Tuesday, 5 December 2017

🌼🌼🌼जीवन मार्ग 🌼🌼🌼

हळू हळू वाचा खुप आनंद घ्याल ........

👌संकटाच्या वेळी मदत मागाल तर विचार करून मागा कारण संकट थोड्या वेळासाठी असतं पण उपकार आयुष्यभर राहतात......✍

👌आपण फुशारकीने इतरांना सांगतो नेहमी खुष राहत जा पण त्याचा रस्ता पण दाखवा...✍

👌काल एक व्यक्ती भाकरी मागून घेवून गेला आणि करोडोंचे आशिर्वाद देवून गेला, माहितीच पडत नव्हतं कि गरीब तो होता का मी.....✍

👌आयुष्याचं गाठोड सोबत बांधून बसलाय अनाडी जे घेवून जायच आहे ते कमवलच नाही.....✍

👌मी त्या नशीबाचे सगळ्यात आवडीच खेळणं आहे, जे रोज मला जोडते ते परत तोडून टाकण्यासाठी...✍

👌ज्या घावातून रक्त निघत नाही, समजून जा तो वार कोणी आपल्यानेच केला आहे...✍

👌लहानपण हे कमालीच होतं, खेळता खेळता भले टेरेसवर झोपा किंवा जमिनीवर झोपा पण डोळे अंथरूणावरच उघडायचे....✍

👌हरवलोय आपण स्वतः पण देवाला शोधत बसलोय.......✍

👌गर्व करून कुठल्या नात्याला तोडण्यापेक्षा माफी मागून ती नाती जपा.......✍

👌आयुष्याची पण गजब खेळी आहे....सावरली तर "जन्नत"....नाहीतर फक्त तमाशाच आहे.....✍

👌आनंद हा नशीबातच असतो...कारण आरशामध्ये बघून सगळेच हसतात.....✍

👌आयुष्यपण व्हिडिओ गेम सारखं झाल आहे, एक लेवल पार केली तर पुढची लेवल ही त्याहीपेक्षा मुश्कील येते......✍

👌एवढी आवड तर पैसे मिळवायला पण लागत नाही जेवढी लहापणीचे फोटो पाहिल्यानंतर परत लहान व्हावस वाटत....✍

👌नेहमी छोट्या छोट्या चुका सुधरायचा प्रयत्न करा कारण मनुष्याला पहाडाने नाही तर छोट्या दगडानेच ठेच लागते.....✍

👌दुसऱ्या ला संपवण्याच्या प्रयत्नात स्वतः संपून जाल
त्या मुळे स्वतः च्या प्रगती कडे लक्ष दया!!!.....✍

👌जगणं हे आईच्या स्वाभिमानासाठी असावं.
आणी जिंकणं वडिलांच्या कर्तव्यापोटी......✍

👌क्षेत्र कोणतेही असो...
आयुष्यात कष्टाला पर्याय नाही
आणि कष्ट प्रामाणिक असले....
की यशालाही पर्याय नाही..✍🏻

👌केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं....✍

👌"माणुस" स्वता:च्या नजरेत चांगला पाहीजे...,
लोकांच काय लोक " चुका"
तर "देवात" पण काढतात.....✍

👌सुखासाठी कोणाकडे हात ­जोडू नका,वेळ वाया जाईल....­
हि दुनिया मतलबी झाली ­आहे,त्यापेक्षा दुःखाशी दो­न हात करा,चांगली वेळ येईल....✍

👌जेंव्हा लोक तुमच्या मागे बोलतात तेंव्हा समजून घ्यावं की.....तुम्ही त्यांच्या दोन पाऊले पुढे आहात.....✍

👌विरोधक तयार करण्यासाठी मारामारी करावी लागत नाही...!!
तुम्ही चांगले कार्य करु लागले की विरोधक आपोआप तयार होतात...!!✍

👌कर्तृत्ववान व्यक्तींचा पराक्रम बघितला जात नाही...,
पण त्याचं चाक जमिनीत कधी अडकतय याकडे मात्र सर्वाचे लक्ष असते.....✍

👌एक मात्र नक्की खंर आहे की,चांगल्या रस्त्याला गतिरोधक,आणि......चांगल्या व्यक्तिला विरोधक हे असतातंच.....✍

👌चांगल्या कामाला मांजरां पेक्षा माणसेच जास्त आडवी येतात.....✍

👌एक सत्य  . . . 👇"नको असलेल्या अपेक्षा वाढल्या की हवी असणारी माणसं गमावण्याची वेळ येते ".....✍

👌असत्य हे अपंग प्राण्याप्रमाणे असते, दुसऱ्याच्या आधाराशिवाय ते कधीच उभे राहू शकत नाही.....✍

👌"जेवणात जर कोणी विष कालवले तर त्यावर उपचार आहे परंतु मनामध्ये जर कोणी विष भरवले तर त्यावर कोणताच उपचार नाही.".....✍

👌क‍‍‌‌‌‍धी‍ही मिठासारखं आयुष्य जगु नका,की लोक तुमचा चवीनुसार गरजेपुरता वापर करुन घेतील.....✍

👌आयुष्यात स्वत:ला कधी उध्वस्त होउ देऊ नका
          कारण
लोक ढासाळलेल्या घराच्या वीटा सुद्धा सोडत नाही.....✍

Sunday, 3 December 2017

🌼🌼🌼अंतःकरण असता पवित्र । सदाकाळ वाचावे गुरुचरित्र 🌼🌼🌼

 गुरूचरित्र हे मराठीतील एक प्रभावशाली धार्मिक पुस्तक आहे. १५ व्या- १६ व्या शतकात श्री. सरस्वती गंगाधर स्वामींनी हे पुस्तक लिहीले. या पुस्तकात स्वामी नरसिंह सरस्वती यांचे चरीत्र, त्यांचे तत्वज्ञान, आणि त्यांच्याबद्दलच्या पौराणिक कथा आहेत. या पुस्तकात उर्दु आणि पर्शियन शब्द टाळून संस्कृत शब्द वापरलेले आहेत. गुरुचरित्र हिंदू लोकांत फार पवित्र ग्रंथ मानतात. सर्व दत्त भक्त या ग्रंथाचे मार्गशीर्ष महिन्यात येणार्‍या पौर्णिमेपासून आठ दिवस आधी पारायण करतात, आणि पौर्णिमेच्या दिवशी, उद्यापन करतात. मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा दत्तजयंती होय.

ह्या ग्रंथाला पवित्र वेद समजतात, म्हणून या ग्रंथाचे पारायण कठोर नियमाने करावे. याचे नियम या ग्रंथातच दिलेले आहेत. हा ग्रंथ सात दिवसांच्या सप्ताहातच किंवा तीन दिवसातच पूर्ण करावा असा नियम आहे.

श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदांइतकाच मान्यता पावलेला आहे. इसवी सनाच्या १४व्या शतकात श्रीनृसिंह सरस्वती यांचे दिव्य व अद्भुत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्रीगुरूंच्या शिष्यपरंपरेतील श्रीसरस्वती गंगाधर यांनी १५व्या शतकात लिहिला. श्रीगुरूंच्या चरित्रासारखा अलौकिक विषय व परंपरेचा वारसा लाभलेला श्रीगुरुकृपासंपन्न, सिद्धानुभवी लेखक, असा योग जुळून आल्यामुळे या समग्र ग्रंथास सिद्ध मंत्राचे सामर्थ्य प्राप्त झाले आहे. हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे. संकल्प-पूर्तीसाठी श्रीगुरुचरित्र-वाचनाची विवक्षित पद्धती आहे. त्याप्रमाणेच वाचन, पारायण व्हावे. स्वतः गुरुचरित्रकार म्हणतात.

"अंतःकरण असता पवित्र । सदाकाळ वाचावे गुरुचरित्र ।"

अंतर्बाह्य शुचिर्भूतता राखून ह्या ग्रंथाचे वाचन करावे. वैविध्यपूर्ण अशा संकल्पपूर्ततेसाठी गुरुचरित्र सप्ताहवाचनाचे अनुष्ठान निश्चित फलदायी ठरते, असा अनेक वाचकांचा व साधकांचा अनुबव आहे. ह्या दृष्टीने अनुष्ठानाच्या कालात पाळावयाचे सामान्य संकेत वा नियम पुढीलप्रमाणे आहेत.

१. वाचन हे नेहमी एका लयीत, शांत व सुस्पष्ट असे असावे. उरकण्याच्या दृष्टीने उच्चारभ्रष्टता होऊ नये. चित्त अक्षरांतून व्यक्त होणार्‍या अर्थाकडे असावे.

२. वाचनासाठी नेहमी पूर्वाभिमुख वा उत्तराभिमुखच बसावे.

३. वाचनासाठी ठराविक वेळ, ठराविक दिशा व ठराविक जागाच असावी. कोणत्याही कारणास्तव ह्यात बदल होऊ देऊ नये.

४. श्रीदत्तात्रेयांची मूर्ती वा प्रतिमा नसल्यास पाटावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी व तीत श्रीदत्तात्रेयांचे आवाहन करावे.

