Wednesday, 30 November 2016

🌼🌼🌼*सकारात्मक विचारांचे सामर्थ्य* *डॉ. दत्ता कोहिनकर*🌼🌼🌼

मनासारखा नवरा नाही मिळाला. करायचा म्हणून संसार करते, जगण्यात काही मजाच नाही सर, खूप नैराश्य येते, रोजचीच भांडणं, हेवे-दावे-तूतू मैं-मैं जीवन नकोसे वाटतंय, झोप येत नाही, जेवण जात नाही अस उदास व रडक्या आवाजत रडगाणं गाणार्या महिलेला पाहून वाटलं. त्या स्त्रीला कसा का होईना - नवरा बरोबर आहे. ज्यांच्या आयुष्यात पतीच नाही त्या बाईने काय करायचे? त्याच वेळी एक गाणं आठवलं.
‘‘चाँद मिलता नही - सबाके संसार मे ।है दिया ही बहोत रोशनी के लिए.’’
खरोखरच मित्रांनो आपलं संपूर्ण आयुष्य हे आपण कसा विचार करतो यावर अवलंबून आहे. मनात दररोज (24 तासांत) 60 हजार विचार येतात. यातील 60 ते 70% विचार हे नकारात्मक असतात. दर 15 ते 20 सेकंदाला नवीन विचार हे चक्र अव्हयातपणे चालू असतं.
*ज्यावेळेस आपण नकारात्मक विचार करतो त्यावेळेस विश्वात जेवढी नकारात्मक तरंग आहेत त्याच्याशी आपण जोडले जाऊन नकारात्मक विचारांची गर्दी आपल्या भोवती उरते व उदासी - भय - यातून नैराश्याकडे वाटचाल सुरू होते*. रेडिओ किंवा वाहिन्या ज्या ब्रँडवर आपण लावतो तेच प्रक्षेपण लगेच चालू होते. म्हणून नकारात्मक विचारांना - सकारात्मक करणे गरजेचे असते.
सकारात्मक विचार आपली शक्ती, आत्मविश्वास, मनोबल वाढवतात. नकारात्मक विचारांना - सकारात्मक करणे म्हणजे मनाचेच - मनाशी युध्द करणे होय. यालाच तुकाराम महाराज म्हणतात. ‘‘रात्रं दिनं आम्हां युदधाचा प्रसंग’’!
थॉमस् अल्वा एडिसनने 999 प्रयोग केले - हजाराव्या प्रयोगाच्या वेळेला विजेचा दिवा लागला. थॉमसला ज्यावेळेस पत्रकारांनी मुलाखतीत विचारलं. - थॉमस 999 प्रमाणे फसले याबाबत तुला काय वाटले ?
थॉमस म्हणाला - 999 प्रयोग फसले असे म्हणू नका. 999 वेळा मी हे सिध्द केलं, या मार्गाने विजेचा दिवा लागू शकत नाही. (सकारात्मक दृष्टीकोन)
नेपोलियन समुद्र किनार्यावर सैन्यासमोर जहाजातून उतरताना पाय चिखलावर घसरून छातीवर आडवा पडला, छाती चिखलाने माखली. तेव्हा अंधश्रध्दाळू सैनिकांना वाटलं. आपला सेनापती आडवा झाला म्हणजे आज आपला पराभव होणार, आपली मुंडकी उडणार - सैनिक भयभत झाले. नेपोलियनने ही बाब हेरली. तो उठताना छातीत झटकत म्हणाला, ‘मित्रांनो आजचे युध्द आपणच जिंकणार, जिथे जिथे आपण जाऊ तेथे - तेथे आपला विजय होणार’ कारण आल्या आल्या या भूमीने मला अलिंगन दिले आहे - मी तुझी आहे, मी तुझी आहे....
मित्रांनो सैनिकांचे मनोबल वाढले व सगळीकडे मोठी विजयश्री त्यांनी खेचून आणली. हे घडलं सकारात्मक दृष्टीकोनामुळे. टेबलावर एक ग्लास पाण्याने अर्धा भरला आहे.
जर असा विचार केला की, अर्धा भरला आहे त्यामुळे मन समाधानी होतं. पण तो अर्धा रिकामा आहे म्हटलं की, नैराश्य, व्याकूळता, हताशपण येतं. सकारात्मक दृष्टीकोन मनाला प्रसन्न करून - अतिरिक्त ऊर्जा प्रदान करतो त्यामुळे कर्माला गती प्राप्त होते आणि आत्मविश्वास वाढतो. नकारात्मक विचार मनाला व शरीराला दुर्बल करतो. परिणामी कर्माची गती मंदावते - चुका होतात - हानी होते व यातूनच औदासिन्य (Depression) येते.
गौतम बुध्दाजवळ एक शिष्य धापा टाकत आला व म्हणाला भगवान ‘‘मला गावकर्यांनी शिवी दिली.’’ बुध्द म्हणाले ‘‘बरं झालं त्यांनी तुला मारलं नाही.’’ तो म्हणाला ‘‘भगवान नंतर त्यांनी मला मारलं सुध्दा’’ भगवान म्हणाले ‘‘या मारामुळे तुला काही जखम झाली का ?’’, शिष्य म्हणाला ‘‘भगवान माझं डोकं फुटलं आहे.’’ गौतम बुध्द म्हणाले ‘‘बरं झालं - तुझा मृत्यू झाला नाही.’’ हे ऐकून शिष्य शांतपणे बुध्दाच्या चरणाजवळ शांत बसला, बुध्दांना हेच सांगायचे होते की, *जी घटना घडली त्यापेक्षा वाईट घटना घडू शकली असती पण ती घडली नाही यामुळे समाधानी रहा*.
मी अस्वस्थ आहे, पण लोकं माझ्यापेक्षा जास्त अस्वस्थ आहेत असा विचार मनाची तात्कालीक अस्वस्थता बर्याच प्रमाणात नियंत्रीत करतो.
माजी राष्ट्रपती अब्दुल कलामांना नौदलात भरती होता न आल्यामुळे पुढे ते शास्त्रज्ञ व देशाचे राष्ट्रपती झाले.काही वेळा अपयश हे महान यशाचे पण सूचक असते.
म्हणून सकारात्मक विचार करा व आनंदी रहा.
‘‘ *कोण म्हणतं जीवनात प्रत्येक वेळी काटेरी डंखच आहेत*
*अरे डोळे उघडून बघा-प्रत्येकाला उडण्यासाठी-फुलपाखरासारखे पंख आहेत*.’’

