे. पुराणांमध्ये ह्त्तीमुखधारी यक्ष आहेत. यक्ष हे गणपती प्रमाणे लंबोदर असतात.
'याज्ञवल्क्य संहिता' या ग्रंथात विनायक व गणपतीच्या पूजेचे विवरण सापडते. इसवी सनाच्या सातव्या शतकात रचलेल्या ललित माधव ग्रंथात गणपतीचा उल्लेख आहे.
पौराणिक संदर्भ
गणेश पौराणिक हिंदू धर्मातील प्रथम पूज्य व त्या कारणाने एक मुख्य देवता आहे. म्हणून या देवतेचा नाना आख्यानां-उपाख्यानांत, वेगवेगळ्या पुराणांत व महाकाव्यांत उल्लेख येतो. गणेशाविषयीची सर्वाधिक महत्त्वाची कहाणी म्हणजे गणपतीचे गजानन होणे होय. प्रत्येक पुराणाच्या वर्ण्यविषयानुसार या प्रसंगावर विविध भाष्येही वाचायला मिळतात. इतकी की यामुळे पुराणांमध्ये काही ठिकाणी परस्पर-विरोधही दिसतो. याशिवाय गणपतीच्या मातृपितृभक्ती व विवाहाविषयीच्या अनेक कथा वाचायल्या मिळतात.
वेगवेगळ्या पुराणांतील श्री गणेशाची
जन्मकथा:-
शिवपुराण – शिवपुराणात उल्लेखित उपाख्यानानुसार, पार्वतीने एकदिवशी नंदीस द्बारपाल म्हणून नियुक्त करून स्नान करण्यास गेली. यावेळी शंकर तेथे आले. त्यांनी नंदीस झुगारून न्हाणीघरात प्रवेश केला. यामुळे पार्वती अपमानित व रागाने क्षुब्ध झाली. शेवटी सखी जया व विजया यांच्या सल्ल्याने चिखलापासून एका सुंदर पुत्राची मूर्ती निर्मिली व त्यात प्राण फुंकले. या पुत्रास तिने स्वतःचा अनुचर म्हणून नेमले. नंतर एकेदिवशी या कुमार मुलास दारी नेमून पार्वती स्नानास गेली असता शंकर तेथे उपस्थित झाले. कुमाराने शंकरास अडवले. पहिल्यांदा कुमारासोबत त्यांचा वाद व नंतर पार्वतीच्या मनातील इंगिताप्रमाणे युद्ध झाले. शिव व सकल देवतागण या लढाईत पराजित झाले. तेव्हा नारदाच्या सल्ल्याने विष्णूद्वारे कुमारास मोहित करून शंकरांनी त्याचे मुंडके उडवले. ही वार्ता ऐकून पार्वतीने क्रुद्ध होऊन सृष्टी नष्ट करण्यास प्रारंभ केला. नारद व देवगणांनी तिज शांत केले. तेव्हा पार्वतीने तिच्या पुत्राच्या पुनर्जीवनाची मागणी केली व तिचा पुत्र सगळ्यांना पूज्य व्हावा अशी इच्छा व्यक्तिली. शंकरांनी होकार भरला. परंतु कुमाराचे मस्तक कोठेही न मिळाल्याने त्यांनी गणांस उत्तर दिशेस पाठवले व प्रथम जो प्राणी दिसेल त्याचे मस्तक आणण्याची आज्ञा केली. गण एका हत्तीचे मस्तक घेऊन उपस्थित झाले. देवगणांनी ह्या मुंडक्याच्या साहाय्याने कुमारास जिवंत केले. तदपरांत शंकरांनी या मुलास स्वपुत्र म्हणून स्वीकारले. देवगणांच्या आशिर्वादाने हा मुलगा पूज्य झाला व गणेश नावाने प्रसिद्ध झाला.
स्कंदपुराण – स्कंदपुराणात- गणपतीच्या जन्माविषयी एकाधिक उपाख्यान वर्णिली आहेत. या पुराणातील गणेश खण्डाप्रमाणे सिन्दूर नामक एक दैत्याने पार्वतीच्या गर्भात प्रवेश करून गणेशाचे मस्तक छिन्न केले. पण या अर्भकाचा मृत्यु न होता ते मुण्डहीन अवस्थेत जन्माला आले. नारदाने बालकास याचे कारण विचारले असता गजाननाने वरील घटना सांगितली. तेव्हा नारदांच्या सल्ल्यानुसार गजासुराचे मस्तक छिन्न करून गणपतीने ते स्वतःच्या शरिरावर चढवले.
स्कंपुराणाच्या- ब्रह्मखण्डातील कथेनुसार, पार्वतीने स्वतःच्या मळापासून एक सुन्दर व पूर्णांग पुतळा निर्मिला व त्यात प्राण फुंकले व त्यास आपला द्वारपाल नेमून ती स्नानास गेली. नंतर तेथे येऊन स्नानागारात जाणार्या शंकरास बालकाने अडवले. शंकरासोबतच्या युद्ध झाले व त्यात शंकरांनी बालकाचे मस्तक छिन्न केले या नंतर गजासुराचा वध करून शंकरांनी त्याचे मस्तक बालकाच्या धडावर बसवले.
स्कंदपुराणाच्या- अर्बुद खण्डात म्हटले आहे की, पार्वतीने अंगमळापासून एक मस्तकहीन पुतळा बनवला. कार्तिकेयाने ह्या पुतळ्यास स्वतःचा भाऊ बनवण्याची इच्छा व्यक्त केली व त्याने एक गजमुण्ड आणले. पार्वतीचा आक्षेप असतानाही दैवयोगाने हे मस्तक धडाशी जोडले गेले. यानंतर शक्तिरूपिणी पार्वतीने पुतळ्यास जीवनदान दिले. गजमुण्डयुक्त पुतळ्यावर नायकत्वाचा एक विशेष भाव उमटला त्यामुळे तो महाविनायक नावाने परिचित झाला. शंकरांनी या पुत्रास गणाधिपती होशील व तुझ्या पूजेविना कार्यसिद्धी होणार नाही असा आशीर्वाद दिला. कार्तिकेयाने त्यास कुर्‍हाड दिली. पार्वतीने मोदकपात्र दिले व मोदकाच्या वासाने उंदीर गणपतीचे वाहन बनला.
बृहद्धर्मपुराण – बृहद्धर्मपुराणाप्रमाणे पार्वती पुत्रलाभासाठी इच्छुक असताना शंकरांनी अनिच्छा प्रकट केली. पुत्राकांक्षी पार्वतीस शंकरानी एक वस्त्र फाडून दिले व पुत्रभावाने करण्यास सांगितले. पार्वतीने त्याच वस्त्रास आकार दिला व त्यास जिवंत केले. तेव्हा हा पुत्र अल्पायू आहे असे उद्गार शंकरांनी काढले. मुलाचे मस्तक तत्क्षणी छिन्न झाले. यामुळे पार्वती शोकाकुल झाली. या वेळी उत्तरदिशेस असलेल्या कोणाचेही मस्तक जोडले असता हा पुत्र वाचेल अशी एक आकाशवाणी झाली. तद्नुसार पार्वतीने नंदीस उत्तरेत पाठवले. नंदीने देवतांचा विरोध झुगारून इंद्राचे वाहन असलेल्या ऐरावताचे मस्तक कापून आणले. शंकरांनी हे मुंडके जोडून पुत्रास जिवंत केले. शंकरांच्या वराने इंद्राने ऐरावतास समुद्रात टाकले असता त्यासही पुनः मस्तक प्राप्त झाले.