५. सप्ताहकालात ब्रह्मचर्याचे पालन व्हावे. वाचन शुचिर्भूतपणाने व सोवळ्यानेच करावे. सप्ताहात केवळ हविषान्न घ्यावे. हविषान्न म्हणजे दूधभात. (मीठ-तिखट, आंबट, दही, ताक वर्ज्य. साखर घ्यावी. गूळ घेऊ नये. गव्हाची पोळी (चपाती), तूप, साखर घेता येते.)

६. रात्री देवाच्या सन्निधच चटईवर अथवा पांढर्‍या धाबळीवर झोपावे. झोपताना डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे संकल्पपूर्तीचा दृष्टीने संदेश ऐकू येतात, असा श्रद्धेने अनुष्ठान करणार्‍यांचा अनुभव आहे.

७. वाचनाच्या काळात मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसर्‍याशी बोलू नये.

८. सप्ताहाचा प्रारंभ पुष्कळदा शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करतात. कारण शुक्रवार हा श्रीगुरूंच्या निजानंदगमनाचा दिवस होय.

९. सप्ताह पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवशी, शक्य तर आठव्या दिवशी, सुपारीतून श्रीदत्तात्रेयांचे विसर्जन करावे, आणि नैवेद्य, आरत्या करून, भोजनास सवाष्ण, ब्राह्मण सांगून सांगता करावी. महानैवेद्यात शक्यतो घेवड्याची भाजी असावी.

स्त्रियांनी गुरुचरित्र वाचू नये असा श्री . प. पु. वासुदेवानंद सरस्वतीचा संकेत आहे .

काही विशिष्ट हेतूसाठी अध्याय नित्य वाचणारे लोक आहेत . 

* आरोग्य साठी १३ वा अध्याय 
* परमार्थिक गुरुकृपेसाठी २ रा अध्याय 
* सद्गुरू प्राप्तीची तळमळ व्यक्त होण्यासाठी पहिला अध्याय 
* संततीच्या आरोग्याबाबतची काळजी निवारणासाठी २० वा आणि २१ वा अध्याय .
* पुत्रप्राप्तीसाठी ३९ वा अध्याय 
* आकस्मिक अरिष्ट निवारणार्थ १४ वा अध्याय  अशी त्या अध्यायाची खास वैशिष्टे आहेत .

ज्यांना सवड नसेल ते रोज अवतर्णिका वाचतात ......

"दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा "

॥ श्री गुरुदेव दत्त ॥
Image may contain: 3 people


आपण सारे अर्जुन - व. पु. काळे  पु🌼🌼🌼

एक मांजर सकाळी रस्त्यावर आलं. सूर्याच्या तिरक्या किरणांमुळं मांजराला स्वत:ची लांबपर्यंत पसरलेली सावली दिसली. मांजर म्हणालं,'आज कमीत कमी एखादा घोडा मारून खाल्ल्याशिवाय भूक भागायची नाही.'सूर्य वरवर येऊ लागला.सावलीकडे पाहून मांजर म्हणालं,'घोड्याची काही जरूरी नाही. एखादी शेळी सुद्धा चालेल.'सूर्य आणखी वर आला. सावलीची लांबीही त्याप्रमाणात कमी झाली.मग मांजर म्हणालं,'एखादा ससाही चालेल.'ऐन दुपारी सावली पायांतळीच आली. तेंव्हा मांजर व्याकूळ होत म्हणालं,'फक्त एक उंदराचं पिल्लू पुरे.'
व्याकुळावस्थेत स्वत:ची जी ओळख होते, ती 'वास्तवता'. स्वत:ची ओळख. त्या प्रमाणातच प्रत्येकाची 'पूर्णत्वाची' व्याख्या वेगळी असणार.एखाद्या कलाकृतीत कोणत्याही माणसाला कुठलाही पर्याय किंवा बदल सुचवता येत नाही, तेंव्हा ते 'पूर्णत्व'.
Image may contain: cat

Monday, 7 August 2017

व्हाट्सअप्प बणवणाऱ्या जान कोउम ची कहाणी | story of whatsapp founder jan koum

नकारात्मक लोकांना कुठल्या हि संधी मध्ये काहीना काही अडचण दिसते, तर सकारात्म लोकांना अनंत अडचणीत देखील संधी दिसत असते. आज आपण अशाच एका सकारात्म व्यक्ती बदल माहिती घेणार आहोत. ज्याचा आयुष्यात अन्न पाण्या सारख्या मूलभूत गोष्टींसाठी देखील संघर्षच लिहलं होत. त्यात त्या माणसाने जिद्दीच्या जोरावर आयुष्यातील खाच खळगे भरत, अमेरिका मधील सर्वात श्रीमंत व्यक्तींचा यादीत आपले नाव शामिल केलं.
आज आपण व्हाट्सअप ला बनवणाऱ्या जान कोउम( jan koum) बद्दल माहीती घेणार आहोत. ज्या जान कोउम ला फेसबुक ने त्याचा क्षमतेवर बोट ठेवून नौकरी नाकारली, त्याच फेसबुक ला कोउम ने त्याने तयार केलेला व्हाट्सअप 19 बिलियन डॉलर्स मध्ये विकले. ही रक्कम भारतीय करन्सी मध्ये जवळपास 1 लाख करोड एवढा होतो.

सुरुवातीचा काळ

कोउम च जन्म हे युक्रेन मध्ये झालं होतं. त्याचे वडील बांधकाम मजूर होते. तर आई एक गृहिणी होती. त्याचं आयुष्य खूप खडतर होते. ते 2 वेळच्या अन्न पाण्यासाठी देखील ते महाग होते. त्या वेळी युक्रेन मध्ये वातावरण खूप अस्थिर होत. मग त्यांनी युक्रेन सोडून अमेरिका मध्ये आश्रय घेण्याचा निर्णय घेतला.
जान फक्त 16 वर्षाचा असताना त्याचा कुटूंबानी माउंटन व्हिएव (mountain view) कॅलिफोर्निया येथे स्थलांतर केलं. त्यांना एका सामाजिक संस्थेने त्यांना दोन खोल्यांचं एक लहान घर देऊ केलं होतं. ईथे देखील त्यानां खूप संघर्ष करावा लागला. घर चलवण्या साठी कोउम च्या आईने घरातच बेबी सीटर काम करायला सुरुवात केली. जान कोउम देखील पेपर टाकणे, दुकानातील फारश्या पुसणे इत्यादी कामे करून आईला आर्थिक मदत केली. या काळात कोउम ला तासंतास जेवण मिळवण्या साठी अन्नछत्रा बाहेर उभे राहावे लागत.
पण म्हणतात ना वेळ चांगला असो किंवा वाईट ते नक्की बदलत असते. जान कोउम चे देखील दिवस हळू हळू बदलत होते. त्याने 19 वर्षी एक कॉम्प्युटर विकत घेतला त्याला प्रोग्रामिंग ची आवड होती. तो सर्व काही पुस्तके वाचून स्वतः शिकला होता. त्यांने काही दिवस एका हॅकर ग्रुप WooWoo मध्ये हॅकर म्हणून ही काम केलं आहे.
पुढे कोउम ने सॅन जोश स्टेट युनिव्हर्सिटी मध्ये ऍडमिशन घेतलं. त्या सोबत एर्णस्ट अँड यंग (Ernest and Young) या कंपनीत रात्री सिक्युरिटी टेस्टर म्हणून जॉब करत असे. शिक्षणा नंतर त्याने yahoo येथे जॉब करायला सुरुवात केली येथेच त्याला एक मित्र मिळणार होता ज्याचा सोबत तो इतिहास रचणार होता.