Show more

🌼🌼🌼॥ नवग्रह स्तोत्र ॥● 🌼🌼🌼

( कंसात ज्या ग्रहाचे स्तोत्र आहे त्या ग्रहाचे नाव दिले आहे. )
जपाकुसुम संकाशं काश्यपेयं महद्युतिं ।
तमोरिसर्व पापघ्नं प्रणतोस्मि दिवाकरं ॥ (रवि)
दधिशंख तुषाराभं क्षीरोदार्णव संभवं ।
नमामि शशिनं सोंमं शंभोर्मुकुट भूषणं ॥ (चंद्र)
धरणीगर्भ संभूतं विद्युत्कांतीं समप्रभं ।
कुमारं शक्तिहस्तंच मंगलं प्रणमाम्यहं ॥ (मंगळ)
प्रियंगुकलिका शामं रूपेणा प्रतिमं बुधं ।
सौम्यं सौम्य गुणपेतं तं बुधं प्रणमाम्यहं ॥ (बुध)
देवानांच ऋषिणांच गुरुंकांचन सन्निभं ।
बुद्धिभूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पतिं ॥ (गुरु)
हिमकुंद मृणालाभं दैत्यानां परमं गुरूं ।
सर्वशास्त्र प्रवक्तारं भार्गवं प्रणमाम्यहं ॥ (शुक्र)
नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजं ।
छायामार्तंड संभूतं तं नमामि शनैश्वरं ॥ (शनि)
अर्धकायं महावीर्यं चंद्रादित्य विमर्दनं ।
सिंहिका गर्भसंभूतं तं राहूं प्रणमाम्यहं ॥ (राहू)
पलाशपुष्प संकाशं तारका ग्रह मस्तकं ।
रौद्रं रौद्रात्मकं घोरं तं केतुं प्रणमाम्यहं ॥ (केतु)
● फलश्रुति :
इति व्यासमुखोदगीतं य पठेत सुसमाहितं ।
दिवा वा यदि वा रात्रौ विघ्नशांतिर्भविष्यति ॥
नर, नारी, नृपाणांच। भवेत् दु:स्वप्न नाशनं ॥
ऐश्वर्यंमतुलं तेषां आरोग्यं पुष्टिवर्धनं ॥
ग्रह नक्षत्रजा पीडास्तस्कराग्नि समुद्भवा ।
ता: सर्वा: प्रशमं यान्ति व्यासो ब्रुतेन संशय: ॥
इति श्री व्यासविरचित ।
आदित्यादि नवग्रह स्तोत्रं संपूर्णं ॥
● नवग्रह स्तोत्र मराठी अर्थः


