Tuesday, 27 February 2018



चाणक्य ने कहा था कि शत्रुता सिर्फ मूर्खों की ही होती है


आचार्य चाणक्य को आप और हम एक बेहतरीन नीतिशास्त्र, महान प्रशिक्षक और ऐसे अर्थशास्त्री के तौर पर जानते हैं जिनकी तुलना किसी से संभव नहीं है। चाणक्य के वचन, उनकी नीतियां और उनके आदर्श आज भी बहुत से लोगों का मार्गदर्शन कर रहे हैं।
इन सभी खूबियों के अलावा चाणक्य को राजनीति का भी अग्रदूत माना गया है। वे एक अतुलनीय डिप्लोमैट यानि कूटनीतिज्ञ, जो व्यक्ति और परिस्थिति के अनुसार सही और गलत जैसी बात कहते थे।

नास्ति बुद्धिमतां शत्रुः

उनके कथन जीवन के विभिन्न पहलुओं को छूते थे, उनका कहना था “नास्ति बुद्धिमतां शत्रुः”। इसका अर्थ है कि समझदार व्यक्ति का कोई शत्रु नहीं होता है।

समझदार व्यक्ति

लेकिन उनकी यह बात भी विवादों से घिरी है, बहुत से लोग ये मानते हैं कि समझदार व्यक्ति बहुत से लोगों के लिए खतरा बन सकता है। इसलिए ऐसे लोगों की कोई कमी नहीं होगी जो उसे अपने रास्ते से हटाने का प्रयत्न करे। तो फिर यह कैसा संभव है कि समझदार व्यक्ति का कोई शत्रु ना हो।

एकमात्र विकल्प

चाणक्य के अनुसार जिस तरह हमारा पैसा अगर किसी और के पास रहे तो वह हमारे किसी काम का नहीं होता, कुछ इसी तरह ज्ञान अगर सिर्फ किताबों में ही रहेगा, तो वह हमारे किसी काम का नहीं है। उसे ग्रहण करना ही एकमात्र विकल्प है।

शिक्षित इंसान

शिक्षित इंसान अगर सामने वाले व्यक्ति को सम्मान देना नहीं जानता, अपने अलावा वह किसी और की कद्र नहीं करता तो उसका वह ज्ञान भी किसी काम का नहीं है।

बुद्धिमान इंसान

लेकिन क्या वास्तव में एक बुद्धिमान इंसान शत्रुता से दूर रहने के बावजूद अपने लिए सफलता की राह चुन सकता है, अपनी सफलता की गारंटी ले सकता है।

बुद्धिमान इंसान

एक बुद्धिमान इंसान हर वो चीज करता है, हर वो पैंतरा आजमाता है जिसकी वजह से वह किसी लड़ाई-झगड़े या किसी द्वंद में ना पड़े। किसी क्लेश में ना पड़कर वह अपना बहुत सा समय बचा लेता है, निश्चित तौर पर वो अपना वह समय अपने काम में लगा सकता है, इस समय का प्रयोग वह अपनी क्षमता बढ़ाने के लिए कर सकता है।

अहंकार

मनुष्य हमेशा अपने अहंकार को शांत करने की कोशिश करता रहता है, वह यह नहीं सोचता कि इस चक्कर में वह अपने बहुत से कार्यों से दूर है। वह इस समय का उपयोग किसी सही स्थान पर कर सकता है। मनुष्य को समझना चाहिए कि किसी से शत्रुता मोल लेकर अपने लिए ही समस्या बुला रहा है।

समस्या का निर्माण

आपका क्रोध, आपका गुस्सा और अहंकार हमेशा आग में घी डालने का काम कर रहे हैं। ऐसा करके आप समस्या को सुलझाने की जगह अपने लिए नई समस्या का निर्माण कर रहे होते हैं।

समझदार इंसान

एक समझदार इंसान इस बात को भली-भांति समझता है कि बहस में पड़कर कुछ भी संभव नहीं है। अगर सामने वाला व्यक्ति मूर्ख है और आपकी बात को नहीं समझ रहा है तो निश्चित तौर पर चुप रहकर अपना कार्य करने में ही भलाई है। अपने तथाकथित सम्मान को बचाने के लिए कुछ भी करना व्यर्थ है।


Monday, 26 February 2018

नवमाध्यमांचं ‘बाळ’कडू (शोभा भागवत)