ब्रायन ऍक्टन सोबत ओळख

Yahoo मध्ये कोउम ने 10 वर्षा काम केलं आहे. त्या काळात त्याला ब्रायन ऍक्टन (Brian Acton) नावाचा जिवलग मित्र मिळाला, तो yahoo मध्ये advertising सिस्टीम सांभाळत असे. त्यांचे एक दुसऱ्या सोबत खूप जास्ती पटत असे. या काळात ते एकमेकांचे खूप जिवलग मित्र झाले. नंतर कोउम आणि ऍक्टन दोघानी स्वतःच स्टार्टअप सुरु करायच विचार केला. फेसबुक आणि ट्विटर सारखं मोठं निर्माण करण्याचा ध्येयाने त्यांनी 2007 साली yahoo कंपनीला ला राजीनामा दिला.
पहिला वर्ष त्यांना काहीच जमले नाही. त्यांचा कडे असलेले पैसे हळू हळू संपत होते. निराश होऊन त्यांनी परत जॉब करायचं ठरवलं. त्यांनी फेसबुक आणि ट्विटर मध्ये जॉब साठी अप्लाय हि केला. पण इंटरविव्ह मध्ये त्यांना नाकारण्यात आले. कोउम आणि ऍक्टन दोघानी हा काळ खूपच अवघड असल्याचं ट्विर च्या माध्यमातून सांगितलं होतं.
पण कोणीतरी महान व्यक्तीने म्हंटले आहे की
सध्या तुमच्या जीवनात कठीन काळ असेल तर समजुन घ्या येणार काळ त्या प्रेक्षा कठीण असेल पण त्या नंतर मात्र सर्व चांगले आणि सोप्पे असेल.
त्याच प्रमाणे कोउम आणि ऍक्टन यांचं होतं. कोउम ने 2009 मध्ये अप्पल चा i-phone घेतला. आणि त्याला फक्त 7 महिने जूणा अँप स्टोर च्या क्षमते ची कल्पना आली. त्याला कळाले की मोबाईल ऍप्प तयार करणे खूप फायदाचे होऊ शकते.

whatsapp चा जन्म

कोउम ला त्याचा एका रशियन मित्राने इस्टंट मेसेजिंग ची कल्पना सुचवली. बाजारात इन्स्टंट मेसेजिंग ऍप्पस होत्या, जसे ब्लॅकबेरी मेसेंजर इत्यादी पण ते फक्त ब्लॅकबेरी च्या मोबाईल पुरतेच मर्यादित होत्या. नेमके हेच कोउम ने हेरले, त्याने कोणत्या ही फोन वर चालेल असा इन्स्टंट मेसेजिंग ऍप बनवायचं ठरवलं. त्याने तयार केलेल्या ऍप्प साठी whatsapp हे नाव नक्की केलं, आणि 24 फेब्रुवारी 2009 मध्ये कॅलिफोर्निया येथे स्वतःची whatsapp.inc कंपनी स्थापन केली.
सुरुवातीचा एक वर्ष व्हाट्सअप्प ला अपेक्षा प्रमाणे यश मिळाले नाही. कोउम हा परत निराश होऊन व्हाट्सअप्प बंद करण्या बाबत ऍक्टन कडे बोलणी केली. ऍक्टन ने त्याला आणखी एक वेळा प्रयत्न करण्याचा सल्ला दिला, आणि झालेही तसंच वापरण्यास सोप्पे आणि एकही जाहिरात नसलेला ऍप म्हणून व्हाट्सअप्प प्रसिद्धीस येऊ लागला. तो एवढा प्रसिद्ध झाला की फक्त 3 वर्षातच ऍप्पल च्या ऍप्प स्टोर मध्ये सर्वात जास्ती डाउनलोड केला जाणारा ऍप्प बनला. व्हाट्सअप्प आणि कोउम दोघांचे दिवस फिरले.
स्थापनेच्या फक्त 5 वर्षी नंतरच व्हाट्सअप्प ने यशाचे मोठे मोठे शिखर सर केले होते. अखेर फेसबुक च्या संस्थापक मार्क झुकरबर्ग याने व्हाट्सअप साठी 19 बिलियन डॉलर ची ऑफर कोउम कडे ठेवली. 19 बिलियन म्हणजे जवळपास 1 लाख 19 हजार करोड रुपये होतात. शिवाय व्हाट्सअप्प च्या मुख कार्यकारी मंडळा वर कोउमलाच ठेवण्याचा आश्वासन दिले गेले तेंव्हा कुठे कोउम ने 19 बिलियन डॉलर मध्ये व्हाट्सअप्प फेसबुक कंपनी ला विकायचं निर्णय घेतला. आणि गंमत म्हणजे या फेसबुक ने कोउम याला नौकरी नाकारली होती.
त्याने फेसबुक च्या ऑफर वर सही करण्यासाठी तेच ठिकाण निवडले जिथे, त्याने आयुष्यात सर्वात जास्ती कष्ट घेतलं होतं. जिथे त्याला तासंतास अन्ना साठी थांबावं लागलं. त्याचं कॅलिफोर्निया येथील अन्न छत्रात त्याने फेसबुक च्या करारावर सही केली. जान आता जरी श्रीमंत झाला असला तरी तो त्याचे गरिबीतले दिवस विसरला नाही.
 मित्रांनो आयुष्य असच असते. हजार कष्ट असले तरी आपले दिवस कधी ना कधी येणार या वर विश्वास ठेवायचं असते. यश मिळवण्यासाठी फक्त आणि फक्त एकच गोष्ट महत्वाची वाटते मला ती म्हणजे मैदानात टिकून राहणे बाकी सर्व ऑटोमॅटिक होतं .

॥ आयुष्याचा निर्णय कुणाचा? ॥
सुप्रसिद्ध लेखक देवदत्त पटनाईक ह्यांचं एक सुंदर पुस्तक वाचनात आलं "द गर्ल हू चोस". रामायणातल्या सीतेच्या भूमिकेला प्रकाशात आणणारं हे तासाभरात वाचून होणारं पुस्तक, परंतु जणू काही आपल्या सर्वच समस्यांचे उत्तर देऊन जाते.
आपल्या समस्यां काय? आपल्याला जे मिळते ते आपल्याला मान्य नसल्याने होणारा त्रास म्हणजे आपल्या सर्व समस्यांचे मूळ. जीवन हे एक चक्रात सुरु असते. कधी चागले तर कधी वाईट प्रसंग येत असतात. जे वाईट भासते ते व्हायलाच नको अशी आपली धारणा असल्याने त्याचा आपल्याला त्रास होतो. पण जास्त त्रास होतो जेव्हा आपण जे आपल्याला नकोसं असतं त्याचा दोष दुसर्या कुणाला तरी देत असतो.
आपला समज असा आहे कि "मी स्वतःसाठी वाईट कसे निवडणार"? त्यामुळे जे होत आहे त्याला दुसरे कुणीतरी, किंवा नशीब आणि देव तरी कारणीभूत आहे. आणि असा विचार करून आपण जास्तच दुखी होतो.
रामायणात सीतेच्या परिस्थितीला आणि भोगाला रावण आणि रामालासुद्द्धा कुठे ना कुठे कारणीभूत ठरवले जाते. पण खरंच तसे होते का?
पटनाईकांनी सीतेने केलेले पाच निर्णय संपूर्ण रामायणाला आणि सीतेच्या भोगाला कसे कारणीभूत ठरले ते आपल्या समोर ठेवले आहे.
*ते पाच निर्णय असे:*
१. रामाला वनवास ठोठावला गेल्यावर सीतेने त्याच्यासोबत वनवासात जायचा निर्णय स्वतः घेतला.
२. लक्ष्मणाने निक्षुन सांगितले असतांनाही तिने रावणाला भिक्षा द्यायला लक्ष्मणरेषा ओलांडण्याचा निर्णय घेतला.
३. जेंव्हा हनुमानाने सीतेला लंकेतून चलण्याचा आग्रह केला तेंव्हा सीतेने निर्णय घेतला कि रामाने तिथे येऊन रावणाचा पराभव करून तिला नेल्याशिवाय ती अयोध्येला परतणार नाही.
४. रावणाला हरवल्यावर रामाने सीतेला सांगितले कि त्याने आयोध्येची आणि कुळाची मर्यादा राखली, आता सीता तू कुठेहि जायला मोकळी आहे. त्यावेळी सीतेने रामासोबत जायचा निर्णय घेतला आणि त्यासाठी अग्निपरीक्षा देण्याचाही निर्णय घेतला.
५. सरते शेवटी जेंव्हा लाव- कुश भेटल्यावर आणि जन मानसाने कौल दिल्यावर रामाने सीतेला अयोध्येला परत चलण्याची विनंती केली, त्यावेळी सीतेने भूमीत परत जाण्याचा निर्णय घेतला.
ह्या सर्व निर्णयामागचे कारणं कुठलीही असोत, पण अधिकांश वेळी सीतेला निर्णय घेण्याचा अधिकार होता.
त्याच प्रमाणे आपल्या आयुष्यात होत असलेल्या अधिकांश घटनाक्रमांमध्ये आम्हाला निर्णय घेण्याची संधी मिळते. त्या वेळी आपण कुठला निर्णय घेतो हे आयुष्यातल्या पुढच्या घटनांना कारणीभूत ठरते.
तुमची पत्नी तुम्हाला हवं तशी वागत नाही? पण लग्न करताना तुम्ही तिची निवड केली होती... कुठल्या कारणाने? ती सुंदर दिसते? शिकलेली आहे? पैसा कमावते? व्यवस्थित रहाते? स्मार्ट आहे? स्टाइलिश आहे? ती तुम्हाला आवडली होती, पण त्यावेळी तिने तुमच्या इच्छेप्रमाणेच वागायला हवा अशी अट तुम्ही ठेवली होती का?
तुम्हाला नोकरीत हवा तेवढा पैसा मिळत नाही? पण ज्यावेळी शाळेत आणि कॉलेज ला आभ्यासात मेहनत करायची वेळ होती त्यावेळी तुम्ही पूर्ण मेहनत करायचा निर्णय घेतला होता का? कि त्यावेळी दोस्तानंसोबत वेळ घालवायचा निर्णय तुम्ही घेतला होता? नोकरीत बढतीसाठी नव- नवीन शिकायची आवश्यक्ता असते हे माहीत असतांना तुम्ही मेहनत घेतली कि दिवसभर काम करून थकून जातो म्हणून सोडून दिलं?
आणि ब्लड प्रेशर वाढणे चांगले नाही, डायबिटीज मुळे डोळे आणि किडनी खराब होतात, सिग्रेटी आणि तंबाखू सेवनाने आजार होतात इत्यादींची संपूर्ण जाणीव असतांना तुम्ही शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याची काळजी घेण्याचा निर्णय घेता कि... ?
आपलं आयुष्य कसं असावं हा निर्णय घेण्याचा अधिकार प्रत्येकाला असतो. जे विद्यार्थी आई वडिलांनी पसंतीचा करियर करू दिला नाही म्हणून आपल्या अपयशाचा दोष त्यांना देतात ते हि हमखास घरच्यांचा विरोध असतांनाही व्यसनं करतात आणि आपल्याच पसंतीचा जोडीदार आणतात. ह्या वरून स्पष्ट आहे कि आपल्याला जेथे सोईस्कर असते तिथे आपण आपले निर्णय घेतो आणि इतर ठिकाणी आपल्या त्रासाचा किंवा अपयशाचा दोष दुसऱयांना देतो.
रामायणाच्या ह्या वेगळ्या पैलूला आपल्या घरात जरूर जागा द्या. त्रास असतांना देखील आयुष्यातली संतुष्टी वाढेल आणि मुलांनाही जीवनाचा एक आवश्यक पैलू देता येईल.

