Saturday, 24 September 2016

अभंग म्हणजे जे कधी हि भंग होत नाहीत असे, जे काळाच्या ओघात नष्ट होत नाहीत असे ...संत तुकाराम महाराज.
आपल्या संतांनी आपल्याला अभंगाद्वारे अनेक ग्रंथ संपत्ती देऊन ठेवली आहे . त्या ग्रंथांचा आपण आदर करून पुरेपूर उपयोग करून आपले जीवन सत्कर्मी लावले पाहिजे.
आपल्या आयुष्यात माहित असलेले गुरु म्हणजे आई ,वडील शिक्षक आणि गुरुच. पण या सर्वांना सोडून आपले गुरु म्हणजे ग्रंथ हि आहेत , जे आपल्याला कोणते न कोणते ज्ञान देताच असतात.
आपण ज्ञान घेण्यासाठी अनेक माध्यमांचा वापर करतो पण आजच्या आधुनिक युगात आपण माहिती ग्रंथामध्ये न शोधता सरळ संगणकातील आंतर्जालातून यालाच इंग्रजी शब्द मध्ये इंटरनेट मधून क्षणातूनच मिळवतो पण हि माहिती कोनिनाकोनी एखाद्या ग्रंथातूनच अथवा ज्ञानकोशाचे वाचन करून संगणकातील अंतर्जालात टाकलेली असते .
ग्रंथ हे आपल्याला अमाप ज्ञान देतात त्यासाठी ते आपल्याकडून त्याचे मूल्य त्याचा मोबदला मागत नाही . हिंदू धर्मात सर्वात मोलाचे स्थान ते देवाला व आपल्या पवित्र ग्रंथ भगवद गीतेला . आणि म्हणूनच सर्वात मूल्यवान हा ग्रंथच आहे . त्याच पध्दतीने आयुर्वेदात मोलाचा ग्रंथ चरक संहिता हा पण ग्रंथच आहे . प्रत्येक धर्माचा पवित्र एकनाएक ग्रंथच आहेत म्हणून ग्रंथ हेच आपले गुरु आहेत म्हणून हा बोध ग्रंथासाठी हि होतो .
गुरुर ब्रम्हा गुरुर विष्णु गुरुर देवो महेश्वरा ।
गुरुर साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः ।
🌼🌼🌼स्टीव्ह जॉब्स यांनी २००५ साली सत्र प्रारंभ होताना स्टॅनफोर्ड विद्यापिठात केलेले भाषण. 🌼🌼🌼
जगातील एका सर्वोत्तम विद्यापिठाच्या सत्राचा प्रारंभ होत असताना मी आज इथे उपस्थित आहे हा माझा सन्मान आहे. खरं सागांयचे तर कॉलेज पदवीच्या इतक्या जवळ जाण्याची माझी ही पहिलीच वेळ आहे. आज मला तुम्हाला माझ्या आयुष्यातील तीन गोष्टी सांगायच्या आहेत. होय, फक्त तीन गोष्टी, त्यापलिकडे काही नाही. फक्त तीन गोष्टी.

पहिली गोष्ट आहे घटनांचे अर्थ शोधण्याची धडपड करण्याची.

रीड कॉलेजमधून पहिल्या ६ महिन्यानंतरच मी ड्रॉप आऊट झालो. पण नंतर १८ महिने मी तिथेच ड्रॉप-ईन म्हणून राहिलो व मगच पूर्णपणे कॉलेजला राम राम ठोकला. 

माझ्या जन्माआधीपासून याची सुरवात झाली होती. माझी जन्मदात्री आई एक तरूण, अविवाहीत कॉलेज विद्यार्थिनी होती. तिने मला दत्तक द्यायचे ठरवले. ती स्वत: पदवी अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी होती, त्यामुळे तिला अगदी ठामपणे वाटत होते मला कोणा पदवीप्राप्त व्यक्तीनेच दत्तक घ्यावे. माझा जन्म झाल्याबरोबर एक वकील व त्याची पत्नी मला दत्तक घेतील अशी व्यवस्था करण्यात आली होती.  फक्त माझा जन्म झाला आणि त्या जोडप्याने अगदी शेवटच्या घटकेला ठरवले, नाही त्यांना मुलगी हवी आहे.  प्रतीक्षायादीवर जे पुढील जोडपे होते त्यांना मग भर मध्यरात्री फोन करण्यात आला व विचारण्यात आले, “आमच्याकडे एक मुलगा दत्तक देण्यासाठी उपलब्ध आहे; तुम्हाला हवा आहे का?” ते म्हणाल, “अर्थातच, हवा आहे.” त्यांनी मला दत्तक घेतले.   माझ्या जन्मदात्या आईच्या नंतर लक्षात आले मला दत्तक घेणारी माझी आई कॉलेज पदवीधर नाही तर वडिलांचे तर शालेय शिक्षणही पूर्ण झालेले नाही.  जन्मदात्या आईने दत्तकपत्राच्या करारावर सही करायला नकार दिला. काही महिन्यानंतर माझ्या दत्तक माता-पित्यानीं मला कॉलेजमध्ये पाठवण्यात येईल असे आश्वासन दिले तेव्हाच माझ्या जन्मदात्या आईने मला दत्तक द्यायचे मान्य केले. 

आणि १७ वर्षांनंतर मी कॉलेजमध्ये दाखल झालोच.  पण मूर्खपणे, मी स्टॅनफोर्डइतक्याच एका महागड्या कॉलेजची निवड केली.   कामगारवर्गातील माझ्या आई-वडिलांची सगळी बचत माझ्या कॉलेज फीसाठीच खर्च व्हायला लागली.  सहा महिन्यानंतर त्या शिक्षणात मला काही अर्थ दिसेना. आयुष्यात पुढे काय करायचे मला माहित नव्हते आणि कॉलेज शिक्षणाचा काय उपयोग होईल तेही कळत नव्हते.  आणि तरीही मी माझ्या पालकांची आयुष्यभराची सर्व कमाई त्यावर खर्च करत होती. त्यामुळे मी ठरवले आपण ड्रॉप आऊट होऊ आणि होईल सगळे काही ठीक. खरे तर त्यावेळेस ही खूप चिंता करण्यासारखी स्थिती होती. पण आता मागे वळून बघताना वाटतं, मी घेतलेला हा एक अगदी उत्तम निर्णय होता.   ड्रॉप आऊट झाल्याबरोबर मला स्वारस्य नसलेल्या वर्गांना उपस्थित राहणे बंद केले आणि ज्यात मला इंटरेस्ट वाटत होता अशा वर्गांना उपस्थित राहू लागलो. 

अर्थात नंतरचे दिवस खूप सुखाचे व सरळ सोपे नव्हते.   वसतीगृहात खोली नसल्याने मला मित्राच्या खोलीत जमिनीवर झोपावे लागे.   कोकच्या बाटल्या परत करून जे डिपॉजीट म्हणून ठेवलेले पैसे परत मिळत त्यातून मी माझा जेवणाचा खर्च भागवत असे.  आठवड्यातून एकदा तरी भरपेट जेवण मिळावे म्हणून मी दर रविवारी रात्री गावातील हरे कृष्ण मंदिरात जात असे, तेही ७ मैल चालत. पण या अडचणी असूनही मला ही स्थिती जास्त भावत होती.  माझी जिज्ञासा आणि अंत:प्रेरणा जो मार्ग मला दाखवत होते, त्याच दिशेने मी जात होतो. आणि त्या प्रवासात जे माझ्या हाती लागले ते नंतर अतिशय अनमोल ठरले. एक उदाहरण देतो: 