मोबाईल, टीव्ही, चित्रपट, इंटरनेट अशी माध्यमं रोज बदलत आहेत, नवनवी रूपं धारण करत आहेत. मात्र, त्यांच्या वेगाशी, बदलांशी पाल्यांची सांगड कशी घालून द्यायची हे पालकांसमोरचं मोठं आव्हान आहे. ‘गॅजेटमुक्त’ केलं तर मित्रमंडळींच्या तुलनेत मुलं मागं पडतील का, किंवा टीव्ही त्यांच्या मनासारखा बघू दिला तर ती ‘वाया’ जातील का, असे प्रश्‍न पालकांसमोर आहेत. एकीकडं बालचित्रपट, बालनाट्यं यांचं प्रमाण कमी झालेलं असताना रंजनाच्या नव्या ‘अवतारां’चा मुलांवर दुष्परिणाम होईल का? नव्या माध्यमांचा सकारात्मक उपयोग कसा करायचा?.... बालक-पालकांशी संबंधित अनेक प्रश्‍नांबाबत चर्चा.
सध्या लहान मुलं ‘बाहुबली’च्या प्रेमात आहेत. त्याच्यासारखी तलवार घेऊन, चिलखत घालून, ढाल घेऊन जोरदार उड्या मारणं, धावणं घरात चालू असतं. एक मुलगा आईला म्हणाला ः ‘‘मला लवकर मोठं व्हायचंय आणि ‘युद्ध’ करायचंय.’’ हाच मुलगा ‘हिरोशिमा डे’ला ‘‘बॉम्ब नको, युद्ध नको, आम्हाला शांती हवी,’’ अशी शपथही घेतो. काही काळांनी तो हे दोन्ही विसरून जातो आणि तिसऱ्याच कुठल्या तरी हिरोच्या प्रेमात पडतो.
मुलांना हिंसा ही गंमत वाटते आहे. त्यामुळंच त्यांचे खेळ हिंसक होत चाललेत. मुलांची भाषा, त्यांचे शब्द, आविर्भाव, हिंसक होत आहे. आपण जे निर्माण करतो आहोत, त्यामुळं मुलांच्या मनावर काय परिणाम होईल याची टीव्ही, चित्रपट, इंटरनेट, जाहिराती अशा नवमाध्यमांना चिंता नाही, फिकीर नाही. कारण मूल कुणाला कळलंय? आणि मुलांकडं लक्ष द्यायला कुणाला वेळ आहे?
मुलांचा विचार करायचा फक्त बालदिनाला. तोही त्यांना काही वस्तूंचं वाटप केलं, की आपली जबाबदारी संपली. केला बालदिवस साजरा. ‘‘पैशांसाठी वाट्टेल ते,’’ हे सगळ्या समाजाचंच सूत्र बनलं आहे. नवमाध्यमं का मागं राहतील? मुलांना वाईट कार्यक्रम दाखवू नका असा कोणी पालकांना सल्ला दिला, तर पालक म्हणतात ः ‘‘आम्ही थांबवू शकत नाही मुलांना. ती बघतातच.’’ त्यातून ती अस्वस्थही होतात. मुलांवर आणि मोठ्यांवरही नकळत अनेक परिणाम माध्यमं करतात. त्यातून माणसं नाटकी बोलायला लागतात. किंचाळून बोलतात. त्यांचे विचार, भाषा, पोशाख, अभिव्यक्ती सगळ्याला माध्यमं वळण लावतात. किती भडकायचं, कसा राग व्यक्त करायचा तेही नकळत माणसं टीव्ही, चित्रपटांतून शिकतात.
एकीकडं पर्यावरणरक्षणासाठी सबंध आयुष्य घातलेली माणसं आपण पाहतो आणि दुसरीकडं टीव्ही पुनःपुन्हा आपल्यावर काय आदळत राहतो? ‘हे सॉस खा’, ‘हा जॅम खा’, ‘हे सूप प्या’, ‘त्या नूडल्स खा’, ‘ही चॉकलेट्‌स आणा’, ‘ते त्रिकोण खा’, ‘डायपर्स आणा’ वगैरे वगैरे. हे सगळं वापरणं, खाणं, फेकणं, पर्यावरणरक्षणाचे प्रयत्न फुकट घालवणार आहे, ही साधी बाब दुर्लक्षितच राहते.
तरुण मुलं मोबाईल वापरतात. मध्यरात्रीपर्यंत त्यांच्या मोबाईलवर गप्पा चालतात. पालक फतवा काढतात. आठ वाजता मोबाईल पालकांकडं द्यायचा. त्यावर भांडणं होतात. तान्ही बाळंसुद्धा मोबाइलकडं एकटक पाहतात आणि काढून घेतला मोबाइल तर आकांततांडव!
सहविचार, माध्यमशिक्षणाची  गरज
आपण मुलांना जबरदस्तीनं आज्ञा पाळायला लावतो; पण त्यांच्याबरोबर सहविचार करत नाही. मुलांना मार देण्यावर आपला विश्‍वास असतो. त्यांना तडातडा बोलण्यावर विश्‍वास असतो; पण त्यांना माध्यमांचं शिक्षण देण्याविषयी आपण विचार करत नाही.
पूर्वी राजपुत्रांचं शिक्षण गुरुगृही का होत असे? राजवाड्यात शिक्षण होणं शक्‍य नव्हतं. म्हणून गुरुकुलात मुलं शेती करत, गुरं सांभाळत, सर्व कामं करत आणि त्याबरोबर अध्ययन करत. गुरुकुलातले ऋषी-मुनी म्हणजे शिक्षक नव्हते. त्यांची दिनचर्या वेगळी चालू असे. ते विद्यार्थ्यांना जीवनाचे धडे देत. परीक्षा घेत. पण शाळेत शिकवल्याप्रमाणं नाही.
आज आपण घरांचेच ‘राजवाडे’ करण्याच्या मागं आहोत का? आपल्या राजपुत्रांच्या, राजकन्यांच्या जीवनात भरपूर करमणूक आहे. खायला पिझ्झा, बर्गर, आईसक्रीम आहे, मोबाइल आहे, लॅपटॉप आहे, टीव्ही आहे, टॅब्लेट आहे, एमपीथ्री आहे, त्यांना अभ्यास बोअरिंग वाटला तर नवल ते काय?
माध्यमांचा परिणाम स्वप्रतिमेवरही होतो. चित्रपटात टीव्ही मालिकांमध्ये ज्या प्रकारचे कपडे मुली घालतात, तसे आपण आपल्या रोजच्या वातावरणात घालावेत का? टीव्हीसारखे ड्रेसेस घालण्याचा हट्ट मुलं धरतात, त्यांना पालक विरोध करतात आणि मुलं तर हट्ट सोडत नाहीत. गेल्याच्या गेल्या पिढीत पालक सांगत ः ‘चित्रपट घरात आणायचा नाही. तिथंच सोडून यायचा.’ आता मुलांना हे पटतच नाही. ती जणू कायमच माध्यमांच्या जगात जगत असतात.
माध्यमांचा वेगळा विचार
मध्यंतरी नाशिकच्या अभिव्यक्ती संस्थेनं ‘माध्यम-जत्रा’ केली होती. त्यांच्याकडून प्रशिक्षण घेऊन आम्ही पुण्याच्या गरवारे बालभवनात ‘माध्यम-जत्रा’ केली. मुलांना माध्यमांची डोळस ओळख करून देण्याचा तो प्रयोग होता. त्यात एका स्टॉलवर वर्तमानपत्रं लावली होती आणि येणाऱ्याला एकेक टिकली दिली होती. ‘रोज तुम्ही वृत्तपत्रांतलं काय, सर्वांत जास्त वाचता त्यावर टिकली लावा,’ असं सांगितलं होतं. कुणी बातम्यांवर, तर कुणी जाहिरातीवर टिकली लावत होते. एका मुलीनं तर शाहरूख खानच्या गालावर टिकली लावली.