ब्रह्मवैवर्त पुराण – ब्रह्मवैवर्त पुराणानुसार, शंख-चक्र-गदा-पद्मधारी कृष्णास पाहून मुग्ध पार्वतीने तशाच एका पुत्राची कामना केली. कृष्णाने तसे वरदानही दिले. एकदिवस जेव्हा शिव-पार्वती स्वगृही क्रीडारत असताना कृष्ण वृद्ध ब्राह्मणरूपात भिक्षा मागण्यास आला. पार्वती त्यास भिक्षा देण्यास गेली असता तेथे कृष्ण स्वतः शिशुरूपात अवतीर्ण झाला. वृद्ध ब्राह्मण अंतर्धान पावला. पार्वती ह्या शतचन्द्रसमप्रभम् बालकास पाहून आनंदित झाली नंतर देवता व ऋषिगण बालकास पाहण्यास कैलासी आले. त्यात शनीदेवही होता. शनीने आपल्या कुदृष्टीची गोष्ट पार्वतीस सांगितली पण पार्वतीच्या आग्रहाने शनी बालकास बघण्यास तयार झाले. पण शनीने भीतीने केवळ डाव्या डोळ्यानेच बालकाकडे बघितले. पण तेवढ्यानेही बालकाचे मस्तक छिन्न होऊन वैकुण्ठात कृष्णाच्या देहात जाऊन विलिन झाले. पार्वती शोकाने बेशुद्ध झाली. तेव्हा गरुडावरून जाणार्या विष्णूने पुष्पभद्रा नदीच्या तीरावर उत्तरदिशेस डोके ठेवून झोपलेल्या एका हत्तीस पाहिले. त्याचे मस्तक ऊडवल्याने हत्तीणी व तिचे बाळ रडू लागले. तेव्हा विष्णूने एका मुंडक्यापासून दोन मुंडकी तयार केली व एक हत्तीच्या व दुसरे गणपतीच्या धडावर स्थापिले व दोघंना जीवित केले. शंकरांच्या आशिर्वादाने गणपतीस अग्रपूजेचा मान मिळाला. पार्वतीच्या आशिर्वादाने तो गणांचा पती,विघ्नेश्वर व सर्वसिद्धिदाता झाला. यानंतर एकेकाळी कार्तिकेयास देवांचा सेनापती नेमताना इन्द्राचा हात आखडला. शंकरास याचे कारण विचारले असता, गणेशाची अग्रपूजा न झाल्याने असे घडले असे सांगितले.
ब्रह्मवैवर्त- पुराणातील आणखी एका कथेनुसार, माली आणि सुमाली नामक दोन शिवभक्तांनी सूर्यावर त्रिशूळाने आघात केला. म्हणून सूर्य अचेतन होऊन जग अंधारात बुडाले. सूर्यपिता कश्यपाने शंकरास शाप दिला की तुझ्या मुलाचे मस्तक असेच ढासळेल. यामुळे गणपती मस्तकहीन झाला व म्हणून नंतर इंद्राने ऐरावताचे मस्तक जोडले.
पद्मपुराण – पद्मपुराणानुसार, शंकर पार्वती ऐरावतवर बसून वनविहारास गेले असता त्यांच्या मिलनाने गजमुंड गणेशाचा जन्म झाला.
लिंगपुराण – लिंगपुराणानुसार, देवगणांनी शंकरापाशी येऊन असूरांपासून स्वतःच्या सुरक्षिततेची मागणी केली. तेव्हा शंकरांनी स्वदेहातून गणपतीस जन्म दिला.
वराहपुराण – वराहपुराणानुसार , देव व ऋषिगण शंकरापाशी येऊन विघ्ननिवारणासाठी नव्या देवतेची मागणी केली असता शंकराजवळ एक बालक प्रकट झाला. देवगण, पार्वती बालकास पाहून मुग्ध झाले. पण शंकर क्रोधित झाले. त्यांच्या शापाने बालकास गजमुख, लांबडे पोट व पोटाशी नाग प्राप्त झाला. क्रोधित शंकरांच्या घामातून अनेक गणांनी जन्म घेतला. गणपती त्यांचा अधिपति झाला. या ठिकाणी गणपतीचा गणेश, विघ्नकर व गजास्य म्हणून उल्लेख आहे.
देवीपुराण – देवीपुराणानुसार, शंकरांच्या राजसिक भावामुळे हातातून घाम स्त्रवला व त्यातून गणपतीचा जन्म झाला.
मत्स्यपुराण – मत्स्यपुराणानुसार, पार्वती चूर्ण (भुकटी) स्वतःच्या शरीराचे मर्दन करत होती. याच भुकटीपासून तिने गणपतीची मूर्ती बनवली व गंगेत टाकली. पुतळा मोठा होत होत पृथ्वीइतका झाला. नंतर या मुलास गंगा व पार्वतीने पुत्ररूप मानले व ब्रह्माच्या आशिर्वादाने हा मुलगा गणाधिपती झाला.
वामनपुराण – वामनपुराणानुसार, पार्वतीने स्नानाच्या वेळी अंगमळापासून चतुर्भूज गजानन मूर्ती निर्मिली व महादेव त्यास पुत्र मानून म्हणाले मया नायकेन विना जातः पुत्रकः (मला सोडूनही पुत्र जन्म झाला) त्यामुळे हे बालक विनायक म्हणून प्रसिद्ध होईल व विघ्ननाशकारी होईल.
इतर आख्याने
ब्रह्मवैवर्त पुराण – ब्रह्मवैवर्त पुराणानुसार, परशुराम एकवीस वेळा पृथ्वी निःक्षत्रिय करून कैलासी आले असता, द्बाररक्षक गणेशाने त्यांस अडवले. दोघांमध्ये तुंबळ युद्ध झाले. यात परशुरामांच्या परशुमुळे गणेशाचा एक दात उपटला गेला.
शिवपुराण – शिवपुराणानुसार, गणेश व कार्तिकेय विवाहासाठी स्पर्धा करत होते. तेव्हा दोघांमध्ये जो प्रथम पृथ्वीपरिक्रमा करेल त्याचा विवाह आधी होईल असा निर्णय झाला. कार्तिकेय मोरावर बसून पृथ्वीपरिक्रमेस गेला. गणपतीने शंकर पार्वतीस सातवेळा प्रदक्षिणा घातली व शास्त्रमतानुसार शतवार पृथ्वीपरिक्रमा केल्याचे पुण्य मिळवल्याचा युक्तीवाद केला. हा युक्तीवाद मान्य होऊन विश्वरूपाच्या दोन मुलींसोबत - रिद्धी(बुद्धी) व सिद्धीसोबत गणेशाचा विवाह झाला. लक्ष्य हा सिद्धीचा तर लाभ हा बुद्धीचा पुत्र होय.विवाहाची वार्ता नारदाकडून ऐकून दु:खी कार्तिकेय क्रौञ्च पर्वतावर राहण्यास गेला. आणखी एका कथेनुसार तुलसी नामक एक नारी गणेशासोबत विवाह करू इच्छीत होती. गणपती ब्रह्मचर्यव्रती असल्याने त्याने नकार दिला व तुलसीस दानवपत्नी होशील असा शाप दिला. तुलसीनेही तुझा विवाह होईल असा शाप दिला.
तन्त्र – तंत्रमतानुसार लक्ष्मी व सरस्वती या गणपतीच्या पत्नी होत. याखेरीज तीव्रा, ज्वालिनी, नन्दा, सुभोगदा, कामरूपिनी, उग्रा, तेजोवती, सत्या आणि विघ्ननाशिनी नावाच्या गणेशाच्या इतर नऊ पत्नी होत.
महाभारत – महाभारतामध्ये, कौरव व पाण्डव यांच्या मृत्युनंतर व्यास ध्यानास बसले. महाभारताच्या सार्या घटना त्यांना आठवू लागल्या. तेव्हा एका विशाल ग्रंथाच्या रचनेचा त्यांनी निश्चय केला. यासाठी त्यांना पात्र लेखनिकाची गरज होती. ब्रह्माच्या सल्ल्यानुसार ते गणपतीकडे आले. गणपती लेखनिक होण्यास तयार झाला. पण त्याची एक अट होती - लिहिताना लेखणी थांबू नये. व्यासांनी उलट अट सांगितली - अर्थ न समजता गणपतीने तो श्लोक लिहू नये. यासाठी व्यासांनी महाभारतात ८८०० कूटश्लोक समाविष्ट केले. या श्लोकांचा अर्थ समजण्यास गणपतीस थोडा वेळ लागल्याने त्यांना आणखी श्लोकरचना करण्यासाठी अवसर मिळाला.
गणेश चतुर्थी
भाद्रपद व माघ महिन्याची शुक्ल चतुर्थीस गणेश चतुर्थी म्हणतात. हिंदूश्रद्धेनुसार हा गणपतीचा जन्म दिन होय. गणेश चतुर्थीची प्रचलित कथा येणेप्रमाणे आहे - एकदा गणपती चतुर्थीचे स्वतःचे आवडीचे मोदक खाऊन उंदराच्या पाठीवरून जात होता. वाटेत साप पाहिल्याने उंदिर भयाने कापू लागला. यामुळे गणपती उंदराच्या पाठीवरून खाली पडला व त्याचे पोट फाटून मोदक बाहेर पडले. गणपतीने ते सारे मोदक पुनः पोटात टाकले व पोटावर साप बांधला. हे दृश्य पाहून आकाशातील चंद्र हसू लागला. म्हणून तुझे चतुर्थीस कोणी दर्शन करणार नाही असा शाप दिला.