Saturday, 5 August 2017

🌼🌼🌼 एक सुंदर बोध कथा... 🌼🌼🌼


वाल्मिकी ऋषींनी 'रामायण " लिहून पूर्ण केले .त्यांनी ते देवर्षी नारदाना वाचायला दिले . नारदांनी ते वाचून सांगितले कि " हनुमान " रचित रामायण , हे तुमच्या रामायणा पेक्षा खूप सुंदर आणि भक्तिपूर्ण आहे. वाल्मिकी म्हणाले , " काय ? त्या माकडाने पण रामायण लिहिले आहे ? " वाल्मिकींना हे आवडले नाही. मग, कोणाचे रामायण चांगले आहे ? हि जिज्ञासा त्यांना स्वस्थ बसू देईना ..ते हनुमानाच्या शोधात फिरू लागले . 
शोधता शोधता ते कर्दळी वनात, केळ्यांच्या बागेत आले . तेथील सात मोठ्या केळीच्या पानांवर रामायण कोरलेले त्यांनी पाहिले . त्यांनी ते संपूर्ण वाचले . त्यांनाही ते खूप भावले . अगदी योग्य शब्द , व्याकरण, व्याप्ती, भाषेचा ओघ, व ओघवती रसाळ भक्तिपूर्ण रचना ह्यांनी ते नटलेले होते. वाल्मिकींना ते सहनच झाले नाही . ते रडू लागले , ते स्वतःला आवरू शकले नाहीत.
"एवढे वाईट आहे का ?" हनुमानाने मागून विचारले. वाल्मिकी म्हणाले, " खूप सुंदर आहे ." हनुमान म्हणाले ," मग, तुम्ही का रडत आहात ? " वाल्मिकी म्हणाले ," आता, तुझे रामायण वाचल्यावर माझे रामायण कोणीही वाचणार नाही ".
हे ऐकल्यावर हनुमानाने ती सातही केळीची पाने फाडून टाकली ..चला, आता कोणीही हनुमानाचे रामायण वाचणार नाही .
हनुमान म्हणाले, माझ्या रामायणा पेक्षा तुम्हाला तुमच्या रामायणाची गरज आहे . जगात लोकांनी तुम्हाला वाल्मिकी म्हणून ओळखावे म्हणून तर तुम्ही रामायण लिहिले . माझे तसे नाही . मला माझा राम माझ्या सोबत सतत हवा म्हणून मी रामायण लिहिले .
त्याच क्षणी वाल्मिकींना जाणीव झाली कि मी एका हव्यासा पोटी रामायण लिहिले पण मला राम हा समजला च नाही . मी एका इर्षेपोटी रामायण लिहित गेलो, ते सत्य जगाला सांगण्याच्या गुर्मीत रामाला विसरून गेलो. मी रामायण लिहिले ते माझ्या तल्या "मी" ला सुखावण्या साठी , ती माझी महत्वाकांशा होती . हनुमानाने रामायण लिहिले ते त्याच्या " रामावरील भक्तिपोटी " . राम त्याचा सर्वस्व आहे आणि म्हणूनच ते जास्त सुंदर आहे .
" रामा " पेक्षा रामायण मोठे नाही. ज्याला राम कळला त्याला रामायण समजले कि नाही ह्याचा काहीच फरक पडत नाही .
श्री राम जय राम जय जय राम ..!!!

Saturday, 1 July 2017

श्रीकृष्ण से सीखें सफलता के 5 मंत्र जिंदगी में आ रही
बाधाओं को दूर कर
सफलता प्राप्त करे
==============================
======================
युवाओं के लिए मार्गदर्शक के तौर पर भगवान एवं
सखा श्रीकृष्ण से बढ़कर दूसरा कोई नहीं है। युवाओं के
सबसे करीबी माने जाने वाले श्रीकृष्ण उनके लिए
मित्रवत होने के साथ ही अहम गुरू भी हैं,जो उन्हें
विपत्ति और संकट के समय गीता के ज्ञान से उजाले
की ओर से ले जाते हैं और तनाव से मुक्ति भी दिलाते
हैं।
श्यामवर्ण श्रीकृष्ण की गीता में लिखित ज्ञान के
माध्यम से जिंदगी में आ रही बाधाओं को भी दूर कर
सफलता प्राप्त की जा सकती है। जन्माष्टमी के
पावन पर्व पर हम आपको बता रहे हैं गीता में श्रीकृष्ण
द्वारा बताए गए सफलता के कुछ मंत्र-
-------------------------
दूरगामी सोच-
=====================================
श्रीकृष्ण की ओर से बोले गए ज्ञान के श्लोकों पर
आधारित भागवत गीता के अनुसार हमें सोच को
संकुचित बनाने के स्थान पर दूरगामी और व्यापक
बनानी चाहिए। उदाहरण के तौर पर जब पांडव मोम
के लाक्षागृह में फंस गए तो महज एक चूहा उन्हें उपहार
में दिया और केवल एक चूहे के जरिए पांडवों ने
लाक्षागृह से बाहर निकलने का रास्ता ढूंढ जीवन
को सुरक्षित किया। यह दूरगामी सोच का ही
परिणाम रहा।
डर के आगे जीत-
====================================
गीता के अनुसार अगर आपके सामने समस्या विकराल
बनती जा रही है और फिर भी समाधान नहीं कर पा
रहे हैं तो भी हिम्मत न हारे और चिंतन करने के साथ
ही समस्या का सामना करें। मुसीबतों से घबराने की
जगह उसका सामना करना ही सबसे बड़ी शक्ति है।
एक बार डर को पार कर लिया तो समझो जीत आपके
कदमों में। पांडवों ने भी धर्म के सहारे युद्ध जीता था।
प्रगति पथ पर प्रशस्त-
======================================
श्रीकृष्ण ने हमेशा पांडवों से यही कहा कि पीछे हटने
की बजाए प्रगति पथ पर मार्ग प्रशस्त करें। उदाहरण के
तौर पर यदि एक कर्मचारी कम्पनी से लगाव होने के
कारण जीवन बढिया अवसरों को छोड़ रहा है,तो यह
मूर्खता है। क्योंकि अटैचमेंट टैलेन्ट को मार देता है।
ऐसे में अगर आपको ज्यादा स्कोप,स्थान परिवर्तन में
दिखाई देता है,तो फिर स्थान परिवर्तन करने में ही
फायदा है।
बनें ऋषिकेश-
====================================
श्रीकृष्ण को ऋषिकेश भी कहा जाता है। यह दो
शब्दों से मिलकर बना है ऋषक और ईश यानी
इन्द्रियों को वश में करने वाला स्वामी। श्रीकृष्ण
की भक्ति करने वाला व्यक्ति बुद्धि पर विजय
प्राप्त करने में सक्षम रहता है। गीता के अनुसार हवा
को वश में करना तो फिर भी संभव है, लेकिन दिमाग
को वश में कर पाना असंभव है। बावजूद इसके जिसका
मन पर कंट्रोल हो गया वह आसानी से हर जगह
सफलता हासिल कर सकता है।
स्मृति,ज्ञान और बुद्धि-
==============================
================
गीता में श्रीकृष्ण ने एक श्लोक के माध्यम से
उल्लेखित किया है कि किसी भी क्षेत्र में सफल होने
के लिए स्मृति और बुद्धि का स्वस्थ होना अनिवार्य
है। बुद्धि मतलब अच्छी चीजों को परखने की क्षमता,
ज्ञान मतलब सभी पहलुओं की बारीकी से
जानकारी और स्मृति यानी बुरी को भुलाने और
अच्छी को याद करने की क्षमता। यदि इन तीनों पर
युवा फोकस करें तो जीवन की सत्तर फीसदी
कठिनाइयों से छुटकारा पाया जा सकता है।
कृष्ण का व्यक्तित्व अनूठा है। अभी तक हम उन्हें
अलग-अलग देखते आए हैं। कोई योगेश्वर कृष्ण कहता
है,कोई भगवान,तो कोई राधा का प्रेमी,कोई
द्रोपदी का सखा,अर्जुन के गुरु,तो कोई कुछ और।
सूरदास के कृष्ण बालक है,महाभारत के कृष्ण गुरु है तो
भागवत के कृष्ण इससे भिन्न है।
सब उन्हें अपने-अपने नजरिए से देखते हैं। मीरा इन्हें
प्रियतम मानती है,हम जैसे लोग लोग उन्हें भगवान
मानते हैं। कृष्ण के अनेक रूप है। भिन्न-भिन्न लोग
भिन्न-भिन्न रूप में उनकी पूजा करते हैं।
कृष्ण संपूर्ण जीवन के समर्थक है। वे पल-पल आनन्द से
जीने की प्रेरणा देते हैं। महर्षि अरविन्द को जो जेल
में दर्शन दे सकते हैं,तिलक का मार्गदर्शन कर सकते
हैं,विनोबा को प्रेरित कर सकते हैं तो हमें भी रास्ता
दिखा सकते हैं।
बस जरूरत है पूरे मनोयोग से उस पर अमल करने की और
आगे बढ़ने की। यकीन मानिए सफलता आपके कदम
चूमेगी।