रीड कॉलेजमध्ये तेव्हा कॅलिग्राफीचे एकदम उत्तम शिक्षण मिळायचे.  कॉलेज परिसरातील प्रत्येक पोस्टर, प्रत्येक ड्रॉवरवरचं प्रत्येक लेबल हातानी लिहिलेल्या सुंदर कॅलिग्राफीने सजलेले असायचे. ड्रॉप आऊट असल्याने मला आधीच्या विषयांच्या वर्गांना उपस्थित राहण्याची आवश्यकता नव्हती.   मी मग कॅलिग्राफीच्या वर्गांना हजर राहायचे ठरवले.   इथे मला सेरीफ व सॅन सेरीफ टाईपफेसेस म्हणजे काय ते कळले (टीप: अक्षरांच्या टोकांवर रेष देऊन ते ठळक करणे म्हणजे सेरीफ व तसे न करणे म्हणजे सॅन सेरीफ. उदा: मराठी लिहिताना अक्षरांच्या डोक्यावर रेष न काढणे सॅन सेरीफ म्हणता येईल.) तसेच वेगवेगळ्या अक्षरांसाठी मध्ये जागा सोडताना ती कशी कमी जास्त करायची ते कळले. खूप चांगली टायपोग्राफी खूप चांगली कशामुळे होते ते मला कळले. कॅलिग्राफी जणू माझ्यावर मोहिनी घातली.   ते शिकणे छान होते, त्याला ऐतिहासिक संदर्भ होता कलात्मकदृष्ट्या ते इतके तरल होते, विज्ञानाची तत्वांत त्याला जखडता आले नसते. 

यापैकी कशाचाच माझ्या आयुष्यात उपयोग होईल अशी शक्यता नव्हती. पण नंतर दहा वर्षांनी आम्ही आमचा पहिला मॅकिनटॉश संगणक डिझाईन करायला घेतला तेव्हा हे माझ्या उपयोगी पडले. हे सर्व आम्ही आमच्या मॅकमध्ये घेतले.   सुंदर टायपोग्राफी असलेला हा पहिलाच संगणक होता.   जर मी ड्रॉप आऊट झालो नसतो तर मॅकमध्ये अनेक टाईपफेस आलेच नसते किंवा प्रमाणबध्द अंतर राखून असलेले फॉन्टही त्यात नसते.  आणि विंडोजने मॅकची फक्त कॉपी केली. बहुधा स्वत:हून अशी सोय करायचे त्यांना सुचले नसते, म्हणजे जगातील कोणत्याच संगणकात ही छान सोय मिळाली नसती. जर मी ड्रॉप आऊट झालो नसतो तर मी कॅलिग्राफीच्या वर्गांना हजर राहिलो नसतो आणि पर्सनल कॉम्पुटरमध्ये आज जी टायपोग्राफीची सुंदर सोय आहे ती मिळालीच नसती. अर्थात मी कॉलेजमध्ये होतो तेव्हा यामुळे भविष्यात असा फायदा होईल असा अर्थ लावणे शक्य नव्हते. पण दहा वर्षांनी मागे बघताना मात्र ते सुस्पष्ट होते. 

हा माझा मुद्दा पुन्हा स्पष्ट करतो, पुढे आयुष्यात काय घडेल, त्याचा विचार करत आपण आपल्या आयुष्यात आज घडणार्‍या घटनांची सुसंगती लावू नाही शकत. पण मागे ज्या घटना घडून गेल्या त्या आधारे आपल्या आजच्या आयुष्याचा अर्थ लावू शकता. म्हणजे ज्या घटना घडत आहेत, त्याचा तुमचे भविष्य घडवण्यासाठी पुढे उपयोग होईल असा विश्वास तुमच्यात हवा. तुमची जिद्द, नियती, आयुष्य, कर्म कशावर तरी तुमचा विश्वास हवा. हा दृष्टीकोन असल्यामुळे निराशा कधी माझ्या वाट्याला आली नाही, आणि हा दृष्टीकोन असल्यानेच माझ्या आयुष्यात चांगले, सकारात्मक बदल झाले. 

माझी दुसरी गोष्ट आहे ज्याची आवड आहे तेच आयुष्यात करायला मिळण्याबाबत आणि गमावण्याबाबत. 

मला काय करायची आवड आहे, हे आयुष्यात खुप लवकर मला कळले हे माझे भाग्य.   मी केवळ २० वर्षांचा असताना, माझ्या पालकांच्या गॅरेजमध्ये वॉझ व मी मिळून अॅपल कंपनी सुरू केली. आम्ही प्रचंड मेहनत केली आणि १० वर्षात एका गॅरेजमधून फक्त आम्हा दोघांच्या बळावर चालणारी ही कंपनी एक मोठी कंपनी बनली – चक्क ४००० कर्मचारी असणारी व २ बिलियन डॉलरची कंपनी. आमची सर्वोत्कृष्ट निर्मिती – मॅकिनटॉश- एका वर्षाआधी आम्ही बाजारात आणला होता आणि मी ३० वर्षांचा झालो होता. आणि माझी हकालपट्टी करण्यात आली.  जी कंपनी तुम्ही सुरू केली, त्यातून तुमची हकालपट्टी कशी होऊ शकते?  सांगतो. अॅपल जशी वाढायला लागली, आम्ही एका व्यक्तीची नेमणूक केली.  मला वाटले माणुस बुध्दीमान आहे, आम्ही दोघे मिळून कंपनी आणखी मोठी करू. पहिल्या वर्षी सर्व चांगले सुरू होते. पण कंपनीची पुढे वाटचाल कशी असावी या विषयी आमच्या धारणेत नंतर खूप मतभेद होत गेले आणि शेवटी तर ते विकोपाला गेले. संचालक मंडळात त्याच्या बाजूने बहुमत झाले आणि ३०व्या वर्षी मला माझ्याच कंपनीतून बाहेर पडावे लागले. अगदी जाहिरपणे.  माझ्या जाणत्या वयातील आयुष्याचा पूर्ण फोकसच माझ्यापासून हिरावला गेला आणि मी उध्वस्त झालो. 

काही महिने तर काय करावे हेही मला सुचत नव्हते.  उद्योजकांच्या माझ्या आधीच्या पिढीला मी तोंडघशी पाडले आहे, अशी माझ्या मनात अपराधी भावना होती.  मशाल माझ्या हातात दिली जात असतानाच्या क्षणी मी अवसानघात केला आहे असे वाटत होते.   डेव्हीड पॅकार्ड व बॉब नोयसी यांना मी भेटलो व माझ्या या घोळाबद्दल माफी मागायचा प्रयत्न केला.  मी अगदी प्रसिध्द व्यक्ती होतो आणि मी सिलिकॉन व्हॅलीपासून दूर पळून जाण्याचाही विचार केला.  पण हळू हळू मला एक गोष्ट उमजत गेली.   मी जे काम करत होतो, ते माझ्या खूप आवडीचे होते. अॅपलमधील घडामोडीमुळे त्यात जरासुध्दा बदल झाला नव्हता. मला नकार मिळाला होता, पण माझे प्रेम कायम होते. हा विचार सुचल्यावर मग मी ठरवले पुन्हा पहिल्यापासून सुरवात करायची.   त्या वेळेस माझ्या लक्षात आले नाही, पण अॅपलमधून हकालपट्टी होणे ही माझ्यासाठी सर्वात उत्तम घटना होती. यशस्वी असण्याचा बोझ माझ्या छातीवरून हटला गेला. नवीन सुरवात करताना कशाचीच खात्री नसते आणि अपयशाच्या भीतीचा दबाव नसतो. एक मुक्तपणा मला अनुभवायला मिळाला. माझ्या आयुष्यातील सर्वात सर्जनशील कालखंडाचा लाभ मला त्यामुळे मिळाला. 