अवतार
उपपुराण मानल्या जाणार्या व गाणपत्य संप्रदायाचे मुख्य ग्रंथ असलेल्या गणेश पुराण व मुद्गल पुराण- ह्या दोन ग्रंथात गणपतीच्या अनुक्रमे चार व आठ अवतारांचा उल्लेख आहे.
गणेश पुराण – गणेश पुराणात- गणपतीचे चार अवतार अनुक्रमे सत्य, त्रेता, द्वापर व कलियुगात झाले असा उल्लेख आहे. हे होते -
महोत्कट विनायक – हा दशभूजाधारी व रक्तवर्णी अवतार. वाहन सिंह. कश्यप , .दिती यांच्या सन्तान म्हणून जन्मग्रहण केले व त्या कारणाने काश्यपेय नावाने प्रसिद्ध झाला. या अवतारात त्याने नरान्तक आणि देवान्तक नावाच्या दोन असुर भावांचा व धूम्राक्ष नावाच्या दैत्याचा वध केला. मयूरेश्वर – हा षडभूज व श्वेतवर्णी अवतार आहे. वाहन मोर. त्रेता युगात शिवपार्वतींचा पुत्र म्हणून जन्मला. या अवतारात सिंधू नामक दैत्याच्या वध केला. अवतारसमाप्तीच्या वेळेस मोर भाऊ कार्तिकेय यास दान केला. मोरगाव येथे मोरेश्वराचे मंदिर आहे
.
गजानन – हा चतुर्भुज व रक्तवर्णी अवतार. वाहन उंदिर. द्वापार युगात शिवपार्वतींचा पुत्र म्हणून जन्मला. या अवतारात सिंदूर नामक दैत्याच्या वध केला.अवतारसमाप्तीच्या वेळेस राजा वरेण्य यास गणेश गीता सांगितली. धूम्रकेतु – द्बिभूज अथवा चतुर्भूज व धूम्रवर्णी अवतार. वाहन निळा घोडा. हा अवतार कलियुगाच्या शेवटी अवतीर्ण होईल व अनेक दैत्यांचा नाश करेल असे सांगितले जाते. विष्णूच्या कल्की अवतारावरून कल्पित.
मुद्गल पुराण – मुद्गल पुराणात- गणपतीच्या आठ अवतारांचे वर्णन सापडते. दुर्गुणांवरील विजय असा त्याचा भावार्थ आहे. हे अवतार खालील प्रमाणे -
वक्रतुण्ड – प्रथम अवतार.वाहन सिंह. मात्सर्यासुराचा (अर्थात मत्सराचा) वध केला. एकदन्त – आत्मा व परमब्रह्माचे प्रतीक. मूषकवाहन.अवताराचा उद्देश्य मदासुराचा (अर्थात, मद/मी-पण) वध। महोदर – वक्रतुण्ड व एकदंताचे सम्मिलित रूप. बह्माच्या प्रज्ञेचे प्रतीक। मोहासुर (अर्थ मोह) याचा वध केला. हा अवतारही मूषकवाहन आहे. गजवक्त्र वा गजानन – महोदर अवताराचे अन्यरूप. लोभासुर (लोभ) याचा वध केला. लम्बोदर – ब्रह्माच्या शक्तीचे प्रतीक.वाहन मूषक. क्रोधासुराचा वध केला. विकट – सूर्याचे प्रतीक. कामासुराचा वध केला. वाहन मयूर. विघ्नराज – विष्णूचे प्रतीक.ममासुराचा (अहंकार) वध हा या अवतारचे उद्देश्य. धूम्रवर्ण – शिवाचे प्रतीक. ब्रह्माच्या विनाश शक्तीचे प्रतीक. वाहन घोडा.अभिमानासुराचा नाश केला.
रूप व रूपभेद
भारतीय शिल्प व चित्रकलेत गणेश एक अत्यंत महत्वपूर्ण व लोकप्रिय मूर्तीविषय आहे.गणपतीच्या नाना रूपांचे वर्णन जे पुराण व इतिहासात मिळते, ते भारतीय उपखंडात व भारताबाहेरही विविध रूपात आविष्कृत झाले आहे. गणेशाच्या विविधरूपातील मूर्ती आहेत. कोठे उभा, कोठे नृत्यरत, कोठे असुरवधकारी वीर युवक म्हणून, कोठे शिशु तर कोठे पूजक रूपातील गणपती दिसतो. गणपतीची उपलब्ध प्राचीनतम मूर्ती इसवीसनाच्या दुसर्‍या शतकात श्रीलंकेत निर्मिली गेली. इसवीसनाच्या सहाव्या शतकापासूनच्या गणेशमूर्ती भारताच्या विविध भागात मिळाल्या आहेत. इसवीसनाच्या सातव्या शतकात गणपती लोकप्रिय दैवत म्हणून स्थापित झाले असे दिसते.
रूप
भारतीय शिल्पकलेत प्रथमपासूनच गणेश गजानन, एकदंत व लंबोदर रूपात आहे. गणेशाच्या ध्यान, प्रार्थना व मंत्रही असेच रूपवर्णन करतात-
सर्वं स्थूलतनुं गजेन्द्रवदनं लम्बोदरं सुन्दरं प्रस्यन्दन्मद्गन्धलुब्धमधुपब्यालोलगण्डस्थलम्।
दन्ताघातविदारितारिरुधिरैः सिन्दूरशोभाकरं वन्दे शैलसुतासुतं गणपतिं सिद्धिप्रदं कामदम्।। (गणेशध्यानम्)
एकदंन्तं महाकायं लम्बोदरं गजाननं।
विघ्ननाशकरं देवम् हेरम्बं प्रणमाम्यहम्।। (गणेशप्रणामः)
देवेन्द्रमौलिमन्दारमकरन्दकणारुणाः।
विघ्नं हरन्तु हेरम्वचरणाम्बुजरेणबः।। (गणेशप्रार्थना)
सुरवातीच्या काळापासूनच गणपती एकदंत रूपात शिल्पबद्ध आहे. गुप्तकाळातील गणेशमूर्तीही लंबोदर आहेत. ब्रह्मांड पुराणात या उदरात सारे जग सामावू शकेल असे म्हटले आहे. गणपतीच्या हातांच्या व अस्त्रांच्या संख्येत मतांचि विविधता दिसते. गणपती चतुर्भूज, द्बिभूज, षड्भूज अशा अनेक रूपात दिसतो. हातात साधारणपणे पाश-अंकुश, वरदहस्त व मोदक असे रूप असते.
रूपभेद
नृत्यरत बौद्धगणेश, मध्य तिबेट मधील चित्र - कालः पंधराव्या शतकाचा प्रथमार्ध
भारतात व बाहेर गणपतीच्या रूपात अनेक फरक दिसतो. रूपभेदानुसार ध्यान व पूजाविधी बदलतो. गुप्तयुगातील गणेशमूर्ती अष्ट ते दशभूज आहेत. तंत्रमार्गी ग्रन्थ तन्त्रसारात, काश्मीरात, नेपाळमध्ये व अफगाणिस्तानमध्ये आढळणार्‍या मूर्तींमध्ये गणपतीचे वाहन सिंह दाखवले आहे. येथील गणपती नेहमीप्रमाणेच प्रसन्न रूपात आहे. पण प्राणतोषिनी तन्त्र- या तांत्रिक ग्रंथात उल्लेखित चौरगणेश साधनाचे फळ चोरतो असे म्हटले आहे. त्याचप्रमाणे विघ्नगणेश विघ्न घडवितो व लक्ष्मीगणेश लक्ष्मीस आलिंगन देउन असतो असा उल्लेख आहे.
महागणपती – महागणपती हे गणपतीचे एक तंत्रमार्गी रूप आहे. यात गणपतीसोबत शक्ती विराजमान असते व एकमेकांस उपस्थ स्पर्श केलेला असतो.
हेरम्ब-गणपती – हेरम्ब-गणपती तन्त्रसार- ग्रंथात उल्लेखित आहे.हे रूप पंचानन (पाचतोंडी) असते. त्यातील मधले एक मुख ऊर्ध्वदिशी (आकाशाकडे तोंड केलेल्) असते. अभयवर, मोदक, निजदन्त, मुण्डमाला, अंकुश व त्रिशूल असतो. हेरम्ब म्हणजे दीन पालक होय. 