१) जास्वंदीच्या फुलाप्रमाणे लाल अंगकांती असलेल्या, कश्यप ऋषींच्या वंशांत जन्मलेल्या अत्यंत तेजस्वी, अंधाराचा शत्रू, सर्व प्रकारची पापे नष्ट करणार्या दिवसाच्या राजाला, सूर्याला मी नमस्कार करतो.
२) दही आणि शंख यांच्या तुषारांप्रमाणे शोभून दिसणार्या, क्षिरसागरांतून निर्माण झालेल्या, भगवान शंकराच्या डोक्यावर दागिन्यांप्रमाणे शोभणार्या आणि ससा धारण केलेल्या सोमाला (चंद्राला) मी नमस्कार करतो.
३) धरणीच्या पोटांतून जन्म घेतलेल्या, विजेसारखी अंगकांती असलेल्या, हातात शक्ती हे शस्त्र धारण केलेल्या, कुमारस्वरूप अश्या त्या मंगळाला मी नमस्कार करतो.
४) अशोकाच्या फुलाप्रमाणे लाल-श्यामल रंग असलेल्या, अति रूपवान, बुद्धिवंत, सोज्वळ, सरळमार्गी, सुस्वभावी बुधाला मी नमस्कार करतो.
५) देवांचा आणि ऋषींचा गुरु, सोन्यासारखी अंगकांती असलेल्या, अति बुद्धिवंत, त्रिलोकांत श्रेष्ठ अशा त्या बृहस्पतीला (गुरूला) मी नमस्कार करतो.
६) हिमकमळाच्या देठाप्रमाणे प्रभा असलेल्या, दैत्यांचा गुरु असलेल्या, सर्व शास्त्रांचे ज्ञान असलेल्या, भृगुकुळांत जन्मलेल्या शुक्राला मी नमस्कार करतो.
७) निळ्यारंगाची प्रभा असलेल्या, सूर्यपुत्र, यमाचा मोठा भाऊ असलेल्या, त्या शनैश्चराला (शनीला) मी नमस्कार करतो.
८) अर्धेच शरीर धारण केलेल्या, वीर्यवान, चंद्र-सूर्याला छळणार्या, सिंहीकेपासून जन्मलेल्या त्या राहूला मी नमस्कार करतो.
९) पळसाच्या फुलाप्रमाणे लाल, तारका आणि ग्रहांमध्ये प्रमुख, भीती निर्माण करणार्या, रुद्राप्रमाणे तापदायक, अशा केतुला मी नमस्कार करतो.
१०) याप्रमाणे श्रीव्यास ऋषींच्या मुखांतून निघालेले हे नवग्रह स्तोत्र जो कोणी दिवसा आणि रात्री पठण करेल त्याची सर्व विघ्ने नष्ट होतील.
११) नर-नारी-राजा या सर्वांची दुःखे नष्ट होतील. त्यांचे ऐश्वर्य, आरोग्य आणि श्रेष्ठत्व यांची वृद्धी होईल.
१२) ग्रह, नक्षत्र, चोर आणि अग्नी यांपासून होणारा त्रास नष्ट होईल यांत संशय नाही असे श्रीव्यास ऋषी म्हणतात.
अशारीतीने श्रीव्यास ऋषींनी रचिलेले हे नवग्रह स्तोत्र संपूर्ण झाले.
नवग्रह स्तोत्र नवग्रह स्तोत्र हे व्यास ऋषींनी रचलेले आहे. हे स्तोत्र म्हणजे नऊ ग्रहांचे नऊ मंत्रच आहेत. आपल्या आयुष्यावर नवग्रहांचा परिणाम होत असतो, असे ज्योतिषशास्त्र म्हणते. नवग्रहांचा आपल्या जीवनावरील वाईट परिणाम नाहीसा होऊन हे नवग्रह आपल्याला अनुकूल व्हावेत म्हणून या नवग्रह स्तोत्राचा एक पाठ रोज श्रद्धेने, भक्तिभावाने व मनापासून करावा. त्यामुळे आपली संकटे, अडचणी नाहीश्या होतात व वाईट स्वप्नेही पडत नाहीत. उत्तम व निरोगी आयुष्याचा लाभ होतो. आपण धनवान व आयुष्यमान होतो.