पुढील पाच वर्षात मी नेक्स्ट (NeXT) नावाची कंपनी सुरू केली, पिक्सर नावाची आणखी एक दुसरी कंपनी सुरू केली. आणि एका विलक्षण स्त्रीच्या प्रेमात पडलो, जी नंतर माझी पत्नी झाली. पिक्सरने बनवली, जगातील पहिली कॉम्पुटर अनिमेटेड फिचर फिल्म, टॉय स्टोरी, आणि जगातील सर्वात यशस्वी अनिमेशन स्टुडीओ पिक्सरचा आहे. 

या नंतर काही नाट्यपूर्ण घडामोडी झाल्या, अॅपलने नेक्स्ट विकत घेतली. मी अॅपलमध्ये परतलो. नेक्स्टमध्ये जे तंत्रज्ञान आम्ही विकसित केले होते, तेच अॅपलच्या पुनश्च: भरभराटीसाठी कामात आले.  आणि माझी पत्नी लोरीन व मी, आमचे एक आनंदी कुटुंब आहे. 

अॅपलमधून माझी हकालपट्टी नसती तर यातले काही घडलेच नसते याची मला खात्री आहे. ते एक कटू औषध होते, पण रुग्णाला त्याचीच गरज होती. कधी कधी आयुष्य तुमच्या टाळक्यात एक वीट हाणते. पण विश्वास गमावू नका. मी जे काम करत होतो, ते माझ्या खूप आवडीचे होते आणि त्यामुळेच मी हार न मानता, पुढे जात राहू शकलो या बद्दल मी ठाम आहे. काम हा तुमच्या आयुष्याचा एक फार मोठा भाग असतो.  आणि खूप उत्तम काम करायचे असेल तर, तुम्ही जे काम करत आहात त्याच्या प्रेमात असणे हाच एक मार्ग आहे.  हे तुमचे असे प्रेयस तुम्हाला अजून मिळाले नसेल तर त्याचा शोध घेत रहा.   तडजोड करू नका.   नातेसंबंधातील प्रेम मिळाले आहे हे जसे तुमच्या ह्यदयातील आवाज तुम्हाला सांगतो, तसेच कामाच्या बाबतीतही ती अनुभूती मिळेल. आणि चांगले नातेसंबंध जसे काळाच्या ओघात अधिकाधिक परिपक्व होत जातात तसे कामाच्या बाबतीतही होईल. त्यामुळे तुमच्या आवडीच्या कामाचा शोध घेत राहा. 

माझी तिसरी गोष्ट आहे, मृत्यूबाबत. 

मी १७ वर्षांचा होतो, तेव्हा एक सुभाषित वाचले होते, ते असे, “प्रत्येक दिवस हा तुमच्या आयुष्यचा जणू शेवटचा दिवस आहे, असे जगलात तर, एक दिवस तुमचा विचार अगदी तंतोतंत खरा ठरणार.” या वाक्याचा माझ्यावर प्रभाव पडला आणि त्यानंतर मागील ३३ वर्षे रोज सकाळी मी आरशात बघून स्वत:ला विचारतो, “आज जरा माझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस असता तर आज मी जे करणार आहे तेच केले असते का?” आणि सलग अनेक दिवस या प्रश्नाचे उत्तर “नाही” असे मिळत गेले तर माझ्या लक्षात येते, काही बदल करण्याची गरज आहे. 

आयुष्यात महत्वाचे मोठे निर्णय घ्यायची वेळ आली तेव्हा, मी लवकरच मरणार आहे याचे भान, मला साहाय्यकारी ठरले. कारण मृत्यू समोर असताना फक्त खरोखरच्या महत्वाच्या गोष्टी तेवढ्या उरतात, बाकी इतर सर्व, इतरांच्या अपेक्षा, तुमचा गर्व, अभिमान, अपयशाची भीती सगळे गळून पडते. आपण कमावलेले गमावून बसू या भीतीने आपण नवे काही करायचा धोका घ्यायला बघत नाही. या दुष्टचक्रात अडकून बसायचे नसेल तर आपण मरणार आहोत याचे भान ठेवणे. शेवटी तुम्ही सर्व गमावणारच आहात, मग तुमच्या ह्यदयाच्या हाकेला प्रतिसाद द्या.

साधारण एका वर्षापूर्वी मला कॅन्सर आहे याचे निदान झाले. सकाळी ०७:३० वाजता स्कॅन केले तेव्हा स्पष्टपणे दिसले माझ्या स्वादुपिंडात ट्यूमर आहे. स्वादुपिंड म्हणजे काय तेही मला माहित नव्हते. डॉक्टरांनी मला सांगितले, हा नक्कीच एक असाध्य प्रकारचा कॅन्सर आहे आणि मी फारतर फक्त सहा महिने जगू शकेन. माझ्या डॉक्टरांनी सांगितले, घरी जावून, मी माझी कामे मार्गे लावावीत, अर्थात ते सांगत होते, मी मरण्याची तयारी करावी. जे तुमच्या मुलांना कधीतरी दहा वर्षांनतर सांगावे लागले असे वाटत होते, ते सांगायला फार थोडा अवधी आहे. तुमच्या पश्चात तुमच्या कुटुंबाला त्रास होऊ नये म्हणून सर्व व्यवस्था करणे. निरोप घेणे. 

त्या निदानामुळे सर्व दिवसभर प्रचंड अस्वस्थ होतो, मनात खळबळ माजली होती. त्याच दिवशी संध्याकाळी माझि बायोप्सी करण्यात आली. माझ्या घशातून, पोटात, आंतड्यात एंडोस्कोप घालण्यात आला, माझ्या स्वादुपिंडात एक सुई घालून ट्युमरच्या काही पेशी काढून घेण्यात आल्या. मी तर गुंगीत होतो. पण माझी पत्नी तिथे हजर होती. तिने मला सांगितले, डॉक्टरांनी त्या पेशी मायक्रोस्कोपमधून बघितल्या तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, कारण हा स्वादुपिंडाचा एक दुर्मीळ प्रकारचा कॅन्सर, ज्याच्यावर इलाज आहे, असा कॅन्सर असल्याचे त्यांच्या लक्षात आले. मग माझ्यावर शस्त्रक्रीया करण्यात, आली व आता मी ठीक आहे. 

मृत्यूच्या जास्तीत जास्त जवळ मी इतकाच गेलो आहे आणि आणखी दशके तरी यापेक्षा जास्त जवळ जावे लागणार नाही अशी मला आशा आहे. या अनुभवातून गेल्यानंतर मी तुम्हाला आता खात्रीने सांगू शकतो: 

कोणाचीही मरायची इच्छा नसते. अगदी ज्यांची स्वर्गात जायची इच्छा आहे, त्यांचीही त्यासाठी मरण्याची तयारी नसते. आणि तरीही मृत्यू हे असे अंतिम सत्य आहे ज्याचा आपल्या सगळ्यांना स्वीकार करावा लागतो. तो कोणालाच चुकत नाही. आणि ते योग्यच आहे, कारण मृत्यू हा आयुष्याने लावलेला सर्वात सुंदर शोध आहे. आयुष्यात बदल घडविणारा हा एक दुत आहे. नव्याला वाव देण्यासाठी तो जूने मार्गातून दुर करतो. सध्या हे नवे तुम्ही आहात, पण हळू हळू तुम्ही जुने होणार व तुम्हाला दुर केले जाणार. नाट्यपूर्ण वाटत असले तरी हेच सत्य आहे. 

तुमच्याकडे असलेला वेळ मर्यादीत आहे, आणि त्यामुळे दुसर्‍याचे आयुष्य जगण्यात तो वाया घालवू नका. एका सापळ्यात अडकू नका – हा सापळा असतो, दुसर्‍यांच्या तुमच्याबद्दलच्या मतांचा. दुसरे लोक काय विचार करतात, त्याप्रमाणे आयुष्य जगणे हा एक सापळा आहे, त्यात अडकू नका. दुसर्‍यांच्या मता मतांचा जो कोलाहल, त्याच्या गोंगाटापुढे, तुमच्या आतल्या आवाजाला दबू देऊ नका. आणि सर्वात महत्वाचे, तुमचे ह्यदय आणि तुमची अंत:प्रेरण यांनी सुचवलेल्या मार्गावर चालण्याचे धैर्य दाखवा. इतर सर्व गौण आहे. 