‘जाहिरातींची गंमत करा,’ असा एक खेळ होता. फुगवलेल्या पाकिटांमधून येणाऱ्या वेफर्सवर एका मुलानं लिहिलं ः ‘पैसे द्या मूठभर, वेफर्स घ्या चिमूटनभर.’’ ज्या वस्तूची कधी जाहिरात होत नाही, त्या शहाळं, हॅंगर, सेफ्टी पिन इत्यादींच्या जाहिराती मुलांनी करून लावल्या. एका चित्रपटाचा शेवट मुलांना दाखवला आणि तो कसा बदलाल, असा प्रश्‍न होता. मुलांनी त्यातले चुकीचे संदेश आणि चुकीची दृष्टी ओळखून शेवट बदलून दिला. ‘काय खावं- काय प्यावं- काय टाळावं,’ यात अनेक मांडलेल्या गोष्टी पाहून  मुलांनी त्यातून सुकी भेळ, राजगिरा वड्या, खजूर, शेंगदाणा चिक्की असे पदार्थ निवडले. शेवटी होता ‘सपना-बझार!’ त्यात अनेक गोष्टी मांडल्या होत्या. चॉकलेट्‌स, मॅगी, पेन्स, पाणी, कोल्ड्रिंक इत्यादी इत्यादी. प्रत्येक मूल खरेदी करून आलं, की त्याला तीन खोकी दाखवली जात. एकावर ‘गरज’ लिहिलं होतं. दुसऱ्यावर ‘सोय’ आणि तिसऱ्यावर ‘चैन’ लिहिलं होतं. जेव्हा आपण पाच रुपयांच्या पेनऐवजी पन्नास रुपयांचं पेन निवडतो, तेव्हा आपण ‘चैन’ करत असतो. मुलं नवे-नवे शोध लावत होती. शंभर रुपयांची खरेदी करा असं सांगितलं होतं, तर त्यांनी पाचशे रुपयांची केली. प्रश्‍न असा होता, की शंभर रुपये घेऊन जाऊन पाचशे रुपयांचा माल कोण देईल? तेव्हा मुलांची उत्तरं होती ः ‘आम्ही क्रेडिट कार्ड वापरू,’ ‘आमचा दुकानदार खात्यावर लिहून ठेवतो.’
एक मुलगा कॅडबरीची तीन पाकिटं घेऊन आला. ‘गरज’, ‘सोय’, ‘चैन’ या तिन्ही खोक्‍यांत एकेक पाकीट टाकलं आणि म्हणाला ः ‘‘भूक लागली, की ती माझी ‘गरज’ असते. सहलीला नेतो तेव्हा ‘सोय’ असते आणि घरी टीव्ही बघताबघता मजेत खातो तेव्हा ‘चैन’ असते.’’
एक मुलगी मॅगी नूडल्सची पाकिटं घेऊन आली आणि ती सगळी तिनं ‘गरज’मध्ये टाकली. तिला विचारलं तर ती म्हणाली ः ‘‘माझ्या आईचं नुकतंच निधन झालं. बाबांना अजून स्वयंपाक येत नाही. मलाही येत नाही. त्यामुळं सध्या ही आमची ‘गरज’ आहे.’’ सध्याच्या माध्यमविस्फोटाच्या जगात ही मुलं रोज जेवताना-खाताना-बाजारात असा विचार करतील का? ‘चैनीकडून गरजेकडं’ त्यांचा प्रवास व्हावा हाच हेतू असला पाहिजे.
चित्रपट रसग्रहण वर्ग हवेत
माध्यमांचं शिक्षण अभिनव पद्धतीनं करण्याचा ‘माध्यम-जत्रा’ हा सफल कार्यक्रम झाला. असंच प्रशिक्षण इतरही काही माध्यमांसाठी देता येईल. पाचवीपासून शाळाशाळांतून चित्रपट रसग्रहण वर्ग सुरू करायला हवेत. लहान मुलांसाठी असलेले किंवा मोठ्यांचे चित्रपट असूनही लहान मुलांच्या विचारांना, कल्पनाशक्तीला वाव देणारे असे चित्रपट उलगडून दाखवायला हवेत.
मोबाईल आणि आपण
वस्तू जेवढ्या वैयक्तिक वापराकडं वाटचाल करतील, तेवढ्या त्या पर्यावरणाला हानीकारक होतील, हे तर स्पष्टच आहे. घरात लॅंडलाइन फोन असला आणि ते सगळे वापरत असले तर त्यावर कुणाला फार खासगी बोलता येत नाही. मात्र, मोबाईल आला, की चार माणसं चार दिशांना तोंड करून स्वतःचं खासगी बोलत राहू शकतात आणि एकमेकांपासून दूर जातात. अर्थात मोबाईलचे चांगले उपयोग पुष्कळ आहेत, हे कुणीही मान्य करेल; पण केवळ वैयक्तिक मजेसाठी, चैनीसाठी तो वापरला जातो आहे. तो दुरुपयोग आहे. मुलांना या सगळ्या गोष्टी वापरण्यातल्या ‘तारतम्याचं बाळकडू’ पालकांनी, शिक्षकांनी वेळोवेळी द्यायला हवं.  
हेही जाणवतं आहे, की कोणतीही गोष्ट नवी असते, तोवर तिच्यावर अनेक दोषारोप होतात. मात्र, ती सरावाची झाली, की तिच्या दोषांकडं काणाडोळा होतो. तसंच मोबाईलचं झालं आहे. मात्र, प्रत्येक वस्तूच्या वापराच्या मर्यादा आपण जाणल्या पाहिजेत. अजूनही कटाक्षानं मोबाईल न वापरणारी मंडळी आहेत. पंखा न वापरणारी, छत्री न वापरणारी मंडळी आहेत. अर्थात त्यांचे व्यवसाय, त्यांची वयं लक्षात घेतली, तर हा सल्ला इतरांना देणं घवघड आहे.
मात्र, मोबाईलपासून सर्वांत धोका आहे तो लहान आणि तरुण मुलामुलींना. त्यांना मोबाईलवरचे खेळ खेळणं हे भलतं आकर्षण असतं. त्यातूनच ‘ब्लू व्हेल’सारख्या दुष्ट खेळाचा सापळा तयार झाला. कुणाच्या तरी ताब्यात गेल्यासारखी मुलं वागली. सांगितलेल्या सर्व अटी पाळत गेली आणि अखेर त्यांचे जीवही. त्या धोकादायक जाळ्यात सापडले. काय वाटलं असेल त्यांच्या पालकांना? वापराच्या अटीही समजावून सांगा अशा घटनामुळे वाटतं, की मोबाईल हातात देण्यापूर्वी त्याच्या वापराच्या अटी मुलांना समजावून द्यायला हव्यात. यातले धोके काय आहेत आणि त्यापासून दूर कसं राहता येईल याची चर्चा आवश्‍यक आहे.  मोबाईलवर गप्पा, इंटरनेटचा वापर हे वाटतं तितकं निष्पाप नाही. त्यातून तुम्हाला जाळ्यात ओढलं जातं. तुमच्याशी अतिशय आदरपूर्वक व गोड बोलतात आणि त्यांची मुद्दे तयार असलेली एखादी ‘खेळसाखळी’ तुमच्या गळ्यात घालून तुमचा ताबा घेतला जातो. तुम्ही सावध असाल, वेळेवर त्या गटातून बाहेर पडलात तर वाचलात!