Image may contain: flower and plant

Sunday, 22 January 2017

🌼🌼🌼 रामेश्वरम 🌼🌼🌼


भगवान राम के द्वारा हनुमान जी का अहंकार नाश-
यह कथा उस समय की है जब लंका जाने के लिए भगवान श्रीराम ने सेतु निर्माण के पूर्व समुद्र तट पर शिवलिंग स्थापित किया था। वहाँ हनुमानजी को स्वयं पर अभिमान हो गया तब भगवान राम ने उनके अहँकार का नाश किया।
जब समुद्र पर सेतुबंधन का कार्य हो रहा था तब भगवान राम ने वहाँ गणेशजी और नौ ग्रहों
की स्थापना के पश्चात शिवलिंग स्थापित करने का विचार किया। उन्होंने शुभ मुहूर्त में शिवलिंग लाने के लिए हनुमानजी को काशी भेजा। हनुमानजी पवन वेग से काशी जा पहुँचे। उन्हें देख भोलेनाथ बोले- “पवनपुत्र!” दक्षिण में शिवलिंग की स्थापना करके भगवान राम मेरी ही इच्छा पूर्ण कर रहे हैं क्योंकि महर्षि अगस्त्य विन्ध्याचल पर्वत को झुकाकर वहाँ प्रस्थान तो कर गए लेकिन वे मेरी प्रतीक्षा में हैं। इसलिए मुझे भी वहाँ जाना था। तुम शीघ्र ही मेरे प्रतीक को वहाँ ले जाओ। यह बात सुनकर हनुमान गर्व से फूल गए और सोचने लगे कि केवल वे ही यह कार्य शीघ्र-अतिशीघ्र कर सकते हैं।
यहाँ हनुमानजी को अभिमान हुआ और वहाँ भगवान राम ने उनके मन के भाव को जान लिया। भक्त के कल्याण के लिए भगवान सदैव तत्पर रहते हैं। हनुमान भी अहंकार के पाश में बंध गए थे। अतः भगवान राम ने उन पर कृपा करने का निश्चय कर उसी समय वारनराज सुग्रीव को बुलवाया और कहा-“हे कपिश्रेष्ठ! शुभ मुहूर्त समाप्त होने वाला है और अभी तक हनुमान नहीं पहुँचे। इसलिए मैं बालू का शिवलिंग बनाकर उसे यहाँ स्थापित कर देता हूँ।”
तत्पश्चात उन्होंने सभी ऋषि-मुनियों से आज्ञा प्राप्त करके पूजा-अर्चनादि की और बालू का शिवलिंग स्थापित कर दिया। ऋषि-मुनियों को दक्षिणा देने के लिए श्रीराम ने कौस्तुम मणि का स्मरण किया तो वह मणि उनके समक्ष उपस्थित हो गई। भगवान श्रीराम ने उसे गले में धारण किया। मणि के प्रभाव से देखते-ही-देखते वहाँ दान-दक्षिणा के लिए धन, अन्न, वस्त्र आदि एकत्रित हो गए। उन्होंने ऋषि-मुनियों को भेंटें दीं। फिर ऋषि-मुनि वहाँ से चले गए।
मार्ग में हनुमानजी से उनकी भेंट हुई। हनुमानजी ने पूछा कि वे कहाँ से पधार रहे हैं? उन्होंने सारी घटना बता दी। यह सुनकर हनुमानजी को क्रोध आ गया। वे पलक झपकते ही श्रीराम के समक्ष उपस्थिति हुए और रुष्ट स्वर में बोले-“भगवन! यदि आपको बालू का ही शिवलिंग स्थापित करना था तो मुझे काशी किसलिए भेजा था? आपने मेरा और मेरे भक्तिभाव का उपहास किया है।”
श्रीराम मुस्कराते हुए बोले-“पवनपुत्र! शुभ मुहूर्त समाप्त हो रहा था, इसलिए मैंने बालू का शिवलिंग स्थापित कर दिया। मैं तुम्हारा परिश्रम व्यर्थ नहीं जाने दूँगा। मैंने जो शिवलिंग स्थापित किया है तुम उसे उखाड़ दो, मैं तुम्हारे लाए हुए शिवलिंग को यहाँ स्थापित कर देता हूँ।” हनुमान प्रसन्न होकर बोले-“ठीक है भगवन! मैं अभी इस शिविलंग को उखाड़ फेंकता हूँ।”
उन्होंने शिवलिंग को उखाड़ने का प्रयास किया, लेकिन पूरी शक्ति लगाकर भी वे उसे हिला तक न सके। तब उन्होंने उसे अपनी पूंछ से लपेटा और उखाड़ने का प्रयास किया। किंतु वह नहीं उखड़ा। अब हनुमान को स्वयं पर पश्चात्ताप होने लगा। उनका अहंकार चूर हो गया था और वे श्रीराम के चरणों में गिरकर क्षमा माँगने लगे।
इस प्रकार हनुमान ने अहम का नाश हुआ। श्रीराम ने जहाँ बालू का शिवलिंग स्थापित किया था उसके उत्तर दिशा की ओर हनुमान द्वारा लाए शिवलिंग को स्थापित करते हुए कहा कि ‘इस शिवलिंग की पूजा-अर्चना करने के बाद मेरे द्वारा स्थापित शिवलिंग की पूजा करने पर ही भक्तजन पुण्य प्राप्त करेंगे।’
यह शिवलिंग आज भी रामेश्वरम में स्थापित है और भारत का एक प्रसिद्ध तीर्थ है।
Image may contain: 2 people