मी तरूण होतो तेव्हा “द होल अर्थ कॅटलॉग” नावाचे एक नियतकालीक प्रकाशित व्हायचे. माझ्या पिढीचे ते जणू बायबल होते. स्टीवर्ट ब्रॅन्ड नावाची व्यक्ती त्याची निर्मीती करायची. त्याच्या जादूई स्पर्शाने तो ते खूप छान बनवायचा. ही १९६०च्या दशकाच्या शेवटीची बाब आहे. तेव्हा पर्सनल कॉम्पुटर आणि डेस्कटॉप पब्लिशींग नव्हते. त्यामुळे ते प्रकाशित केले जायचे, टाईपरायटर, कात्र्या आणि पोलराईड कॅमेरा यांच्या साहाय्याने. गुगल येण्याआधी ३५ वर्षे जणू ते पुस्तक स्वरूपातील गुगल होते: माहितीने ओतप्रोत भरलेले, छान असायचे. 

स्टीवर्ट आणि त्याच्या सहकार्‍यांनी द होल अर्थ कॅटलॉगचे अनेक अंक प्रकाशित केले. मग त्याची उपयुक्तता कमी झाल्यावर १९७०च्या दशकाच्या मध्ये त्याचा शेवटचा अंक काढला. त्यावेळेस मी तुमच्याच वयाचा होतो. या शेवटच्या अंकाच्या मागील पृष्ठावर एक फोटो होता. एका गावाकडे जाणार्‍या रस्त्याचे एक सकाळचे दृश्य. तुम्ही साहसी असाल तर अशा ठिकाणी प्रवासास जाल, तेव्हाचे दृश्य. त्या फोटोखाली लिहिले होते, “असंतुष्ट रहा, चक्रम रहा – स्टे हंग्री, स्टे फूलिश.” हा त्यांचा निरोपाचा संदेश होता - स्टे हंग्री, स्टे फूलिश. आणि मी स्वस्त:साठी नेहमी तीच अपेक्षा केली आहे. आणि आता पदवी मिळवून तुम्ही एक नवी सुरवात करणार आहात, तेव्हा मी तुमच्यासाठीही तीच अपेक्षा करतो.

स्टे हंग्री, स्टे फूलिश. 

धन्यवाद. 

स्टीव्ह जॉब्ज, सीईओ अॅपल कॉम्पुटर

Thursday, 22 September 2016

🌼🌼🌼" श्री गुरूदेव दत्त "🌼🌼🌼

एका गावात एक श्रीमंत कुटुंब राहत असते. नवरा बायको भरपूर दानधर्म करायचे. पण त्यांचा मुलगा देवधर्म काही करत नव्हता. लहान होता तेव्हा काही वाटले नाही.
पण जसा मोठा झाला तशी घरच्यांना चिंता पडली की पुढे याचे कसे होणार ? हा तर देवाचे काहीच करत नाही....
एकदा गावात एक साधू येतात, त्यांना हे कुटुंबिय विनंती करतात.
एकदा तरी त्याच्या मुखातून श्री गुरुदेव दत्त नाम येऊ द्या......!
साधू महाराज खूप वेळ विचार करून त्यांना म्हणतात मी सांगेल तेव्हा त्याला माझ्याकडे घेऊन या, मी त्याच्या कडून दत्त गुरूंचे नाव वदवून घेईल......!
ठरलेल्या दिवशी ते कुटुंबिय त्यांच्या मुलाला घेऊन साधू महाराजां कडे येतात.
तेव्हा साधू महाराज मुलाला प्रश्न विचारतात एकदा श्री गुरुदेव दत्त म्हंटले तर काय होईल.......?
मुलगा त्यांनाच उलट प्रश्न विचारतो....
एकदा श्री गुरुदेव दत्त म्हंटले तर काय होईल......?
मुलाच्या तोंडून दत्तगुरुंचे नाव आले, हे बघून घरच्यांना आनंद होतो आणी ते निघून जातात.
कालांतराने वयोमानानी त्या मुलाचे निधन होते आणि तो यम धर्मापुढे उभा असतो.
तेव्हा तो यमाला म्हणतो. तुम्हाला जी काही शिक्षा द्यायची असेल ती द्या,
पण आधी माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या......
यम म्हणतो विचार काय प्रश्न आहे........
मुलगा :- एकदा श्री गुरुदेव दत्त म्हंटले कि काय होते..?
यम :- मला दत्त गुरुंबद्दल माहित आहे पण एकदा श्री गुरुदेव दत्त म्हंटले कि काय होते, हे मला नाही सांगता येणार यासाठी आपण ब्रह्म देवाकडे जाऊ तेच ह्या प्रश्नाचे उत्तर देतील.
मुलगा :- मी ब्रह्म देवाकडे येईल पण तुम्हाला माझ्या प्रश्नाचे उत्तर आले नाही,
म्हणून तुम्ही मला पालखी मध्ये बसवून ब्रह्म देवाकडे घेऊन जायचे......
त्या पालखी चे भोई तुम्ही होणार.........
यमदेव तयार होतात. दोघे ब्रह्म देवाकडे जातात. ब्रह्म देवाला पण तोच प्रश्न विचारला जातो.
ब्रह्म देवाला पण उत्तर माहित नसते. मग ते म्हणतात आपण भगवान विष्णू कडे जाऊ त्यांना हा प्रश्न विचारू. तेव्हा तो मुलगा म्हणतो.....
माझ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आले नाही, म्हणून तुम्ही पण पालखीचे भोई होणार.
ब्रह्म देव तयार होतात....
असे तिघे ते भगवान विष्णू कडे जातात. भगवान विष्णूं ना पण तोच प्रश्न विचारतात.
एकदा श्री गुरुदेव दत्त म्हंटले तर काय होते....?
विष्णू उत्तर देतात दत्त गुरुं बद्दल मला पण खूप माहिती आहे.
पण एकदा गुरुदेव दत्त म्हंटले कि काय होते ते मला पण सांगता येणार नाही......
आपण भगवान शिवांकडे जाऊ त्यांना नक्की माहित असेल. आता पालखी चे दोन भोई झाले असतात.
मुलगा विष्णू ना म्हणतो तुम्हाला माझ्या प्रश्न चे उत्तर आले नाही,
म्हणून आता तुम्ही पंखा घेऊन मला हवा घालणार.....
असे करत ते भगवान शिवा कडे पोचतात. भगवान शिवांना पण या प्रश्न चे उत्तर येते नाही,
म्हणून ते म्हणतात आपण हा प्रश्न स्वतः गुरुदेव दत्तांनाच विचारू..... असे म्हणून सगळे दत्त गुरुं कडे येतात.
श्रीगुरुदेव दत्तां ना बघून मुलगा पालखीतून खाली उतरतो.
अन् दत्त गुरुं ना प्रश्न विचारतो एकदा श्री गुरुदेव दत्त म्हंटले तर काय होते...?
तेव्हा गुरुदेव त्याच्या कडे बघून हसतात आणि सांगतात.......
एकदा श्रीगुरू देव दत्त म्हंटले कि काय होते....?
हा प्रश्न घेऊन तू आयुष्यभर बेचैन राहिलास आणि न कळत पणे किती तरी वेळा माझे नाव घेतले. त्याने काय होते हे तर तुला बघायचे असेल तर बघ......
तू नाम घेत राहिला म्हणून प्रत्यक्ष यम, ब्रह्मा - विष्णू आणि शिव हे तुला जन्म मरणाच्या फेऱ्यातून काढून माझ्या पायापाशी घेऊन आले, तू ह्या सगळ्यातून मुक्त झाला आता कायम माझ्या चरणा जवळ राहशील.......
हेच ते फळ एकदा श्री गुरुदेव दत्त म्हंटले कि मिळते.....
🌹श्री गुरुदेव दत्त🌹