मुलांनी आपला मोकळा वेळ मोबाईल, आयपॅडसारख्या गॅजेट्‌समध्ये न घालवता आजूबाजूला चालू असलेल्या एखाद्या सामाजिक कामात त्यांना सहभागी होता येईल. एकेकटं कशात तरी रमण्यापेक्षा गटांनी काम करणं हे जास्त सुरक्षित, विधायक ठरतं. विशिष्ट वयात शरीरातल्या हार्मोनल घडामोडीमुळं मन अस्वस्थ होतं. स्वभाव हळवा होतो. अस्वस्थता चैन पडू देत नाही. मित्र-मैत्रिणीबद्दल आकर्षण वाटतं. शरीरातले बदल चैन पडू देत नाहीत. अशावेळी विधायक कामात गुंतता आलं पाहिजे. अशा कामात एकत्र येणाऱ्या तरुण-तरुणींची चांगली निरामय मैत्री होऊ शकते. पालक या सगळ्यांत एक दुवा म्हणून काम करू शकतात.
सहशिक्षणाची गरज
शिक्षणतज्ज्ञ कृष्णकुमार मुलांच्या कुमार वयातल्या वागण्याबद्दल एक महत्त्वाचा मुद्दा मांडतात, ‘‘पौगंडावस्थेनंतर मुला-मुलींना अनैसर्गिकरित्या वेगळे ठेवल्यामुळे शरीरशास्त्रीय - मानसशास्त्रीय आणि सांस्कृतिक असे सर्वच तर्कशास्त्र धुडकावणारी एक कृत्रिम, सामाजिक व्यवस्था आम्ही निर्माण केली आहे. मानवी इतिहासातली ती सर्वात मोठी विकृती आहे.’’
‘‘सहशिक्षणाच्या प्रश्‍नावर सरकारचे काहीही मार्गदर्शक धोरण वा आदेश नाहीत. मुला-मुलींच्या शाळा वेगळ्या करणे हा प्रकार शोचनीय आहे. कारण त्यातून व्यक्तीचं मानवीपण हरवून जातं. जो मुलगा मुलीकडं एक वस्तू म्हणून पाहतो, तो स्त्रीशी मैत्रीचं नातं जोडण्याची संधी नष्ट करतो आणि अशा मैत्रीतून येणारी स्वतःच्या जीवनातली समृद्धीही गमावून बसतो. त्याच्या जीवनात लैंगिक इच्छेचं परिवर्तन जुलूम-जबरदस्तीत होतं. आपली महाविद्यालयं व विद्यापीठं अशा मुलांनी भरलेली आहेत. ‘सहशिक्षण’ हे या समस्येचं उत्तर असलं, तरी ते सोपं नाही. असं पाऊल उचलायचं असेल, तर शिक्षकांच्या प्रशिक्षणातही बदल करावे लागतील. चित्रपट आणि दूरचित्रवाणी ही माध्यमं स्त्री-पुरुषांच्या पारंपरिक प्रतिमांचा फायदा घेतात. शाळानी स्वतःच्या माध्यमांतून म्हणजे पाठ्यपुस्तकं व इतर साहित्यांतून स्त्री-पुरुषांच्या वेगळ्या प्रतिमा निर्माण करायला हव्यात.’’
नवमाध्यमांचा पूरक वापर
तेव्हा नवमाध्यमांचा विचार करताना इतरही अनेक गोष्टी कराव्या लागतील.
  सहशिक्षण देणाऱ्या शाळा वाढवणं
  माध्यमांचं शिक्षण सर्व स्तरांवर देणं
  पालकशिक्षण मोठ्या प्रमाणावर सुरू करणं
  माध्यमांनी मुलांचा विचार करून निर्मिती करणं
  समाजानं मुलांचं भान ठेवणं
  शाळांनी आपल्या जबाबदाऱ्या ओळखणं.
दर बालदिनाला प्रत्येक संस्थेनं मुलांच्या भल्याचा एक निर्धार करावा आणि वर्षभर तो प्रत्यक्षात आणावा. तरच मुलींची आणि मुलांचीही परिस्थिती बदलेल.
माध्यमांचा असाही विचार ...
  •   ‘डोरेमॉन’सारखी काही कार्टून्स मुलांना दाखवायला हरकत नाही. त्यातून अनेक सर्जनशील कल्पनाही मुलांना मिळतील; मात्र त्याच वेळी ‘प्रत्येक वेळी डोरेमॉन आपल्याला मदतीला येत नसतो बरंका! आपली मदत आपल्यालाच करायला लागते,’ अशा प्रकारच्या गप्पा मारून मुलांना पुन्हा जमिनीवर आणायलाही शिकवा.
  •   मोबाईलवरच्या हिंसक गेम्स का वाईट असतात, हे मुलांना आवर्जून समजावून सांगा. मात्र, त्याच वेळी त्यांना या माध्यमाशीही मैत्री करू देणाऱ्या, तंत्रज्ञानाच्या जगाची चुणूक दाखवून देणाऱ्या त्यांच्या वयाला साजेशा काही गेम्स जरूर खेळायला द्या.
  •   पुस्तकांचे नवे ट्रेंड्‌स कोणते आहेत ते मुलांकडूनच जाणून घेऊन, ती पुस्तकं मुलांना जरूर वाचायला द्या. पुस्तकं विकत घ्या किंवा मुलांना जिथं निवडीसाठी वाव असेल, अशा ग्रंथालयांत आवर्जून नोंदणी करा.
  •   चित्रं काँप्युटरवर काढणं मुलांना आवडतं. मात्र, हातानं चित्र काढण्यातली सर्जनशीलता त्यांना दाखवून द्या आणि काँप्युटरवरच्या तंत्रज्ञानामुळं काय साधता येतं हेही दाखवून द्या.
  •   ‘फेसबुक’, ‘व्हॉट्‌सॲप’ अशा सोशल नेटवर्किंग साइट्‌स; क्रेडिट कार्डस, एटीएम मशीन्स अशा गोष्टींशी मुलांचा थेट संबंध नसतो. मात्र, त्याबद्दल ती विचारणा करत असतात. मात्र, अशा वेळी मुलांना झिडकारू नये. ‘तुला काय करायचंय आत्ता’ असे प्रश्‍न न विचारता त्यांना या नव्या गोष्टींचे फायदे-तोटे समजावून सांगा. तंत्रज्ञानाशी संबंधित एखाद्या छोट्या कृतीत मुलांना अधूनमधून सहभागी करून घ्या; मात्र ‘हे सगळं या वयात करण्यासाठीचं नाही,’ याचं भानही वेळोवेळी देत राहा.   
  •   अनेक गोष्टी पारंपरिक माध्यमांद्वारे शिकवता येत नाहीत, अशा वेळी छोट्या दोस्तांसाठी तयार केलेल्या काही वेबसाइट्‌स, काही ॲप्स यांचा आवर्जून वापर करा. संगीत, चित्रं, ॲनिमेशन, रंग, आवाज या सगळ्या गोष्टींचा मिलाफ करणं नव्या तंत्रज्ञानामुळं शक्‍य होत असल्यामुळं अनेक गोष्टी समजायला सोप्या जातात, हेही लक्षात घ्या.
  •   लहान मुलांसाठीचे चित्रपट कमी झाले आहेत, हे खरं असलं, तरी नेटवर जगभरातले अनेक चित्रपट असतात. त्यांचीही ओळख मुलांना करून द्या. काही वेळा पालक त्यांच्यासाठीचे चित्रपट बघायला मुलांना नेतात. त्यापूर्वी तो चित्रपट लहान मुलांना बरोबर घेऊन जाण्याचा आहे का, हे कुणाला तरी जरूर विचारा.
  •   टीव्ही, चित्रपट वगैरेंसारख्या दुनियेपासून मुलांना एकदम न तोडता त्यांचा संयमित ‘डोस’ आणि मजा मुलांना जरूर घेऊद्यात.
  •   चित्रपट, टीव्हीची दुनिया एक स्वप्नमय विश्‍व आपल्यासमोर निर्माण करतं. मात्र, हे जग आभासी असतं, याचीही जाणीव मुलांना वेळोवेळी करून देत राहा.

