Monday, 7 August 2017

व्हाट्सअप्प बणवणाऱ्या जान कोउम ची कहाणी | story of whatsapp founder jan koum

नकारात्मक लोकांना कुठल्या हि संधी मध्ये काहीना काही अडचण दिसते, तर सकारात्म लोकांना अनंत अडचणीत देखील संधी दिसत असते. आज आपण अशाच एका सकारात्म व्यक्ती बदल माहिती घेणार आहोत. ज्याचा आयुष्यात अन्न पाण्या सारख्या मूलभूत गोष्टींसाठी देखील संघर्षच लिहलं होत. त्यात त्या माणसाने जिद्दीच्या जोरावर आयुष्यातील खाच खळगे भरत, अमेरिका मधील सर्वात श्रीमंत व्यक्तींचा यादीत आपले नाव शामिल केलं.
आज आपण व्हाट्सअप ला बनवणाऱ्या जान कोउम( jan koum) बद्दल माहीती घेणार आहोत. ज्या जान कोउम ला फेसबुक ने त्याचा क्षमतेवर बोट ठेवून नौकरी नाकारली, त्याच फेसबुक ला कोउम ने त्याने तयार केलेला व्हाट्सअप 19 बिलियन डॉलर्स मध्ये विकले. ही रक्कम भारतीय करन्सी मध्ये जवळपास 1 लाख करोड एवढा होतो.

सुरुवातीचा काळ

कोउम च जन्म हे युक्रेन मध्ये झालं होतं. त्याचे वडील बांधकाम मजूर होते. तर आई एक गृहिणी होती. त्याचं आयुष्य खूप खडतर होते. ते 2 वेळच्या अन्न पाण्यासाठी देखील ते महाग होते. त्या वेळी युक्रेन मध्ये वातावरण खूप अस्थिर होत. मग त्यांनी युक्रेन सोडून अमेरिका मध्ये आश्रय घेण्याचा निर्णय घेतला.
जान फक्त 16 वर्षाचा असताना त्याचा कुटूंबानी माउंटन व्हिएव (mountain view) कॅलिफोर्निया येथे स्थलांतर केलं. त्यांना एका सामाजिक संस्थेने त्यांना दोन खोल्यांचं एक लहान घर देऊ केलं होतं. ईथे देखील त्यानां खूप संघर्ष करावा लागला. घर चलवण्या साठी कोउम च्या आईने घरातच बेबी सीटर काम करायला सुरुवात केली. जान कोउम देखील पेपर टाकणे, दुकानातील फारश्या पुसणे इत्यादी कामे करून आईला आर्थिक मदत केली. या काळात कोउम ला तासंतास जेवण मिळवण्या साठी अन्नछत्रा बाहेर उभे राहावे लागत.
पण म्हणतात ना वेळ चांगला असो किंवा वाईट ते नक्की बदलत असते. जान कोउम चे देखील दिवस हळू हळू बदलत होते. त्याने 19 वर्षी एक कॉम्प्युटर विकत घेतला त्याला प्रोग्रामिंग ची आवड होती. तो सर्व काही पुस्तके वाचून स्वतः शिकला होता. त्यांने काही दिवस एका हॅकर ग्रुप WooWoo मध्ये हॅकर म्हणून ही काम केलं आहे.
पुढे कोउम ने सॅन जोश स्टेट युनिव्हर्सिटी मध्ये ऍडमिशन घेतलं. त्या सोबत एर्णस्ट अँड यंग (Ernest and Young) या कंपनीत रात्री सिक्युरिटी टेस्टर म्हणून जॉब करत असे. शिक्षणा नंतर त्याने yahoo येथे जॉब करायला सुरुवात केली येथेच त्याला एक मित्र मिळणार होता ज्याचा सोबत तो इतिहास रचणार होता.