🌼🌼🌼पितृपक्ष का घटना व नवरात्रि का बढ़ना 🌼🌼🌼


इस साल के नवरात्रों में होंगे सब के दुख दूर, 427 साल बाद बना है ऐसा अद्भुत संयोग
हिन्दुओं में पितृपक्ष और नवरात्रों का काफ़ी महत्व है. पितृपक्ष में जहां हम अपने पूर्वजों को याद करते हैं, वहीं नवरात्रों में बड़ी धूम-धाम से शक्ति की देवी दुर्गा की उपासना करते हैं. कहा जाता है कि करीब 16 दिनों तक चलने वाले पितृपक्ष में किसी भी नए या शुभ काम को नहीं किया जाता. वहीं देवी के 9 दिनों में बिना पत्रों को देखे किसी भी शुभ काम को किया जा सकता है
इस साल एक संयोग बैठा है, जो बिते 427 सालों में पंचांग में नहीं बैठा. इस बार पितृपक्ष मात्र 15 दिनों में ही खत्म हो जाएगा. वहीं नवरात्रे 9 के बजाए 10 दिन चलेंगे. इससे पहले यह संयोग 1589 में बना था और अब यह संयोग पुनः साढ़े चार सौ साल बाद बनेगा.
पितृपक्ष का घटना व नवरात्रि का बढ़ना शुभ संकेत है. पंडितों के अनुसार श्राद्ध पक्ष का एक दिन कम होना और नवरात्रि का एक दिन बढ़ना शुभ संकेत दे रहा है. व्यापारियों के लिए यह साल शुभ संदेश लेकर आ रहा है. साथ ही भगवान पर भरोसा कर के पूरी लगन के साथ मेहनत करने वालों के लिए भी शुभदायी साबित होगा और सफलता मिलेगी.
नवरात्रि में तृतीया दो दिन पड़ेगी। इस बार नवरात्रे 1 अक्टूबर से शुरू हो रहे हैं, जो 10 अक्टूबर तक चलेंगे. सालों बाद नवरात्रि नौ के बजाय 10 दिनों तक मनाई जाएगी. नवरात्रे में तृतीया तिथि दो दिन तक 3 व 4 अक्टूबर को मनाई जाएगी. 11 वें दिन दशहरा मनाया जाएगा.
इस बार शुभ संदेशों को देख देशभर के पंडित काफ़ी खुश हैं, साथ ही सभी को अपने कामों में मेहनत करने की राय भी दे रहे हैं. अब देखना होगा कि किस-किस के लिए आने वाले नवरात्रे खुशी की ख़बर लेकर आते हैं
This year will be in navarātrōṁ all ills, 427 years later would make a wonderful combination.
Hindus and pitnpaksha navarātrōṁ much significance. In pitnpaksha their where we remember, the greatest in navarātrōṁ celebrates with strength from the worship of the goddess durga. It is said that around 16 days in pitnpaksha of any new or good job. Goddess of the place in 9 days without seeing the letters any auspicious work is to be done
This year is a coincidence, who steal bitē in 427 years not in the calendar. This time only 15 days pitnpaksha in be over soon. Spot Navarātrē 9 instead of 10 days. This chance before it was made in 1589 and now again this is coincidence, four hundred years later.
The Pitnpaksha of navratri events and or good sign. According to pundits śrāddha side of less than a day, and be a good day to go. Traders for this year with good messages. At the same time trust God fully to the work with an affinity for people too be śubhadāyī and get success.
Navratri Tritiya in two days. THIS TIME WILL NAVARĀTRĒ 1 start from October, 10 till October. After nine years, instead of the 10 days you will be celebrated. Navarātrē tritiya tithi in two days, 3 and October 4th will be celebrated. 11th day, you will be celebrated.
This time good to see the whole country was happy enough, along with all his hard work also to Roy. Now look how you coming for navarātrē happy news are coming.

Tuesday, 20 September 2016

🌼🌼🌼बोधकथा🌼🌼🌼

एकदा भगवान श्रीकृष्ण, बलराम आणि सात्यकी हे तिघे जंगलातून जात असताना रात्रीच्या वेळी काहीच न कळाल्याने रस्ता चुकले.जंगल घनदाट होते, तेथे न पुढे जाण्याचा मार्ग दिसत होता न मागे येण्याचा. तेव्हा तिघांनीही असा निर्णय
घेतला आता येथेच एखादी सुरक्षित जागा पाहून विश्राम करायचा आणि सकाळी उठून मार्गस्थ व्हायचे.तिघेही दमलेले होते पण प्रत्येकाने थोडा थोडा वेळ पहारा देण्याचे ठरवले.पहिली पाळी सात्यकीची होती.सात्यकी पहारा करू लागला.

तेव्हाच झाडावरून एका पिशाच्चाने हे पाहिले की एक माणूस पहारा करतो आहे आणि दोनजण झोपले आहेत. पिशाच्च झाडावरून खाली उतरले व सात्यकीला मल्लयुद्धासाठी बोलावू लागले. पिशाच्चाने बोलावलेले पाहून सात्यकी संतापला व क्रोधाने पिशाच्चावर धावून गेला. त्याक्षणी पिशाच्चाचा आकार बदलला व तो मोठा झाला. दोघांत तुंबळ मल्लयुद्ध झाले. पण जेव्हा जेव्हा सात्यकीला क्रोध येई तेव्हा तेव्हा पिशाच्चाचा आकार मोठा होई व ते सात्यकीला अजूनच जास्त जखमा करत असे.

एका प्रहरानंतर बलराम जागे झाले व त्यांनी सात्यकीला झोपण्यास सांगितले.सात्यकिने त्यांना पिशाच्चाबदल काहीच सांगितले नाही. बलरामांनाही पिशाच्चाने मल्लयुद्धास निमंत्रण दिले. बलराम पण क्रोधाने पिशाच्चाशी लढायला गेले तर त्याचा आकार त्यांना वाढलेला दिसून आला. ते जितक्या क्रोधाने त्याला मारायला जात तितका त्या पिशाच्चाचा आकार मोठा होत असे. शेवटी तोही प्रहर संपला व आता पहा-याची पाळी भगवान श्रीकृष्णाची होती.

पिशाच्चाने मोठ्या क्रोधाने श्रीकृष्णांना आव्हान दिले पण श्रीकृष्ण शांतपणे मंदस्मित करत त्याच्याकडे पहात राहिले. पिशाच्च अजून संतापले व मोठमोठ्याने ओरडून श्रीकृष्णांना बोलावू लागले पण श्रीकृष्ण मंदस्मित करत शांत भाव जपत राहिले व एक आश्चर्य झाले ते म्हणजे जसे जसे पिशाच्चाला क्रोध येऊ लागला तसतसा त्याचा आकार लहान होत गेला. रात्र संपत गेली अन पहाट झाली शेवटी आकार लहान होत होत पिशाच्चाचा एक छोटासा किडा झाला व श्रीकृष्णांनी अलगद
त्याला आपल्या उपरण्यात बांधून ठेवले. सकाळी सात्यकी व बलरामांनी रात्रीची कहाणी सांगताच श्रीकृष्णांनी तो किडा त्यांना दाखविला व म्हणाले, 
"तुम्ही क्रोधाने याला कधीच जिंकू शकत नव्हता कारण हे क्रोधाचे पिशाच्च होते. त्याला शांती हेच औषध
आहे. क्रोधाने क्रोध वाढतो मात्र त्याचा प्रतिकार हा केवळ शांतभाव प्रकटीकरणाने होतो.
मी शांत राहिलो म्हणून हे पिशाच्च बघा कसे आता या किड्यासारखे लहान होऊन बसले आहे. ’’