Monday, 26 June 2017

🌼🌼🌼*दूसरे की निंदा करिए और अपना घड़ा भरिए*🌼🌼🌼


हम जाने-अनजाने अपने आसपास के व्यक्तियों की निंदा करते रहते हैं: जबकि हमें उनकी वास्तविक परिस्थितियों का तनिक भी ज्ञान नही होता। निंदा रस का स्वाद बहुत ही रुचिकर होता है सो लगभग हर व्यक्ति इस स्वाद लेने को आतुर रहता है।
वास्तव में निंदा एक ऐसा  मानवीय गुण है जो सभी व्यक्तियों में कुछ न कुछ मात्रा में अवश्य पाया जाता है। यदि हमें ज्ञान हो जाये कि पर निंदा का परिणाम कितना भयानक होता है तो हम इस पाप से आसानी से बच सकते हैं।
गुरुदेव जी अक्सर एक कहानी सुनाते हैं- राजा पृथु एक दिन सुबह सुबह घोड़ों के तबेलें में जा पहुंचे। तभी वहीं एक साधु भिक्षा मांगने आ पहुंचा। सुबह सुबह साधु को भिक्षा मांगते देख पृथु क्रोध से भर उठे। उन्होंने साधु की निंदा करते हुए बिना विचारे तबेलें से घोडें की लीद उठाई और उसके पात्र में डाल दी। साधु भी शांत स्वभाव का था सो भिक्षा ले वहाँ से चला गया और वह लीद कुटिया के बाहर एक कोने में डाल दी। कुछ समय उपरान्त राजा पृथु शिकार के लिए गए। पृथु ने जब जंगल में देखा एक कुटिया के बाहर घोड़े की लीद का बड़ा सा ढेर लगा हुआ है उन्होंने देखा कि यहाँ तो न कोई तबेला है और न ही दूर-दूर तक कोई घोडें दिखाई दे रहे हैं। वह आश्चर्यचकित हो कुटिया में गए और साधु से बोले "महाराज! आप हमें एक बात बताइए यहाँ कोई घोड़ा भी नहीं न ही तबेला है तो यह इतनी सारी घोड़े की लीद कहा से आई !" साधु ने कहा " राजन्! यह लीद मुझे एक राजा ने भिक्षा में दी है अब समय आने पर यह लीद उसी को खाना पड़ेगी। यह सुन राजा पृथु को पूरी घटना याद आ गई। वे साधु के पैरों में गिर क्षमा मांगने लगे। उन्होंने साधु से प्रश्न किया हमने तो थोड़ी-सी लीद दी थी पर यह तो बहुत अधिक हो गई? साधु ने कहा "हम किसी को जो भी देते है वह दिन-प्रतिदिन प्रफुल्लित होता जाता है और समय आने पर हमारे पास लौट कर आ जाता है, यह उसी का परिणाम है।" यह सुनकर पृथु की आँखों में अश्रु भर आये। वे साधु से विनती कर बोले "महाराज! मुझे क्षमा कर दीजिए मैं आइन्दा मैं ऐसी गलती कभी नहीं करूँगा।" कृपया कोई ऐसा उपाय बता दीजिए! जिससे मैं अपने दुष्ट कर्मों का प्रायश्चित कर सकूँ!" राजा की ऐसी दुखमयी हालात देख कर साधु बोला- "राजन्! एक उपाय है आपको कोई ऐसा कार्य करना है जो देखने मे तो गलत हो पर वास्तव में गलत न हो। जब लोग आपको गलत देखेंगे तो आपकी निंदा करेंगे जितने ज्यादा लोग आपकी निंदा करेंगे आपका पाप उतना हल्का होता जाएगा। आपका अपराध निंदा करने वालों के हिस्से में आ जायेगा।
यह सुन राजा पृथु ने महल में आ काफी सोच-विचार किया और अगले दिन सुबह  से शराब की बोतल लेकर चौराहे पर बैठ गए। सुबह सुबह राजा को इस हाल में देखकर सब लोग आपस में राजा की निंदा करने लगे कि कैसा राजा है कितना निंदनीय कृत्य कर रहा है क्या यह शोभनीय है ??  आदि आदि!! निंदा की परवाह किये बिना राजा पूरे दिन शराबियों की तरह अभिनय करते रहे।
इस पूरे कृत्य के पश्चात जब राजा पृथु पुनः साधु के पास पहुंचे तो लीद का ढेर के स्थान पर एक मुट्ठी लीद देख आश्चर्य से बोले "महाराज! यह कैसे हुआ? इतना बड़ा ढेर कहाँ गायब हो गया!!"
साधू ने कहा "यह आप की अनुचित निंदा के कारण हुआ है राजन्। जिन जिन लोगों ने आपकी अनुचित निंदा की है, आप का पाप उन सबमे बराबर बराबर बट गया है।
*गुरुदेव जी कहते हैं-  जब हम किसी की बेवजह निंदा करते है तो हमें उसके पाप का बोझ भी उठाना पड़ता है तथा हमे अपना किये गए कर्मो का फल तो भुगतना ही पड़ता है, अब चाहे हँस के भुगतें  या रो कर। हम जैसा देंगें वैसा ही लौट कर वापिस आएगा!*

|| श्री राम जय राम जय जय राम ||
||जय हनुमान ||

Sunday, 25 June 2017

*♻क्रोधावरील उपाय संयम* ♻


एकदा भगवान श्रीकृष्ण, बलराम
आणि सात्यकी हे तिघे जंगलातून जात
असताना रात्रीच्या वेळी काहीच
न कळाल्याने रस्ता चुकले.
जंगल घनदाट होते, तेथे न पुढे
जाण्याचा मार्ग दिसत होता न मागे येण्याचा.
तेव्हा तिघांनीही असा निर्णय
घेतला आता येथेच एखादी सुरक्षित जागा पाहून विश्राम करायचा आणि सकाळी उठून मार्गस्थ व्हायचे.
    तिघेही दमलेले होते पण प्रत्येकाने थोडा थोडा वेळ पहारा देण्याचे ठरवले.
पहिली पाळी सात्यकीची होती.
सात्यकी पहारा करू लागला

 तेव्हाच झाडावरून एका पिशाच्चाने हे पाहिले की एक माणूस पहारा करतो आहे आणि दोनजण झोपले आहेत. पिशाच्च झाडावरून खाली उतरले व सात्यकीला मल्लयुद्धासाठी बोलावू
लागले.
  पिशाच्चाने बोलावलेले पाहून
सात्यकी संतापला व क्रोधाने पिशाच्चावर धावून गेला. त्याक्षणी पिशाच्चाचा आकार बदलला व तो मोठा झाला. दोघांत तुंबळ मल्लयुद्ध झाले. पण जेव्हा जेव्हा सात्यकीला क्रोध येई तेव्हा तेव्हा पिशाच्चाचा आकार मोठा होई व ते सात्यकीला अजूनच जास्त जखमा करत असे.

एका प्रहरानंतर बलराम जागे झाले व
त्यांनी सात्यकीला झोपण्यास सांगितले.
सात्यकिने त्यांना पिशाच्चाबदल काहीच सांगितले नाही. बलरामांनाही पिशाच्चाने मल्लयुद्धास निमंत्रण दिले. बलराम पण क्रोधाने पिशाच्चाशी लढायला गेले तर त्याचा आकार त्यांना वाढलेला  दिसून आला. ते जितक्या क्रोधाने त्याला मारायला जात तितका त्या पिशाच्चाचा आकार मोठा होत असे. शेवटी तोही प्रहर संपला व आता पहा-याची पाळी भगवान श्रीकृष्णाची होती.