Friday, 20 January 2017

🌼🌼🌼नामसाधना  🌼🌼🌼


नामसाधनेची हि पथ्ये एखाद्याने काळजीपूर्वक पळून आपली नामसाधना नेटाने सुरु ठेवली तर नामसाधनेचे अनेक दिव्य अनुभव त्यास प्राप्त झाल्याशिवाय खचित राहणार नाहीत. तथापि, नामधारकानी आणखी एक महत्त्वाची गोष्ट नित लक्षात ठेवली पाहिजे आणि ती गोष्ट म्हणजे 'नामस्मरण' आणि 'नामोच्चारण' या दोहोतील फरक !पुष्कळसे साधक रोज खूप जप करतात; परंतु त्यापैकी बहुतेकजण केवळ 'नामोच्चारण' करताना दिसतात. त्यांच्याकडून नामस्मरण होताच नाही !
तेव्हा प्रथम नामस्मरण आणि नामोच्चारण यात काय फरत आहे
ते पाहू या. नामोच्चारण याचा अर्थ तोंडाने नामाचा केवळ उच्चार करणे असा होतो. तोंडाने राम, कृष्ण, दत्त, शिव यांचे केवळ नाम उच्चारणे म्हणजे नामोच्चारण होय. यात 'ॐ नम: शिवाय' , किंवा ' श्रीराम जय राम जय जय राम ' इ.मन्त्रजपांचाहीसमावेश होतो; परंतु या मंत्राजापाचा केवळ उच्चार करणे आणि नामस्मरण करणे यात खूप फरक आहे. कारण "नामस्मरण" याचा अर्थ तोंडाने नाम घेत असताना त्याच वेळी बिश्तमंत्राच्या दैवताचे स्मरणही मनात झाले पाहिजे. नामस्मरणात या शब्दातील ' स्मरण ' हा शब्द महत्त्वाचा आहे. नामोच्चारणात हे स्मरण नसते.
कबीरांनी याचे वर्णन करताना म्हटले आहे; कि"माला हातात फिरते आहे,आणि जीभ मुखात फिरते आहे ;परंतु मन मात्र
दशदिशांत फिरते आहे !"अश्या जपला एक प्रकारचा यांत्रिकपणा येतो. अश्या वेळी मुखाने नामाचा उच्चार होत असला तरी मन रिकामे असल्याने ते नेहमीप्रमाणेच कुठेही भरकटत असते आणि त्यावेळी अनेक सांसारिक चिंता, विषय,
इत्यादीची गर्दी मनात होते. हे मनाचे भरकटणे तसे चोवीस तासच सुरु असते. याचे कारण आपली वृत्ती मुळातच बहिर्मुख
असते. बाहेरच्या जगात काय चालले आहे हे पाहण्यासाठी आपले मन ज्यात त्यात आपले नाक खुपसत असते; परंतु उपासनेचा मुल हेतू हा बहिर्मुख मनाला अंतर्मुख करणे - आत्म्याकडे केंद्रीभूत करणे- हा आहे. त्याचा प्रवाह बदलाने व तो भगवंताकडे वळविणे हि महत्त्वाची गोष्ट आपल्याला साधावयाची आहे आणि केवळ नामोच्चारणाचा फारसा उपयोग होत नाही. म्हणूनच संत नामदेवांनी या नामोच्चारणाला " वाचेचा गोंधळ " असे म्हटले आहे. ते म्हणतात,"
नाम घेता हे वैखरी | चित्त धावे विषयावरी |नाम रुप नाही मेळ | अवघा वाचेचा गोंधळ || " यासाठीच हा वाचेचा गोंधळ न करता स्मरण्युक्त नाम घेण्याबद्दल त्यांचा आग्रह आहे. ते पुढे म्हणतात-" नवल स्मरणाची ठेव | स्मरणामाजी प्रगटे देव |एक जनार्दनी नाम | नामी प्रगटे आत्माराम || "तथापि, अगदी सुरुवातीच्या कळत नाम आणि रूप यांचा मेल साधकाला कदाचित साधता येणार नाही.
बहिर्मुख मनाला एकदम उलट दिशेने वळवून अंतर्मुख करणे ती तारेवरची कसरत सर्वांनाच जमेल असे नाही, तथापि, हे न जमेल तरी साधकांनी निराश होण्याचे कारण नाही.कारण या संदर्भात श्री ब्रम्हचैतन्यमहाराज सांगतात कि, " नाम घेणे हे
महत्त्वाचे आहे. ते घेत असताना रूपाचे ध्यान राहिले तर उत्तमच ; पण ते तसे न राहिले तरी नाम घेताना रूपाचे स्मरण सुक्ष्ण रूपाने होत असतेच असते.
उदाहरणार्थ एका गृहस्थाचे घरी ' राम ' नावाचा एक गाडी आहे आणि तो गृहस्थ " राम राम " असा जप करीत बसला आहे ;परंतु परंतु त्याचवेळी त्याचे लक्ष रामाच्या रुपाकडे नसून दुसरीकडेच आहे. त्याच्या मनात त्यावेळी अनेक संसारिक विषय
घोळत आहेत.अशा वेळी जर त्याला एकदम विचारले, कि " तुम्ही कोणाचेनाव घेत आहात ? " तर अर्थात, " रामाचे " असेच उत्तर तो देईल :परंतु हे उत्तर देताना त्याच्या मनात ' दाशरथी राम ' हीच व्यक्ती असणार, ' राम गडी ' हि व्यक्ती अर्थातच नसणार ! याचाच अर्थ असा, कि नाम घेताना रूपाचे ध्यान सूक्ष्म रूपाने आत जागृत असते. म्हणूनच रूप ध्यानी येत नाही म्हणून अडून बसू नये !"श्रीमन्ममहाराजांनी प्राथमिक अवस्तेतील नामधारकांना अशा प्रकारे मोठाच दिलासा दिलेला आहे. श्रीतुकाराम महाराजांनी नामधारकांच्या या अडचणीची कल्पना असावी असे वाटते आणि म्हणूनच ते म्हणतात कि,
" नसे तरी मणी वसे | परी वाचे तरी वसो || "
कारण अगोदरच नामाचे माहात्म्य पाटणे अवघड आणि ते पटले तरी आलास झटकून मुखातून रोज नाम येणे त्याहून अवघड ! अशा परिस्थितीत ते नाम जिभेवर आले आहे हे देखील काही कमी भाग्याचे नव्हे ! नामस्मरण या शब्दातील ' स्मरण ' शब्द लक्षात ठेवून नामाधाराकानी नामाबरोबरच रूपाचे स्मरण करण्यास प्रयत्न अवश्य करायला हवा. कारण असे झाले तरच नामाचे अनुभव लवकर येतील यात शंका नाही.यासाठी एक युक्ती साधकांनी करून पहावी.
ती अशी कि नामस्मरणाला बसण्यापूर्वी प्रथम आपल्या इष्टदैवताच्या मूर्तीकडे किंवा तसबिरीकडे बराच वेळ एकाग्रतेने
पाहावे, नंतर डोळे मिटून ती मूर्ती डोळ्यापुढे आणण्याचा प्रयत्न करावा. शक्य तर जपापुर्वी मानास्पुजाही करावी. त्या योगे जप करताना इष्टदैवताची मूर्ती डोळ्यासमोर राहील. हे करताना प्रथम इष्टदैवताच्या मूर्तीच्या पायाकडे
टक लावून पहावे. नंतर एकेका अवयवावरनामाचे स्मरण करीत हळूहळू दैवताच्या मुखाकडे यावे, प्रथम मूर्तीच्या डोळ्यावर, नासिकेवर दृष्टी टाकीत नंतर हास्यमुखावर आणि त्यानंतर मंदहास्यावर आणि अखेर त्या मंद हास्यातील अवर्णतीय आनंदावर वृत्तीधारणा स्थिर करीत आपणही आनादामय होऊन जावे. अशा प्रकारचा
अभ्यास काही दिवस करीत राहिल्यास मनाची बाहेर भटकण्याची वृत्ती हळूहळू कमी होऊन ते अंतर्मुख होईल आणि
मग नामसाधनेचे दिव्य अनुभव साधकाला आपोआप प्राप्त होतील.म्हणून ' नामोच्चारण ' आणि ' नामस्मरण ' या
दोहोतील फरक नित लक्ष्यात घेऊन साधकांनी नामोच्चारणाऐवजी ' नामस्मरण ' कसे होईल याकडे लक्ष पुरविणे आवश्यक आहे.
कारण नामोच्चारणाला संत एकनाथ चक्क ' विस्मरण ' च म्हणतात ! प्रसिद्ध संत त्यागराज स्वमींचेही असेच मत आहे.
त्यांना अखंड नामसाधनेच्याद्वारे प्रभूदर्शन झाले होते. आपल्या एका पडत ते म्हणतात, कि " स्मरणाशिवाय केलेल्या
नामसाधनेचा मुळीच उपयोग होत नाही. " कारण तेथे ' विस्मरण 'च आहे. स्मरण असेल तर ते भगवंताचे नसून ते इतर सांसारिक गोष्टीचे आहे. हे विस्मरण अर्थातच उपयोगाचे नाही. नामस्मरणाच्या वेळी इष्टदैवताची मूर्तीच डोळ्यापुढे उभी
राहिली पाहिजे. तसेच, नुसती जड मूर्ती उभी राहून चालणार नाही. ती मूर्ती चैतन्यमय असायला हवी. आणि अशी ती
चैतन्यमय प्रभूची सुहास्ययुक्त मूर्ती आपल्याला आशीर्वाद देत आहे अशी कल्पना करून त्या मूर्तीकडे पहात पहात आपला जप व्हायला हवा ! हे साधू लागले, कि एक दिवस ' नामसमाधी 'ची अवस्था साधकाला प्राप्त होईल आणि त्यावेळी त्याचा जप त्याचा केवळ मुखानेच नव्हे तर त्याच्या रोमारोमातून होऊ लागेल आणि एका विलक्षण आनंदाची दिव्य अनुभूती त्या
साधकाला येईल आणि हे जसजसे अधिकाधिक साधू लागेल त्या प्रमाणात साधकदशेतून सिधावास्थेकडे साधकाचे मार्गक्रमण सुरु होईल. जे सिद्ध असतात त्यांना मुद्दाम नामरूपाचा मेळ घालावा लागत नाही. कारण त्यांचे नाम सतत चालू असते आणि रूप तर कायमच डोल्याप्य्ध्ये असते ! हि अवस्था हनुमंताला प्राप्त झाली होती. त्याच्या रोमारोमात एकाच राम भरून राहिला होता! हि अवस्था अनेक संतानाही प्राप्त झाली होती.महात्मा गांधी यांनी एकदा असे सांगितले होते, कि " मी व्यवहारात काहीही करीत असलो तरी रामनामाचा तंबोरा माझ्या हृदयात सतत वाजत असतो. " हि फार उच्च
अवस्था आहे आणि हि अवस्था प्राप्त झाल्यामुळेच ते 'महात्मा ' बनले !
श्री ब्रम्हचैतन्य महाराजांची अशीच गोष्ट आहे.एकदा एक डॉक्टर त्यांची प्रकृती तपासण्यासाठी आले. त्यावेळी
त्यांनी ' स्टेथोस्कोप ' त्यांच्या छातीला लावला आणि त्यांचे डोळे आश्चर्याने विस्फारले गेले. कारण ' स्टेथोस्कोप
'मधून त्यांना हृदयाचे स्पंदन ऐकू येण्याऐवजी चक्क " श्रीराम जय राम जय जय राम " असा त्रयोदशाक्षरी मंत्रच ऐकू आला ! या अवस्थेलाच ' नामसमाधि ' असे नाव आहे. संत चोखामेळा
यांची हि गोष्ट अशीच सांगतात. त्यांच्या कलेवरातूनही विठ्ठलनामाचा ध्वनी ऐकू येत होता ! उमडीचे महान सत्पुरुष श्रीभाऊसाहेब महाराज उमदीकर यांनी देह ठेवल्यानंतर देखील त्यांच्या अस्थीतून कितीतरी वेळ रामनामाचा ध्वनी लोकांना ऐकू आला व त्याचा उल्लेख गुरुदेव रानडे यांना पाठविलेल्या एका पत्रात शियेअंबूरावमहार
ाजांनी आवर्जून केला होता !
अशा प्रकारे नामोच्चारण-नामस्मरण आणि शेवटी नामसमाधि अशा या तीन महत्त्वाच्या अवस्था असून नामसाधकांनी अखेरची अवस्था प्राप्त करून घेण्यसाठी स्वताच्या प्रयत्नाबरोबर भगवत्कृपेची भगवंताची प्रार्थना करणेही तितकेच आवश्यक आहे ! त्याचप्रमाणे भगवंतावर आणि आपण जे नाम घेतो त्यावर पूर्ण श्रद्धा असणे हेही तितकेच
महत्त्वाचे आहे.
|| श्री राम जय राम जय जय राम ||
|| जय हनुमान|| 

