Saturday, 12 January 2019

संस्कार ......
लहान मुलांच्यावर संस्कार म्हटले की, मराठी मध्यमवर्गिय किंवा उच्च मध्यमवर्गिय लोकांच्या डोळ्यांपुढे प्रथम 'शुभं करोति कल्याणमय', मुजं, देवाची प्राथना अशा प्रकारचीच चित्रे उभी राहतात. संस्कारांचे वर्तुळ हे अशा धार्मिक मानल्या गेलेल्या जुन्या रुढींपुरतेच मर्यादित केलेले असल्यामुळे त्या रुढी पाळणारे ते सुसंस्कृत आणि बाकीचे असंस्कॄत असे सोयिस्कर गणित मांडले जाते. या देशातल्या अपार दारिद्र्याशी टक्कर घेत जगणार्या समाजाला तर लहान मुलांवर संस्कार करणे वगैरै परवडतच नाही.
जे संस्कार समाजात जबाबदार नागरिक म्हणून जगायची शिकवण देत नाहीत, त्यांना काहीही अर्थ नसतो. समाजाच्या वागण्यातून सिध्द होते ती खरी संस्कृतीः ग्रंथात असते ती नव्हे. जीवनात आपल्याइअतकाच दुसर्यायही माणसाला निर्वेधपणाने जगायचा अधिकार आहे हे जोपर्यत आपण मानत नाही, तोपर्यतं आपल्याला सुसंस्कृत म्हणवून घेण्याचा अधिकारच नाही. म्हणून स्वतःचे आणि ज्या समाजात आपण जगतो आहोत त्या समाजाचे जीवन आपल्या वागण्याने अधिक दुःखमय होणार नाही, अशा दक्षतेने जगण्याची जाणीव मुलांच्यात लहानपणापासूण निर्माण करणारे संस्कार कुठले याचा विचार सतत व्हायला हवा.
जी सुस्थित माणसे आहेत त्यांच्यावर तर अशा त-हेच्या चांगल्या सामाजिक जाणिवा जागृत करून मुलांना वाढविण्याची अधिक जबाबादारी आहे. कारण त्यांच्या वागण्याकडे आदर्श म्हणून पाहिले जाते. त्या घरातल्या मुलांना, दुर्बल परिस्थितल्या मुलांना आधाराचे हात देण्याची सवय अधिक कटक्षाने लावावी लागते.
संस्कार --- पु.लं. देशपांडे

No comments:

Post a Comment