ब्रायन ऍक्टन सोबत ओळख

Yahoo मध्ये कोउम ने 10 वर्षा काम केलं आहे. त्या काळात त्याला ब्रायन ऍक्टन (Brian Acton) नावाचा जिवलग मित्र मिळाला, तो yahoo मध्ये advertising सिस्टीम सांभाळत असे. त्यांचे एक दुसऱ्या सोबत खूप जास्ती पटत असे. या काळात ते एकमेकांचे खूप जिवलग मित्र झाले. नंतर कोउम आणि ऍक्टन दोघानी स्वतःच स्टार्टअप सुरु करायच विचार केला. फेसबुक आणि ट्विटर सारखं मोठं निर्माण करण्याचा ध्येयाने त्यांनी 2007 साली yahoo कंपनीला ला राजीनामा दिला.
पहिला वर्ष त्यांना काहीच जमले नाही. त्यांचा कडे असलेले पैसे हळू हळू संपत होते. निराश होऊन त्यांनी परत जॉब करायचं ठरवलं. त्यांनी फेसबुक आणि ट्विटर मध्ये जॉब साठी अप्लाय हि केला. पण इंटरविव्ह मध्ये त्यांना नाकारण्यात आले. कोउम आणि ऍक्टन दोघानी हा काळ खूपच अवघड असल्याचं ट्विर च्या माध्यमातून सांगितलं होतं.
पण कोणीतरी महान व्यक्तीने म्हंटले आहे की
सध्या तुमच्या जीवनात कठीन काळ असेल तर समजुन घ्या येणार काळ त्या प्रेक्षा कठीण असेल पण त्या नंतर मात्र सर्व चांगले आणि सोप्पे असेल.
त्याच प्रमाणे कोउम आणि ऍक्टन यांचं होतं. कोउम ने 2009 मध्ये अप्पल चा i-phone घेतला. आणि त्याला फक्त 7 महिने जूणा अँप स्टोर च्या क्षमते ची कल्पना आली. त्याला कळाले की मोबाईल ऍप्प तयार करणे खूप फायदाचे होऊ शकते.

whatsapp चा जन्म

कोउम ला त्याचा एका रशियन मित्राने इस्टंट मेसेजिंग ची कल्पना सुचवली. बाजारात इन्स्टंट मेसेजिंग ऍप्पस होत्या, जसे ब्लॅकबेरी मेसेंजर इत्यादी पण ते फक्त ब्लॅकबेरी च्या मोबाईल पुरतेच मर्यादित होत्या. नेमके हेच कोउम ने हेरले, त्याने कोणत्या ही फोन वर चालेल असा इन्स्टंट मेसेजिंग ऍप बनवायचं ठरवलं. त्याने तयार केलेल्या ऍप्प साठी whatsapp हे नाव नक्की केलं, आणि 24 फेब्रुवारी 2009 मध्ये कॅलिफोर्निया येथे स्वतःची whatsapp.inc कंपनी स्थापन केली.
सुरुवातीचा एक वर्ष व्हाट्सअप्प ला अपेक्षा प्रमाणे यश मिळाले नाही. कोउम हा परत निराश होऊन व्हाट्सअप्प बंद करण्या बाबत ऍक्टन कडे बोलणी केली. ऍक्टन ने त्याला आणखी एक वेळा प्रयत्न करण्याचा सल्ला दिला, आणि झालेही तसंच वापरण्यास सोप्पे आणि एकही जाहिरात नसलेला ऍप म्हणून व्हाट्सअप्प प्रसिद्धीस येऊ लागला. तो एवढा प्रसिद्ध झाला की फक्त 3 वर्षातच ऍप्पल च्या ऍप्प स्टोर मध्ये सर्वात जास्ती डाउनलोड केला जाणारा ऍप्प बनला. व्हाट्सअप्प आणि कोउम दोघांचे दिवस फिरले.
स्थापनेच्या फक्त 5 वर्षी नंतरच व्हाट्सअप्प ने यशाचे मोठे मोठे शिखर सर केले होते. अखेर फेसबुक च्या संस्थापक मार्क झुकरबर्ग याने व्हाट्सअप साठी 19 बिलियन डॉलर ची ऑफर कोउम कडे ठेवली. 19 बिलियन म्हणजे जवळपास 1 लाख 19 हजार करोड रुपये होतात. शिवाय व्हाट्सअप्प च्या मुख कार्यकारी मंडळा वर कोउमलाच ठेवण्याचा आश्वासन दिले गेले तेंव्हा कुठे कोउम ने 19 बिलियन डॉलर मध्ये व्हाट्सअप्प फेसबुक कंपनी ला विकायचं निर्णय घेतला. आणि गंमत म्हणजे या फेसबुक ने कोउम याला नौकरी नाकारली होती.
त्याने फेसबुक च्या ऑफर वर सही करण्यासाठी तेच ठिकाण निवडले जिथे, त्याने आयुष्यात सर्वात जास्ती कष्ट घेतलं होतं. जिथे त्याला तासंतास अन्ना साठी थांबावं लागलं. त्याचं कॅलिफोर्निया येथील अन्न छत्रात त्याने फेसबुक च्या करारावर सही केली. जान आता जरी श्रीमंत झाला असला तरी तो त्याचे गरिबीतले दिवस विसरला नाही.
 मित्रांनो आयुष्य असच असते. हजार कष्ट असले तरी आपले दिवस कधी ना कधी येणार या वर विश्वास ठेवायचं असते. यश मिळवण्यासाठी फक्त आणि फक्त एकच गोष्ट महत्वाची वाटते मला ती म्हणजे मैदानात टिकून राहणे बाकी सर्व ऑटोमॅटिक होतं .