|| श्री राम जय राम जय जय राम ||
||जय हनुमान ||

Saturday, 19 November 2016

...................औक्षण .....................
.
.
*औक्षण दारात न करता वास्तूच्या आतमध्ये का करावे ?*
औक्षण करणे किंवा ओवाळणे, हा हिंदु धर्मात शुभप्रसंगी सांगितलेला छोटासा; पण महत्त्वाचा विधी आहे. वाढदिवस, रक्षाबंधन, भाऊबीज,, परदेशगमन, परीक्षेतील यश, युद्धात विजयी होणे अशा शुभप्रसंगी त्या त्या व्यक्तीला ओवाळून शुभेच्छा देण्याचा हा विधी आहे. त्या विधीविषयी जाणून घेऊया !
*‘औक्षण’ या शब्दाचा आध्यात्मिक अर्थ काय ?*
‘औक्षण’ म्हणजे दिव्याच्या ज्योतीच्या साहाय्याने कार्यरत झालेल्या ब्रह्मांडातील देवतांच्या लहरी पृथ्वीवर येण्याच्या क्षणाचे स्वागत करणे आणि तो क्षण टिपून त्याच वेळी त्या लहरींना शरण जाणे.
*औक्षण करण्याचे महत्त्व काय ?*
*अ. संरक्षक-कवच निर्माण होणे*
औक्षण करतांना तबकातील दिव्याच्या साहाय्याने प्रक्षेपित होणार्‍या किंवा ग्रहण केल्या जाणार्‍या लहरींचे, औक्षण करवून घेणार्‍या जिवाच्या देहाभोवती गतीमान संरक्षक-कवच निर्माण होते.
*आ. देवतेचा आशीर्वाद मिळण्यास साहाय्य होणे*
औक्षण करतांना देवतांना शरण जाऊन स्वतःची आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी प्रार्थना केल्यानेच अपेक्षित फलनिष्पत्ती होण्यास साहाय्य होते आणि खर्‍या अर्थाने औक्षणकर्माचे उदि्दष्ट साध्य होते, म्हणजेच औक्षणाच्या माध्यमातून देवतेचा आशीर्वाद मिळण्यास साहाय्य होते.’
*औक्षण कोणाचे करावे ?*
लहान मूल, संस्कार्य व्यक्ती, स्वागतमूर्ती, युद्धावर निघालेला सैनिक, राजा आणि संत यांचे औक्षण करावे.
*औक्षण कोठे करावे ?*
सर्वसाधारणतः ज्याचे औक्षण करायचे आहे त्याला घरात देवापुढे बसवून त्याचे औक्षण करावे. विशेष कार्य (उदा. मुंज, लग्न इत्यादी) असल्यास त्या कार्यस्थळी औक्षण करावे.
*औक्षण दारात न करता वास्तूच्या आतमध्ये का करावे ?*
‘दाराचा उंबरा हे पाताळातून प्रक्षेपित होणार्‍या त्रासदायक लहरी ग्रहण करण्याचे आणि त्या पुन्हा पाताळात संक्रमित करण्याचे उत्तम माध्यम आहे. दाराच्या चौकटीमध्ये या त्रासदायक लहरी घनीभूत झालेल्या असतात. दारात उभे राहिल्याने या रज-तमात्मक लहरींनी भारित क्षेत्राचा जिवाला त्रास होतो. जिवाभोवती या त्रासदायक लहरींचा कोश निर्माण होतो. याचा जिवाच्या मनोमयकोशावर परिणाम होऊन तेथील रज-तम कणांचे प्राबल्य वाढल्याने जीव चिडचिडा बनतो. या कारणास्तव दारात औक्षण करणे, हे हिंदु धर्माला संमत नाही. दारात औक्षण करण्यापेक्षा दाराच्या आतल्या भागात, म्हणजेच वास्तूत, शक्यतो देवघरासमोर औक्षण करावे. देवघरासमोर रांगोळीचे स्वस्तिक काढून त्यावर पाट मांडून मगच औक्षण करावे. असे केल्याने देवतेचे वातावरणातील चैतन्य जिवाच्या भावामुळे कार्यरत होऊन त्याचा जिवाला अपेक्षित लाभ मिळण्यास आणि त्याला पुढील कार्यास अपेक्षित असे देवतेचे आशीर्वादरूपी बळ मिळण्यास साहाय्य होते.’
*(व्यक्तीला वाईट शक्तींचा त्रास असल्यास तो दूर करण्यासाठी तिची मीठ-मोहरी आणि लाल मिरच्या यांनी दृष्ट काढतात, तसेच तिच्यावरून नारळ ओवाळतात. दृष्ट दारात काढतात आणि ओवाळलेला नारळ उंबरठ्याबाहेर फोडतात. उंबरठा हे त्रासदायक लहरी पाताळात संक्रमित करण्याचे उत्तम माध्यम असल्याने असे करतात.)*
*औक्षण करण्यासाठी लागणारे साहित्य*
*हळद-कुंकू, अक्षता, कापसाच्या वाती, तेल, निरांजन, सोन्याची अंगठी, पूजेची सुपारी इत्यादी.*
१. अंगठी आणि सुपारी हे प्रत्यक्ष कार्य करणार्‍या शिवाचे (पुरुषतत्त्वाचे) प्रतीक म्हणून आपल्या उजव्या बाजूला ठेवावे.
२. अक्षता या सर्वसमावेशक असल्याने त्यांना मध्यभागी, म्हणजेच तबकाच्या केंद्रबिंदूच्या ठिकाणी स्थान द्यावे.
३. अक्षतांच्या थोडेसे पुढे; परंतु मध्यभागी दीपाला स्थान द्यावे. दीप हा जिवाच्या आत्मशक्तीच्या बळावर कार्यरत होणार्‍या सुषुम्नानाडीचे प्रतीक आहे. हळदकुंकवाच्या माध्यमातून आदिशक्तीची, तर अंगठी आणि सुपारी यांच्या माध्यमातून शिवाची जोड मिळाल्याने देवतांकडून येणार्‍या आशीर्वादात्मक लहरी अक्षतांकडून जिवाकडे संक्रमित होण्यास साहाय्य झाल्याने, दीपाच्या माध्यमातून कार्यरत झालेल्या सुषुम्नानाडीमुळे जिवाने हाती घेतलेले कार्य देवतेच्या कृपेने सफल होते. अशा प्रकारे तबकातील घटकांची योग्य मांडणी केल्याने जिवाला देवतेच्या तत्त्वाचा अधिक लाभ मिळतो.’
औक्षण करण्यासाठी घ्यावयाच्या तबकात ‘हळद-कुंकू आपल्या डाव्या बाजूला ठेवावे’, असे दिले आहे, तर ‘पूजेच्या तबकातील घटकांची मांडणी’ यात ‘हळद-कुंकू आपल्या उजव्या बाजूला ठेवावे’, असे दिले आहे. या दोन्हींचा समन्वय कसा साधायचा ?
पूजेच्या तबकातील घटकांची मांडणी ही पूजेच्या वेळी ते ते तत्त्व आकृष्ट करून पूजास्थळ शुद्ध करण्याच्या उद्देशाने व्यापक भावाच्या स्तरावर दिलेली आहे. यात तबकामध्ये समाविष्ट घटक हे रंग आणि गंध कण यांच्याशी संबंधित असल्याने या सर्वांमध्ये शक्तीवर्धक कार्यकारी रजोगुणी सगुणत्व त्यातल्या त्यात हळद-कुंकू यांच्याकडे संक्रमित झाल्याने त्यांना जिवाच्या उजव्या बाजूला स्थान दिले आहे, तर कनिष्ठ स्तरावरील औक्षणाच्या तबकात सुपारी आणि अंगठी या घटकांचा समावेश झाल्याने ते ते कार्यत्व हळद-कुंकू या घटकांपेक्षा कनिष्ठ स्तरावर कार्य करणार्‍या रजोगुणाकडे संक्रमित झाल्याने हळद-कुंकू जिवाच्या डाव्या बाजूला सरकवून अंगठी अन् सुपारी या प्राबल्याने कार्यरत असणार्‍या रजोगुणी घटकांना जिवाच्या उजव्या बाजूला स्थान दिले आहे. त्या त्या विधीतील कार्यरत रजोगुणी उद्देशाप्रमाणे तो तो घटक जिवाच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला दर्शवला आहे.
.