तात्पर्य : क्रोधावर संयमानेच विजय मिळविता येतो.
क्रोधाला क्रोधाने मारता येऊ शकत नाही तर शांतपणे, प्रेमानेच कमी करता येते, नष्ट करता येते.
Image result for bodh katha in marathi

Monday, 19 September 2016

🌼🌼🌼 जानिए किन चार तरह के व्यक्तियों को नींद नहीं आती-🌼🌼🌼

‘महाभारत’ की कथा के महत्वपूर्ण पात्र विदुर को कौरव-वंश की गाथा में विशेष स्थान प्राप्त है। विदुर हस्तिनापुर राज्य के शीर्ष स्तंभों में से एक अत्यंत नीतिपूर्ण, न्यायोचित सलाह देने वाले माने गए है।
वे जो सलाह देते थे, उसमें संपूर्ण मनुष्य जाति का भला छिपा होता था। उनकी इन सलाहों को विदुर नीति के नाम से जाना जाता है...।
विदुर का कहना था, कोई भी व्यक्ति चाहे वह स्त्री हो या पुरुष दोनों के जीवन में ये चार बातें होती हैं, तब उसकी नींद उड़ जाती है और मन अशांत हो जाता है। ये चार बातें कौन-कौन सी हैं, आईये जानते हैं।
 जब किसी स्त्री या पुरुष की शत्रुता उससे अधिक बलवान व्यक्ति से हो जाती है तो भी उसकी नींद उड़ जाती है। निर्बल और साधनहीन व्यक्ति हर पल बलवान शत्रु से बचने के उपाय सोचता रहता है क्यूंकि उसे हमेशा यह भय सताता है कि कहीं बलवान शत्रु की वजह से कोई अनहोनी न हो जाए।
 विदुर ने धृतराष्ट्र से कहा कि यदि किसी व्यक्ति के मन में कामभाव जाग गया हो तो उसकी नींदें उड़ जाती है और जब तक उस व्यक्ति की काम भावना तृप्त नहीं हो जाती तब तक वह सो नहीं सकता है।
 यदि किसी व्यक्ति का सब कुछ छीन लिया गया हो तो उसकी रातों की नींद उड़ जाती है। ऐसा इंसान न तो चैन से जी पाता है और ना ही सो पाता है। इस परिस्थिति में व्यक्ति हर पल छीनी हुई वस्तुओं को पुन: पाने की योजनाएं बनाता रहता है और जब तक वह अपनी वस्तुएं पुन: पा नहीं लेता है, तब तक उसे नींद नहीं आती है।
 यदि किसी व्यक्ति की प्रवृत्ति चोरी की है या जो चोरी करके ही अपने उदर की पूर्ति करता है, जिसे चोरी करने की आदत पड़ गई है, जो दूसरों का धन चुराने की योजनाएं बनाते रहता है, उसे भी नींद नहीं आती है। चोर हमेशा रात में चोरी करता है और दिन में इस बात से डरता है कि कहीं उसकी चोरी पकड़ी ना जाए। इस वजह से उसकी नींद भी उड़ी रहती है।
ये चारों बातें व्यवहारिक और हर युग में सटीक मालूम पड़ती हैं, उम्मीद करते हैं कि महात्मा विदुर की बातों से आप भी अपनी सीख लेंगे और दूसरों को भी प्रेरित करेंगे। 

Friday, 16 September 2016

🌼🌼🌼वडील आणि मुलगा🌼🌼🌼

खास  वडीलांसाठी
हल्लीच्या धावपळीच्या जगात आपल्याला आपल्या मुलांकडे लक्ष देण्यासाठी वेळच मिळत नाही
त्यामुळे वडील व मुलांमधील नाते जरा विस्कळीत होत आहेत  व मुलांवर थोड्याफार प्रमाणात वाईट विचार करण्याची क्षमता वाढली आहे  ती  खालील प्रमाणे  तुम्ही प्रयत्न करा आपल्या मुलाला वेळ देण्याचा
विचार करावा अशा काही बहुमोल गोष्टी ....
1. तुमचे मूल तुमच्याशी नेहमी खोटे बोलते याचा अर्थ  त्याच्या प्रत्येक चुकीच्या वागण्यावरची तुमची प्रतिक्रिया अतिशय कठोर असते..
2. तुमच्या मुलाला तुमच्याशी मनातले सर्व बोलायला, मन मोकळे करायला तुम्ही नाही शिकवू शकलात तर तुमचे मूल तुमच्या हातातून गेले असे समजा..
3. तुमचे मूल कोणासमोरही अनावश्यक पणे दडपून जात असेल, नको तिथे एखाद्याचे वर्चस्व स्वीकारून त्याच्या अपेक्षेनुसार वागत असेल,  तर समजा की तुमच्या मुलामध्ये आत्मप्रतिष्ठेची कमतरता आहे आणि त्याचे कारण तुम्ही त्याला प्रोत्साहन कमी आणि सल्लेच जास्त देता..
4. कधी कधी आपले योग्य असूनसुद्धा जग आपल्याला चूक ठरवते; अशा वेळी ठाम राहून स्वतःच्या भूमिकेचे समर्थन करता आले पाहिजे. तुमचे मूल इथे कमी पडत असेल तर त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही त्याला सर्वांच्या देखत शिस्त लावायचा सातत्याने प्रयत्न केला आहे..
5. तुमचे मूल दुसर्‍यांच्या वस्तू घेते याचा अर्थ त्याच्यासाठी तुम्ही वस्तू तर घेता कदाचित पण त्याला ती वस्तु स्वतः निवडण्याचे स्वातंत्र्य देत नाही..
6. तुमचे मूल भित्रे आहे कारण तुम्ही नेहमी  जरा जास्तच तत्परतेने त्याच्या मदतीला धावून जाता..
7. तुमचे मूल इतरांच्या भावनांचा अनादर करते याचा अर्थ तुम्ही त्याच्याशी संवाद साधण्याऐवजी सतत सूचना करत राहता आणि त्याच्या वागण्या बोलण्याचे नियंत्रण कायम स्वतःकडे ठेवता, त्यावर नेहमी अधिकार  गाजवत राहता..
8. तुमच्या मुलाला फार पटकन राग येतो याचा अर्थ त्याच्या चुकीच्या वागण्याकडे तर तुमचे प्रचंड  लक्ष असते पण त्या मानाने त्याच्या चांगल्या वागण्याची तुम्ही आजिबात दखल घेत नाही..
9. तुमच्या मुलाला इतर कुणाबद्दल असूया आहे याचा अर्थ त्याने एखादे काम यशस्वी पणे पूर्ण केले तरच तुम्ही त्याचे कौतुक करता; मात्र त्याने त्याच्या धडपडी दरम्यान स्वतःमध्ये पूर्वीच्या मानाने नक्कीच काही सुधारणा केलेल्या असतात - भले ते काम त्याला तुमच्या अपेक्षेप्रमाणे पूर्ण करता आले नसेल पण अशा सुधारणांबद्दल तुम्ही त्याचे मोकळ्या मनाने कौतुक करू शकत नाही..
10. तुमचे मूल तुम्हाला मुद्दाम त्रास देते, खोड्या काढते, तुमच्या भावनांचा विचार न करता तुमच्या कामात व्यत्यय आणून असुरी आनंद मिळवायचा प्रयत्न करते याचा अर्थ तुमचे मूल म्हणून त्याला हवी असलेली शारिरिक जवळीक  व त्या आपुलकीच्या स्पर्शातून  व्यक्त होणारी तुमची माया कमी पडली आहे..
11. तुमचे मूल तुम्हाला मुळी जुमानतच नाही, अगदी उघडपणे तुम्हाला धुडकावून लावते, याचा अर्थ तुम्ही बर्‍याचदा नुसत्या पोकळ धमक्या देता पण त्याप्रमाणे कृती कधीच करत नाही..
12. तुमचे मूल तुमच्या पासून गोष्टी लपवते, तुम्हाला कळूच नये म्हणून प्रयत्न करते याचा अर्थ तुम्ही त्याला समजून घ्याल याचा त्याला विश्वास वाटत नाही उलट तुम्ही राईचा पर्वत करून आकांडतांडवच जास्त कराल याची त्याला खात्री आहे..
13.तुमचे मूल तुम्हाला उलटे बोलते, दुरुत्तरे करते कारण तुम्हांला त्याने इतरांशी असेच करताना अनेकदा पाहिले आहे; त्यामुळे त्यात काही गैर आहे असे त्याला अजिबात वाटत नाही..
14. तुमचे मूल तुमचे तर ऎकत नाहीच; उलट इतरांचे जास्त ऎकते आणि त्यांच्या सल्ल्यानुसार वागण्याचा प्रयत्न करते कारण तुम्ही फार पटकन निर्णय सांगून किंवा आपले मत देऊन मोकळे होता हे त्याला माहीत आहे..
15. तुमचे मूल तुमच्याशी बंडखोरी करते कारण त्याने हे पक्के ओळखलेले आहे की काय योग्य आहे यापेक्षाही लोक काय म्हणतील , हे तुमच्या लेखी जास्त महत्वाचे आहे..