पिशाच्चाने मोठ्या क्रोधाने श्रीकृष्णांना आव्हान दिले पण श्रीकृष्ण शांतपणे मंदस्मित करत त्याच्याकडे पहात राहिले. पिशाच्च अजून संतापले व
मोठमोठ्याने ओरडून श्रीकृष्णांना बोलावू लागले पण श्रीकृष्ण मंदस्मित करत शांत भाव जपत राहिले
व एक आश्चर्य झाले ते म्हणजे जसे जसे पिशाच्चाला क्रोध येऊ लागला तसतसा त्याचा आकार लहान होत गेला. रात्र संपत गेली अन पहाट
झाली शेवटी आकार लहान होत
होत पिशाच्चाचा एक छोटासा किडा झाला व श्रीकृष्णांनी अलगद
त्याला आपल्या उपरण्यात बांधून ठेवले.
  सकाळी सात्यकी व बलरामांनी रात्रीची कहाणी सांगताच श्रीकृष्णांनी तो किडा त्यांना दाखविला व म्हणाले,
 "तुम्ही क्रोधाने याला कधीच जिंकू शकत नव्हता कारण हे क्रोधाचे पिशाच्च होते. त्याला शांती हेच औषध
आहे. क्रोधाने क्रोध वाढतो मात्र त्याचा प्रतिकार हा केवळ शांतभाव प्रकटीकरणाने होतो.
मी शांत राहिलो म्हणून हे पिशाच्च बघा कसे आता या किड्यासारखे लहान होऊन बसले आहे.

तात्पर्य : क्रोधावर संयमानेच विजय मिळविता येतो.
क्रोधाला क्रोधाने मारता येऊ शकत नाही तर शांतपणे, प्रेमानेच कमी करता येते, नष्ट करता येते.
क्रोधाचे हे पिशाच्च बाहेर कोठे नसून,  आपल्या विचारातच वसत असते.

Friday, 16 June 2017

एक हृदयस्पर्शी बोध-कथा
॥ माणुसकीचा झरा ॥
एकदा एक माणूस मॉर्नींग वॉकसाठी बाहेर पडला होता. परत येताना त्याला रस्त्यावरील एका खांबावर एक चिठ्ठी घडी करून अडकवून ठेवलेली दिसली. त्याने कुतुहलाने ती चिठ्ठी उलगडून वाचायला सुरवात केली. ती चिठ्ठी बर्याीच वेडावाकड्या अक्षरांमध्ये लिहिली होती. त्या चिठठीतील मजकूर असा होता.
‘माझी 50 रुपयांची नोट हरवली आहे. मी एक गरीब आणि वृद्ध महिला आहे. ही नोट इथेच कुठेतरी पडली असावी. मी ती नोट शोधायचा प्रयत्न केला पण मला काही ती नोट सापडली नाही. ज्या कुणाला ही नोट सापडेल त्याने ती नोट खालील पत्यावर पोचवण्याची कृपा करावी.’
त्या चिठ्ठीच्या शेवटी पत्ता दिला होता आणि ‘गणपतीच्या देवळाजवळ’ अशी खुण पण सांगीतली होती.
त्या माणसाला काय वाटले कोणास ठाऊक. तो पत्ता शोधत निघाला. हा पत्ता एका गरीब आणि दळिद्री झोपडपट्टीतला निघाला. त्याने त्या वस्तीतील गणपतीचे देऊळ शोधून काढले व त्या पत्यावरील घर पण शोधून काढले. ते घर म्हणजे एक चंद्रमौळी झोपडी होती. झोपडीचे दार बंद होते. त्याने दाराची कडी वाजवली. एका जख्ख म्हातारीने दार उघडले. त्या म्हातारीचे सर्वांग लटपटत होते. काठीचा आधार घेऊन ती कशीबशी उभी होती. शरीर खंगलेले, चेहेरा सुरकुतलेला, गालाची हाडे वर आलेली, अंगावर फाटके कपडे पण चेहेर्याावर स्वाभीमान असे तिचे रूप होते.
‘आजी मला तुमची 50 रुपयांची नोट सापडली! हे घ्या तुमचे पैसे!’ असे म्हणून त्याने खिशातील 50 रुपयांची नोट काढून आजींना दिली.
‘कमाल आहे! माझी हरवलेली 50 रुपयांची नोट देण्यासाठी आत्तापर्यंत 40 माणसे येऊन गेली. तु 41 वा आहेस!’ आजी म्हणाल्या.
‘तुला कोणी सांगीतले माझे पैसे हरवले आहेत म्हणून?’ आजींनी विचारले.
‘मी ते खांबावरच्या चिठ्टीमध्ये वाचले.’ त्या माणसाने उत्तर दिले.
‘एकतर माझे पैसे मुळीच हरवेले नाहीत! दुसरे म्हणजे ती खांबावरची चिठ्ठी मी लिहीलेली नाही. कारण एकतर मला नीट दिसत नाही त्यामूळे मी घरातून बाहेर पडत नाही. तसेच मला लिहीता वाचता पण येत नाही. कोणीतरी खोडसाळपणाने ती चिठ्टी लिहीली आहे. हे तुझे 50 रुपये परत घेऊन जा!’ आजी म्हणाल्या.
‘नको आजी! राहुदे हे पैसे तुमच्याजवळ! तुम्हालाच ते उपयोगी पडतील!’ तो माणूस म्हणाला.
‘कमाल आहे! आत्तापर्यंत जो जो माणूस माझे हरवलेले 50 रुपये परत द्यायला आला त्याला मी पैसे परत घे म्हणून सांगीतले तर प्रत्येकाने हेच उत्तर दिले!’ आजीबाई म्हणाल्या
‘माझे एक काम करशील?’ आजीबाईंनी विचारले.
‘हो सांगाना! तुमचे काम नक्की करीन!’ त्या माणसाने उत्तर दिले.
‘अरे बाबा! जाताना ती खांबावरची चिठ्ठी फाडून टाक. लोकांना उगीच त्रास होतो आणि भुर्दंड बसतो. मी सगळ्यांनाच ती चिठ्ठी फाडून टाकायला सांगीतली. पण अजून कोणी ते काम केलेले दिसत नाही. बहुतकरून विसरले असावेत. निदान तू तरी ते काम करून टाक’ असे म्हणून त्याला धन्यवाद देत त्या आजींनी त्यांच्या झोपडीचे दार बंद केले.
परत जाताना त्या माणसाला त्या खांबावरची चिठ्ठी दिसली. ती चिठ्ठी फाडण्यासाठी म्हणुन तो त्या खांबाजवळ आला आणि थबकला.
त्याच्या लक्षात आले की त्या एका चिठ्ठीमूळे माणुसकीचा झरा वाहू लागला आहे. त्या चिठ्ठीमूळे अनेक लोकांची मदत त्या गरीब आजीबाईंना मिळाली आहे. आपले 50 रुपये गेले पण एका गरजू माणसाला मदत केल्याचा आनंद व समाधान आपल्याला मिळाले. असेच समाधान त्या 40 लोकांना पण मिळाले असेल. ही चिठ्ठी जर आपण फाडून टाकली तर माणुसकीचा झरा आटून जाईल. त्याला ती चिठ्ठी लिहिणार्याच माणसाचे कौतूक वाटले आणि तो चिठ्ठी न फाडताच तेथुन निघुन गेला.
‘माणुसकी नाही! माणुसकी नाही!’ अशी हाकाटी आपण मारत असतो. ‘हल्ली माणुसकी शिल्लक राहीली नाही! माणसाला माणसाची पर्वा किंवा किंमत राहिली नाही’ अशी बोंब ठोकत आपण सगळीकडे फिरत असतो. पण समाजात माणुसकीचे असे ‘सुप्त’ झरे नेहमीच वाहत असतात. फक्त आपल्याला ते दीसत नसतात. माणुसकीचे हे झरेच समाजाला व माणसाला जिवंत ठेवत असतात. असे झरे हेच समाजाच्या जिवंतपणाचे लक्षण असते.
तुम्हाला सुद्धा माणुसकीच्या अशा एखाद्या झर्याेमध्ये सामील होण्याची संधी मिळाली तर ती जरूर घ्या. इतरांना मदत केल्यामूळे जो काही आनंद किंवा समाधान मिळते याचा जरूर अनुभव घ्या!
अर्थात हा अनुभव घ्यायचा की नाही हे तुम्हीच ठरवायचे!