🌼🌼🌼एक बोध कथा...🌼🌼🌼


वाल्मिकी ऋषींनी 'रामायण " लिहून पूर्ण केले .त्यांनी ते देवर्षी नारदाना वाचायला दिले . नारदांनी ते वाचून सांगितले कि " हनुमान " रचित रामायण , हे तुमच्या रामायणा पेक्षा खूप सुंदर आणि भक्तिपूर्ण आहे. वाल्मिकी म्हणाले , " काय ? त्या माकडाने पण रामायण लिहिले आहे ? " वाल्मिकींना हे आवडले नाही. मग, कोणाचे रामायण चांगले आहे ? हि जिज्ञासा त्यांना स्वस्थ बसू देईना ..ते हनुमानाच्या शोधात फिरू लागले . 
शोधता शोधता ते कर्दळी वनात, केळ्यांच्या बागेत आले . तेथील सात मोठ्या केळीच्या पानांवर रामायण कोरलेले त्यांनी पाहिले . त्यांनी ते संपूर्ण वाचले . त्यांनाही ते खूप भावले . अगदी योग्य शब्द , व्याकरण, व्याप्ती, भाषेचा ओघ, व ओघवती रसाळ भक्तिपूर्ण रचना ह्यांनी ते नटलेले होते. वाल्मिकींना ते सहनच झाले नाही . ते रडू लागले , ते स्वतःला आवरू शकले नाहीत.
"एवढे वाईट आहे का ?" हनुमानाने मागून विचारले. वाल्मिकी म्हणाले, " खूप सुंदर आहे ." हनुमान म्हणाले ," मग, तुम्ही का रडत आहात ? " वाल्मिकी म्हणाले ," आता, तुझे रामायण वाचल्यावर माझे रामायण कोणीही वाचणार नाही ".
हे ऐकल्यावर हनुमानाने ती सातही केळीची पाने फाडून टाकली ..चला, आता कोणीही हनुमानाचे रामायण वाचणार नाही .
हनुमान म्हणाले, माझ्या रामायणा पेक्षा तुम्हाला तुमच्या रामायणाची गरज आहे . जगात लोकांनी तुम्हाला वाल्मिकी म्हणून ओळखावे म्हणून तर तुम्ही रामायण लिहिले . माझे तसे नाही . मला माझा राम माझ्या सोबत सतत हवा म्हणून मी रामायण लिहिले .
त्याच क्षणी वाल्मिकींना जाणीव झाली कि मी एका हव्यासा पोटी रामायण लिहिले पण मला राम हा समजला च नाही . मी एका इर्षेपोटी रामायण लिहित गेलो, ते सत्य जगाला सांगण्याच्या गुर्मीत रामाला विसरून गेलो. मी रामायण लिहिले ते माझ्या तल्या "मी" ला सुखावण्या साठी , ती माझी महत्वाकांशा होती . हनुमानाने रामायण लिहिले ते त्याच्या " रामावरील भक्तिपोटी " . राम त्याचा सर्वस्व आहे आणि म्हणूनच ते जास्त सुंदर आहे .
" रामा " पेक्षा रामायण मोठे नाही. ज्याला राम कळला त्याला रामायण समजले कि नाही ह्याचा काहीच फरक पडत नाही .
श्री राम जय राम जय जय राम ..!!!
Image result for ram bhakt hanuman


|| श्री राम जय राम जय जय राम ||

|| जय हनुमान|| 
हनुमान जी एक मात्र ऐसे देवता है जिनका वास अभी भी पृथ्‍वी पर ही है. बल, बुद्धि, विद्या और धन प्राप्त करने के लिए भगवान हनुमान की श्रद्दाभाव से पूजा करनी चाहिए. श्रीराम का पूजन करने से हनुमान अपनी पूजा से कहीं अधिक प्रसन्न होते हैं. जो भी साधक श्रीरामचरितमानस का पाठ करता है उसपर हनुमान जी की विशेष कृपा बरसती है. हनुमान जी की कृपा पाने के लिए श्रीराम स्तुति का गायन प्रतिदिन करना चाहिए. इसके साथ ही मंगलवार और शनिवार को हनुमान चालीसा और रामचरितमानस के सुंदरकांड का पाठ करने से हनुमान जी अत्यंत प्रसन्न होते हैं. सर्वविदित है कि राम की पूजा से हनुमान जी अपनी कृपा बरसाते हैं !
अगर आप हनुमानजी के भक्त हैं तो आपके लिए मंगलवार और शनिवार बहुत खास दिन हैं. कुछ आसान उपायों से हनुमान जी को सहजता से प्रसन्न किया जा सकता है ~~ प्रतिदिन सुबह-सुबह पीपल के कुछ पत्ते तोड़ लें और उन पत्तों चंदन या कुमकुम से श्रीराम नाम लिखें. इसके बाद इन पत्तों की माला या पत्ते हनुमान जी को अर्पित करें !
पीपल के पेड़ में जल डालें और उस पेड़ की सात परिक्रमा करें. इसके बाद पीपल के पेड़ के नीचे बैठकर हनुमान चालीसा का पाठ करें.
कार्य में आ रही बाधाओं को दूर करने के लिए किसी सिद्ध हनुमान मंदिर में एक नारियल लेकर जाएं. मंदिर में हनुमानजी की प्रतिमा के सामने नारियल को अपने सिर पर सात बार रखें. इस बीच हनुमान चालीसा का पाठ करते रहें. फिश्र उस नारियल को हनुमान जी के सामने ही फोड़ दें, सभी बाधाएं दूर होंगी.
रात में किसी हनुमान मंदिर जाएं और वहां प्रतिमा के सामने चौमुखा दीपक लगाएं. चौमुखा दीपक को चार ओर से जलाना है. उीपक जलाकर हनुमान चालीसा का पाठ करें. ऐसा प्रतिदिन करने से बड़ी से बड़ी समस्या से निजात मिल जायेगी और आप धनवान हो जायेंगे.
सिंदूर चढ़ाने से हनुमान जी काफी प्रसन्न होते हैं. हनुमानजी को सिंदूर और तेल अर्पित करें. श्रीराम प्रभु की लंबी आयु के लिए एक बार हनुमान जी ने अपने पूरे शरीर पर सिंदूर लपेट लिया था, तभी से हनुमान जी को सिंदूर चढ़ाया जाता है. सिंदूर अर्पित करने वाले की सभी इच्छाएं पूर्ण होती हैं. 