🌼🌼🌼आयुष्यात जेव्हा एकाच वेळी अनेक गोष्टी करावाशा वाटतात आणि दिवसाचे २४ तासही अपुरे पडतात तेव्हा काचेची बरणी आणि २ कप चहा आठवून पहा.🌼🌼🌼



तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक वर्गावर आले. त्यांनी येताना कही वस्तू बरोबर आणाल्या होत्या. तास सुरू झाला आणि सरांनी कही न बोलता मोठी काचेची बरणी टेबलावर ठेवली आणि त्यात पिंगपाँगचे बॊल भरु लागले. ते भरून झाल्यावर त्यांनी मुलांना बरणी पूर्ण भरली का म्हणून विचारले. मुले हो म्हणाली. मग सरांनी दगड खड्यांचा बॊक्स घेऊन तो बरणीत रिकामा केला आणि हळूच ती बरणी हलवली. बरणीत जिथे जिथे मोकळी जागा होती तिथे ते दगड खडे जाऊन बसले. त्यांनी पुन्हा मुलांना बरणी भरली का म्हणुन विचारले. मुलांनी एका आवाजात होकार भरला. सरांनी नंतर एका पिशवीतून आणलेली वाळू त्या बरणीत ओतली. बरणी भरली. त्यांनी मुलांना बरणी भरली का म्हणून विचारले. मुलांनी तबडतोब हो म्हटलं. मग सरांनी टेबलाखालून चहा भरलेले २ कप घेतले आणि तेही बरणीत रिकामे केले. वाळूमध्ये जी कही जागा होती ती चहाने पुर्ण भरून निघाली. विद्यार्थांमधे एकच हशा पिकला. तो संपताच सर म्हणाले,"आता ही जी बरणी आहे तिला तुमचे आयुष्य समजा.

Image result for 2 cupपिंगपाँगचे बॊल ही महत्वाची गोष्ट आहे - देव, कुटुंब, मुलं, आरोग्य, मित्र आणि आवडीचे छंद - ह्या आशा गोष्टी आहेत की तुमच्याकडचं सरं कही गेलं आणि ह्याच गोष्टी राहिल्या तरी तुमचं आयुष्य परिपुर्ण असेल. दगड खडे ह्या इतर गोष्टी म्हणजे तुमची नोकरी, घर, कार. उरलेलं सारं म्हणजे वाळू - म्हणजे अगदी लहान सहान गोष्टी." "आता तुम्ही बरणीमध्ये प्रथम वाळू भरलीत तर पिंगपाँगचे बॊल किंवा दगड खडे ह्यासाठी जागा उरणार नाही. तीच गोष्ट आपल्या आयुष्याची. तुम्ही आपला सारा वेळ आणि सारी शक्ती लहान सहान गोष्टींवर खर्च केलीत तर महत्वाच्या गोष्टींसाठी तुमच्यापाशी वेळच रहाणार नाही. तेव्हा... आपल्या सुखासाठी म्हत्वचं काय आहे त्याकडे लक्श द्या." "आपल्या मुलाबाळांबरोबर खेळा. मेडिकल चेकअप करुन घेण्यासठी वेळ काढा. आपल्या जोडीदाराला घेउन बहेर जेवायला जा. घराची सफाई करायला आणि टाकऊ वस्तूंची विल्हेवाट लावायला तर नेहमी वेळ मिळत जाईल." "पिंगपाँगचे बॊलची काळजी आधी घ्या. त्याच गोष्टींना खरं महत्व आहे. प्रथम काय करायचं ते ठरवून ठेवा. बाकी सगळी वाळू आहे."
सरांचं बोलून होताच एका विद्यार्थिनीचा हात वर गेला. तिनं विचारलं,"यात चहा म्हणजे काय?" सर हसले आणि म्हणाले,"बरं झाले तु विचारलेस. तुझ्या प्रश्नाचे उत्तर असे की आयुष्य कीतीही परिपुर्ण वाटले तरी मित्रांबरोबर १-२ कप चहा घेण्याइतकी जागा नेहमीच असते " :)



Saturday, 10 September 2016

🌼🌼🌼श्री गणेशाय नमः ॥🌼🌼🌼


स्वस्तिश्री गणनायकं गजमुखं मोरेश्वर सिद्धीदम्‌ ।
बल्लाळं मुरुडं विनायकं मढं चिंतामणी थेवरम्‌।
लेण्यांद्रिं गिरीजात्मजं सुवरदंविघ्नेश्वरं ओझरम्‌ ।
ग्रामोरांजण स्वस्थित: गणपती कुर्यात्‌ सदा मंगलम्‌ ।।
अष्टविनायकांचे वर्णन
जय गणपती गुणपती गजवदना ।
आज तुझी पूजा देवा गौरीनंदना ।
कुडी झाली देऊळ छान, काळजात सिंहासन ।
काळजात सिंहासन, मधोमधी गजानन ।
दोहीकडे रिद्धिसिद्धि उभ्या ललना ।।
अष्टविनायका तुझा महिमा कसा ।
दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा ।।१।।
गणपती, चौथा गणपती, पायी रांजणगावचा देव महागणपती ।
दहा तोंड हिचं हात जणू मूर्तीला म्हणती ।
गजा घालितो आसन डोळं भरुन दर्शन ।
सूर्य फेकी मूर्तीभर वेळ साधून किरण ।
किती गुणगान गावं किती करावी गणती ।
पुण्याईचं दान घ्यावं ओंजळ पसा ।।५।।
अष्टविनायका तुझा महिमा कसा ।।
अखेर गणपतीच्या आठ नावांचा गजर
मोरया मोरया मंगलमूर्ती, मोरया मोरया मयुरेश्वरा मोरया ।
मोरया मोरया चिंतामणी मोरया, मोरया मोरया सिद्धिविनायक मोरया ।
मोरया मोरया महागणपती मोरया, मोरया मोरया विघ्नेश्वरा मोरया ।
मोरया मोरया गिरिजात्मजा मोरया, मोरया मोरया वरदविनायक मोरया ।
मोरया मोरया बल्लाळेश्वर मोरया, मोरया मोरया अष्टविनायक मोरया ।।
Image result for ashtavinayak