Tuesday, 21 March 2017

🌼🌼🌼

रामदासांची सुसंवाद सूत्रे 

🌼🌼🌼

बरेच वेळा आपण पाहतो की, बोलणा-याचा ‘वाच्यार्थ’ एक असतो तर त्याच्या बोलण्याचा ‘मथितार्थ’ काही वेगळाच असतो. उदाहरणार्थ, गोष्टीतल्या एका शिका-याने आपल्या प्रतिस्पर्धी शिका-याला सावजापासून हूल देण्यासाठी सांगितले की, या जंगलात चांगली हरणे नसल्याने मी दुस-या जंगलात जात आहे.
‘हेच समजून उत्तर देणें। दुस-याचें जीविंचे समजणे। मुख्य चातुर्याची लक्षणें। तीही ऐंसी।।’
अर्थात, सर्वात पहिले, दुस-या व्यक्तीला आपल्याला काय सांगायचे आहे ते नीट समजून घ्या आणि मगच त्याच्या बोलण्याचा हेतू समजावून घ्या. त्या हेतूप्रमाणे तुमचे उत्तर ठरवा. हीच चातुर्याची लक्षणे आहेत.
बरेच वेळा आपण पाहतो की, बोलणा-याचा ‘वाच्यार्थ’ एक असतो तर त्याच्या बोलण्याचा ‘मथितार्थ’ काही वेगळाच असतो. उदाहरणार्थ, गोष्टीतल्या एका शिका-याने आपल्या प्रतिस्पर्धी शिका-याला सावजापासून हूल देण्यासाठी सांगितले की, या जंगलात चांगली हरणे नसल्याने मी दुस-या जंगलात जात आहे.
त्या पहिल्या शिका-याचा हेतू जाणून न घेता दुस-या शिका-याने पहिल्याच्या सांगण्यावरच भरंवसा ठेवून ते जंगल सोडले, तर पहिल्या शिका-याला ते संपूर्ण जंगल आयतेच किंवा बाहेर घालविणा-या एकटय़ालाच मिळेल. याच्या उलट दुस-याने हा आपल्याला हाकलवण्याचा पहिल्याचा कट आहे हा हेतू समजावून घेतला तर तो चतुर ठरेल.
सूत्र २ :
‘नेणतेंपण सोडूं नये। जाणपणों फुगों नये।
नाना जनांचे हृदये। मृदू शब्दें उकलावे।।’
जो नेता विविध लोकांशी संबंध ठेवून असतो, अशा नेत्याला समर्थ रामदासांची ही ओवी फारच उपयुक्त ठरेल. या ओवीनुसार अशा लोकनेतृत्वाने स्वत:च्या ज्ञानाने अहंमन्य होऊन आपल्यापेक्षा कनिष्ठ वर्गाशीही बोलण्याचे टाळू नये.
किंवा एखादी गोष्ट माहीत नसल्यास ते ध्यानात ठेवून लोकांशी झालेल्या संवादातून अशी माहिती काढावी की, जेणेकरून मृदू शब्दांतून लोकांचे मनोगत जाणण्याची विद्या हस्तगत करावी. लोकांशी सातत्याने संबंध येणा-या प्रत्येक व्यवस्थापकासाठी हे सूत्र खूप महत्त्वाचे व आवश्यक आहे.
सूत्र ३ :
‘जगामध्ये जगमित्र। जिव्हेपासीं आहे सूत्र।’
ज्या कुणाला चांगले बोलण्याची कला हस्तगत झालेली आहे, असा माणूस जगमित्र होत असतो. लोकांना आपल्या वक्तृत्वाच्या प्रभावाने जिंकून घेणारे काही जण असतात. असे लोक प्रभावी नेते ठरतात. प्रभावी व्यवस्थापक ठरतात.
सूत्र ४ :
‘कठिन शब्दें वाईट वाटतें।
हें तो प्रत्ययास येतें।
तरी मग वाईट बोलावें तें।
काय निमित्य।।
पेरिलें तें उगवतें।
बोलण्यासारिखें उत्तर येतें।
तरी मग कर्कश बोलावें तें।
काये निमित्य।।’
जे पेराल तेच उगवेल हा निसर्ग नियम आहे. त्यामुळे क्रियेला जशी प्रतिक्रिया तसेच अनुचित शब्दाला अनुचित प्रतिशब्दच आपल्याला ऐकू येणार. हे माहीत असूनही आपण अनुचित का बोलावे बरे?
आपल्याशी जर एखादी व्यक्ती रागावून बोलली तर आपल्याला ज्याप्रमाणे वाईट वाटते, त्याप्रमाणे इतरांशी बोलताना दुस-याच्या मनाचा विचार करावा व इतरांशी बोलताना त्यांना बोचेल किंवा वाईट वाटेल असे बोलू नये. कारण ज्याप्रमाणे आपण बोलत असतो त्याप्रमाणेच समोरच्या व्यक्तीकडून प्रतिक्रिया येण्याची शक्यता असते. याचे भान ठेवूनच लोकांशी बोलावे.
संदर्भ व सौजन्य : प्रहार

Sunday, 19 March 2017

पालकांसाठी लेख (हेरंब कुलकर्णी )
टिव्ही आणि सोशल मिडिया यांचा लहान मुलांवर होणारा परिणाम व पालकांची जबाबदारी यावर सकाळ च्या सप्तरंग पुरवणीतील लेख..

