Tuesday, 15 November 2016

🌼🌼🌼🌼
 उदाहरण किंवा दृष्टांत महिलांना जास्त चटकन आणि पक्का समजेल. पुरुष मंडळींना देखील समजेल पण जरा वेळ लागेल इतकेच. कसे आहे, उदाहरण जर आपल्या नित्याच्या जिवनातील दिले तर ते चटकन समजत आणि पक्के मनावर ठसते.
तर उदाहरण अस की डेअरीतुन किंवा अन्य दुकानातुन दुधाची पिशवी आणली की ती फ़्रिजमधे ठेवली जाते पण एकदा का पिशवी फ़ोडुन त्यातील दुध टोपात ओतुन तापवले की मग मात्र या दुधाची काळजी खुप घ्यावी लागते. ते नीट झाकुन ठेवावे लागते, त्या टोपाला हात लावतांना हात स्वच्छ आहेत याची खात्री करुन घ्यावी लागते. इतर कोणताही पदार्थ त्या दुधात पडणार नाही या साठी खुप काळजी घ्यावी लागते. सगळ्यात महत्वाचे म्हणजे ते दुध एक तर फ़्रिजमधे ठेवावे लागते किंवा दर ३-४ तासांनी गरम करावे लागते. पहा घरची गृहिणी हे दुध दिवसातुन ३-४ वेळा तापवतेच. एकदा सकाळी मग दुपारी सगळी कामे झाली की झोपायच्या आगोदर , मग दुपारच्या चहाच्या वेळेस तापवले जाते मग रात्री जेवणे झाली, सगळी आवराआवर झाली की झोपायला जायच्या आगोदर दुध गरम करायचे आणि मगच झोपी जायचे. हे जर नाही जमले तर दुध नासायची शक्यता खुप असते. म्हणुनच हे काम गृहिणी कधीच टाळत नाही किंवा पुढे ढकलत नाही.
माणसाचे मन हे अगदी दुधासारखेच आहे, खुप सेन्सेटिव्ह असते जरा जरी दुर्लक्ष केले तर विषयांनी (काम, क्रोध, मोह, मत्सर इत्यादी) बरबटलेल्या विचारांनी निर्मळ मन लगेच नासते, दुश्चित्तपण येते मनाकडे.
जसे दुध खराब होवु नये म्हणुन ते वारंवार तापवावे लागते तसे मन निर्मळ रहावे म्हणुन ते दिवसातुन २-३ वेळा तरी नामस्मरण, उपासना, पुजाअर्चा, ध्यानधारणा, ग्रंथवाचन इत्यादीच्या अग्नीवर गरम करावे लागते. असे केल्याने मन निर्मळ रहाते. आता हे मन निर्मळ का ठेवायचे ? असा प्रश्न तुम्ही विचारणारच.
आता पहा तुम्हाला कोणी बसायला सांगितले तर बसायची जागा स्वच्छ आहे की नाही हे तुम्ही पहाता ना ? स्वच्छ असेल तर मग बिनघोर बसता. बरोबर ? जसे आपले तसेच देवाचे आहे, तो देखील तुमच्या मनात बसण्या आगोदर पहातोच की मन स्वच्छ, निर्मळ, पवित्र आहे ना ? ते असेल तर तो बिनघोर वस्ती करतो आपल्या मनात.
आपले गुरु, सद़्गुरु संत नेमके हेच तर करीत असतात. ते आपल्याला आपले मन निर्मळ पवित्र राखण्यासाठी मदत करीत असतात. ते देवाला अजिबात सांगत नाहीत की तु येथे येवुन बस, कारण त्यांना माहिती आहे की मन निर्मळ असेल तर देव नक्की मनात येवुन रहातो, तेव्हा तो तुम्ही लहान, मोठे, श्रीमंत गरीब, जातपात, धर्म काहिही पहात नाही. त्याला आवडते ते स्वच्छ, शुद्ध, निर्मळ, पवित्र मन. मग ते कोणाचेही का असेना. पहा आता पटले तर घ्या नाहीतर विसरुन जा.
श्रीराम जय राम जय जय राम..

No comments:

Post a Comment