Thursday, 1 September 2016

🌼🌼🌼जपानी जिद्दीची गोष्ट🌼🌼🌼

स्पर्धेचं आणि शर्यतीचं वातावरण आजसर्वत्र दिसतंय. चढाओढीच्या धुंदीनं आज सारे नादावलेले आहेत. जिद्द, चिकाटी हेच गुण आज महत्त्वाचे आहेत. हेच सांगणारी ही जपानी लोकांची गोष्ट. ही गोष्ट थोडी क्रूर वाटेल आणि काही लोकांना रुचणारही नाही. अर्थात, काही लोकांना “त्यात काय क्रूर वाटायचंय? किंवा न रुचणारं आहे? असेही प्रश्‍न पडतील; तर असे प्रश्‍न घेऊनच प्रश्‍न सोडविणाऱ्या जपान्यांची ही गोष्ट…
************************************************
एकदा काय झालं… एकदा नाही हो, बऱ्याचदा काय झालं, की जपान्यांना त्यांचे आवडते मासे मिळेनात. म्हणजे जपानी लोकांना कच्चे मासे खायला आवडतं, हे तर तुम्हाला ठाऊक आहे. “सुशी’ या सोज्वळ नावानंही जपानी डिश लोकप्रिय आहे; तर किनाऱ्याजवळच्या समुद्रात मासेमारी केल्यानं “सुशी’साठी लागणारे मासे संपले. म्हणजे जपानी कोळी जाळीबिळी टाकायचे; पण त्यात सुशीयोग्य मासे सापडायचे नाहीत.
आता काय करायचं?
त्यांनी उपाय शोधला. मोठ्या बोटी घेऊन ते समुद्राच्या आतल्या भागात गेले. तिथे “सुशी’ सापडले. मग काय? पकडले आणि आणले! पण गंमत अशी झाली, की बोटी किनाऱ्यापासून दूर गेल्यामुळे त्यांना परत यायला वेळ लागे. तोपर्यंत “सुशी’ मासे मरून जात. मग त्या माशांच्या मासामध्ये ती गंमत येत नसे. आता काय करायचं?
मग त्यांनी ठरवलं. दूर समुद्रात जाणाऱ्या बोटीत आपण “फ्रिझर्स’ ठेवू. त्यात माशांना बंद करू. किनाऱ्यावर पोचलो. त्यांना पुन्हा वॉर्मअप करू की सुशी तय्यार.
झालं, तो प्रयोग यशस्वी झाला. मासे अगदी फ्रेश राहू लागले; पण फ्रिझरमध्ये ठेवलेले मासे आणि ओरिजनल सुशी यात फरक होता. तेव्हा फ्रिझरची आयडिया अगदी व्यावहारिक; पण मत्स्यप्रेमींनी नाकं मुरडली.
आता काय करायचं?
पण जपानी लोक डोकेबाज. त्यांनी काय केलं? त्या मोठमोठ्या बोटींवर मोठाले टॅंक बांधले. त्या पाण्यात मासे सोडायचे आणि जिवंत आणायचे. किनाऱ्याला लागले, की टॅंकमधून बाहेर. सुशी तय्यार! वा! सुशीच्या डिश जपानी रेस्टॉरंटमधून मिळू लागल्या.
पण गुणवत्तेच्या बाबतीत चोखंदळ जपान्यांनी आपली इवलीशी नाकं मुरडली. जिवंत माशांची सुशी बरी लागली खरी; पण त्या टॅंकमध्ये दाटीवाटीनं राहणाऱ्या माशांत तसा दम नव्हता. त्यांच्या हालचाली मंदावलेल्या. त्यांची तोंडं मरगळलेली. ओरिजनल सुशी ती ओरिजनल सुशी, हो की नाही मिस्टर सुझुकी? हो! अगदी खरं मिस्टर यामा टोमो! किंवा मि. यामोटोमा!!
आता काय करायचं?
जपानी कोळी लई हिकमती मानूस. तो काय असा डगमगनारा न्हवेच!
त्यानं डोकं खाजवलं, विचार केला आणि अखेर एक शक्कल सुचली. शक्कल म्हणजे भारी अक्कल असल्याशिवाय शक्‍यच नाही.
त्यांनी बोटीवरील टॅंकचा अभ्यास केला. टॅंकमधले मासे मरगळतात का? मंदावतात का? त्यांच्या वावरण्यात जोम का राहत नाही? त्यांच्या हालचालींतील जोश का हरवतो?
जपानी गडी रिसर्चमध्ये एकदम हुश्‍शार बरं. हार खाणारा नव्हे! सुशी खाल्ल्याचा परिणाम दुसरं काय?
बरं, युक्ती नामी. त्यांनी? काय केलं त्या टॅंकमध्ये माशांमध्ये जिवंतपणा, जोश व जोम टिकविण्यासाठी काही शार्क मासे सोडले. झालं! या शार्क माशांच्या तडफदार आणि झटपट हालचालींमुळे इतर माशांना पळता भुई! सॉरी पोहता पाणी अपुरं पडू लागलं.
साऱ्यांना एकच धास्ती, या शार्कपासून कसा बचाव करायचा?
बोटी किनाऱ्याला लागेपर्यंत सगळे मासे ताजेतवाने, तरतरीत आणि तडफदार राहू लागले! जपानी लोकांना अगदी हव्वी तश्‍शी ताजी सुशी मिळू लागली!!
जपानी लोक खूश झाले. मित्रहो, या गोष्टीत तुम्हाला एक ठाम बाजू घ्यावी लागेल. म्हणजे तुम्ही माशांच्या बाजूचे की माणसांच्या?
माशांच्या बाजूचे असाल, तर त्यांच्या “सकाळ’मध्ये “माणसांच्या क्रूरपणाची कमाल’ अशा शीर्षकाखाली इथल्या प्रसंगाचं रिपोर्टिंग होईल. तुम्ही माणसांच्या बाजूचे, सुशीप्रेमी मत्स्याहारी असाल तर कधी एकदा सुशी खातोय, असं तुम्हाला वाटेल. तुमच्या लेखी माणसाच्या मर्मभेदी संशोधनाची आणि अक्कलहुशारीची गोष्ट ठरेल.
पैकी कोणाचीही बाजू घ्यायची नसेल, तर उत्तम. कारण ही गोष्ट ना माशांची, ना माणसांची आहे; माणसामधल्या तडफदारीची. तुम्हाला जीवनातला जोश टिकवायचा आहे. तुम्हाला सळसळत्या उत्साहानं जगायचंय? तुम्हाला जोमानं जीवनाचं आव्हान स्वीकारायचंय? तर मग तुम्हाला बंदिस्त राहून चालणार नाही.
अहो, इथे थांबला तो संपला.
मनातली जिगर टिकवायची असेल, तर स्पर्धेला घाबरू नका. आपल्यापेक्षा बलाढ्य शत्रूशी लढा देण्यात खरी मर्दुमकी आहे. त्या शत्रूबरोबर दोन हात करण्यात, गनिमी काव्यानं लढण्यात खरी गंमत असते. अशा लढाईत आपल्या शौर्याचा आणि हिमतीचा कस लागतो. अशा सामन्यात आपण बुद्धी, शक्ती व युक्तीची शस्त्रं पारजून ठामपणे लढतो.
स्पर्धेचं आणि शर्यतीचं वातावरण आज सर्वत्र दिसतंय. चढाओढीच्या धुंदीनं आज सारे नादावलेले आहेत. या सर्वांना आपण पुरून उरणार आहोत. कदाचित, त्या जपान्यांनाही पुरून उरू आणि भारतीय आर्थिक सत्तेचा झेंडा जगभर फडकू लागेल.
अर्थात, त्यासाठी चिकाटी, संशोधक वृत्ती हवी, हार न मानण्याची प्रवृत्ती हवी. मग काय आहात ना तय्यार!
आणि अखेर गोष्ट वाचल्याबद्दल थॅंक्‍यू, धन्यवाद, आभारी आहे, शुक्रिया नाही नाही आरिगातो गोजायमास.
– डॉ. राजेंद्र बर्वे
मानसोपचारतज्ज्ञ, मुंबई