Image may contain: 2 people

Thursday, 19 January 2017

🌼🌼🌼वृक्ष तुकाराम बीज 🌼🌼🌼


देहू येथील नांदुरकी वृक्ष हलण्यामागील अध्यात्मशास्त्र आणि
त्याविषयीच्या घटनेमागील पार्श्वभूमी
(दैनिक सनातन प्रभात २५-३-२०१६)
१. देहूला वैकुंठ गमन केलेल्या स्थानी असलेला वृक्ष तुकाराम
बीज या दिवशी बरोबर दुपारी १२:०२ वाजता हलणे
देहूला संत तुकाराम महाराज जेथून वैकुंठाला गेले, त्या
स्थानावर आजही एक वृक्ष आहे. त्याचे नाव नांदुरकी. आजही
तो तुकाराम बिजेला बरोबर दुपारी १२:०२ वाजता
तुकोबाराया वैकुंठाला गेले, त्या वेळी प्रत्यक्ष हलतो आणि
याची अनुभूती सहस्रो भक्तगण घेतात.
२. प्रत्येक गोष्टीचे उत्तर अध्यात्मात असते; कारण अध्यात्म हेच
एकमेव असे परिपूर्ण शास्त्र असणे
प्रत्येक गोष्टीचे उत्तर अध्यात्मात असते; कारण अध्यात्म हेच
एकमेव असे परिपूर्ण शास्त्र आहे. देवाच्या भक्तीमुळे संत
विश्वमन आणि विश्वबुद्धी यांच्याशी, म्हणजेच ईश्वरी
मनाशी आणि बुद्धीशी एकरूप झालेले असल्याने संतांना सर्व
ज्ञात असते, असे म्हटले जाते; कारण ईश्वरी बुद्धीला सर्वच
माहीत असते. नांदुरकी वृक्षाचे मिळालेले ज्ञानही याला
अपवाद नाही. भक्त प्रार्थना करतात, त्या वेळी ईश्वर त्यांना
त्याचे विचार सुचवतो. हे विचार भक्ताकडून लिहिले जातात,
यालाच ईश्वरी ज्ञान म्हणतात. गुरुकृपेमुळे अशाच मिळालेल्या
ईश्वरी ज्ञानातून तुकाराम बिजेच्या दिवशी नांदुरकी वृक्ष
हलण्याविषयी मिळालेले विचार येथे लिहिले आहेत.
३. देहूला वैकुंठगमन केलेल्या स्थानी असलेला वृक्ष तुकाराम
बिजेच्या दिवशी बरोबर दुपारी १२:०२ वाजता हलण्यामागील
अध्यात्मशास्त्र
३ अ. वैकुंठगमन केलेल्या स्थानी श्रीविष्णुतत्त्वाशी संबंधित
क्रियाशक्ती तेथील भूमीमध्ये भोवर्याच्या स्वरूपात कार्यरत
असणे : देहूला वैकुंठगमन केलेल्या स्थानी विष्णुतत्त्वाशी
संबंधित क्रियाशक्ती तेथील भूमीमध्ये भोवर्याच्या स्वरूपात
कार्यरत आहे. त्यामुळे त्या स्थानाला अनन्यसाधारण महत्त्व
आहे. तसेच स्थळ, काळ आणि वृक्ष हलण्याचा तो क्षण यांच्या
एकत्रित संयोगाने भूगर्भातील शक्ती कार्यरत होते अन्
वैकुंठातील विष्णु-ऊर्जा स्थळाला १२.०२ मिनिटांनी स्पर्श
करते. त्याचवेळी विष्णुतत्त्वात्मक प्रकट ऊर्जेचे भूमीवर अवतरण
होते आणि त्यामुळे या ऊर्जेच्या स्पर्शाने वृक्षाची पाने
हलतांना दिसतात.
३ आ. भक्तांच्या आणि लाखो वारकर्यांच्या श्रद्धेपायी
श्रीविष्णूची क्रियाशक्तीनामक काळऊर्जा तुकाराम
बिजेच्या दिवशी विशेष साक्ष देण्यासाठी वैकुंठलोकातून
बरोबर दुपारी१२.०२ वाजता भूमीच्या दिशेने येणे आणि हे
एकप्रकारे श्रीविष्णूच्या क्रियाऊर्जेचे भूमीवरील अवतरणच
असणे : नांदुरकी वृक्ष हलणे, यामागे स्थळमहात्म्य
असण्याबरोबरच काळमहात्म्यही आहे. येथे स्थळ आणि काळ या
दोन्ही ऊर्जांचा संगम झालेला आहे. तुकाराम महाराजांनी
बरोबर दुपारी १२.०२मिनिटांनी वैकुंठगमन केले. या दिवशी
स्थळाशी संबंधित जी ऊर्जा वैकुंठलोकातून खाली आली, ती
तेथेच, म्हणजे नांदुरकी वृक्षाच्या ठिकाणी घनीभूत झाली;
कारण या वृक्षाच्या ठिकाणीच तुकाराम महाराज आणि सर्व
समाजमंडळी एकत्रित जमली होती. श्रीविष्णूचा वैकुंठलोक
हा क्रियाशक्तीशी संबंधित आहे. आजही या ठिकाणी
भूगर्भात ही ऊर्जा सूक्ष्म भोवर्याच्या रूपात वास करत आहे.
अजूनही भक्तांच्या आणि लाखो वारकर्यांच्या श्रद्धेपायी
वैकुंठलोकातून ही काळऊर्जा तुकाराम बिजेच्या दिवशी
विशेष साक्ष देण्यासाठी वैकुंठलोकातून बरोबर दुपारी१२.०२
वाजता भूमीच्या दिशेने येते. हे एकप्रकारे श्रीविष्णूच्या
क्रियाऊर्जेचे भूमीवरील अवतरणच असते.
३ इ. ज्या वेळी ही काळाच्या स्तरावरील ऊर्जा भूमीतील
स्थळविषयक ऊर्जेला बरोबर दुपारी १२.०२ मिनिटांनी स्पर्श
करते, त्या वेळी नांदुरकी वृक्ष आपादमस्तक हलतो. त्याचे हलणे
आपल्याला पानांच्या हलण्याच्या रूपात दिसते.
३ ई. नांदुरकी वृक्ष हलतो, याची प्रत्यक्ष प्रचीती आम्हाला
घेता येणे : याचा अनुभव आम्ही प्रत्यक्ष घेतला आहे. भारतातील
संतपरंपरा आणि या परंपरेच्या रूपाने वर्षानुवर्षे
भक्तकल्याणासाठी देव देत असलेली ही अवतरण साक्ष किती
महान आहे, याचीच आम्हाला या वेळी प्रत्यक्ष प्रचीती घेता
आली. याचे आम्ही चित्रीकरणही केले आहे.
३ उ. नांदुरकी वृक्ष हलतो, त्या वेळी भोवतीचे वातावरणही
स्तब्ध होणे : या वेळी भोवतीचे वातावरणही स्तब्ध होते.
जणुकाही इतर पशु-पक्षी, झाडेही हा क्षण बघण्यासाठी आतुर
झालेले असतात. ते आपल्या सर्व हालचाली थांबवून स्तब्ध
झालेले असतात, असे वाटते.
३ ऊ. वैकुंठलोकातून येणारी काळऊर्जा भूमीवर अवतरीत
झाल्याने नांदुरकी वृक्ष हलणे : तुकाराम महाराज वैकुंठाला
गेले. त्या वेळेपासून भूमीत घनीभूत झालेल्या स्थळविषयक
क्रियाशक्तीच्या भोवर्याला बरोबर तुकाराम बिजेदिवशी
वैकुंठलोकातून येणारी काळऊर्जा ज्या वेळी स्पर्श करते, त्या
वेळीच याची साक्ष म्हणून हा वृक्ष हलतो.
- (पू.) सौ. अंजली गाडगीळ, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय,
गोवा.

Sunday, 15 January 2017

श्री. गणपतीअथर्वशीर्ष म्हणजे काय?–
गणेशाच्या ज्या स्तोत्राला सर्वाधिक लोकप्रियता मिळाली ते महान स्तोस्त्र गणपती अथर्वशीर्ष होय! गणपती अथर्वशीर्ष असे का म्हटले आहे? जे गणपती उपनिषद् आहे ते अथर्ववेदाचे, अथर्वण वेदाचे आहे असे परंपरेने मानले आहे. वेद हे शब्द्ब्रह्म आहे आणि ते शब्दब्रह्म अपौरूशेय आहे, हाही खुलासा आपण प्रारंभी केला. आता समजावून घ्या, की हे "अथर्वशीर्ष" आहे. त्याला याच नावाने का सम्बोधिले जाते? दुसरे नाव का दिले जात नाही? वस्तुत: गणपती अथर्वशीर्ष असे नाव का प्रस्तुत झाले? आणि ते इतके लोकप्रिय का झाले? सर्वांनी त्याला शिरोधार्थ का केले?
महाराष्ट्रात घरोघरी गणपती अथर्वशीर्ष म्हणतात. पण सगळ्यांनाच गणपती अथर्वशीर्ष या शब्दाचा अर्थ माहीत असेलच असे नाही. आपण समजावून घेऊ. काय अर्थ आहे? गण-पती कोण आहे ते आपण पहिले. गणांचा जो पती (म्हणजे शंकराने जे जे प्रगट केलेले आहेत,) त्यांचा तो अधिपति आहे. याचा अर्थ आपल्या लक्षात आला का पहा. शंकराला "भूतेश" असे म्हटले. भूतांचा तो ईश आहे. त्याने कोणते गण प्रकट केले? भूत, पिशाच्च, त्याच्या भोवती नाचत असतात असे म्हटले आहे. पण त्यालाही काही लक्षणार्थ आहे. सगळ्याच गोष्टी वाच्यार्थाने घ्यायच्या नसतात.
टिळक रस्ता टिळक स्मारक मंदिरावरून जातो, याचा लक्षणार्थ घ्यायचा असतो. कुणी टिळक स्मारक मंदिरावर चढून जर बघायला लागले तर काय करणार? त्याच्यातला लक्षणार्थ स्वीकारायचा असतो. मग तो लक्षणार्थ काय आहे? हे जे सगळे भूतगण आहेत ना ते गण कोणते? ते अनंत विद्यांचे आणि अनंत कलांचे आहेत. कारण सर्व कला, सर्व विद्द्या, सर्व शास्त्रे शंकरापासून निघालेली आहेत. नृत्य त्यानेच दिले. अभिनय त्यानेच दिला. संगीत त्यानेच दिले आहे. तांडव करून "लय" काय असते तेही त्यानेच प्रकट केले आहे. व्याकरणासारखी अवघड शास्त्रे हे देखील त्याच्यापासून निर्माण झालेली आहेत. मग तो शंकर असे विविध शास्त्रांचे, विविध ज्ञानांचे, कलांचे गण प्रकट करत असतो. त्या सगळयांचे आधिपत्य कुणाकडे असेल तर ते "गणेशाकडे" आहे. कारण सगळी विद्द्या, सगळ्या कला, ते सगळे गण तो आपल्या ठायी धारण करतो आणि त्यांचा तो अधिपति होतो. म्हणून तो गणपती आहे. त्याचा समास दोन प्रकारे सोडवता येईल. गणांचा पती म्हणता येईल. म्हणजे षष्ठी तत्पुरुष समास झाला आणि गणपती असेही म्हणता येईल. म्हणजे गणांचा तर पती आहे, पण गणरूपी आहे. म्हणजे ज्ञान, सगळ्या कला, सगळ्या विद्द्या, सगळी शास्त्रे, त्याने धारण केली आहेत असा त्याचा अर्थ होतो. म्हणून तो गणरूपी पती होतो.
असा हा गणपती, त्या गणपतीचे अथर्वशीर्ष ! "शीर्ष" हा शब्द हेतू पूर:स्पर योजलेला आहे. कारण असे आहे की सगळ्या अवयवानमध्ये 'शीर्ष' प्रधान आहे. कारण तिथे बुध्दी आहे. बुध्दीशिवाय माणसाला निर्णय करता येत नाही. बुध्दिशीवाय निश्चय करता येत नाही. बुध्दी शिवाय मनुष्य सत्कर्म करायला प्रवृत्त होत नाही. बुध्दी शुध्द झाल्याशिवाय आत्मसाक्षात्काराचा मार्ग मानवाला दिसत नाही, ईश्वराचे निर्गुण आणि सगुण रूप उलगडत नाही.
थर्व म्हणजे चंचलता. चंचलता आहे तोवर सात्विक यज्ञ, तप, दान घडू शकत नाही. मन, शीर्ष, हे अथर्व करायचे असेल म्हणजे त्यातील चंचलता घालवायची असेल तर अभ्यास, वैराग्य धारण करून उपासना करा. कारण उपनिषदांनी आम्हाला सांगितले आहे की ब्रह्मविद्द्येचा पाया, अधिष्ठान कोण असेल तर तप आहे, शुचिता आहे, उपासना आहे. ही उपासना ॐकाराची करायला सांगितली आहे. ॐकार आणि गणेश यांच्यामध्ये तादृष् काही फरक नाही. म्हणून ज्यावेळी ॐकाराची उपासना आप्ण करतो त्यावेळी थर्वता म्हणजे सगळी चंचलता जाते.
संतांनी आम्हाला हेच सांगितले, तुकाम्हणे मना पाहिजे अंकुश| नित्य नवा दिस जागृतीचा||
तो "जागृतीचा नवा दिस" जर आपल्या चित्तामध्ये आणि प्रत्यक्ष व्यवहारामध्ये उजाडायला हवा असेल तर आपणॐकाराची उपासना करायला प्रारंभ केला पाहिजे. "अथर्वशीर्ष" म्हणजे बुध्दिचा अंकुश लावून मनाची चंचलता घालवणे. मनाला स्थिर करणे. मग मनुष्य आत्मोन्नतिकडे झेपावेल. उपासनेची दृढ बैठक त्याला लाभेल आणि मग त्या अथर्वशीर्षरूपी उपासने मधून गणपतीचे, गणेशाचे साक्षात दर्शन उपासकाला घडेल. जे बध्द आहेत ते मुमुक्षु होतील, जे मुमुक्षु आहेत ते साधक होतील, आणि जे साधक आहेत त्यांची सिध्दावस्थेमध्ये परिणती होईल, एवढे सामर्थ्य या अथर्वशीर्षामध्ये आहे. महापापापासून, महावीघ्नांपासून उपासकाची मुक्तता होईल असे आश्वासन अथर्वशीर्षाच्या फलस्वरूपामध्ये दिले आहे.
"महावीघ्नात्प्रमुच्यते |महापापात्प्रमुच्यते |". हे प्रत्यक्ष अथर्वशीर्षात सांगितले आहे. पण केव्हा? बुध्दिचा अंकुश लागला आणि चंचलता नाहीशी झाली की मगच! माणसाची बुध्दी, मन, चित्त, अंत:करण, चतुष्टय स्थिरावले, की मग हा मार्ग दिसायला लागेल आणि गणपतीचे साक्षात दर्शन आपल्याला घडेल अशी ग्वाही गणकऋषींनी आपल्याला दिली आहे. म्हणूनच या उपनिषदाला नाव पडले आहे
श्री.गणपतीअथर्वशीर्ष!