॥ आयुष्याचा निर्णय कुणाचा? ॥
सुप्रसिद्ध लेखक देवदत्त पटनाईक ह्यांचं एक सुंदर पुस्तक वाचनात आलं "द गर्ल हू चोस". रामायणातल्या सीतेच्या भूमिकेला प्रकाशात आणणारं हे तासाभरात वाचून होणारं पुस्तक, परंतु जणू काही आपल्या सर्वच समस्यांचे उत्तर देऊन जाते.
आपल्या समस्यां काय? आपल्याला जे मिळते ते आपल्याला मान्य नसल्याने होणारा त्रास म्हणजे आपल्या सर्व समस्यांचे मूळ. जीवन हे एक चक्रात सुरु असते. कधी चागले तर कधी वाईट प्रसंग येत असतात. जे वाईट भासते ते व्हायलाच नको अशी आपली धारणा असल्याने त्याचा आपल्याला त्रास होतो. पण जास्त त्रास होतो जेव्हा आपण जे आपल्याला नकोसं असतं त्याचा दोष दुसर्या कुणाला तरी देत असतो.
आपला समज असा आहे कि "मी स्वतःसाठी वाईट कसे निवडणार"? त्यामुळे जे होत आहे त्याला दुसरे कुणीतरी, किंवा नशीब आणि देव तरी कारणीभूत आहे. आणि असा विचार करून आपण जास्तच दुखी होतो.
रामायणात सीतेच्या परिस्थितीला आणि भोगाला रावण आणि रामालासुद्द्धा कुठे ना कुठे कारणीभूत ठरवले जाते. पण खरंच तसे होते का?
पटनाईकांनी सीतेने केलेले पाच निर्णय संपूर्ण रामायणाला आणि सीतेच्या भोगाला कसे कारणीभूत ठरले ते आपल्या समोर ठेवले आहे.
*ते पाच निर्णय असे:*
१. रामाला वनवास ठोठावला गेल्यावर सीतेने त्याच्यासोबत वनवासात जायचा निर्णय स्वतः घेतला.
२. लक्ष्मणाने निक्षुन सांगितले असतांनाही तिने रावणाला भिक्षा द्यायला लक्ष्मणरेषा ओलांडण्याचा निर्णय घेतला.
३. जेंव्हा हनुमानाने सीतेला लंकेतून चलण्याचा आग्रह केला तेंव्हा सीतेने निर्णय घेतला कि रामाने तिथे येऊन रावणाचा पराभव करून तिला नेल्याशिवाय ती अयोध्येला परतणार नाही.
४. रावणाला हरवल्यावर रामाने सीतेला सांगितले कि त्याने आयोध्येची आणि कुळाची मर्यादा राखली, आता सीता तू कुठेहि जायला मोकळी आहे. त्यावेळी सीतेने रामासोबत जायचा निर्णय घेतला आणि त्यासाठी अग्निपरीक्षा देण्याचाही निर्णय घेतला.
५. सरते शेवटी जेंव्हा लाव- कुश भेटल्यावर आणि जन मानसाने कौल दिल्यावर रामाने सीतेला अयोध्येला परत चलण्याची विनंती केली, त्यावेळी सीतेने भूमीत परत जाण्याचा निर्णय घेतला.
ह्या सर्व निर्णयामागचे कारणं कुठलीही असोत, पण अधिकांश वेळी सीतेला निर्णय घेण्याचा अधिकार होता.
त्याच प्रमाणे आपल्या आयुष्यात होत असलेल्या अधिकांश घटनाक्रमांमध्ये आम्हाला निर्णय घेण्याची संधी मिळते. त्या वेळी आपण कुठला निर्णय घेतो हे आयुष्यातल्या पुढच्या घटनांना कारणीभूत ठरते.
तुमची पत्नी तुम्हाला हवं तशी वागत नाही? पण लग्न करताना तुम्ही तिची निवड केली होती... कुठल्या कारणाने? ती सुंदर दिसते? शिकलेली आहे? पैसा कमावते? व्यवस्थित रहाते? स्मार्ट आहे? स्टाइलिश आहे? ती तुम्हाला आवडली होती, पण त्यावेळी तिने तुमच्या इच्छेप्रमाणेच वागायला हवा अशी अट तुम्ही ठेवली होती का?
तुम्हाला नोकरीत हवा तेवढा पैसा मिळत नाही? पण ज्यावेळी शाळेत आणि कॉलेज ला आभ्यासात मेहनत करायची वेळ होती त्यावेळी तुम्ही पूर्ण मेहनत करायचा निर्णय घेतला होता का? कि त्यावेळी दोस्तानंसोबत वेळ घालवायचा निर्णय तुम्ही घेतला होता? नोकरीत बढतीसाठी नव- नवीन शिकायची आवश्यक्ता असते हे माहीत असतांना तुम्ही मेहनत घेतली कि दिवसभर काम करून थकून जातो म्हणून सोडून दिलं?
आणि ब्लड प्रेशर वाढणे चांगले नाही, डायबिटीज मुळे डोळे आणि किडनी खराब होतात, सिग्रेटी आणि तंबाखू सेवनाने आजार होतात इत्यादींची संपूर्ण जाणीव असतांना तुम्ही शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याची काळजी घेण्याचा निर्णय घेता कि... ?
आपलं आयुष्य कसं असावं हा निर्णय घेण्याचा अधिकार प्रत्येकाला असतो. जे विद्यार्थी आई वडिलांनी पसंतीचा करियर करू दिला नाही म्हणून आपल्या अपयशाचा दोष त्यांना देतात ते हि हमखास घरच्यांचा विरोध असतांनाही व्यसनं करतात आणि आपल्याच पसंतीचा जोडीदार आणतात. ह्या वरून स्पष्ट आहे कि आपल्याला जेथे सोईस्कर असते तिथे आपण आपले निर्णय घेतो आणि इतर ठिकाणी आपल्या त्रासाचा किंवा अपयशाचा दोष दुसऱयांना देतो.
रामायणाच्या ह्या वेगळ्या पैलूला आपल्या घरात जरूर जागा द्या. त्रास असतांना देखील आयुष्यातली संतुष्टी वाढेल आणि मुलांनाही जीवनाचा एक आवश्यक पैलू देता येईल.