Tuesday, 15 November 2016

🌼🌼🌼🌼
 उदाहरण किंवा दृष्टांत महिलांना जास्त चटकन आणि पक्का समजेल. पुरुष मंडळींना देखील समजेल पण जरा वेळ लागेल इतकेच. कसे आहे, उदाहरण जर आपल्या नित्याच्या जिवनातील दिले तर ते चटकन समजत आणि पक्के मनावर ठसते.
तर उदाहरण अस की डेअरीतुन किंवा अन्य दुकानातुन दुधाची पिशवी आणली की ती फ़्रिजमधे ठेवली जाते पण एकदा का पिशवी फ़ोडुन त्यातील दुध टोपात ओतुन तापवले की मग मात्र या दुधाची काळजी खुप घ्यावी लागते. ते नीट झाकुन ठेवावे लागते, त्या टोपाला हात लावतांना हात स्वच्छ आहेत याची खात्री करुन घ्यावी लागते. इतर कोणताही पदार्थ त्या दुधात पडणार नाही या साठी खुप काळजी घ्यावी लागते. सगळ्यात महत्वाचे म्हणजे ते दुध एक तर फ़्रिजमधे ठेवावे लागते किंवा दर ३-४ तासांनी गरम करावे लागते. पहा घरची गृहिणी हे दुध दिवसातुन ३-४ वेळा तापवतेच. एकदा सकाळी मग दुपारी सगळी कामे झाली की झोपायच्या आगोदर , मग दुपारच्या चहाच्या वेळेस तापवले जाते मग रात्री जेवणे झाली, सगळी आवराआवर झाली की झोपायला जायच्या आगोदर दुध गरम करायचे आणि मगच झोपी जायचे. हे जर नाही जमले तर दुध नासायची शक्यता खुप असते. म्हणुनच हे काम गृहिणी कधीच टाळत नाही किंवा पुढे ढकलत नाही.
माणसाचे मन हे अगदी दुधासारखेच आहे, खुप सेन्सेटिव्ह असते जरा जरी दुर्लक्ष केले तर विषयांनी (काम, क्रोध, मोह, मत्सर इत्यादी) बरबटलेल्या विचारांनी निर्मळ मन लगेच नासते, दुश्चित्तपण येते मनाकडे.
जसे दुध खराब होवु नये म्हणुन ते वारंवार तापवावे लागते तसे मन निर्मळ रहावे म्हणुन ते दिवसातुन २-३ वेळा तरी नामस्मरण, उपासना, पुजाअर्चा, ध्यानधारणा, ग्रंथवाचन इत्यादीच्या अग्नीवर गरम करावे लागते. असे केल्याने मन निर्मळ रहाते. आता हे मन निर्मळ का ठेवायचे ? असा प्रश्न तुम्ही विचारणारच.
आता पहा तुम्हाला कोणी बसायला सांगितले तर बसायची जागा स्वच्छ आहे की नाही हे तुम्ही पहाता ना ? स्वच्छ असेल तर मग बिनघोर बसता. बरोबर ? जसे आपले तसेच देवाचे आहे, तो देखील तुमच्या मनात बसण्या आगोदर पहातोच की मन स्वच्छ, निर्मळ, पवित्र आहे ना ? ते असेल तर तो बिनघोर वस्ती करतो आपल्या मनात.
आपले गुरु, सद़्गुरु संत नेमके हेच तर करीत असतात. ते आपल्याला आपले मन निर्मळ पवित्र राखण्यासाठी मदत करीत असतात. ते देवाला अजिबात सांगत नाहीत की तु येथे येवुन बस, कारण त्यांना माहिती आहे की मन निर्मळ असेल तर देव नक्की मनात येवुन रहातो, तेव्हा तो तुम्ही लहान, मोठे, श्रीमंत गरीब, जातपात, धर्म काहिही पहात नाही. त्याला आवडते ते स्वच्छ, शुद्ध, निर्मळ, पवित्र मन. मग ते कोणाचेही का असेना. पहा आता पटले तर घ्या नाहीतर विसरुन जा.
श्रीराम जय राम जय जय राम..