Wednesday, 4 January 2017

🌼🌼🌼Chess is for mind fitness  🌼🌼🌼

बुद्धिबळ मनाच्या तंदुरुस्तीसाठी
शरीराच्या फिटनेसबरोबर मनाची तंदुरुस्ती महत्त्वाची! कारण आपल्याला माहिती आहे की, शारीरिक आजारांमुळे मनावर गंभीर परिणाम होतात तर पुष्कळ वेळा मन:स्वास्थ्य बिघडल्याने त्याने शारीरिक आजार होतात. तेव्हा या दुष्टचक्रातून बाहेर पडायचं तर मनाला विचारांची योग्य दिशा देणं महत्त्वाचं! एकदा विचार योग्य प्रकारे विवेकबुद्धीनं करता येऊ लागला की मनाविरुद्धच्या कोणत्याही स्थितीत आपण अतिरेकी विचार करत नाही. परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी पर्याय शोधतो. सध्या आपण आलेल्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी किती पर्यायांचा विचार करतो? जास्तीत जास्त ४-५ किंवा ७-८ याच्यावर आपण पर्यायांचा विचार करतच नाही. पण आपण नियमितपणे बुद्धिबळाचा खेळ खेळला तर आपण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी किमान ५० हून अधिक पर्यायांचा नक्कीच विचार करू. बुद्धिबळ हा खेळ ५ वर्षांच्या बालकापासून ८५ वर्षांच्या वृद्धापर्यंत कुणीही खेळू शकतो. दिवसातून एकदा तरी हा खेळ जरूर खेळावाच. प्रत्यक्ष जोडीदार स्पर्धक घरातल्यापैकी कुणाला तरी घ्यावं किंवा मोबाइल अॅप्स, इंटनेटवर प्रतिस्पध्र्याशी खेळावं. फक्त संगणकाबरोबर खेळू नये. त्या खेळाचा फायदा-अनेक पर्यायांचा त्यातील फायद्या तोटय़ांचा विचार करून ठरावीक कालावधीत अचूक निर्णय घेणं हे या खेळातून आपल्याला साधतं हे महत्त्वाचं! बुद्धिबळ खेळामध्ये प्रत्येक खेळी खेळताना (मूव्ह) ती किती प्रकारांनी करता येते? या विषयी माहिती देताना अहमदनगर येथील न्यू आर्टस्, कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेजमध्ये गणित विभागात कार्यरत असलेल्या डॉ. श्रद्धा इंगळे म्हणाल्या, 'गणिती शास्त्रानुसार शास्त्रशुद्ध अभ्यास केल्यास असं दिसून येतं की, या खेळात एका चालीनंतर ४०० वेगवेगळ्या प्रकारच्या चालींचे पर्याय उपलब्ध असतात. तर दोन्ही खेळाडूंनी २ चाली खेळल्यावर ७२,०८४ इतके चालीचे प्रकार उपलब्ध असतात.' म्हणजे पाहा नियमित बुद्धिबळ खेळलं तर वैचारिक क्षमता किती प्रचंड प्रमाणात वाढेल आणि मग कौटुंबिक, करिअर, वैयक्तिक जीवनात कोणतीही गुंतागुंतीची समस्या आली तर मग बुद्धीला, नियमित खेळल्याने सवय झाल्याने समस्याग्रस्त वेळी भावनात्मक विचार न करता त्यावर लॉजिकली विचार करू. आपल्याकडे असलेल्या गोष्टीतून समस्येवर मात करण्यासाठी १००-२०० पर्यायांचा विचार करू शकू. एवढं जर झालं तर समस्येचा आपल्यावर पडणारा ताण निश्चितच कमी होईल. असा ताण कमी होतो, असा खेळाडूंचा प्रत्यक्ष अनुभव आहे. ताणाच्या प्रसंगात बुद्धिबळाचे एक मिनीट, तीन मिनीट असे छोटे डाव खेळल्याने ताणातून मुक्तता होते का? याविषयी स्वानुभव व इतर सहकाऱ्यांचे प्रत्यक्षानुभव यांच्या आधारावर, मुंबईतील एकमेव ग्रॅण्डमास्टर, अर्जुन पुरस्कार विजेते प्रसिद्ध बुद्धिबळपटू प्रवीण ठिपसे म्हणाले, ''मोठय़ा स्पर्धा खेळताना एखादा गेम हरल्यावर दुसऱ्या दिवशीच्या गेमसाठी तयारी करताना हरल्याचे विचार, ताण जाण्यासाठी स्पर्धा झाल्यावर आम्ही एक-एक मिनिटांचे ७-८ गेम्स खेळतो. त्याने लगेच फ्रेश व्हायला होतं. बुद्धिबळ खेळताना इतकी तल्लीनता येते की समजा डोळे दुखत असतील आणि मी बुद्धिबळ खेळायला घेतलं तर काही मूव्हज् झाल्यावर डोळेदुखीची वेदनाच मला जाणवत नाही. अनेक ज्येष्ठ खेळाडूंचाही असाच अनुभव आहे. पूर्वी अनेक खेळाडू असे होते की ज्यांना वैयक्तिक, कौटुंबिक, आर्थिक अडचणी होत्या. पण बुद्धिबळ खेळायला लागले आणि चार-पाच मस्त मूव्हज् केल्या की त्यांना जो आनंद व्हायचा तो बघितला की वाटायचं खरंच त्याच्या आयुष्यात यांना इतक्या समस्या आहेत का? प्रवीण ठिपसे यांच्या पत्नी भाग्यश्री ठिपसे याही महिलांमधील इंटरनॅशनल मास्टर आहेत. प्रवीण ठिपसे म्हणाले, आम्हाला कंटाळा आला, व्यावसायिक ताण असेल तर आम्ही मस्त बुद्धिबळाचे छोटे गेम्स खेळतो आणि एकदम फ्रेश होतो. असा आपल्यामध्ये उत्साह निर्माण करणारा, संयमी वृत्तीनं समस्येवर विविध पर्याय शोधायला शिकवणारा, मनाला आनंद देणारा हा बुद्धिबळाचा खेळ प्रत्येकाने खेळायलाच हवा. खूप वेळ नसेल तर घडय़ाळ लावून अध्र्या तासाचा छोटा खेळ खेळा आणि दिवसभराच्या ताणातून मुक्त व्हा.
 थोडक्यात, तुम्ही तंदुरुस्त राहणं हे तुमच्या हातात आहे, तुम्ही आणि तुम्हीच त्यासाठी वेळ काढायला हवा. खेळ तुम्हाला आनंद देतील. व्याधींमधून, तणावातून मुक्ती देतील. मुख्य म्हणजे तुमचं बालपण परतून येईल. तेव्हा खेळ खेळा, आनंदी जगा.