Saturday, 24 February 2018

॥ आपला राग स्वस्त नका ठेवू॥


एका ठिकाणी एक मोठा हत्ती शांतपणे बसलेला असतो, तेवढयात एक कुरापती ऊंदराला हत्तीला चिडवयाचि हुक्की येते , तो आपल्या बिळातुन येऊन तो हत्तीला त्रास देवू लागतो, सुरवातीला हत्ती दुर्लक्ष करतो, पण नंतर ऊंदीराला मजा येवू लागते, हत्तीला त्रास देण्यात, हत्ती जागेवरुन ऊठतो आणी ऊंदराला मारण्या साठी त्याच्या बिळाच्चा दिशेने आपल्या डोक्याने टक्कर मारू लागतो, ऊंदीर आत असल्याने ऊंदराला काहीच फरक पडत नाही, तो परत दुसरी कडुन त्रास देत राहतो, कारण ऊंदराला पक्क माहीत होत की हा हत्ती प्रंचड ताकदवर आहे, तसाच त्याचा राग ही प्रंचड आहे, पण तरीही तो आपनास हरवु शकत नाही , कारण त्याचा राग आणी अतिऊत्साऊ पणाच त्याला नडेल, जितका ऊंदीर त्रास देऊ लागला, तितका हत्तीचा राग अजुन वाढु लागला , आणी आपन कुणाशी भांडतो कशासाठी भांडतोय , हे हत्तीच्या लक्षात आले नाही, शिवाय ऊंदाराचे तर कामच आहे कुरापतीं करणे, आपन तिकडे लक्ष न देता त्याच्याकडे दुर्लक्ष करूण आपन ऊंदराला हरवु शकतो हेही हत्ती विसरला, ऊंदीर आपल्याला आपल्या ऊद्देशापासुन लांब नेतोय हे पण हत्तीच्या ध्यानातच येत नसते, आणी शेवटी इतका मोठा बलाढ्य हत्ती , ऊंदराच्या फालतु गोष्टीमुळे , हत्तीने आपले डोके आपटुन आपदुन आपला जिव गमवाला,, आता यात ऊंदराचे काहीच नुसकान झाले का ? नाही, उलटे ऊंदाराने चागले स्वतःच मनोरंजन करून घेतले, वरून एका बलाढ्य हत्तीला हरविण्याचा श्रेय आणी आनंद मिळवला , हत्ति त्याच्या ताकदीच्या गर्वाने झुकवल आणी बुद्धीने काम करण थांबवल, जर वेळीच त्याने विचार केला असता , आणी त्याप्रमाणे वागला असता, तर अस कोणही त्याची ताकद आणी रागाचा गैरफायदा घेतला नसता,,,,,
तात्पर्य,,,,,
समाजात पण असच होत असत, एकदा का कळाल की आपन गरम डोक्याचे आहात आणी रागा मध्ये भान विसरून जातो, तेव्हा छोटा ऊंदीर ही आपला नाश करु शकतो,,,,,,, शांत रहा आणी चांगला निर्णय घ्या , आपल्या जीवनात विजयी व्हा,,,,,,, ॥
|| श्री राम जय राम जय जय राम ||
||जय हनुमान ||

Friday, 23 February 2018

 🙏 *अध्यात्म म्हणजे काय?🙏*

(१) सर्वसाधारणपणे हा देह मन चालवत असतो त्यामुळे त्या मनात येईल ते आपण करत असतो. ते बरोबर की चूक हे त्याचा परिणाम ठरवत असते तेव्हा प्रत्येक गोष्टीचा परिणाम चांगलाच येण्यासाळूठी त्या मनालाच चालवायला आपण शिकले पाहिजे ते शिकवणारे शास्त्र म्हणजेच अध्यात्म.
(२) परमेश्वराने निर्मिलेल्या सर्वच गोष्टी सकारात्मक. त्या गोष्टीस जे आपले मन नकारात्मक विचाराने किंवा गोष्टीने झाकू पाहते तेंव्हा त्या नकारात्मक गोष्टी किंवा विचार नष्ट करण्यास लागणारे सत्य व कृती म्हणजेच आध्याम होय.
(३) परमेश्वर निर्मित सृष्टीच्या रचनेस व नियमावलीस समजून घेणे व त्यावर (जन्म, मृत्यू, संकटे, आनंद, दु:ख इ)पूर्ण विश्वास ठेवणे, त्याने डोके रिकामे ठेवण्याची म्हणजे अनावश्यक गोष्टींवर अजिबात लक्ष न देण्याची आठवण होऊन पूर्णतः दुर्लक्ष करण्याची सवय लावून घेण्याचे शिकवणारे शास्त्र म्हणजे अध्यात्म. अध्यात्म म्हणजे श्रध्दा जाग्रुत करणे.
(४) मनासारखे कोणालाच जगता येत नसते. परिस्थितीनुसार जगायला शिकवणारे शास्त्र म्हणजे अध्यात्म.
(५) मनात चांगल्या विचारामुळे चांगल्या इच्छा निर्माण होतात. चांगल्या इच्छा म्हणजे ज्या मनाला फक्त समाधानच देतात त्यांचा दुष्परिणाम नसतोच अशा सर्व इच्छा पूर्तीचा मार्ग म्हणजे अध्यात्म.
(६) मन शांत व स्वतःला स्थिर करण्याची व एकाच परमानंद भावनेत राहण्याची कला म्हणजे अध्यात्म.
(७) समस्या नष्ट करणारे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. तेव्हा कुठल्याही परिस्थितीला सक्षमपणे तोंड देण्यास ह्या देहाला तयार करते ते आत्मज्ञान आणी ते शिकवणारे शास्त्र म्हणजेच अध्यात्म.
(८) मनुष्य चुकीचा विचार करून चुकीच्या मार्गाने जाऊन अनावश्यक परिस्थिती ओढवून घेत असतो कारण मनुष्य भावनेत जगत असतो. भावनेमुळेच तो सुखी अथवा दुखी होतो. सुखी भावना जर सुखी करते तर सर्वच भावना सुखकारक करण्यासाठी काम करणारे शास्त्र म्हणजे अध्यात्म.
(९) सत्य जाणून घेणे. वस्तूस्थिती ही सत्य व माया ही असत्य तेव्हा मायेच्या मोहातून बाहेर पडण्याचा अभ्यास करणे आवशक असतेच. म्हणून खरे सुख काय व कशात आहे हे जाणण्याचा सराव म्हणजे अध्यात्म.
(१०) नि:शंक व निर्भय मन शरीराला पुरेशी झोप/ताकद/आरोग्य देते. भीती फक्त मनात असते, अन्य कोठेही नसते. नको ते विचारच पराभवाला कारण असतात. ते काढून टाकायला शिकवणारे शास्त्र आणि मग हे नि:शंक मन सतत परमेश्वराची आठवण ठेवते. मग त्या आनुशंगाने परमेश्वराच्या सान्निध्यात राहणे व याच रीतीने नि:शंक होऊन निर्भय होण्याचा मार्ग म्हणजे अध्यात्म.
(११ ) द्विधा मनस्थितीत माणूस बेचैन राहतो तर एकच मनोमन पटलेली गोष्ट करण्यास तो केव्हाही तयार असतो. अशा द्वैताकडून अद्वैताकडे म्हणजे मी श्रद्धा युक्त अंत:करणाने कोणत्या ही देवाला कोठेही, केव्हाही नमस्कार केला तर तो माझ्या मनोदेवतेलाच असतो हा विश्वास शिकवणारे शास्त्र म्हणजे अध्यात्म.
(१२ ) समोर सर्वच जण सर्वांनाच चांगले म्हणत असतात पण माघारी चांगले म्हणवणारे शास्त्र म्हणजे अध्यात्म.
(१३) देहबुद्धीच्या पलीकडे जाणे/स्वानंद, म्हणजे मनाला ज्या गोष्टीत आनंद वाटतो त्यात सतत रममाण असणे अशी एकाच गोष्ट म्हणजे आध्यात्म. देहबुद्धी विसरणे म्हणजे देह विसरणे नव्हे तर एक प्रकारे देहाच्या अनावशक क्रिया विसरणे. याने काही नुकसान न होता अध्यात्मात प्रगतीचे असणारे पहिले महत्त्वाचे पाऊल आहे..
(१४) मनाची तगमग थांबवण्याचे शिकण्यासाठी अध्यात्म. अध्यात्म हे मनाला बंधन नसून चुकीच्या मार्गापासून वाचून जीवनाचा खरा आनंद घेण्याचे प्रभावी साधन आहे. प्रत्येक माणसाला कसली तरी चिंता, काळजी आहेच. ती दूर करण्याचे शास्त्र अध्यात्मात आहे. आणि संपूर्ण अध्यात्म हे नामात आहे!
(१५) अध्यात्मातील व्यक्ती वरकरणी जरी वेडगळ वाटत असली तरी आतून ती अत्यंत ज्ञानी असते व इतरांचे अज्ञान न्याहाळत असते व ते दूर करण्याच्या प्रयत्नात असते. आपण आपली पात्रता वाढवण्यास शिकावे. पात्रता वाढवण्यासाठीच आध्यात्मात ही प्रतिस्पर्धी हवा.
(१६) थोडक्यात सकारात्मक जगायला शिकवते ते अध्यात्म. अध्यात्म या शब्दाची फोड अधि म्हणजे शरीर व त्यात वास असणाऱ्या आत्म्याचे अध्ययन करणे म्हणजे शिकणे ते अध्यात्म.
.......अध्यात्म निरूपण समूहा वरून