Tuesday, 8 November 2016

🌼🌼🌼आजपासून पाच वर्षांनी तुम्ही कुठं असाल? या प्रश्नाचं उत्तर फक्त दोनच गोष्टी देऊ शकतात.🌼🌼🌼


१) आज तुम्ही नेमकी कुठली पुस्तकं वाचताय?
२) आणि सध्या तुम्हाला संगत कोणाची आहे?
- चांगली पुस्तकंही वाचत नसाल, बरी माणसंही अवती-भोवती नसतील, तर तुमचं भविष्य दुसर्‍या कोणी कशाला सांगायला हवं?
- आपण फक्त काही मोजक्या गोष्टी लक्षात ठेवल्या आणि तेवढय़ा मनापासून केल्या तरी आपलं जगणं आपण एका खास उंचीवर नेऊ शकतो.
*१)जे कराल, ते उत्तम करा!*
विसरून जा की, तुमची स्पर्धा दुसर्‍या कोणाशी आहे! जे कराल ते उत्तम करा, पहिल्याच फटक्यात असं खास काहीतरी करा की, ते उत्तमच असलं पाहिजे! आणि मुख्य म्हणजे जे केलं ते केलं, त्याहून काहीतरी खास करण्याची तयारी करा!
*२) इन्व्हॉल्व्ह व्हा*
आपण जर प्रश्न सोडवायला राजी नसू तर आपणही त्या प्रश्नाचाच एक भाग बनतो, स्वत:च प्रॉब्लेम होऊन बसतो. त्यामुळे सतत तक्रार करणं सोडा, जे समोर येईल त्याला भीडा. त्यामुळे एकतर झोकून देऊन काम करा, नाहीतर निदान तोंड तरी बंद करा.
*३)थोडंसं एक्स्ट्रा*
लोकांच्या अपेक्षांपेक्षा जास्त काहीतरी करण्याची, जास्त प्रयत्न करून थोडं जास्त काम करण्याची तयारी ठेवा! जेमतेम आणि नेमून दिलेलं काम तर सगळेच करतात, तुम्ही काहीतरी एक्सट्रा करणार की नाही हे ठरवा!
*४) भूमिका घ्या*
सगळंच गोलमोल, वारा आला तशी फिरवली पाठ. तर तुम्ही लाटेबरोबर वाहून जाल. त्यापेक्षा निष्ठा ठेवा, भूमिका घ्या आणि त्यावर ठाम रहा.
*५) फोकस*
तुमचं लक्ष्य काय, तुम्हाला नक्की काय हवंय, हे विसरू नका. काहीही झालं तरी, तुमचा फोकस हलता कामा नये.
*६) मित्र जरा जपून निवडा.*
नेता चांगला असतो, पण त्याचे सल्लागार वाईट असतात, हे वाक्य आपण सतत ऐकतो. तसं आपलं होऊ नये, म्हणून जरा मित्र चांगले आणि जपून निवडा. चांगली यशस्वी माणसं पहा आणि त्यांचे मित्र पहा, संगतीचा असर होतोच.
*७) स्वत:वर भरवसा ठेवा*
अनेकदा इथंच घसरतं. असतं सगळं पण आपला स्वत:वर भरवसा नसतो. आपल्याला स्वत:विषयी चांगलं वाटलं तर जग चांगलं दिसतं. नात्यागोत्याची माणसं चांगली वागतात. त्यामुळे जरा स्वत:वर भरवसा ठेवून, स्वत:वरही प्रेम करा.
*८) कॅरॅक्टर जपा.*
एका रात्रीत काही कुणाचं कॅरॅक्टर तयार होत नाही. अनेकदा काही माणसांविषयी आपल्याला वाटतं भलतंच, पण ती असतात वेगळीच. त्यामुळे आपली रेप्युटेशन काय तयार होतेय याकडे जरा लक्ष द्या. एकदा प्रतिमा डागाळली तर ती सुधारायला प्रचंड कष्ट पडतात.
*९) जगायचं कशासाठी?*
विचारा स्वत:ला! आपण कशासाठी जगतोय. आपलं ध्येय काय? जगणं खूप सुंदर आहे, ते नाकारू नका. असं म्हणतात ना की, काहीतरी करून अपयश मिळणं हे काहीच न करण्यापेक्षा केव्हाही चांगलंच! त्यामुळे आपल्या जगण्याची दिशा शोधा.
*१0) दिवसाची सुरुवात आनंदी*
उठलं की फोन असं होतं का तुमचं? त्यापेक्षा दिवसाची सुरुवात आनंदी होईल, असा प्रयत्न करा. अनेकदा छोट्या गोष्टीनं मूड जातो आणि आपण काहीच करत नाही. फक्त चिडचिड. असं होऊ नये. त्यामुळे उठल्या क्षणापासून स्वत:ला पॉझिटिव्ह एनर्जीचा एक डोस द्या.....
|| श्री राम जय राम जय जय राम ||
|| जय हनुमान|| 