Saturday, 5 August 2017

🌼🌼🌼 एक सुंदर बोध कथा... 🌼🌼🌼


वाल्मिकी ऋषींनी 'रामायण " लिहून पूर्ण केले .त्यांनी ते देवर्षी नारदाना वाचायला दिले . नारदांनी ते वाचून सांगितले कि " हनुमान " रचित रामायण , हे तुमच्या रामायणा पेक्षा खूप सुंदर आणि भक्तिपूर्ण आहे. वाल्मिकी म्हणाले , " काय ? त्या माकडाने पण रामायण लिहिले आहे ? " वाल्मिकींना हे आवडले नाही. मग, कोणाचे रामायण चांगले आहे ? हि जिज्ञासा त्यांना स्वस्थ बसू देईना ..ते हनुमानाच्या शोधात फिरू लागले . 
शोधता शोधता ते कर्दळी वनात, केळ्यांच्या बागेत आले . तेथील सात मोठ्या केळीच्या पानांवर रामायण कोरलेले त्यांनी पाहिले . त्यांनी ते संपूर्ण वाचले . त्यांनाही ते खूप भावले . अगदी योग्य शब्द , व्याकरण, व्याप्ती, भाषेचा ओघ, व ओघवती रसाळ भक्तिपूर्ण रचना ह्यांनी ते नटलेले होते. वाल्मिकींना ते सहनच झाले नाही . ते रडू लागले , ते स्वतःला आवरू शकले नाहीत.
"एवढे वाईट आहे का ?" हनुमानाने मागून विचारले. वाल्मिकी म्हणाले, " खूप सुंदर आहे ." हनुमान म्हणाले ," मग, तुम्ही का रडत आहात ? " वाल्मिकी म्हणाले ," आता, तुझे रामायण वाचल्यावर माझे रामायण कोणीही वाचणार नाही ".
हे ऐकल्यावर हनुमानाने ती सातही केळीची पाने फाडून टाकली ..चला, आता कोणीही हनुमानाचे रामायण वाचणार नाही .
हनुमान म्हणाले, माझ्या रामायणा पेक्षा तुम्हाला तुमच्या रामायणाची गरज आहे . जगात लोकांनी तुम्हाला वाल्मिकी म्हणून ओळखावे म्हणून तर तुम्ही रामायण लिहिले . माझे तसे नाही . मला माझा राम माझ्या सोबत सतत हवा म्हणून मी रामायण लिहिले .
त्याच क्षणी वाल्मिकींना जाणीव झाली कि मी एका हव्यासा पोटी रामायण लिहिले पण मला राम हा समजला च नाही . मी एका इर्षेपोटी रामायण लिहित गेलो, ते सत्य जगाला सांगण्याच्या गुर्मीत रामाला विसरून गेलो. मी रामायण लिहिले ते माझ्या तल्या "मी" ला सुखावण्या साठी , ती माझी महत्वाकांशा होती . हनुमानाने रामायण लिहिले ते त्याच्या " रामावरील भक्तिपोटी " . राम त्याचा सर्वस्व आहे आणि म्हणूनच ते जास्त सुंदर आहे .
" रामा " पेक्षा रामायण मोठे नाही. ज्याला राम कळला त्याला रामायण समजले कि नाही ह्याचा काहीच फरक पडत नाही .
श्री राम जय राम जय जय राम ..!!!