|| श्री राम जय राम जय जय राम ||
||जय हनुमान ||


★‘‘ मनाचा एक्स-रे’’ (प्रतिबिंब)★
-:डॉ .दत्ता कोहिनकर:-
सिग्मंड फ्राईड एकदा बायको व मुलाला घेऊन बागेत फिरायला गेला. मुलगा छोटा होता. आई-वडील गप्पात गुंग झाल्यावर तो हळूच तेथून संधी साधून गायब झाला. थोडया वेळानंतर समोरच खेळणारा मुलगा गेला कुठे म्हणून आई कासावीस झाली. घाबरून ती इकडे तिकडे त्याला शोधण्यासाठी पळू लागली. घाबरलेल्या, सैरावैरा पळणार्‍या आपल्या पत्नीला फ्राईड म्हणाला, ‘‘अगं मला एवढंच सांग आपला बागेत जायचा बेत ठरला तद्नंतर तू त्याला अमुक एक जागी जाऊ नकोस असं काही सांगितलं होतं का?’’ ती म्हणाली हो, ‘‘बागेतल्या कारंज्याजवळ जाऊ नको असं बजावलं होतं. त्याने, लगेच बायकोला घेऊन कारंज्याकडे कुच केली. मुलगा कारंज्याच्या थुई-थुई नाचणार्‍या पाण्यात पाय बुडवून मजेत पाण्याचे फवारे अंगावर घेत नाचत होता.’’ बायकोने मुलाला हाक मारली व फ्राईडचा हात धरत विचारलं, ‘‘तुम्हाला सिध्दी प्राप्त झालीय का ? हा कारंज्याजवळच आहे हे कसे तुम्हाला कळालं ?’’ फ्राईड म्हणाला - ‘‘सिध्दी-बिध्दी काही नाही, मला माणसाचं मन समजतं थोडंफार.’’
खरोखर मित्रांनो कवयत्री बहिणाबाईंनी म्हटल्याप्रमाणे आता भुईवर असणारं मन क्षणार्धात आकाशात जाते. प्रयोग करून पहा, डोळे मिटून ध्यान करताना ध्यानात माकडे यायला नकोत असा विचार केला कि दोन-तीन माकडं डोळयासमोर येतील. एखादया दारावर आत डोकावू नये अशी पाटी लावली कि आत डोकावण्याची तीव्र इच्छा मनात निर्माण होईल व काहीही करून आपण आत डोकावणारच.
एक राजा लढाईला जाताना राजमहालात आपल्या देखण्या राणीला ठेवून जिवलग मित्राकडे चावी देऊन राजा त्याला म्हणाला, ‘‘मित्रा मी जर तीन दिवसांत परत आलो नाही तर लढाईत माझा मृत्यू झाला असे समजून तू राजमहालाचे कुलूप उघड व राणी तुझीच असे समज.’’ राजा लढाईला निघाला. वाटेत एक तासानंतर तो विश्रांतीला थांबला. पाहतो तर काय त्याचा जिवलग मित्र खूप वेगाने घौडदौड करत चावी घेऊन आला व राजाला म्हणाला अरे यार ही किल्ली दुसर्‍या कुलपाची दिसतेय, राणीच्या महालाची नाही. पाहिलंत ना, राणीच्या मोहापायी तीन दिवसांनी कुलूप उघडण्याची राजाज्ञा त्याने धुडकावून लावली होती.
अंर्तमनाला एखादी गोष्ट करू नकोस असे ताकिद देऊन दरडावून सांगितले की ते तीच गोष्ट करून बघण्यासाठी धडपड करते. त्यावेळी बर्हिमनाने त्याला सहजपणे - हळुवारपणे, तत्वनिष्ठ भावनेने गोंजारत समजावून सांगितले व त्याचे फायदे-तोटे मैत्रीभावनेने लक्षात आणून दिले कि अंर्तमन-बर्हिमन यात सुसंवाद सुरू होतो. तेथे ताणाचा अजिबात लवलेश नसल्याने दुष्कृत्य घडत नाहीत. अंर्तमन व बर्हिमन यांच्यात सतत बोलणे चालू असते. त्यालाच स्वसंवाद असे म्हणतात. आपल्या मनाचा काही भाग आपण सर्वांना दाखवण्यासाठी प्रयत्न करतो. पण काही भाग मात्र कोणालाही व कधीही दिसू नये यासाठी आपण जागरूक असतो.
आपला भाव देवाला दिसावा असे भक्ताला वाटते, आपले प्रेम प्रेयसीला कळावे असे प्रियकराला वाटते, कविता रसिकांनी वाचावी व लोकांनी आपणांस दाद दयावी असे कवीला वाटते. आपल्या जीवनाचा काही भाग सगळयांना दिसावा पण संपूर्ण अंतरंग मात्र सगळयांना दिसावे, असे आपणास कधीच वाटत नाही. कारण आपण प्रथम आपले व नंतर जगाचे असतो.
मन हा आपल्या जीवनाचा गाभा आहे. जीवनाचे सारे रंग व तरंग सामावून घेणारे अंतरंग म्हणजे मन. निर्वाणाचा साक्षात्कार होतो तो मनाच्याच ठायी. सारे वेग व आवेग विराम पावतात ते मनाच्याच ठायी. जीवनाचे सुख-दुःख हे मनावरच अवलंबून असते. म्हणून मनात काय चाललेय याचा वारंवार एक्स-रे काढण्यासाठी सजग राहून दिर्घश्‍वसनाचा सराव करावा. थोडे चालणे, काही आसने करणे, सुर्यनमस्कार घालणे महत्वाचे असते. हे करण्याबरोबर मनाचे शांत चित्ताने तटस्थपणे निरिक्षण करावे त्यासाठी *रोज सकाळ-संध्याकाळ मांडी घालून शांत बसा. तटस्थपणे येणार्‍या जाणार्‍या श्‍वासाला डोळे मिटून जाणत रहा*. यामुळे मनातील विचारांचे वादळ हळूहळू शांत होऊ लागेल व मनाचा एक्स-रे व्यवस्थित पाहून मनानी मनानेच ऑपरेशन करून मनाला प्रसन्न करता येईल. शेवटी म्हणतात ना,
‘‘मन करा रे प्रसन्न - सर्व सिध्दीचे कारण.’’