Sunday, 6 November 2016

🌼🌼🌼कबिराच्या दोह्यावरचे विवेचन🌼🌼🌼

चिंटी चावल ले चली...
चिंटी चावल ले चली,
बीच में मिल गई दाल।
कहै कबीर दो ना मिलै,
इक ले डाल॥
अर्थात : 
मुंगी तांदळाचा दाना घेऊन आनंदाने निघाली. पण तितक्यात वाटेत तिला दाळीचाही दाना दिसला. मुंगी मनात म्हणाली, 'क्या बात है देवा! तू भाताची सोय केलीच होती, आता वरणाचीही सोय झाली.' पण एकावेळी दोन्ही दाणे उचलणे मु़ंगीला शक्य नसल्यामुळे ती खिन्न झाली. तेव्हा कबीर म्हणाले, 'वेडाबाई! तुला दोन्ही गोष्टी नाही मिळणार. तुला भात हवा असेल, तर वरणाचा त्याग करावा लागणार आणि वरण हवे असेल, तर भाताचा त्याग करावा लागणार.'
तांदुळाचा दाना गवसल्यावर अतिशय आनंदाने, समाधानाने व लगबगीने आपल्या वारुळाच्या दिशेने निघालेल्या मुंगीचा आनंद व समाधान, दाळीने हिरावून घेतला. माणसाचंही तसंच आहे. जोवर समोर विकल्प उपलब्ध नसतो, तोवर माणूस आहे त्या गोष्टीत समाधानी असतो. पण विकल्प निर्माण झाले, की ते त्याचा आनंद आणि समाधन क्षणात हिरावून घेतात.
साधं मोबाईलचं उदाहरण घ्या ना! एखादी व्यक्ती बचत करुन कसाबसा आवडीचा मोबाईल घेते, नि आठवडाभरातच त्याचं लेटेस्ट मॉडेल बाजारात येतं आणि त्याने घेतलेल्या मोबाईलचा आनंद, एका आठवड्यातच संपुष्टात येतो. तो मनाशी म्हणतो, 'इतके दिवस थांबलो होतोच, आणखी आठवडाभर थांबलो असतो, तर काय बिघडलं असतं.'
विकल्प माणसाच्या डोक्यात बिघाड निर्माण करतात. हे मर्म लक्षात घेऊन शोषणशासनव्यवस्था विकल्पांची लयलूट करतात. ती बघून, 'घेशील किती दोन करांनी' अशी माणसाची अवस्था होते. त्याचं डोकं काम करेनासं होतं. अशी माणसं शोषणशासनव्यवस्थांना हाकायला खुप सोपी पडतात.
पूर्वी आजोबा-पणजोबांच्या काळातल्या वस्तुही, पुढील पिढ्या आनंदाने वापरत. त्यांना त्या जुन्या वाटत नसत. कारण तेव्हा इतके विकल्प नव्हते (आणि ऐपतही नव्हती.) आज असंख्य विकल्पांनी, वस्तुंचा जुन्या होण्याचा कालावधीच क्षणिक करुन टाकला आहे. परिणामी लोक चांगल्या वस्तुही भंगारात टाकू लागले आहेत. भौतिक वस्तुंचा हा नियम मानवी नातेसंबंधांनाही लागू झाला आहे, कारण माणूसही भौतिकच आहे. नातं, मैत्री यांची नाळही, कधी नव्हे इतकी कमजोर झाली आहे. पायापाशी असणारं सुख मृगजळासारखं पुढच्या चौकात, तर तिथे गेल्यावर ते, आणखी पुढच्या चौकात दिसू लागलं आहे.
बायबलमध्येही म्हटलं आहे, 'परमेश्वर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उपहार (गिफ्ट्स) ठेवत असतो. त्यापैकी कोणत्या तरी एका बाजूच्याच गिफ्ट्स तुम्हाला घेता येऊ शकतात.'
तर भगवान बुद्धांनीही हेच सांगितले आहे की, 'विणेच्या तारा झंकृत व्हाव्या म्हणून, इतक्या ताणू नका, की छेडताच तुटतील आणि तूटण्याच्या भीतीने इतक्या सैलही सोडू नका, की छेडल्यावर त्या झंकृतच होणार नाहीत.' यालाच बुद्धांचा 'प्रतीत्य (कारण) समुत्पाद' (कार्य) किंवा 'मध्यमा प्रतिपद' म्हणतात.
मुळात माणूस हा उजवाही नसतो अनं डावाही नसतो. त़ो 'प्रतीत्य समुत्पादी' म्हणजे मध्यममार्गीच असतो. पण तो तसा असणं हे शोषणशासनसंस्थांच्या हिताचं नसतं. म्हणून त्या त्याला तसं राहू देत नाहीत. त्याच्यासमोर चांगल्या-वाईट विकल्पांचा पसारा माडून, ते त्याला उजव्या-डाव्या छावण्यांमध्ये विभाजित करतात. त्यावर काही चतुर माणसं 'सेंटर टू लेफ्ट' वा 'सेंटर टू राईट' अशी पळवाट काढतात. पण सगळे काही चतुर नसतात. त्यांना कुठल्या न कुठल्या पारड्यात आपलं वजन टाकावच लागतं.
या अगतिकतेला, आपली दोन्ही हातांनी गोळा करायची आसक्तीच कारणीभूत आहे. देवाने माणसाला दोन हात दिलेत, ते दोन्ही हातांनी गोळा करावे म्हणून नाहीत, तर एका हाताने घ्यावं आणि दुस-या हाताने द्यावं, यासाठी आहेत. नुसतं घेत राहिल्याने एकूणच असमतोल निर्माण होतो. मानवी जीवनातील अरिष्टास तो कारणीभूत ठरतो. म्हणून देवघेव सुरु राहिली पाहिजे. देवघेवीमुळे समतोल तर टिकून राहतोच, माणसाचं समाधान आणि आनंदही त्यामुळे टिकावू बनतो. कबीरांच्या या दोह्यात असा मोठ्ठा आशय दडला आहे.
*******संग्रहित