॥ हजार तासांची घरातली शाळा..... ॥

शिक्षण कायदयाने प्राथमिक शाळा वर्षाला ८०० तास तर माध्यमिक शाळा १००० तास चालते. इतका कमी काळ चालणार्या शाळेचे आपण समाज शासन पालक म्हणून किती बारकाईने मूल्यमापन करतो. त्यांच्याकडून खूप सार्या अपेक्षा करतो.ते करायला ही हरकत नाही.पण दुसरी एक १००० तास घरातच शाळा भरते पण त्या शाळेकडे पालक लक्ष देत नाही की त्या शाळेशी दर्जा सुधारा म्हणून भांडत नाहीत. त्या शाळेकडून अपेक्षा करीत नाहीत. कोणती आहे ती शाळा ?ती शाळा आहे दूरदर्शन आणि सोशल मिडियाची....!!!!
१००० तास ? होय.आपली मुले वर्षाला टीव्ही आणि सोशल मीडिया एका वर्षात १००० तासापेक्षा जास्त वेळ बघतात म्हणजे शाळेच्या वेळेतच या शाळेत ते असतात आणि तरीही त्या शाळेत ती काय शिकतात याकडे पालक,समाज ,शासन औपचारिक शाळेकडे काळजीने बघत नाहीत.
याउलट टिव्हीविरोधी बोलणार्यााना फॅडिस्ट समजले जाते.माझ्या घरातला टिव्ही गेली ३ वर्षे मी बंद ठेवला आहे. त्याचा लाभ मुलाचे वाचन,चित्र काढणे वाढले.गंभीरपणे एखादा विषय समजून घेणे वाढले. माझे स्वत:चे लेखन टिव्ही नसल्याने वाढले.मुलगा ज्या विषयात आवड आहे ती माहिती नेटवर बसतो. बातम्या दुसर्या दिवशी वर्तमानपत्रातून समजल्याने काही फरक पडत नाही. हे सारे सकारात्मक परिमाण मी अनुभवतो आहे॰ पण जेव्हा आमच्याकडे कुणी येते आणि घरात टिव्ही नाही तेव्हा एखाद्या हातपाय नसलेल्या व्यक्तीकडे दयेने बघावे तसे ते बघतात व जगाच्या ज्ञांनापासून मुलांना दूर ठेवू नका असा उपदेश करतात.
तेव्हा या टिव्ही आणि सोशल मिडियच्या अनौपचारिक शाळा खरच जगाचे परिपूर्ण ज्ञान देते का ?मुलांना शाळा जशा विकासाच्या संधी देते तशा संधी देते का ?या गृहीतकाचीच उलटतपासणी करायला हवी.
 टिव्ही ने आणि सोशल मीडिया ने शारीरिक नुकसान मुलांचे होते त्यापेक्षा कितीतरी जे अधिक नुकसान हे मानसिक स्तरावरचे असते. वेगवान हालचाली हिंसकतेशी जोडल्या गेल्याने मुलांना मग हिंसकताही आवडू लागते. कार्टून सिरियल्स बघितल्यामुळे लहान मुलांमध्ये हिंसकता वाढते. टॉम व जेरीचे विनोद हे आवडतात. त्यांच्यातली हिंसक प्रवृत्ती व त्यांच्या हिंसक कारवायांभोवती गुंफलेले असतात. हॉरर चित्रपट किंवा मालिकासुद्धा आवडायला लागतात. भीती आणि हिंसा याबाबत त्यांची संवेदनशीलता कमी होत जाते आणि याचा त्यांच्या प्रत्यक्ष जीवनावरही परिणाम होतोच. माध्यमिक शाळेतली मुलांना एकटय़ाने किंवा समवयीन मुलांबरोबर टीव्ही बघायला आवडतं. स्वातंत्र्य, प्रणय हे विषय आवडतात . म्युझिक व्हिडीओज्, हॉरर मूव्हीज् आणि पोर्नोग्राफिक व्हिडीओज् बघायला आवडतात. मध्यंतरी मानसोपचार परिषदेत किशोर अवस्थेतील ५० टक्के मुले पोर्न बघतात असा निष्कर्ष अतिरेकी वाटला तरी मोबाइलच्या वापरामुळे वास्तवाच्या जवळ जाणारा आहे.
आपली मुले टिव्ही आणि सोशल मिडियाच्या शाळेत शिकतात. यातून त्यांच्या भावनांकाची तोडफोड होते.हिंसाचार बघून संवेदना बोथट होतात.अपघात बघून थंडपणे पुढे जाणारी पिढी घडते.ओरडणे,शिवीगाळ,प्रसंगी मारहाण हे स्वभाव विशेष होतात. मध्यंतरी संगमनेर तालुक्यात लहान वर्गमित्रांनी आपल्याच मित्राचा केलेला खून हे बोलके उदाहरण ठरावे. प्रेमप्रकरणे अगदी ५ वीच्या वर्गापासून सुरू होतात. गेल्या ३ वर्षात मुंबईत १५ वर्षाखालील मुलींच्या गर्भपात करण्याच्या प्रयत्नात १४४ टक्क्याने वाढ झाली आहे तर १५ ते १९ वयोगटात गर्भपातात ४७ टक्के वाढ झाली आहे. या तपशीलाचा सहसंबंध या माध्यमांशी जोडायचा की नाही ?
ग्रामीण आणि आदिवासी भाग हाही याला अपवाद नाही. किंबहुना गरीब कुटुंबात ही एकमेव करमणूक व एकच खोली त्यामुळे तिथे मुले जास्त टिव्ही बघतात. मोबाइल बघतात.या आभासी जगातली मूल्यव्यवस्था आणि जाहिरातीतील जग त्यातील घर,तिथली सुंदर नटलेली आई ,गाडी आपल्या वाट्याला का नाही ? यातून एक वेगळाच न्यूनगंड मुलांमध्ये
संशोधनात असे आढळून आले की, जास्त टीव्ही पाहणार्याल मुलांमध्ये खेळाची आवड कमी होत जाते. ते लांबउडीदेखील मारू शकत नाहीत. माँट्रियल विद्यापीठ व जस्टिन मदर अँड चाइल्ड हॉस्पिटल यांच्या संयुक्त संशोधनातून मुलांनी अनेक तास टीव्ही पाहिल्याने त्यांच्यात स्थूलपणाच्या तक्रारी वाढतात. त्याच्या शरीरातील मांसपेशी कमजोर पडतात व त्यामुळे भविष्यात त्याच्या प्रकृतीला गंभीर धोका पोहोचू शकतो.
तासन्तास दूरचित्रवाणी बघितल्यास प्राणघातक पल्मनरी एम्बॉलिझम हा रोग होण्याची शक्यता असते.पल्मनरी एम्बॉलिझम म्हणजे हृदयाकडून फुफ्फुसाकडे रक्त वाहून नेणार्याम रोहिणी या मुख्य रक्तवाहिनीमध्ये अडथळा निर्माण होते
यावर उपाय काय? आमच्यासारखे टिव्ही बंद करावा आणि ते शक्य नसेल तर मुलांशीच चर्चा करून रोज १ तास टिव्ही बघण्याचे वेळापत्रक ठरवावे. कार्यक्रम एकत्र बघावेत.बघितल्यावर मुलांशी त्यावर चर्चा करावी. जाहिरातींचा पडणारा प्रभाव,खोटी जीवनमूल्ये यावर चर्चा करून वास्तवाची जाणीव करून द्यावी. त्याचबरोबर आपण सोशल मिडिया कमीत कमी वापरुन मुलांच्या हातात मोबाइल देवू नये. उलट सुटीच्या दिवशी जास्त वेळ व रोज मुलांशी बोलणे,खेळणे .त्याला चित्र काढणे,गोष्टीची पुस्तके वाचणे हे करायला हवे.पालकांची मुले अनुकरण करतात. तुमच्या हातात पुस्तके आली,घरात लहान मुलांसाठी ची पुस्तके असली तरच मुले ती वाचतील. तेव्हा पालक टिव्हीसमोर आणि whatsapp वर असतील तर मुले तेच करणार..तेव्हा टिव्ही सोशल मिडियाला सशक्त पर्याय पालकांनी दिले तरच घरातली १००० तासांची शाळा मुलांची सुटेल.
राजीव दीक्षित म्हणायचे की राजा हरिश्चंद्र हे नाटक बघून जर मोहनदास नावाचा बालक सत्य जगण्याचा संकल्प करून महात्मा गांधी होत असेल आणि या माध्यमात इतके सामर्थ्य असेल तर इतकी हिंसा,सेक्स आणि उथळ कार्यक्रम बघून आपली मुले काय होतील ? याची कल्पनाच करवत नाही

टीव्ही बंद अभियान
जळगाव येथील कुतूहल फाउंडेशन चे महेश गोरडे केवळ टीव्ही व सोशल मीडिया या विषयावर जागरण करण्याचे काम गेली १० वर्षापासून करीत आहेत. या समस्येबद्दल आतापर्यंत महाराष्ट्रात ३ लाख माहिती पत्रकांचे वाटप केले.४०,००० हून अधिक मुलांचे सामुहिक समुपदेशन झाले आहे.शेकडो व्याख्याने, कार्यशाळा, चर्चासत्रे, विविध स्पर्धा , पालक सभा , शिक्षक सभा, अशा विविध माध्यमातून या विषयावर नियमित प्रबोधन करीत आहेत. टीव्ही बंद नव्हे तर टीव्ही शिस्त अभियान ते सांगतात. टीव्ही,मोबाईल,इंटरनेट, व्हाटसअप फेसबुक या माध्यमांचा योग्य प्रमाणात वापर करून उपयोग करून घ्यावा. त्यांचा अतिवापर व चुकीचा वापर टाळावा असे सांगणारे ‘या टीव्हीच काय करायचं?’ हे पुस्तक लिहिले.त्याला महाराष्ट्रभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. टीव्ही शिस्त पुरस्कार विद्यार्थी, पालक यांना वितरीत करतात टीव्ही,मोबाईल, इंटरनेट व सोशल मिडियाच्या आहारी गेलेल्यांसाठी टीव्ही ,मोबाईल,इंटरनेट व्यसनमुक्ती केंद्रही सुरू केले. केवळ टीव्ही ला विरोध न करता सकारात्मक पर्यायही दिला. मुलांचे छंदवर्ग सुरू करण्यात आले.त्यात विज्ञान प्रकल्प,बौद्धिक खेळणी,सीडी,पुस्तके,सहली,यासह उपक्रम केंद्र सुरू केले आहे. हजारो विद्यार्थी व पालक या वर्गात सहभागी झाले. यातून पालकांना पर्याय मिळाला. आठवड्यातून एक दिवस टीव्ही बंद. टीव्ही किती वेळ बघायचा याचे वेळापत्रक मुले टीव्ही शेजारी लावतात.

 रोज सरासरी ४ तास टीव्ही ,व्हाटस अप ,फेसबुक चा वापर याप्रमाणे एका वर्षाला १४६० तास ,तर ६० वर्षांच्या आपल्या आयुष्यात ८७६०० तास टीव्ही ,व्हाटस अप, फेसबुक साठी खर्च होतो . १२ तासांचा कामाचा दिवस धरला तर आपण आयुष्यतील २० सोनेरी वर्ष टीव्ही ,व्हाटस अप, फेसबुक वर अक्षरश: वाया घालवतो.
भारतातील मुले (चार ते १४ वर्षे) दिवसाला सुमारे १७० मिनिटे (सुमारे तीन तास) टीव्ही बघतात. शनिवार-रविवारी आणखी जास्त म्हणजे २०० मिनिटे (सुमारे साडेतीन तास).
वय वर्षे चार ते नऊ या वयोगटातील मुलांमध्ये हेच प्रमाण अनुक्रमे १३० आणि २०० मिनिटे आहे.
संपूर्ण देशभरातील तीन कोटींहून अधिक मुले (चार ते १४ वर्षे) रात्री दहानंतरही टीव्ही बघतात.
रात्री दहानंतर एफ टीव्हीच्या प्रेक्षकांपैकी १३ टक्के, चॅनल व्हीच्या प्रेक्षकांपैकी १३ टक्के, एम टीव्हीच्या प्रेक्षकांपैकी १३ टक्के, तर बिन्दास चॅनलच्या प्रेक्षकांपैकी तब्बल १७ टक्के प्रेक्षक हे १४ वर्षांखालील मुले आहेत.
‘आहट’ या हॉरर मालिकेचे ४८ टक्के प्रेक्षक हे चार ते १४ वयोगटातील मुलं आहेत.
स्टार वनवरील ‘हॉरर नाईट्स’ या मालिकेचे हिंदी भाषिक राज्यांतील ४८ टक्के प्रेक्षक १४ वर्षांखालील मुलं आहेत, तर २५ टक्के प्रेक्षक हे नऊ वर्षांखालील मुलं आहेत.
( ‘व्हॉट्स ऑन इंडिया’ने मे २०१० मध्ये केलेल्या सर्वेक्षण)
हेरंब कुलकर्णी