Wednesday, 21 February 2018

॥ काहीतरी शिकण्यासारखे...॥
अभिनेता दिलीप कुमार म्हणतात
"जेव्हा माझं करिअर उंची वर होत... प्रसिध्दी पदरी होती माझ्या... सगळीकडे मान, सन्मान मिळायचा.. त्या वेळचा हा जीवनप्रसंग.....
एकदा मी विमानाने प्रवास करत होतो...
माझ्या बाजुला एक साधा, वयाने माझ्यापेक्षा मोठा असलेला प्रवासी बसलेला होता...
माणूस खुपच Simple...कपडे त्यांनी साधे च लावलेले... Middle class वाटत होता... पण तो प्रवासी सुशिक्षित वाटत होता..
मी विमानात आहो हे लक्षात येताच इतर प्रवासी मला हात दाखवू लागले... पाहू लागले.. पण माझ्या बाजुला बसलेला Gentleman ते आपल्या कामात मग्न होते... त्यांनी माझ्याकडे लक्ष पण नाही दिलं... ते वर्तमानपत्र (Newspaper) वाचत बसलेले.. खिडकी च्या बाहेर बघत होते.... पण ते माझ्याशी बोलले पण नाही... बोलणं तर दूरच बघितलं सुद्धा नाही..
जेव्हा चाय प्यायची वेळ आली मीच त्यांना Smile दिली...
ते पण हसून उत्साहाने मला Hello म्हणाले..
मग आम्ही बोलायला लागलो...
मी सिनेमाचा विषय काढला आणि त्यांना विचारलं, "सिनेमा बघता ना?"
ते म्हणाले, "हो, पण खुप कमी...खुप वर्ष झालीत शेवटचा सिनेमा पाहून.."
मी म्हटलं की मी स्वतः सिनेमात काम करतो..
"अरे वाह! काय करता तुम्ही?" त्यांनी मला विचारलं.....मी अभिनेता आहे त्यांना सांगितलं...
ते म्हणाले “अच्छा...छानच..”
जेव्हा आम्ही पोहोचलो... विमानाच्या बाहेर निघताच...
मी माझा हाथ समोर करून म्हटलं.. “खरंच, खुप छान वाटलं तुमच्या बरोबर प्रवास करून,, बाय द वे, माय नेम इज दिलीपकुमार’
त्यानी माझ्याशी हात मिऴवला आणि म्हटलं..’अरे वा....I am J. R. D. Tata!’
*त्याक्षणी मी शिकलो की तुम्ही किती पण मोठे व्हा,,तुमच्यापेक्षा नेहमीच कोणीतरी मोठं असणार.. “माणसानी अहंकार न बाऴगता नम्र असावं... It costs nothing”
-:दिलीप कुमार (अभिनेता)

*♻  सत्कर्म* ♻


 जगज्जेता अलेक्झांडर
जवळजवळ संपूर्ण जग जिंकून आपल्या सैन्यासह माघारी आपल्या देशात परतत होता. परंतु जाताना तो अतिशय गंभीर आजारी झाला.अनेक उत्कृष्ट उपाय करूनही आजारातून बरे होण्याची कोणतीही लक्षणे दिसत नव्हती. जिंकलेले संपूर्ण साम्राज्य, एवढी मोठी शूर सेना, आपली जगज्जेती तीक्ष्ण तलवार आणि अमाप संपत्ती, ह्या सर्वांचा त्याग करून आपणाला आता मृत्यूला सामोरे जावे लागणार ह्याची त्याला जाणीव झाली. आपण आता कोणत्याही परिस्थितीत आपल्या मायदेशी जीवंत पोहचू शकत नाही हे त्याला कळून चुकले. मृत्यूच्या शेवटच्या घटका मोजत असताना त्याने आपल्या सरदाराला पाचारण केले आणि म्हणाला ” मी आता लवकरच हे जग सोडून निघून जाणार आहे, माझ्या तीन इच्छा आहेत आणि त्या पूर्ण करण्याची सर्वस्वी तुमची जबाबदारी आहे."
सरदाराला साश्रूपूर्ण होय म्हणण्याशिवाय गत्यंतर नव्हते.
अलेक्झांडर म्हणाला:

*१*. माझी पहिली इच्छा “माझ्या खाजगी डॉक्टरनेच माझी शवपेटी एकट्यानेच उचलून न्यावी”
*२*. माझी दुसरी इच्छा “माझी शवपेटी स्मशानभूमीवर नेण्याच्या संपूर्ण रस्त्यावर मी आतापर्यंत जिंकलेले सर्व सोने, चांदी, जडजवाहीर पसरून ठेवावे”
*३*. आणि माझी अंतिम इच्छा ” माझे दोन्ही हात शवपेटीेच्या बाहेर काढून लोंबकळत ठेवावे.” आपला राजा आपणाला कायमचे सोडून जाणार, हे ऐकून सर्व सेना अतिशय दुःखी झाली. सरदाराने इच्छा पूर्ण करण्याचे आश्वासन दिले, तरी देखील हिम्मत करून प्रश्न विचारला, ” हे राजन, ह्या कसल्या विचित्र इच्छा." राजाने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला,“माझ्या आयुष्यात मी जे काही आता शिकलो, ते सर्व जगाला माहीत व्हावे म्हणूनच ह्या तीन इच्छांची पूर्तता करणे गरजेचे आहे” माझ्या खाजगी डॉक्टरने माझी शवपेटी एकट्यानेच उचलून न्यावी, ह्यातून मला जगाला एक संदेश द्यावयाचा आहे की, जगातील कोणीही उत्कृष्ट डॉक्टर देखील तुम्हाला मरणापासून वाचवू शकत नाही मरण हे अंतिम सत्य आहे. त्यामुळे जीवन हे गृहीत न धरता ते चांगल्या प्रकारे कोणालाही न दुखावता कसे जगता येईल हा प्रत्येकाने प्रामाणिकपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे. जगज्जेता म्हणून नावलौकिक प्राप्त करण्यासाठी मी आयुष्यभर सतत लढाया केल्या, अपार संपत्ती गोळा केली,पण मरताना मात्र मी काहीच घेवून जाणार नाही,
म्हणूनच माझी दुसरी इच्छा “माझी शवपेटी स्मशानभूमीवर नेण्याच्या संपूर्ण रस्त्यावर मी आतापर्यंत जिंकलेले सर्व सोने, चांदी, जडजवाहीर पसरून ठेवावे,केवळ संपत्ती कोणत्याही प्रकारे जमविणे म्हणजेच जीवन नाही." हा संदेश लोकांना मिळेल आणि अशी संपत्ती मिळविण्यासाठी केलेली धावाधाव म्हणजेच जीवनातील अमूल्य वेळेचा कालापव्य. जनतेला कळू द्या मी रिकाम्या हातानेच ह्या जगात आलो आणि रिकाम्या हातानेच हे जग सोडून जात आहे, म्हणून माझी तिसरी इच्छा” माझे दोन्ही हात शवपेटीेच्या बाहेर काढून लोंबकळत ठेवावे." हे सर्व सांगून थोड्याच वेळात त्याचा मृत्यू झाला.

 *तात्पर्य*
*माणुस मरतांना शेवटी काहीच सोबत नेत नाही.फक्त कर्मच सोबत येते .म्हणजे जेव्हा काळाची उडी पडेल तेव्हा कोणीही वाचवू शकत नाही*.
*सगळं इथेच ठेवून जायचे आहे.*
*एक माणूस म्हणून या संसारात चांगले  वागावे, आणि  चांगली कर्मे करावीत*.

Tuesday, 20 February 2018

🌼🌼🌼

स्त्रियांमध्ये कोणते गुण असावे याबद्दल श्री समर्थ रामदास स्वामी महाराज लिहितात —

🌼🌼🌼

शक्ती बुद्धी विशेष ।
नाही आलस्याचा विशेष ।
कार्यभागाचा संतोष ।
अतिशयेसी ॥
स्त्रियांना काम करावयाचे तर शक्ती पाहिजे आणि काम कसे करावे यासाठी बुद्धीही पाहिजे आणि काम करताना आळस नसावा. समर्थांच्या मते आळस हा मनुष्याचा शत्रू आहे. केलेल्या कामाचा संतोष असावा. कोणालाही खाऊ घालताना तृप्त वृत्ती असावी.
ही ओवी समर्थ रामदास स्वामींच्या ‘स्वयंपाकिणी’ या स्फूट समासातील आहे. समर्थ रामदास हे असे संत आहेत की, ज्यांनी जीवनातील प्रत्येक गोष्टींवर मार्गदर्शन केले आहे.
आता ऐका स्वयंपाकिणी ।
बहुत नेटक्या सुगरणी ।
अचूक जयांची करणी ।
नेमस्त दीक्षा ॥
स्वयंपाक करताना पदार्थ नीट करावे ते कसे असावे -
गोड स्वादिष्ट रुचिकर ।
येकाहून येक तत्पर ।
न्यून पूर्णाचा विचार ।
कदापि न घडे ॥
घरात होणारा स्वयंपाक हा घरातील सर्व व्यक्तींना योग्य अशा प्रकारचा असला पाहिजे.
रोगी अत्यंत खंगले ।
तेणे ते अन्न पाहिजे भक्षिले ।
भोजन रुचीने गेले ।
दुखणे तयाचे ॥
अत्यंत खंगलेल्या रोग्यालाही उत्तम वाटेल असे अन्न सुगरणीने करावे जेणे करून ते अन्न खाल्ल्याने त्याचे दुखणेही दूर होईल.
उत्तम अन्ने निर्माण केली ।
नेणो अमृते घोळिली ।
अगत्य पाहिजे भक्षिली ।
ब्रह्मादिप्ती॥
स्वयंपाक असा असावा की, जणुकाही अमृतच टाकले आहे असे वाटावे. देवांनाही आवडेल असा रुचकर स्वयंपाक करणे हे सुगरणीचे काम असते.
सुवासेची निवती प्राण ।
तृप्त चक्षू आणि घ्राण ।
कोठून आणिले गोडपण ।
काही कळेना ॥
स्वयंपाकाच्या नुसत्या वासाने अंत:करण आनंदित झाले पाहिजे. डोळे आणि नाक तृप्त झाले पाहिजे. या पदार्थांची चव इतकी छान असावी की इतकी सुंदर चव कशी आली असा खाणार्‍याला प्रश्‍न पडला पाहिजे. याचे नेहमी पाहत असलेले उदाहरण म्हणजे महाप्रसादाचे जेवण होय. काही विशेष न टाकताही देवासाठी आत्मीयतेने केल्यामुळे महाप्रसादाचा स्वयंपाक अप्रतिमच होतो. तसा घरी कितीही मसाले टाका पण होत नाही.
एवढा उत्तम स्वयंपाक केला की मग प्रथम देवाला नैवेद्य दाखवावा.
देव वासाचा भोक्ता ।
सुवासेचि होये तृप्तता ।
येरवी त्या समर्था ।
काय द्यावे ॥
देवाला आपण नैवेद्य दाखवितो. देव फक्त वासानेच तृप्त होतो. आपण सामान्य माणसे देवाला काय देणार. देवाला नैवेद्य दाखविल्यानंतरच बाकीच्यांना जेवावयास वाढावे. जेवताना देवाचे नामस्मरण करावे.
जनी भोजनी नाम वाचे वदावे ।
अति आदरे गद्यघोषे म्हणावे ।
हरीचिंतने अन्न सेवीत जावे ।
तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे ॥
अशा प्रकारे गृहिणीने स्वयंपाक केला तर सर्व कुटुंबाचे आरोग्य उत्तम राहील. सुदृढ कुटुंब सुदृढ समाज निर्माण करेल. अशा या स्वयंपाकाची फलश्रुती समर्थ सांगतात-
भव्य स्वयंपाक उत्तम |
भोजनकर्ते उत्तमोत्तम |
दास म्हणे भोक्ता राम |
जगदांतरे ||
अशाप्रकारे केलेले मिष्टान्न चवीने ग्रहण करणारे लोक तृप्त झाले म्हणजे श्रीरामच संतोष पावतात. कारण श्रीरामच सर्वांच्या अंतरी असतात.

|| श्री राम जय राम जय जय राम ||
||जय हनुमान ||