|| श्री राम जय राम जय जय राम ||
|| जय हनुमान|| 

🌼🌼🌼Is God Evil or Good??🌼🌼🌼


Once a university professor went to a class to give lecture. Professor asked students a question.
He asked, “Everything that exist is created by God??”
One student stood up and answered, “Yes, it is.”
Now professor asked, “If God created everything that means, God created Evil too.. And according to principal – The things we do, Determine who we are – Means God is Evil..!!”

Student got quiet after hearing this and professor was very happy to show that he once again proved that God is a Myth.
After this another student stood up and said, “Professor, can i ask you a question?”
“Of course” , Professor replied.
Student asked, “Professor, Does cold exist?”
“Of course it exist, Don’t you ever feel cold?” professor replied.
(Everyone in the class laughed at the question of the student.)
After professor replied student said, “Actually Sir, Cold doesn’t exist. According to physics law, When we think about cold it’s just absence of heat. An absolute zero is complete absence of heat. We created word cold to describe what we feel in absence of heat.”
Student continued and asked another question to professor, “Sir, does darkness exist?”
“Of course it exist.” replied professor.
Again student replied, “You are wrong sir, darkness doesn’t exist. It is just absence of light. We can study light but not darkness. According to Newton’s law we can study white light, expand it into many colors but you can’t measure darkness. how can we measure how much dark some space is? We measure the quantity of light. Darkness is just what people use to describe as absence of light.”
Finally Student asked professor, “Sir, does evil exist?”
Professor replied, “Yes of course it exist. We can see it’s presence in our day to day life. Cruelty, crime, violence all around the world are example of evil.”
To this student answered, “No sir, Evil doesn’t exist itself. It is just an absence of God. God doesn’t create evil. Evil is result of absence of godly love in human heart. It’s like cold which comes in absence of heat or darkness which comes in existence in absence of light.
These words left the professor speechless.

🌼🌼🌼KFC Colonel Sander’s Inspirational Story!!🌼🌼🌼

Sander’s was born in 1890. When sander’s was 5 yrs old, he lost his father. His mother who was housewife had to go out to work to earn for family and sander’s had to take care of his siblings. He used to look after and cook for them. By age of 7 his skills got good with cooking.
At age of 10, he began to work at local farmer. Soon, his mother remarried and sander had tumultuous relationship with his stepfather due to which he dropped out of 7th grade and left his home by himself.
At age of 14, he took job for painting horse carriages and then moved to Indiana to work as farmhand for 2 yrs. At age of 16  he falsified his date of birth and completed his service commitment as teamster in Cuba.
At age of 19 he met Josephine while working on rail road. Soon, he got married to her. They had three kids (son and two daughter). His son died at early age. Now, he found a job at Illinois central railroad but soon had to lost even this job due to brawl with his colleague and his wife left him and moved to her parents with kids.
He used to study Law by correspondence. After losing job he started to practice law but even his legal career ended after a fight with his own client. He moved back to his mother and again went to work as labor for railway. Here he started to work as Life insurance agent but eventually fired.
At age of 30, he established a ferry boat company which was an instant success. After 3 yrs he sold all his shares of ferry boat for 22,000$ and used this money to establish a company manufacturing lamps but even this venture failed. After this sander’s moved to Winchester, Kentucky to work as salesman but soon he lost his job also.
In 1930, Sander was offered a rent free station to run by Shell oil company where he began to serve chicken dishes and other meals. Slowly his popularity grew and soon his service station became famous throughout Kentucky. It was called “Kentucky Fried Chicken of Harland Sanders.” All customers noted the quality of its seasoning, which he prepared from 11 different spices. Life began to improve.
Harland Sanders bought a service station, motel and cafe at Corbin, a town in Kentucky. He left Claudia, as manager of the North Corbin restaurant and motel. He started to work as assistant cafeteria manager in Tennessee.
In 1947 he divorced his first wife and in 1949 married Claudia.
For first time sander franchised “Kentucky Fried Chicken” in 1952. Restaurants sales lead to popularity of KFC and increase in income but life hit hard on him once again, due to some reason his sales dropped drastically and he was forced to sell all his property to pay his debt.
At age of 65 he was broke and was living off on Social Security Check of 105$. At this time he started to think about all and upon reflection he decided that he can sell his recipe to other restaurants. He wandered throughout U.S. with his spice recipe and pressure cooker visiting restaurants of America. Even this time it took long before he could find his first customer. After 4 years KFC was very successful and after a deal his net worth estimated at $3.5 million.
In 1980, at the age of 90 years, Harland Sanders died. In recent years he was traveling, playing golf and ran their own restaurant Claudia Sanders Dinner House with his wife.
Moral:
Never Give Up. Staying Positive and Passionate can help us to go through hard time in life and start again. Despite getting failed again and again we should not lose Hope.